कलासक्त चित्रकार रवी परांजपे यांच्या निधनाला नुकतेच वर्ष पूर्ण झाले. ६० वर्षांहून अधिक काळ सौंदर्यपूर्ण चित्रनिर्मिती करणाऱ्या या कलावंताच्या चित्रांचे प्रदर्शन २० ते २६ जूनदरम्यान मुंबईच्या जहांगीर कलादालनात आयोजित करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने चित्रकार राहुल देशपांडे यांनी या सौंदर्यवादी चित्रकाराच्या चित्रशैलीचा घेतलेला मागोवा..

ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांनी ६० वर्षांहून अधिक काळ सातत्याने गुणवत्तापूर्ण चित्रनिर्मिती केली. त्यांची नवीन सृजनशक्यतांचा शोध घेण्याची वृत्ती, परंपरा व नवता यांचा मनोहारी संगम दर्शवणाऱ्या कलाकृती, रेखांकनप्रधान चित्रशैलीचा गौरव करणारी चित्रनिर्मिती ही त्यांची वैशिष्टय़े. उपयोजित कला व अभिजात कला अशा दोन्ही क्षेत्रांत आपल्या वैशिष्टय़पूर्ण शैलीचा अमीट ठसा उमटवणारा हा कलावंत. कलाइतिहासाकडे एका वेगळय़ा दृष्टिकोनातून पाहणारा चित्रकार, आपल्या क्षेत्रातील अपप्रवृत्तींना स्पष्टपणे विरोध करणारा, त्याचप्रमाणे होतकरू गुणी तरुणांना प्रोत्साहन देणारा, चित्रकाराची कलाविषयक भूमिका आणि निर्मिती याबाबत वैचारिक सुस्पष्टतेचा आग्रह असणारा कलाकार..

monolith monuments found in kumbhavade village,
राजापूरातील कुंभवडे येथे जांभ्या दगडात आढळली सात एकाश्मस्तंभ स्मारके
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Abhinav, Raosaheb Gurav , Raosaheb Gurav passed away, loksatta news, pune,
‘अभिनव’चे माजी प्राचार्य रावसाहेब गुरव यांचे निधन
javed akhtar got Asian culture award
जावेद अख्तर यांचा २१ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवात सन्मान, ‘हा’ पुरस्कार मिळाल्यावर म्हणाले, “हल्लीच्या चित्रपटांमध्ये…”
second phase of Taliye rehabilitation will be completed in June
तळीये पुनर्वसनाचा दुसरा टप्पा जूनमध्ये पूर्ण
marathi actress Ashwini Chavare bold photos
ओले केस अन् गळ्यात फक्त नेकलेस, मराठी अभिनेत्रीचे बोल्ड फोटो पाहिलेत का?
तर्कतीर्थ विचार: तर्कतीर्थांचे वेदाध्ययन
Marathi Actress Rucha Vaidya Engagement
अडीच महिन्यांपूर्वी आदिनाथ कोठारेच्या चित्रपटातून सिनेविश्वात पदार्पण करणाऱ्या मराठी अभिनेत्रीने उरकला साखरपुडा, फोटो आले समोर

रसिक, जाणकार, कलाव्यावसायिक, कलाअध्यापक आणि कलाविद्यार्थी यांना आपल्या गुणवत्तापूर्ण चित्रनिर्मितीने प्रभावित करणाऱ्या भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळातील प्रमुख कलाकार म्हणून चित्रकार रवी परांजपे यांचे स्थान महत्त्वाचे ठरते. १९६० साली आपल्या कारकीर्दीची सुरुवात करताना त्यांचा अभिजात कलेचा पाया भक्कम होता, तसेच त्यांचे रेखांकनावरही मनस्वी प्रेम होते. त्या काळात भारतात अंधानुकरण स्वीकारलेली आधुनिक चित्रकलेची लाट स्थिरावत होती. अशा कालखंडात त्यांनी उपयोजित कलेच्या क्षेत्रात, बोधचित्रकारितेत स्वशैलीसह आपला प्रभाव प्रस्थापित केला. पूर्वसुरींपेक्षा निराळी परंतु सौंदर्यपूर्ण अशी स्वत:ची चित्रभाषा त्यांनी वापरली. प्रकाशन व जाहिरात दोन्ही क्षेत्रांत त्यांची कामगिरी उंचावत गेली. परदेशातील कामाच्या संधीमुळे त्यांचा आत्मविश्वास आणि कामाचा आंतरराष्ट्रीय दर्जा दुणावला. त्यांच्या १९६०, ७०, ८०च्या दशकांतील बोधचित्रांमध्ये स्वातंत्र्योत्तर भारताच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय जीवनात घडून आलेल्या बदलांचे चित्रण प्रतिबिंबित झालेले दिसते. तो आज एक महत्त्वाचा दस्तऐवज ठरला आहे. छपाई तंत्रात घडून आलेले बदल आत्मसात करत त्यांनी कलात्मकता व प्रायोगिकता सांभाळत उच्च दर्जाची कलानिर्मिती केली. आधुनिकता आणि भारतीयत्व यांचा मिलाफ दर्शवण्यासाठी त्यांनी आपल्या रेखांकनप्रधान चित्रशैलीला पैलू पाडले. नवीन रंगमाध्यमे, साधने, चित्रतंत्र वापरत त्यांनी आपली चित्रभाषा अधिक समृद्ध केली.

वास्तुप्रकल्पाचे संकल्पचित्र हे त्यांनी चित्रकारांसाठी निर्माण केलेले क्षेत्र. यामध्ये त्यांनी कलात्मकता, रंगविचार या बाबतीत नवे मापदंड प्रस्थापित केले. याचे पुढे अनेक चित्रकारांनी अनुकरणही केले. त्यांचे एकूणच काम अभ्यासनीय व प्रेरणादायी आहे.अभिजात चित्रकलेच्या क्षेत्रातही त्यांनी आपला वेगळेपणा जपला. भारतीय ग्रामीण जीवनातील चित्रविषयाकडे जरी त्यांचा ओढा असला, तरीही ते केवळ निमित्त असे. रंग, रेषा आणि आकार यांचे चित्रअवकाशाशी असलेले नातेसंबंध शोधून त्याची एक सौंदर्यपूर्ण चित्ररचना करणे हाच मूळ गाभा असल्याचे जाणवते. चित्रातील आशय अधिक परिणामकारतेने पोहोचवण्यासाठी त्यांनी रंग, रंगलेपन तंत्र, चित्ररचना या बाबतीत अनेक प्रयोग केले. त्यांनी आधुनिक चित्रकलेतील सकारात्मक अंगाचा डोळसपणे अभ्यास करून स्वीकार केला होता. सौष्ठवपूर्ण रेखांकनासोबतच भारतीय पारंपरिक कला आणि लोककला यांचा मिलाफ करताना रेषा, बिंदू, रेषाखंड यांच्या वापरातून पोतनिर्मिती आणि अलंकरण एकाच वेळी साधले. यामुळे त्यांची चित्रे भारतीयत्व आणि आधुनिक कला यांचा मिलाफ साधणारी ठरली. साधेसुधे चित्रविषयसुद्धा एका वेगळय़ाच दृश्यानुभूतीचा अनुभव देणारे ठरले. याच दृश्यचिंतनातून त्यांनी कायमच नवीन सर्जनक्षितिजांचा शोध आपल्या चित्रनिर्मितीतून चालूच ठेवला. म्हणूनच त्यांची चित्रनिर्मिती साचेबद्ध न राहता विविध अंगांनी बहरली. रंगमाध्यमांचा प्रचलित पद्धतीने वापर न करता निराळय़ा पद्धतीने खूप वेगळे दृश्यपरिणाम त्यांनी मिळवले. आशयपूर्तीसाठी रंगमाध्यमांशी केलेला हा संवाद हे त्यांचे एक वैशिष्टय़ म्हणावे लागेल. तैलरंग, जलरंग, अॅक्रेलिक, कलर पेन्सिल, पोस्टर कलर अशा अनेक माध्यमांतील हे प्रयोग अभ्यासनीय व प्रेरणादायी आहेत.

स्वत:च्या विपुल चित्रनिर्मितीबरोबरच त्यांनी चित्रकला क्षेत्रासाठी भरीव योगदान दिले आहे. चित्रकलाविषयक पुस्तकांतून चित्रकलेच्या वैचारिक व तांत्रिक भागांवरील अनेक गोष्टी त्यांनी मुक्तपणे मांडल्या. अनेक चित्रकारांना मार्गदर्शन केले. त्यांच्या सहवासात आलेला प्रत्येक जण एक वेगळी दृष्टी घेऊन बाहेर पडत असे. म्हणूनच चित्रकला आणि शिल्पकला याबरोबरच संगीत, नृत्य, वास्तुशास्त्र, साहित्य या क्षेत्रांतील अनेक तरुण त्यांच्या संपर्कात होते. कलाकारांना ऊर्जा देणारे ते जणू एक शक्तिपीठच होते. चित्रकला व डिझाईनच्या क्षेत्रातील दिग्गजांना त्यांनी गुणिजन कला पुरस्काराने गौरवले आहे. चित्रकला क्षेत्रातील हा एक मानाचा पुरस्कार ठरला आहे. आपल्या अफाट कलाकर्तृत्वासह कृतीतून अनेक आदर्श निर्माण करणाऱ्या या श्रेष्ठ कलावंताचे सिंहावलोकनीय चित्रप्रदर्शन २० ते २६ जून दरम्यान मुंबईच्या जहांगीर कलादालनात आयोजित करण्यात आले आहे. त्यांच्या ६० हून अधिक वर्षांच्या संपन्न कलाकारकीर्दीचा आढावा घेणारे हे प्रदर्शन जाणकार, कलाअभ्यासकांसाठीही पर्वणीच ठरणार आहे.

Story img Loader