अँटिबायोटिक रेझिस्टन्स अर्थात प्रतिजैविकांच्या निष्प्रभतेने सध्या वैद्यकीय क्षेत्रात मोठीच खळबळ माजवली आहे. अर्थात कुठल्याही गोष्टीत सोयीस्कर पळवाट शोधणारे, आडमार्गाचा अवलंब करणारे आणि त्याचा पुरेपूर गैरवापर करणारे आपण भारतीय त्यात नेहमीप्रमाणे आघाडीवर आहोत. भारतात कोणतेही नवीन अँटिबायोटिक टाका, सहा महिन्यांत रेझिस्टन्स निर्माण होतो, असे म्हटले जाते. या अँटिबायोटिक रेझिस्टन्समुळे आपल्याला कोणत्या भयावहतेला तोंड द्यावे लागणार आहे, त्याविषयी आजच्या जागतिक आरोग्य दिनानिमित्ताने..

स्थळ : लंडन, मार्च २०१३.  सर अलेक्झांडर फ्लेमिंगच्या अस्वस्थ येरझारा व त्यांच्या चेहऱ्यावरील काळजी, ताण बघून त्यांचे सहकारी चिंतित झाले. ‘सर, नेमकं काय झालंय? तुम्ही इतके अपसेट का?’ ‘अरे, आज खूप दिवसांनी पृथ्वीवरील परिस्थितीचा मागोवा घेतला. सगळं संपल्यातच जमा आहे, असं वाटतंय रे. जीवजंतूंचे युद्ध हा मानव हरेल रे आणि तेही स्वत:च्याच घोडचुकांनी. आपण निर्माण केलेल्या युगाचा ऱ्हास बघतोय मी.’ फ्लेमिंग उत्तरले अन् सहकाऱ्याला परिस्थितीचा साधारण अंदाज आला आणि तोही व्यथित झाला.

yugendra pawar slams ajit pawar ncp for not opposing gopichand paradkar over his remarks on sharad pawar
पडळकरांच्या टीकेला विरोध करायला हवा होता;  युतीतील राष्ट्रवादीकडून युगेंद्र पवारांची अपेक्षा
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
account wise inquiry started against clerk in case of corruption in Jijamata Hospital of Municipal Corporation in Pimpri
पिंपरी : जिजामाता रुग्णालयातील रकमेचा अपहार; लिपिकाची खातेनिहाय चौकशी
ai complexity
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता नियमनाची किचकट प्रक्रिया
Onion prices fall due to increased production
नाशिक : आवक वाढल्याने कांद्याची घसरण
Saket Bridge, Mumbai Nashik Traffic, Road Widening,
मुंबई-नाशिक मार्गावर पुढील तीन महिने कोंडीचे, साकेत पुलाजवळील मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणास सुरूवात
What is the National Health Claim Exchange health insurance
आरोग्य विम्याची प्रक्रिया आता जलद? काय आहे ‘नॅशनल हेल्थ क्लेम एक्स्चेंज’?
nashik youth murder latest marathi news
नाशिकमध्ये युवकाची हत्या, चार संशयित ताब्यात

हे नोबेल विजेते शास्त्रज्ञ का इतके हताश होते? असं काय घडत होतं पृथ्वीवर?

४४४

स्थळ : लंडन, मार्च २०१३.

ब्रिटिश सरकारचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डेमी श्ॉली डेव्हिस यांनी ब्रिटिश पार्लमेंटला एक अभ्यासपूर्ण अहवाल सादर केला. तो होता अँटिबायोटिक्सविषयी. आपल्याकडील अँटिबायोटिक्स झपाटय़ाने निष्प्रभ होत आहेत व रोगजंतू बलाढय़ होत आहेत. अर्थात या ‘अँटिबायोटिक रेझिस्टन्स’मुळे येत्या काही वर्षांत जंतूसंसर्गावर उपचार करण्यासाठी आपल्याकडे एकही अँटिबायोटिक उरलेले नसेल. अतिरेकी हल्ले किंवा हवामान बदलाइतकाच धोकादायक असा हा प्रकार आहे. राष्ट्रीय आपत्तींमध्ये याचा समावेश व्हावा व याच महिन्यात होणाऱ्या ॅ8 समिटमध्ये हा विषय चर्चेला घ्यावा, अशी मागणी या अहवालात आहे. अँटिबायोटिक रेझिस्टन्स हा एक प्रकारचा टाइमबॉम्बच आहे आणि आपल्याकडे अवधी अगदी कमी उरलाय अशी पुस्तीही त्यांनी जोडली. हऌडने २०१० पासूनच याबाबत धोक्याची घंटा वाजवली होती आणि ही एक गंभीर ‘जागतिक आपत्ती’ (ग्लोबल थ्रेट) आहे असे जाहीर केले होते.

४४४

एखाद्या औषधप्रकाराच्या निष्प्रभ होण्याची दखल पराकोटीच्या उच्च पातळीवर घेतली जाते, यावरूनच मानवी आरोग्याच्या दृष्टीने ते किती महत्त्वाचे असेल हे लक्षात येईल.

अँटिबायोटिक्स म्हणजे प्रतिजैविके. जिवाणूंचा (बॅक्टेरिया) नायनाट करणारी औषधे. अगदी २० व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंतही जंतूच्या लागणीमुळे (इन्फेक्शन) संसर्गजन्य आजाराने होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण लाखाच्या घरात होते. १६ व्या शतकात प्लेगने निम्मा युरोप गारद केला होता. प्लेग, टीबी, कॉलरा, घटसर्प, यलो फीवर वा एकंदरच कोणतेही इन्फेक्शन हे असाध्य होते. किरकोळ शस्त्रक्रियांमध्येही शस्त्रक्रिया यशस्वी झाली तरी इन्फेक्शनने रुग्ण दगावण्याच्या घटना घडत होत्या.

सूक्ष्मजंतूंच्या या शतकानुशतकाच्या विजयी घोडदौडीचा अश्वमेध रोखला तो अलेक्झांडर फ्लेमिंगने. १९२८ साली फ्लेमिंग व त्याच्या सहकाऱ्यांनी पेनिसिलीन या पहिल्या अँटिबायोटिकचा शोध लावला व जंतूंच्या लढाईतील हे प्रभावी अस्त्र मानवाच्या हाती आले. अँटिबायोटिक या ‘मिरॅकल’चे युग सुरू झाले.

सूक्ष्मजंतूचे प्रकार अनेक, जंतुजन्य आजारही अनेक. त्यामुळे एकटे पेनिसिलीन  पुरणार नव्हतेच. मग हळूहळू इतर अँटिबायोटिक्स विकसित झाली. सल्फा, टेड्रासायक्लिन, स्टेप्टोमायसिन, क्लोरॅमफेनिकॉल, इरिथ्रोमायसिन अशी ही यादी १९८५-९० पर्यंत वाढतच राहिली. या औषधांमुळे सर्व जंतुजन्य आजार तर काबूत आलेच, शिवाय कॅन्सरचे उपचार, कृत्रिम अवयव प्रत्यारोपण (१ॠंल्ल ३१ंल्ल२स्र्’ंल्ल३) हेही निर्धोकपणे करता येऊ लागले.

जिवाणूंचा कर्दनकाळ

आता हे वाचून साहजिक वाटेल की, सारे तर सुरळीत आहे. अँटिबायोटिक बनवायला फार्मा कंपन्या आहेत, लिहून द्यायला डॉक्टर्स आहेत, विकायला फार्मसिस्ट आहेत व घेणारे रुग्ण आहेत. प्रॉब्लेम तरी नेमका कुठे आहे? याचे उत्तर अँटिबायोटिक्सच्या वेगळेपणात आहे. इतर सर्व औषधे शरीरातील पेशींवर काम करतात, तर अँटिबायोटिक शरीरातील जिवाणूंवर हल्ला करून त्यांचा नायनाट करते. रुग्णाला जिवाणूंच्या तावडीतून सोडवते. काही अँटिबायोटिक्स काही विशिष्ट जिवाणूंविरुद्धच प्रभावी (नॅरो स्प्रेक्ट्रम) तर काही अनेकविध जंतूसाठी कर्दनकाळ (ब्रॉड स्प्रेक्ट्रम).

सर्व जिवाणूंचा समूळ नाश व्हावा व इन्फेक्शन परत उलटू नये यासाठी अँटिबायोटिक ठरावीक काळासाठी डोस न चुकवता नियमितपणे घ्यावे लागते. सहसा ३, ४, ५, १० दिवस वा कधी अधिक काळासाठी ही औषधे घ्यावी लागतात. टीबी (क्षयरोग)साठी तर कमीत कमी सहा महिने घ्यावी लागतात. कोणत्या इन्फेक्शन्ससाठी कोणते अँटिबायोटिक द्यायचे यासाठी मार्गदर्शक तत्त्वे (ॠ४्रीि’्रल्ली२) असतात. आजाराची लक्षणे, तीव्रता, रुग्णाचे वय/ स्थिती बघून व काही वेळा रक्त, लघवी, थुंकी इ.ची तपासणी करून उपचार ठरवले जातात. थोडक्यात अँटिबायोटिकची गरज असेल तेव्हाच ते वापरणे. अचूक रोगनिदान करून योग्य मात्रेत व योग्य कालावधीसाठी ते घेतले तरच ते शस्त्र प्रभावी ठरते. पण आज आपल्याला अँटिबायोटिक रेझिस्टन्सने वेढले आहे. रेझिस्टन्सचा अर्थ इथे बंडखोरी. पूर्वी जे रोगजंतू या औषधांनी मारले जात होते, ते आज त्यांना दाद देईनासे झाले आहेत. अधिकाधिक स्ट्राँग अँटिबायोटिक्स वापरावी लागत आहेत. या बंडखोर रोगजंतूंनी, सुपर बग्सनी सध्या वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजवली आहे. गंभीर इन्फेक्शन झालेल्या, आयसीयुतल्या रुग्णांसाठी वापरायला आपल्याकडे फक्त एक ते दोन औषधे शिल्लक आहेत. भात्यातील अस्त्रे एकेक करून निकामी झाली आहेत.

हे असे का होते आहे? नेमके काय चुकतेय आपले? जे जिवाणू पूर्वी अँटिबायोटिक्सनी सहज मरत होते, त्यांना अमरत्व कसे लाभले? याचे एका शब्दात उत्तर आहे, अँटिबायोटिक्सचा गैरवापर. अतिवापर, कमी वापर किंवा चुकीचा वापरच या परिस्थितीला कारणीभूत ठरला आहे.

आपण सर्वच घटक- म्हणजे त्यात शासन, डॉक्टर्स, फार्मा कंपन्या, फार्मासिस्ट, रुग्ण असे सर्वच- या औषधांकडे फार निष्काळजीपणे बघत आहेत. हा कॅज्युअल दृष्टिकोन आज आपल्याला नडत आहे. सर्वच जगात अँटिबायोटिक रेझिस्टन्स हा प्रॉब्लेम असला तरी आपल्याकडे त्याची तीव्रता अधिक आहे व त्याची मोजदाद करणारी यंत्रणा, संख्यावारी आपल्याकडे फारशी नाही. भारतात कोणतेही नवीन अँटिबायोटिक टाका, सहा महिन्यांत रेझिस्टन्स निर्माण होतो, असे म्हटले जाते.

चुकीचा वापर

अँटिबायोटिकच्या चुकीच्या वापराचे काही प्रकार पाहू. डॉक्टरांनी समजा ५ दिवसांचा कोर्स लिहून दिला तरी अनेक रुग्ण काय करतात? जरा बरे वाटू लागले की एक-दोन दिवसांत औषध घेणे बंद करतात. तात्पुरते बरे वाटणे व बरे होणे यातला फरक ते समजून घेत नाहीत. अर्धवट कोर्स केल्याने जंतूचा पूर्ण नायनाट होत नाही. औषधाच्या तावडीतून वाचलेले जिवाणू आपल्या अस्तित्वाची लढाई चिवटपणे खेळतात. दर १० ते २० मिनिटांनी प्रजनन करणारे हे स्मार्ट सूक्ष्म जीव आपल्या शत्रूच्या (अँटिबायोटिक्सच्या) कामाची पद्धत जोखून चतुरपणे स्वत:मध्ये बदल (म्युटेशन) घडवून आणतात. मग ही नवीन बंडखोर पिढी त्या अँटिबायोटिकला बधत नाही. या उत्क्रांत होण्याच्या कलेमुळे जिवाणू बंडखोर व बलाढय़ होतात. हेच बंडखोर जंतू समाजात इतरत्र पसरतात आणि सर्व समाजातच अँटिबायोटिक रेझिस्टन्स निर्माण होतो.

ज्या रुग्णाने अँटिबायोटिकचा कोर्स अर्धवट सोडलेला असतो, त्या रुग्णामध्ये कालांतराने परत रोगजंतूंचा, तोही बंडखोर जंतूंचा प्रादुर्भाव होतो. तेव्हा अर्थातच आधी वापरलेले अँटिबायोटिक लागू पडत नाहीच व अधिक स्ट्राँग (व अधिक महागडेही) अँटिबायोटिक वापरावे लागते.

एकीकडे डॉक्टरांनी प्रिस्क्राइब केल्यावर दिलेले औषध नीट घ्यायचे नाही, पण दुसरीकडे स्वमनाने घ्यायचे असे विचित्र रुग्णवर्तन समाजात दिसते. अँटिबायोटिक्स ही जिवाणूंविरुद्ध उपयुक्त, विषाणूंविरुद्ध (५्र१४२ी२) नव्हे. म्हणजे सर्दी, जी विषाणूजन्य आहे त्यासाठी कोणतेही अँटिबायोटिक लागू पडत नाही व वापरायची गरजही नसते. पण अनेक रुग्ण सर्दीसाठी अँटिबायोटिक घेतात.  अँटिबायोटिक्स ही शेडय़ूल एच औषधे आहेत. म्हणजे ती केवळ डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शननेच घ्यायची असतात. कायद्याची अंमलबजावणी तितकीशी कडक नसल्याने प्रिस्क्रिप्शनशिवाय अँटिबायोटिक्स फार्मसीच्या दुकानातूनही विकली जातात. डॉक्टरांकडे जाण्यात वेळ जातो, खर्च होतो अशा कारणांनी परस्पर स्वमनाने औषधे घेतली जातात. या सेल्फ मेडिकेशनमध्ये रुग्णांना आपण अँटिबायोटिक हे वेगळ्या प्रकारचे औषध वापरत आहोत याची जाणीव नसते.

ताप उतरण्यासाठी काय वापरता, असा प्रश्न एका पाहणीत विचारला असता बऱ्याच जणांनी अँटिबायोटिक्स गोळ्यांचा निर्देश केला. त्यांच्या लेखी पॅरासिटॅमॉल व अँटिबायोटिक दोन्ही तापासाठीच होते. दिल्लीतील एका सव्‍‌र्हेमध्ये ५३ टक्के लोकांनी स्वमनाने (नुसते औषधाचे नाव सांगून किंवा जुने प्रिस्क्रिप्शन वापरून किंवा फार्मसिस्टलाच विचारून) अँटिबायोटिक्स घेतल्याचे दिसले. रुग्णाचे सेल्फ मेडिकेशन किंवा कोर्स अर्धवट सोडणे, फार्मसिस्टनी प्रिस्क्रिप्शनशिवाय विक्री करणे यामुळे अँटिबायोटिक्सचा कमी, अती व चुकीचा वापर वाढत जातो.

रुग्णअपेक्षांचा व मागणीचा परिणाम

आता थोडे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन प्रॅक्टिसेसकडे बघू. अनेक डॉक्टर्स जरी अँटिबायोटिक्सचा अगदी रॅशनल वापर करताना दिसले तरी हे चित्र दुर्दैवाने सार्वत्रिक नाही. अनेक प्रिस्क्रिप्शनमध्ये अँटिबायोटिकचा भरमसाठ वापर दिसतो. मग यात नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक (फटढ२) आले, भोंदू डॉक्टर्सही आहेत व क्रॉसपॅथी (आयुवेर्दिक, होमिओपॅथी, युनानी डॉक्टर्स) करणारे डॉक्टर्सही आहेत.

गरज नसताना अँटिबायोटिक देणे, छोटे (’६ी१) अँटिबायोटिक वापरून चालले असते; तरी स्ट्राँग, महागडे अँटिबायोटिक वापरणे, डोस कालावधी चुकीचा असणे, दोन-तीन अँटिबायोटिक एकत्र देणे, असे अनेक प्रकार प्रिस्क्रिप्शन्समध्ये दिसतात. यामुळे साहजिकच रेझिस्टन्सला प्रोत्साहन मिळते.

हऌडने मुंबईत केलेल्या १०० डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन सव्‍‌र्हेमध्ये क्षयरोगासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या तब्बल ८० औषधयोजना (रेजिमेन) आढळल्या. दुसऱ्या एका सव्‍‌र्हेमध्ये १८ टक्के रुग्णांना सर्दीसाठी अँटिबायोटिक प्रिस्क्राईब केले गेले होते.  पण याबाबतीत दोन मुद्देही लक्षात घेतले पाहिजेत. अनेक रुग्णांना ताबडतोब बरे व्हायचे असते, तशी त्यांची अपेक्षा असते. त्यासाठी अनेकदा डॉक्टरांवर दबावही टाकला जातो. ‘मला उद्या ऑफिसला गेलेच पाहिजे, एकदम स्ट्राँग औषध द्या’, या रुग्णअपेक्षांचा व मागणीचा परिणामही अनेकदा प्रिस्क्रिप्शनवर होत असतो. इन्फेक्शन जिवाणूजन्य आहे की विषाणूमध्ये हे झटपट समजण्यासाठी तशा रोगनिदान चाचण्यांची सुविधा हवी व त्या चाचण्या करण्यासाठी रुग्णाची मानसिक, आर्थिक तयारीही हवी. याचा अभाव दिसतो. गुंतागुंतीच्या इन्फेक्शन्समध्येच फक्त सहसा चाचण्या केल्या जातात. याशिवाय महत्त्वाची बाब म्हणजे बाजारात शंभरेक अँटिबायोटिक्सची १०,००० उत्पादने आहेत. त्यात अनेक शास्त्रीयदृष्टय़ा तर्कविसंगत औषध मिश्रणेही आहेत. अर्थात ही सर्व उत्पादने खपवायला फार्मा कंपन्यांची चढाओढही असतेच. त्या मार्केटिंग तंत्राचा प्रभाव अनेक डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन प्रॅक्टिसवर दिसतो.

आधी म्हटल्याप्रमाणे आपण सर्वजण या अँटिबायोटिक्सकडे खूप कॅज्युअल दृष्टीने बघत आहोत व त्याचे दुष्परिणामही भोगत आहोत. दिल्लीतील रुग्णालयात कोणत्याही अँटिबायोटिकना दाद न देणारे जंतू पूर्वीच सापडले आहेत. त्याचा रिपोर्ट ‘लॅन्सेट’ या प्रतिष्ठित वैद्यकीय जर्नलमध्ये आल्यावर आपली लोकसभाही हादरली होती. त्यामुळे आता गरज आहे ती युद्ध पातळीवरून उपाययोजना करण्याची.

काही ठोस उपाय

१) अँटिबायोटिकबाबतीत राष्ट्रीय धोरण (नॅशनल अँटिबायोटिक पॉलिसी) तयार केले जावे. यात रोगनिदान चाचण्या, अँटिबायोटिक वापरासाठी गाइडलाइन्स असाव्यात. विभागीय पातळीवरही गाइडलाइन्स तयार करण्यात याव्यात आणि त्यांची अंमलबजावणी वैद्यकीय व्यावसायिकांकडून केली जावी.

२) डॉक्टर, फार्मासिस्ट यांना उजळणी पाठय़क्रम देऊन अँटिबायोटिक वापराबद्दल सातत्याने जागरूक ठेवले पाहिजे. त्यांच्या मूळ अभ्यासक्रमातही ‘रॅशनल युज ऑफ अँटिबायोटिक्स’ हा विषय गांभीर्याने शिकवला गेला पाहिजे.

३) कायद्याची कडक अंमलबजावणी आवश्यक आहे. प्रिस्क्रिप्शनशिवाय अँटिबायोटिक्स फार्मसिस्टने विकता कामा नयेत. त्यांचा डळउ सेल पूर्ण बंद झाला पाहिजे. स्वमनाने अँटिबायोटिक मागणाऱ्या रुग्णाला समुपदेशन करून फार्मसिस्ट यात खूप महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.

४) शेडय़ूल ऌ1 (एच वन)ची घोषणा नुकतीच शासनातर्फे करण्यात आली आहे. यात काही महत्त्वाच्या अँटिबायोटिकसाठी डॉक्टर्स दुहेरी प्रिस्क्रिप्शन लिहितील व त्याची एक प्रत फार्मसीमध्ये ठेवली जाईल. औषधांच्या लेबलवर विशेष सूचना असतील. ही अँटिबायोटिक्स प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळणे अशक्य असेल.

५) अँटिबायोटिक्स ही कशी विशेष वेगळी औषधे आहेत, दुधारी शस्त्रे आहेत, ती का व कशी जपून वापरली पाहिजेत, यासाठी समाज प्रबोधन आवश्यक आहे. शाळकरी मुलांपासून ते गृहिणींपर्यंत ते उच्चशिक्षित अधिकाऱ्यांपर्यंत हा विषय पोचला पाहिजे. यासाठी माध्यमांचा परिणामकारक वापर केला गेला पाहिजे.

६) बाजारातील अनावश्यक उत्पादने, विशेषत: तर्कविसंगत अँटिबायोटिक मिश्रणे यावर शासनाने बंदी घातली पाहिजे. गेल्या २५ वर्षांत जिवाणूंविरुद्ध नावीन्यपूर्ण रीतीने काम करणारे एकही नवे अँटिबायोटिक विकसित केले गेले नाही. अँटिबायोटिक्स तात्पुरती घेण्याची औषधे; तर मधुमेह, हृदयविकाराची औषधे कायम आयुष्यभर घ्यावी लागतात. फार्मा कंपन्यांनी नफा न बघता अँटिबायोटिक्सच्या बाबतीत शास्त्रीय व रुग्णहिताचा दृष्टिकोन ठेवला पाहिजे. आता परिस्थितीचे गांभीर्य व एक राष्ट्रीय आपत्ती ओळखून फार्मा कंपन्या, संशोधन संस्था व शासनाने नवीन अँटिबायोटिक्सच्या संशोधनाकडे जोमाने वळले पाहिजे.

७) सहजपणे झटपट करता येतील व फारशा महाग नसतील अशा रोगनिदान चाचण्यांची सुविधा डॉक्टरांसाठी उपलब्ध झाली पाहिजे. जेणेकरून उपचार नेमके करता येतील. प्रिस्क्रिप्शनमध्ये अँटिबायोटिक लिहिल्यावर डॉक्टरांनी तसे रुग्णाला स्पष्ट सांगायला हवे आणि त्याच्या वापराविषयी सजग करायला हवे. फार्मासिस्टने प्रिस्क्रिप्शन डिस्पेन्स करताना रुग्णाला अँटिबायोटिकविषयी कोर्स पूर्ण करणे, नियमित घेणे याविषयी समुपदेशन केले पाहिजे. रुग्णांनीही यात सहकार्य करायला हवे.

८) अँटिबायोटिकच्या प्रिस्क्रिप्शनवर ‘डिस्पेन्स’ शिक्का नियमाप्रमाणे मारला पाहिजे.

९) पशुसंवर्धन, मत्स्यउत्पादन यामध्येही अँटिबायोटिक्सचा प्रचंड वापर होतो. शिवाय न वापरलेली, मुदतबाह्य़ अँटिबायोटिक्सची विल्हेवाट हेदेखील रेझिस्टन्सला कारणीभूत ठरतात. त्यात आवश्यक बदल करणे जरुरीचे आहे.

आपले युद्ध जिवाणूंशी आहे. विजिगीषू वृत्तीच्या, चिवट अशा सूक्ष्म जिवांशी. या युद्धात आपण ‘तू तू मैं मैं’ न करता सर्व भेद बाजूला ठेवून एकत्र आले पाहिजे. आपल्याच चुकीने अँटिबायोटिक्सना आपण दुर्बल व जिवाणूंना प्रबळ केले आहे. नोबेल पारितोषिक घेताना सर फ्लेमिंगने तेव्हाच खरे तर इशारा दिला होता, ‘जपून वापरा, अँटिबायोटिक्सना.’ म्हणजे फ्लोिमगने धोका तेव्हाच ओळखला होता, पण आपण दुर्लक्ष केले. आता परत १९२८ पूर्वीची स्थिती येऊ पाहत आहे. तेव्हा अँटिबायोटिक्स नव्हती म्हणून आपण जंतूसमोर असहाय्य होतो, तर आता अँटिबायोटिक्स असूनदेखील असहाय्य! फ्लेमिंगचे दु:ख व श्ॉली डेव्हिसच्या निर्वाणीच्या इशाऱ्याचा आता आपल्याला उलगडा झाला असेलच. सरतेशेवटी स्पर्धेत आपण जिंकू का जिवाणू हे काळच सांगू शकेल, पण आपण शिकस्तीने प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे.

Story img Loader