अरुंधती देवस्थळे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नतालिया गोंचारोवा ( १८८१-१९६२) या त्यांच्या ‘सेल्फ पोट्र्रेट’(१९०७) मध्ये दिसतो तसा रंगीबेरंगी फुलांचा मनस्वी ताटवा.. आपल्याच मनाने फुलणारा आणि एक कलाकार म्हणून त्या काळातल्या पुरुषप्रधान समाजात निडरपणे स्वत:चं स्थान निर्माण करणारा! चित्रातल्या सोनपिवळय़ा लांब देठाच्या लीलीज् पाहून परत जाणवतं की फुलं त्यांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग होती आणि कलेचाही! मॉने आणि वान गॉगसारखं मलाही फुलं काढायला खूप आवडतं असं त्या म्हणत. अष्टपैलू गोंचारोवांनी रशियन अवां गार्द मूव्हमेंटचं नेतृत्व केलं हे निर्विवादच!

जन्म खेडय़ातला, सधन सुसंस्कृत कुटुंबात. लोककला आणि लोककथा कोवळेपणी कायम पाहायला, ऐकायला मिळत. नतालिया ११ वर्षांची असताना त्यांचं कुटुंब मॉस्कोत आलं. हा काळ रशियात आधुनिकतेकडे नेणारा. शेतीप्रधान समाज यंत्र आणि औद्योगिक प्रगतीकडे जाऊ लागला होता आणि त्याचा परिणाम लोकांच्या परंपरागत वैचारिक बैठकीवर होत होता. तिने त्या काळात कलेच्या दृष्टीने हॅपिनग असलेल्या मॉस्कोच्या कला विश्वविद्यालयात शिल्पकला शिकण्यासाठी प्रवेश घेतला, पण लवकरच शिल्पकला सोडून चित्रकलेची सुरुवात केली- ‘‘कारण मला प्रकाशाचे विभ्रम आणि रंगांच्या परस्पर संबंधांतून उभं राहणारं सुंदर विश्व आकर्षित करत होतं.’’ असं तिचं म्हणणं. प्रदर्शनातच नव्हे तर कलाक्षेत्रातल्या इतरही घडामोडींत नतालियाचा उत्साहाने आणि आत्मविश्वासाने सहभाग असे. कॉलेजात भेटलेला कलाकार मिखाईल लॅरिओनोव्ह आयुष्यभराचा साथी ठरला, त्यांनी लग्न मात्र वयाच्या ७५ व्या वर्षी केलं!

गोंचारोवा आणि लॅरिओनोव्हनी मिळून क्युबिझम आणि भविष्यवादी कला यांच्या मिलाफातून ‘रेऑनिझम’ या नव्या अमूर्त शैलीची सुरुवात केली. त्याच्या घोषणापत्रात दोघांनी आपली भूमिका या शब्दांत मांडली होती : ‘‘Long live the beautiful East!  Rayonism is the painting of space,  revealed not by the contours of objects,  not even by their formal colouring but by the ceaseless and intense drama of the rays that constitute the unity of all things!’’ या आधी या दुक्कलीने झूम कविता या शीर्षकाखाली नादांवर आधारित कविता एका नव्याने बनवलेल्या लिपीत प्रकाशित केल्या होत्या. त्यांचं नाव जोडलं जातं ते ‘एव्हरीिथगईझम’शी! (रशियनमध्ये  vsechestvo) ही दोघं वेगवेगळय़ा गोष्टींसाठी वेगवेगळय़ा शैली आणि तंत्रं वापरत; कारण चित्रकलेबरोबरच त्यांचा प्रिन्टमेकिंग, पुस्तकांसाठी चित्रं काढणं, सेट्स डिझाइनिंग, फॅशन, सिनेमा, अंतरसज्जा आणि कुठल्याही नाटय़प्रकाराचं सादरीकरण अशा एकमेकांशी संबंधित क्षेत्रांमध्ये वावर असे. चित्रकलेत तर प्रयोगशीलता अधिकच बहरायची : स्टील लाईफ, न्यूड्स, खेडी आणि शेतकरी खेडूतांची चित्रं ते अमूर्तवादी फ्यूचरिस्टिक लँडस्केप्स असा ऐसपैस पल्ला.. तिचा मायदेश भिन्न संस्कृतींनी बनलेला होता आणि आजच्यासारखा नागरिकांना गृहीतच धरून चालणारा, ठाशीव नव्हता. तो जमाना पोपोवा, रोझानोवा आणि अलेक्झान्द्रा एक्सटरसारख्या अमूर्तवादी स्त्री चित्रकारांचा होता.

अभिव्यक्तीच्या पूर्ण स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या गोंचारोवांना सेन्सॉरशिपशी लढावं लागलं यात आश्चर्य नव्हतंच. त्यांच्या निळय़ा- हिरव्या रंगात, क्युबिस्ट शैलीत रंगवलेल्या ‘दि गॉडेस ऑफ फर्टिलिटी’ (२२.५ x३० से.मी. ऑईल ऑन कॅनव्हास) या न्यूडवर रूढीवादी समाजात गदारोळ उडाल्यावर पोलिसांनी ते जप्त केलं- सीरियन लोककथेतून उपजलेल्या देवतेच्या निर्वस्त्र, ओबडधोबड चित्रणाने जनमानसावर दुष्परिणाम होतो, हे कारण देऊन. भौमितिक आकारांना पैलू पाडून काढावे तसे अनैसर्गिक चेहरे आणि देह. प्राथमिक रंगांचं पॅलेट. अधांतरात निर्माण झाल्यासारखी पोकळी.. त्यात सूचक गोष्टी तरंगत सोडलेल्या म्हणजे एक फूल, घोडा (लोककलेतलं मोटीफ) त्यांचा एकमेकांशी एखाद्या असंबद्ध स्वप्नांत असावा तितपत संबंध.आकाशाची निळाई, समुद्राचं हिरवेपण आणि मातकट जमीन. मातृत्वाने ओथंबलेले स्तन, गर्भवतीचं पोट, चेहऱ्यावर भाव नाहीत, पण एक तृप्त शांती चित्रभर पसरलेली.. नग्नता हीच सरसकट असंस्कृत  ठरवल्यानं, यात अश्लील काय? असा  प्रश्न विचारायचा नसतोच.

नंतर त्यांचं ‘दि इवानजेलिस्ट’ हे चित्र सेंट पीटर्सबर्गमध्ये बेकायदेशीर ठरलं. चर्च आणि धर्म या गंभीर सामाजिक संस्था, अवां गार्द कलेचा विषय होऊ शकत नाहीत. शिवाय एका मुक्त प्रकृतीच्या स्त्रीने त्यांना चितारणे म्हणजे गंभीर मर्यादाभंग, तो सरकार थांबवणार असं जाहीर झालं! ऑईल ऑन कॅनव्हासमधलं हे चार भागातलं चित्र म्हणजे गोंचारोवाच्या कलेचं सशक्त उदाहरण. कालांतराने याच चित्राला अभिजाततेचा सन्मानही मिळाला! या चित्रांमध्ये चार धर्मप्रसारक ख्रिस्ताचा संदेश लांब खलित्यासारख्या गुंडाळय़ा उघडून दाखवत आहेत. गडद अपारदर्शक रंग. कृष्णवर्णाच्याच छटांमधून साकार होणारी आध्यात्मिक जाणीव.  चेहऱ्यामागे जांभळट- राखाडी तेजमंडल. कागदांवरही गूढ अध्यात्माची हलकी जांभळी पखरण. घातलेले लांब झगे.. एक निळाशार, दुसरा लाल- अंजिरी, तिसरा काळा- पांढरा आणि चौथा राखाडी- काळा. गोंचारोवाच्या या कोऱ्या कागदाच्या उलगडून दाखवलेल्या गुंडाळय़ांवर उलटसुलट टीका झाली. आज लक्षात राहते ती गूढ शब्दांपलीकडे पोहोचवणारी अर्थगर्भता, प्रत्येकाचे बोलके हात आणि जमिनीला टेकलेली पावलं! चित्र जपून ठेवण्यासाठी त्यावर दिलेल्या लिन्सीड ऑईलच्या थरामुळे चित्रातले रंग अधिक गहिरे, गडद वाटतात. ही चार चित्रं गोंचारोवानी १९१०-११ दरम्यान काढून रंगवलेली- मनाचा धार्मिक कल आणि बायबलवरली श्रद्धा दाखवणारी. हे चित्र पोलिसांच्या तावडीतून वाचलं. जाणकारांनी बहुमोल ठरवलं, आता त्याच्या प्रतिकृती अनेक कलासंग्रहालयांत आहेत. त्याखाली दिलेल्या माहितीत रशियन दडपशाहीचीही नोंद आहेच. समकालीन चित्रकार काझिमीर मालेवीचसारखंच त्यांनाही रशियन परंपरांचा मेळ आधुनिकतेशी व्हावा असं वाटायचं आणि ते त्यांच्या शैलीत, चिन्हांच्या वापरात दिसायचं.

गोंचारेवांच्या व्यावसायिक जीवनात महत्त्वाचं वळण वयाच्या बत्तिसाव्या वर्षी आलं. १९१३ मध्ये रशियातल्या या महिला चित्रकाराचा पहिला पस्र्पेक्टिव्ह आयोजित झाला! इतर क्रांतिकारी कलाकारांबरोबर गोंचारेवांची ८०० प्रस्थापित मानदंड नाकारणारी मुक्त प्रवृत्तीची चित्रं, रेखाटनं आणि फॅशनचे नमुने मांडले गेले होते, तितकीच इतरांचीही. त्यात त्यांची सुप्रसिद्ध

‘दि हार्वेस्ट’(१९१०) ही उठावदार केशरी- पिवळय़ा रंगातली इंप्रेशनिस्टिक शैलीशी नातं सांगणारी सात चित्रांची मालिकाही होती. उद्घाटनाआधी वृत्तपत्रांत जाहीर करून गोंचारोवा आणि इतर कलाकारांनी चित्रलिपीतले नमुने तोंडावर रंगवून मॉस्कोच्या प्रमुख रस्त्यांवरून नाटय़पूर्ण मिरवणूक काढली, ती लोकांनी कुतूहलाने पाहिली. आजवर असं काही दाखवलं गेलं नव्हतं, म्हणून कलाजगतातच नव्हे, तर पूर्ण समाजात खळबळ माजली. १२ हजार दर्शकांपैकी अनेकांचा पािठबा मिळाला, चित्रं विकली गेली. काही समीक्षकांनी कडाडून विरोधही केला. नामवंत क्युरेटर इवजेनिया ईल्युखीना अभिप्रायात म्हणाल्या होत्या, ‘‘या तरुण कलाकार मुलीचा भराभर वर जाणारा इम्प्रेशनिझम ते पोस्ट इम्प्रेशनिझम ते एक्सप्रेशनिझम हा सृजनाचा आलेख केवळ स्तिमित करणारा आहे, पण तिच्या कलेत आढळणाऱ्या या वेगवेगळय़ा शैलींच्या  मिश्रणामुळे तिचं स्वत:चं असं काय आहे असा प्रश्न उभा राहतो.’’ कदाचित सत्य हे असावं की, गोंचारोवांची कलात्मक सर्जनशीलता त्यांना कायम अस्वस्थ ठेवत असे आणि त्यातूनच सारखी शैली बदलत असे. दरम्यान, गोंचारेवांनी आपण पाश्चिमात्य कलेपेक्षा पूर्वेला जास्त मानतो असं म्हटलं असलं तरी इटालियन फ्यूचरिझमशी त्यांचा संवाद सुरू असावा आणि तो त्यांच्या पहिल्या महायुद्धाआधीच्या ‘एरोप्लेन ओव्हर ट्रेन’ (५५x८३ से. मी.) आणि ‘डायनॅमो मशीन’ ( १६.९x२१.३ से.मी) या आता मुक्तवापरासाठी उपलब्ध क्यूबिक तैलचित्रांतून दिसून येतो.

या प्रदर्शनाला आलेल्या सर्गेई डियाघीलेवनी गोंचारोवांच्या कलेतील नाटकीयता आणि  तरुणाईतली त्यांची लोकप्रियता पाहून, त्यांना आपल्या बॅले रूस या विख्यात नृत्यनाटय़ संस्थेत ‘ल कॉक डोर’ या ऑपेरा बॅलेत (१९१४) वेशभूषा आणि सेट्स डिझायिनगसाठी आमंत्रित केलं. त्यासाठी त्या मिखाईलसह पॅरिसला गेल्या आणि मग कधी मायदेशी परतल्याच नाहीत. या नृत्यनाटय़ाला जबरदस्त यश मिळालं आणि गोंचारोवांचं नाव आंतरराष्ट्रीय वर्तुळात चमकू लागलं. ‘दि फायरबर्ड’ या नृत्यनाटिकेत आधीचंच यश परत मिळालं. एकीकडे फॅशन डिझायनर म्हणून नवीन कामं मिळत होती, दुसरीकडे अमेरिकेत चित्रं विकायला सुरुवात झाली होती. देशविदेशात कीर्ती पसरत होती, आमंत्रणं येत होती आणि दुसरीकडे रशियात बौद्धिक स्वातंत्र्यावरचा सरकारी दबाव वाढत चालला होता, म्हणून त्या दोघांनी त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर उपरेपण स्वीकारून  पॅरिसमध्येच स्थायिक व्हायचं ठरवलं. बॅले कंपन्यांबरोबरची साथ १९५० पर्यंत टिकली. त्यांनी बनवलेले सिनरी आणि सेट्स अजूनही लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझिअममध्ये पाहता येतात. ‘‘वेशभूषा म्हणजे नाटकातल्या पात्राला कपडे चढवणं  नव्हे, ती कल्पनेतलं पात्रं साकार करणारी, पात्राच्या स्वभाव आणि विचारांशी मिळतीजुळती असावी. अनेक आधुनिक वेशभूषा आणि नेपथ्यकार मेहनत करून एक फॉम्र्युला बनवतात आणि तोच वेगवेगळय़ा नाटकांत परत -परत वापरतात, हे बरोबर नव्हे. नेपथ्याचे सर्व तपशील, नाटकाच्या तबियतीनुसार बदलायला हवेत.’’असं म्हणणाऱ्या गोंचारोवांच्या कलेचं वैशिष्टय़ म्हणजे त्या फक्त नवनवीन शैलींत  काम करत नसत, तर जुन्या रशियन लोककलेतून गडद रंग आणि सजावटीचे नमुनेही घेत. बायझेंटाईन चिन्हेआणि पॉल गोगँची ब्रोकन प्लेन्स त्यांच्या चित्रांत अनपेक्षितपणे उमटलेली दिसतात. त्यांनी फ्रेंच आणि रशियनमध्ये लिहिलेल्या चार कवितांच्या वह्य त्यांच्या माघारी सापडल्या.       

गोंचारोवांची वैविध्यपूर्ण कला मागे वळून बघण्यासारखी आहेच आणि एक आगळं माणूसपणही! देश सोडला तरी त्यांच्या घराचे दरवाजे गरजू रशियन बांधवांना खुले असत; विशेषत: कलेशी संबंधितांना.. पॅरिसमध्ये शिकायला आलेल्या मुलांसाठी.. पॅरिसमध्ये प्रदर्शनांना येणाऱ्यांना त्यांनी चित्रं मोफत दिल्याच्या कहाण्या आहेत. त्यांच्यामुळे माझी कला मायदेशाच्या घरांमध्ये जाईल असं त्या म्हणत.

arundhati.deosthale@gmail.com