‘साहित्य : अभिजात आणि लोकप्रिय’ हे डॉ. विनायक गंधे यांचे पुस्तक म्हणजे मराठी साहित्यातील काही निवडक नामवंत साहित्यिक आणि त्यांच्या कलाकृतींचा घेतलेला धांडोळा होय. वि. स. खांडेकर, राम गणेश गडकरी, पु. ल. देशपांडे, आचार्य अत्रे, लक्ष्मीबाई टिळक, बहिणाबाई चौधरी, श्रीनिवास विनायक कुलकर्णी या लेखकांच्या महत्त्वाच्या कलाकृतींचे समीक्षणात्मक विश्लेषण लेखकाने केले आहे. तसेच द. दी. पुंडे यांचे मराठी भाषेवरील ‘भयंकर सुंदर मराठी भाषा’ आणि ‘गंमत शब्दांची’ या लालित्यपूर्ण लेखांविषयी अभ्यासपूर्ण मते मांडली आहेत. डॉ. अंजली सोमण यांनी संपादित केलेल्या पत्रवाड्.मयाविषयीच्या पुस्तकांचे ऐतिहासिक आणि वाड्.मयीन महत्त्व विशद केले आहे. समीक्षेच्या अभ्यासकांनी आवर्जून वाचावे असे हे पुस्तक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा