डॉ. चैतन्य कुंटे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

चित्रपटातील पात्रांबरहुकूमभावदर्शीगायन करण्याचं उत्तम कसब आणि सिनेगीतांच्या सुवर्णकाळातील मुकेश, किशोर यांच्या समसमान स्थान असणाऱ्या मोहम्मद रफी रफी यांच्या जन्मशताब्दीचा आरंभ आज (२४ डिसेंबर) होत आहे. ताना, सरगमयुक्त बंदिशीसारखी गीतं, प्रेमगीतं, नृत्यगीतं, विरहगीतं, उत्साही मादक गीतं, विनोदी गीतं, क्रीडागीतं, भक्तिगीतं, गझल, कव्वाली अशा सर्वच प्रकारांवर हुकमत असणाऱ्या या कलावंताच्या गायकी आणि रकीर्दीवरसांगीतिकदृष्टिक्षेप.. 

वर्ष होतं १९६७.. ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाले, त्यात ज्येष्ठ ठुमरी गायिका सिद्धेश्वरीदेवींसह संगीतकार वसंत देसाईयांचंही नाव होतं. तिसऱ्यानावानं काही लोकांच्या भुवया उंचावल्या, तर काहींना अत्यानंद झाला. ते नाव होतं ‘मोहंमद रफी’. ठुमरीत कलात्मक अभिजाततेचा जो दर्जा सिद्धेश्वरीदेवींचा, तसाच हिंदी पार्श्वगायनातरफीसाहेबांचा!

‘बोलणं आणि गाणं यांत एकसारखाच आवाज असणं’ हा आदर्श कंठसाधनाशास्त्रमानतं. मात्र रफीसाहेब याला अपवाद होते. त्यांचा बोलण्याचा आणि गाण्याचा आवाज अगदी वेगळा होता. संभाषणातला त्यांचा आवाज कोता वाटावा इतका नाजूक होता, याच माणसाच्या गळय़ातून गाताना बुलंद आवाज येत असेल असं अजिबात वाटत नसे. म्हणूनच कंठअभ्यासकांनी त्यांचं गायनतंत्र नक्कीच अभ्यासावं. त्यांच्या आवाजाची जात मुलायम, तलम असूनही हवा तो कर्रारा, खडा आणि कडक करण्याचं कसबही त्यांना साधलं होतं. आवाज हवा तेव्हा हलका, चपळ करणं आणि हवा तेव्हा बोजदार करणं हे तंत्र त्यांनी रियाजानेच कमावलं असावं. त्यांचा गळा खास ‘पंजाबी’ होता- म्हणजे त्यात स्वाभाविक फिरत, मुरकी, लहक, जमजमा होता. गळय़ात जेवढी चांगली मुरकी, तेवढीच मींडही. शास्त्रीय परिभाषेत ज्याला ‘लोअर रजिस्टर’ म्हणतात, त्यात त्यांच्या आवाजाचा पोत मखमली, रेशमी असे; तर ‘अप्पररजिस्टर’मध्ये तोच आवाज टोकदार, तीखाहोई. मोठा तारतापल्ला असलेला त्यांचा आवाज तार सप्तकात कर्कश वाटत नसे की मंद्र सप्तकात पोकळ वाटत नसे- सर्व सप्तकांत एकाच गरीम्याची फेक त्यांना साधली होती. ‘ह’सारखं महाप्राण वर्ण उच्चारताना छातीतून उत्तम घुमारा ते देत, तर अनुनासिकांच्या उच्चारणात गोलाईदार गुंजन जाणवे. ‘स’ उच्चारताना अतिरिक्त हवा बाहेर पडल्यानं किंचित शीळदार परिणाम साधला जाई. श्वासभारित उच्चारातून ‘मदभरा’ असर जसा ते साधत, तसाच नि:श्वासाचा नेमका वापर करून खिन्नता व्यक्त करू शकत. गाण्यात स्वरांखेरीज गुणगुणणं, हसणं, कुजबुज, सुस्कारा, उसासा, चिरकणंयांपासून गद्य बोलण्यापर्यंत अनेक प्रकारे त्यांनी आवाज वापरला. स्वर-शब्दोच्चारांत‘फेड-इन, फेड-आऊट’चं उत्तम तंत्र त्यांना साधलं होतं आणि त्यामुळे अत्यंत असरदारभावाविष्कार ते करू शकत.

हेही वाचा >>> प्रगती म्हणजे व्यक्तीची जागा व्यवस्थेनं घेणं!

चित्रपटातील पात्रांच्या भूमिकेच्या बरहुकूम भावदर्शीगायन करण्याचं उत्तम कसब रफीसाहेबांकडे होतं. नायकापासून साधू, फकीर, फिरता विक्रेता, तेलमालीशवाला, खेळणीवाला, भिकारी अशा अनेक प्रकारच्या भूमिका त्यांनी आपल्या आवाजाच्या माध्यमातून अदा केल्या. त्यांचा हा ‘गायनाभिनय’ अत्यंत प्रभावशाली असे – अनेकदा पडद्यावरच्या अभिनेत्यांपेक्षा सरस! १९५० पासून नायकापासून भिकाऱ्यापर्यंत सर्व प्रकारच्या पात्रांसाठी रफींच्या आवाजाला प्राधान्य दिलं गेलं. दिलीपकुमार, देव आनंद, गुरूदत्त, शम्मीकपूरपासूनऋषीकपूपर्यंतच्या अनेक नायकांचा आवाज म्हणून त्यांच्या आवाजाची निवड प्रामुख्यानं झाली. राज कपूरसाठी मुकेश आणि मन्ना डे यांचा आवाज वापरला गेला असला तरी रफींचीही निवड आरंभीच्या काळी ‘इस दुनिया में ऐ दिलवालों’ (दिल्लगी, १९४९) अशा गीतांत झाली होती. दिलीपकुमारचाअंडरप्ले, देव आनंदचा रोमान्स, शम्मी कपूरचा धसमुसळा प्रणय, गुरूदत्तचीअंतर्मुखता हे सारं त्यांच्या गाण्यातून व्यक्त होई. ‘सर जो तेरा चकराए’, ‘ये है बॉम्बे मेरी जान’, ‘ऑल लाइन क्लीअर’, ‘जंगल में मोर नाचा’ अशा अनेक गाण्यांत जॉनी वॉकरसारख्या हास्य अभिनेत्याचा आवाज म्हणूनही त्यांनी कमाल केलीय. किशोरकुमार हा स्वत: उत्तम पार्श्वगायक आणि अभिनेताही. गंमत अशी की, किशोरकुमारच्या अभिनय कारकीर्दीत‘अजब हैदास्तांतेरी ऐ जिंदगी (शरारत), ‘मन मोरा बावरा’ (रागिणी), ‘मैंइस मासूम चेहरे को छू लूं’ (बागी शहजादा) या चित्रपटांतील गाण्यांत त्याला रफीसाहेबांनी उसना आवाज दिला होता!

ताना, सरगमयुक्त बंदिशीसारखी गीतं, प्रेमगीतं, नृत्यगीतं, विरहगीतं, उत्साही मादक गीतं, उदासवाणी गीतं, विनोदी गीतं, क्रीडागीतं, भक्तिगीतं, गझल, कव्वाली अशा सर्व प्रकारची गीतं गाण्याचं त्यांचं सामथ्र्य विलक्षण होतं. ‘मधुबनमें राधिका’, ‘बाट चलत मोरी चुनरी रंग डारी’ अशी रागदारीबंदिशनुमा गीतं, ‘चौदवी का चांद हो’ सारखं अलवार प्रणयगीत, ‘सुहानी रात ढल चुकी’सारखं विरहगीत, ‘ओ दुनिया के रखवाले’सारखं भक्तिगीत, ‘ये देश है वीर जवानों का’ आणि ‘साथी हाथबढाना’, ‘जहांडालडाल पर सोने की चिडिया’ अशी स्फूर्तिगीतं, ‘दोघूंटमैने पी’सारखं ‘नशिलं’ गीत.. केवढं वैविध्य आहे!

रफींची मातृभाषा पंजाबी असली तरी अन्य भाषांतील शब्दोच्चार समजून घेऊन ते प्रयत्नपूर्वक गात असत. हिंदीसह सिंधी, उर्दू, मैथिली, भोजपुरी, गुजराती, मराठी, कोंकणी, तेलगू, कन्नड, उडिया, बंगाली अशा भारतीय भाषांतील आणि इंग्लिश, सिंहली, अरबी, फारसी, डच, क्रिओल अशा विदेशी भाषांतील गीतांचंगायन त्यांनी केलं. १९७२ साली सर्वप्रथम संगीतकार श्रीकांत ठाकरे यांनी रफींकडून मराठी गीतं गाऊन घेतली. ‘हा रुसवा सोड सखे’, ‘शोधिसी मानवा’, ‘हे मना आज कोणी’, ‘अगं पोरी संबाल दर्याला’ (पुष्पा पागधरेसह), विशेषत: ‘हसा मुलांनो हसा’ ही त्यांची मराठी गीतं लोकप्रिय ठरली.

२४ डिसेंबर १९२४ रोजी पंजाबातीलअमृतसरजवळच्याकोटलासुलतानसिंह या लहानशा खेडेगावात जन्मलेल्या या महान गायकाचं निधन ३१ जुलै १९८० रोजी मुंबईत झालं. बांद्य्राला‘रफीमॅन्शन’पासून जुहूच्यामुस्लीमदफनभूमीपर्यंत त्यांच्या जनाज्यामध्ये दहा हजारांचाजनसमुदाय या लाडक्या गायकाला अखेरची सलामी देण्यासाठी आला होता. अवघं ५६ वर्षांचं आयुष्य.. वयाची साठी गाठायच्या आतच मरण आलं, तरी ३५-३६ वर्षांच्या पार्श्वगायनाच्याकारकीर्दीतहजारोगीतांत त्यांनी आपला चिरकालीन ठसा उमटवला.

हेही वाचा >>> आदले । आत्ताचे : अधोविश्वाची ऊर्ध्वगामी दास्तान

हाजी अली महंमद आणि अल्लारखीबाई यांच्या सहा अपत्यांपैकी महंमदरफी हे शेंडेफळ. लहानपणापासून गाण्याची आवड असलेला हा मुलगा गाणाऱ्याफकिराच्यामागेमागे जाई- त्या सुरांचा मागोवा घेत! बालपणी पंजाबी फकीर, मिरासी यांच्या गायनाचेश्रवणसंस्कार झाले. लहानपणी गुरंराखताना कानी पडलेल्या मिरासी गायकांच्या लोकगीतांचं अनुकरण करताना रफीच्यागळय़ात खास पंजाबी मुरकी, पुकार, उसासायुक्तस्वरोच्चाररुजला. कोटला हे अगदी लहान गाव असलं तरी बाजारासाठी मजीठा, अमृतसर अशा मोठय़ा गावी गेल्यावर ग्रामोफोनरेकॉर्डस आणि लाहोररेडिओचा ध्वनी आपसूकच कानी पडे. वडिलांचा विरोध असल्याने त्यांच्या परोक्ष, भवती मित्रांचा मेळा जमवून रफी आपली गाण्याची भूक भागवून घेई. गावात हिंदू शेतकरी आणि मुस्लीममजुरांत सलोख्याचं वातावरण असल्यानं कृष्णाची भजनं, शीख सबद आणि मुस्लीम नात-कव्वाली हे सारं कानी पडायचं. त्यामुळेच की काय, पुढे रफीसाहेबांनीमुस्लीमधर्मसंगीतातील गीतं जेवढय़ाश्रद्धेनं गायली, तेवढय़ाचआर्ततेनं हिंदू भजनंही गायली.

रफीचे वडील १९३५ साली लाहोरला आले आणि रफीला संगीताची एक ‘नई दुनिया’ गवसली. त्या काळी पंजाबमध्येकालेखां, आशिक अली खां, फझलहुसेनखां, बीबेखां, भाई लाल अमृतसरी, इ. ख्यालियांच्या ध्वनिमुद्रिका गाजत होत्या. बाई मोहम्मद बांदी, बीबीमुख्तार बेगम, बद्रूमुलतानी, कमला झरीया, दरे जान, दिल्लीवालीछमियाबाई ऊर्फ शमशादबाई (सायरा बानूची आजी), जद्दनबाई (नर्गिसची आई), जहांआराकज्जन, जम्मूवालीमलकापुखराजयांचंढंगदारठुमरी-दादरे, गझल काळजाचाही वेध घेई. सबदकीर्तनियेपटियालावाले भाई छैला, नात गायक जानीसाहेब, कव्वालअमृतसरवाले आगा फैज, हुसेनबक्षढाढी यांचेही स्वर ध्वनिमुद्रिकांमार्फत कानी पडत. हे सगळे संगीत-संस्कार रफीला गाण्याकडे तीव्रपणे ओढत होते. रफीसाहेबांच्या गाण्यातली लोचदारदिलकशअदाकारीचं मूळ या सर्व गायकांच्या श्रवणसंस्कारातसापडतं.

लाहोरलावडिलांनीकेशकर्तनालय सुरू करून रफीला त्या कामी लावून दिलं. कात्रीनं केस कापण्यापेक्षा स्वरांनी मनं जोडण्याकडंरफीचा ओढा होता- केस कापताना तो सुरेल गळय़ानं जी लोकगीतं गाई त्यासाठी लोकही त्या दुकानी घोटाळत! रफीचं असंच गाणं एकदा जीवनलालमट्टू यांच्या कानी पडलं. मट्टू हे किराना परंपरेतल्या उस्ताद बहिरे अब्दुल वहीदखां यांचे शिष्य आणि लाहोररेडिओचेउच्चाधिकारी. त्यांनी रफीला भैरव, यमन, मल्हार, बसंत, भैरवी, पहाडी अशा रागांची तालीम दिली. पटियाला परंपरेतल्या छोटे गुलाम अलींचंहीशिष्यत्वमिळालं. बडे गुलाम अली आणि विशेषत: त्यांचे भाऊ बरकत अली यांचा प्रभाव रफीवर झाला. मात्र रफीचा कल अधिक होता सुगम संगीताकडे- आणि त्यासाठी लाहोररेडिओवरचे संगीतकार फिरोझनिजामी यांनी मार्गदर्शन केलं. प्रख्यात गायक कुंदनलालसैगल आणि पंकज मलिक यांना आदर्श मानून मार्च १९४३ पासून लाहोररेडिओवररफी नियमितपणे सुगम गायन करू लागले.

योगायोग असा की, लाहोरला त्यांचे आदर्श असलेल्या कुंदनलालसैगल यांचा कार्यक्रम होता. अचानक वीज खंडित झाल्यानं त्यांनी गायला नकार दिला. वीज येईतोरफीनं गावं असं कुणी सुचवल्यानंरफी गायला. श्रोत्यांत उपस्थित संगीतकार श्यामसुंदर यांनी खूश होऊन रफीलापार्श्वगायनाची संधी दिली. पार्श्वगायक म्हणून सर्वप्रथम ‘गुलबलोच’ (१९४४) या पंजाबी चित्रपटासाठी रफीनं‘सोनीयेहीरीयेतेरीयादनेबहोतसताया’ हे युगुलगीतझीनतबेगमसह गायलं.

संगीतकार मास्टर गुलाम हैदर यांनी रफीला मुंबईत येण्यासाठी उद्युक्त केलं. १९४४ साली मुंबईत प्रवेश केल्यावर श्यामसुंदर यांनी ‘गांव की गोरी’ (१९४५) या चित्रपटात जी. एम. दुरानीबरोबर‘अजी दिल हो काबू में’ या गाण्यात रफीला पहिली संधी दिली. नौशादनीहीरफीतील हुनर जाणून त्याला ‘पहले आप’ (१९४५) चित्रपटात ‘हिंदूोस्तां के हमहैं’, ‘तुम दिल्ली में’ आणि ‘एक बार उन्हें’ गाण्याची संधी दिली. ज्यांना आदर्श मानत होते त्या सैगलसाहेबांसहकोरसमध्ये का होईना ‘रूही मेरी सपनों की रानी’ हे गीत (शाहजहान, १९४६) गायला मिळाल्यानंरफीला धन्यता वाटली. ‘तेरा खिलौनाटूटा बालक’ (अनमोल घडी, १९४६) गाण्यामुळे रफीनं मुंबईत पहिलं यश चाखलं. तेव्हा आघाडीवर असलेल्या नूरजहानसह गायलेले ‘यहां बदला वफा का’ (जुगनू, १९४७), ‘वतन की राह में वतन के नौजवां’ (शहीद, १९४८) ही गाणीही गाजली आणि मोहंमदरफी हे नाव ओळखलं जाऊ लागलं. मात्र रफीला खरा नावलौकिक मिळाला ‘सुहानी रात ढल चुकी’ (दुलारी, १९४९) या गीतानं आणि एक अग्रगण्य पार्श्वगायक म्हणून त्यांचं स्थान निश्चित झालं. ‘तेरा जलवाजिसनेदेखा’ (लैलामजनू, १९४५, गोिवदराम) आणि ‘वोअपनी याद दिलाने को’ (जुगनू, १९४७, फिरोजनिझामी) या दोन चित्रपटगीतांतरफीचं पडद्यावरही दर्शन झालं, पण पडद्याआड राहून ‘पार्श्व’गायन करणंच त्यांनी पसंत केलं.

१९४७ साली सैगल निधन पावल्यावर पार्श्वगायकांच्या नव्या युगाचा आरंभ झाला- त्यांत जी. एम. दुरानी, सी. एच. आत्मा, एस.डी. बातीश, मन्ना डे, तलतमहमूद, मुकेश, किशोरकुमार होते, शिवाय सी. रामचंद्र आणि हेमंतकुमार हे संगीतकारही पार्श्वगायन करत होते. या सर्वाच्या मांदियाळीतरफीसाहेबशीर्षस्थपार्श्वगायक म्हणून विराजमान झाले. १९४५ साली सुरू झालेली कारकीर्द १९८० साली त्यांच्या मृत्यूमुळेच संपली. पार्श्वगायनातरफीसाहेबांची निराळी शैली, गायकी बनली- या गायकीचे वारसदार म्हणून महेंद्र कपूर, मोहंमदअझीज, शब्बीर कुमार, अन्वर, सोनू निगम अशांनीरफीसाहेबांचं अनुकरण केलं.

आरंभीच्या काळात प्रामुख्यानंफिरोजनिझामी, श्यामसुंदर, गुलाम हैदर, हुस्नलालभगतराम, विनोद, अल्लारखाकुरेशी, हंसराजबहल, एस. मोहिंदूर, सार्दुलक्वात्रा अशा पंजाबी संगीतकारांनी रफीला संधी दिली. १९५० नंतर सर्वच संगीत दिग्दर्शकांनी रफीच्या आवाजाला अग्रस्थानी ठेवून नायकासाठी स्वरयोजना केली. ओ. पी. नय्यर यांनी हेतुत: लता मंगेशकरांचा आवाज वापरणं नाकारलं; मात्र असा नकार रफीच्या आवाजाला कोणीही दिला नाही! सज्जादहुसेन, सी. रामचंद्र, रोशन, शंकर जयकिशन, एस. डी. बर्मन, जयदेव, मदन मोहन, खय्याम, रवी, सलिल चौधरी, पंडित रविशंकर, रामलाल, उषाखन्ना, कल्याणजीआनंदजीयांपासून आर. डी. बर्मन, लक्ष्मीकांत प्यारेलाल, बप्पीलाहिरींपर्यंत सर्वच संगीतकारांच्या धुना रफीसाहेबांच्यागायनानंसजल्या. खय्याम यांनी रफींकडूनगैरफिल्मी गझल आणि भजनंही गाऊन घेतली. ‘तेरेभरोसे हे नंदलाल’, ‘पांव पडूं तोरे श्याम’, ‘संभलसंभलपगधरना’ ही भजनं आणि ‘बसके दुशवारहै’, ‘गजब कियातेरे वादे पे’, ‘दर्द-ए-मिन्नतकश-ए-दवा’, ‘तल्खी-ए-मय में जरा’ अशा गझला या दोघांच्या कलाकारीचं सुंदर चिन्हं आहेत.

नूरजहान, अमीरबाई कर्नाटकी, खुर्शीद, शमशाद बेगम, सुरिंदरकौर, सुरैया यांच्यासह रफींनी आरंभी युगुलगीतं गायली, मात्र लता मंगेशकरांबरोबर त्यांच्या सुरेलपणाची जातकुळी जुळल्यानं त्यांची युगुलगीते अधिक गाजली. लताजींसह बेबनाव झाल्याच्या काळात गीता दत्त, सुमन कल्याणपूर, मुबारक बेगम, मिनूपुरुषोत्तम, उषाखन्ना यांच्याबरोबरही त्यांनी द्वंद्वगीतं गायली. अर्थात, सर्वाधिक युगुलगीतं त्यांनी आशा भोसलेंसह गायली- ‘अच्छाजीमैं हारी’मध्ये आशा-रफी यांचा गायनाभिनयदिलकश आहे! विशेष म्हणजे पुरुषांबरोबर सर्वाधिक गीतेहीरफीसाहेबांनीच गायली- त्यांत त्यांचे सहगायक होते जी. एम. दुरानी, तलतमेहमूद, मन्ना डे, किशोरकुमार, मुकेश, बलबीर, भूपिंदर आणि संगीतकार सी. रामचंद्र, मदनमोहनदेखील!

साध्यासरळ स्वभावाचे अत्यंत पापभीरू रफीसाहेबनेमानं पाच वेळा नमाज अदा करत. सर्वाशी मिळूनमिसळून असावं, मृदू बोलावं, ‘आपण बरं आपलं काम बरं’ अशा वृत्तीच्या आणि पूर्णत: निव्र्यसनी असलेल्या रफीसाहेबांचे संबंध चित्रपटसृष्टीत सर्वाशीच अगदी चांगले होते. सुधीर फडके यांच्या आरंभकाळी त्यांच्यासाठी रफींनीगायनकेल्यानं त्यांची चांगली मैत्री होती. ललिता देऊळकरांशी सुधीर फडक्यांचा विवाह झाला तेव्हा रफीसाहेबांनी हजर राहून मंगलाष्टकांत आपलाही स्वर मिसळला होता! (ही हकीकत मी खुद्द ललिताबाईंकडून ऐकली आहे.)

पार्श्वगायक म्हणून त्यांनी कोणाशीही स्पर्धेची भावना ठेवली नाही, उलट या क्षेत्रात पदार्पण करू पाहणाऱ्या गायकांनाही प्रोत्साहन दिलं. कुटुंबवत्सल रफीसाहेब चित्रपटसृष्टीच्या फसव्या दुनियेत छक्क्यापंज्यांपासून दूरच असत. फारसे व्यवहारी नव्हते, त्यामुळे अनेकदा अगदी कमी मानधन घेऊन, कधी विनामूल्यही ते गात. अल्लावरपरमश्रद्धाअसल्यानं दानधर्मही बराच करत. पैसा आणि यश यापेक्षा गाण्याच्या आनंदात त्यांना तसल्ली मिळे. अगदी ‘मिलनसार’ स्वभावाच्या रफीसाहेबांच्या आयुष्यात विसंवादी स्वर वज्र्यच होते. मात्र ज्यांच्यासह त्यांनी कित्येक सुरेल गीते गायली त्या लता मंगेशकरांसह त्यांचे सूर दोनदा विसंवादी झाले. पार्श्वगायकांनाही गाण्यांच्या नफ्यातील ५% रॉयल्टी मिळावी म्हणून १९६२ मध्ये लता मंगेशकरांनी लढा दिला. मात्र मृदू स्वभावाच्या रफीसाहेबांनी मवाळ धोरण स्वीकारून लताजींना पाठिंबा दिला नाही. त्यांच्या बेबनावामुळे ते दोघे पाच वर्ष एकत्र गायले नाहीत. पुढे मदन मोहन आणि जयकिशनजींनी मध्यस्थी केल्यावर दुरावा जाऊन ते पुनश्च एकत्र गाऊ लागले. या दोघांत दुसऱ्यांदाखटका उडला ‘गिनीज बुक ऑफ वल्र्डरेकॉर्डस’साठी सर्वाधिक गीते गायलेला कलाकार म्हणून करण्याच्या नोंदीवरून. अर्थात, ते दोघेही गायक म्हणून एकमेकांना खूप मान देत, हे महत्त्वाचं.

१९४८ साली भारतीय स्वातंत्र्याच्या प्रथम वर्धापनदिनी पंतप्रधान नेहरूंच्या हस्ते रफीसाहेबांनारजतपदकमिळालं होतं. एकवीस नामांकनांपैकी‘चौदवी का चांद हो’ (१९६०), ‘तेरी प्यारी प्यारी सूरत को’ (१९६१), ‘चाहूंगामैं तुझे सांझसवेरे’ (१९६४), ‘बहारों फूल बरसाओ’ (१९६६), ‘दिलकेझरोखेमेंतुझकोबिठाकर’ (१९६८), ‘क्याहुआ तेरा वादा’ (१९७७) या सहा गीतांसाठी रफींनाफिल्मफेअर पुरस्कार मिळाला. १९५७, १९६५ आणि १९६६ अशा तीन वर्षी बंगाल फिल्मजर्नलिस्ट्सअवॉर्ड त्यांना मिळालं. ‘मन रे तू काहे ना धीर धरे’ (१९६४) साठी त्यांना सुरसिंगारसंसदचा स्वामी हरिदास पुरस्कार लाभला. १९८० साली लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉल आणि वेम्बलीकॉन्फरंससेंटरमध्ये कार्यक्रम पेश करण्याचा बहुमान रफीजींना मिळाला. मात्र गाण्याला ‘इबादत’ मानणाऱ्यारफीसाहेबांना अशा बाह्य पुरस्कारांची भूक नव्हती.. त्यांना लाभलेला आवाज ते ‘खुदा की देन’ मानत आणि खरोखरच त्यांचं गायन म्हणजे ‘खुदा की आवाज’च होता!

keshavchaitanya@gmail.com