मनोहर पारनेरकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

samdhun12@gmail.com

पाश्चात्य संगीत, साहित्य, कला यांवर रोखठोक मल्लिनाथी करत सांस्कृतिक विश्वाचे अनोखे पदर खुमासदार शैलीत उलगडणारे सदर..

या लेखात मी देव आनंदच्या पडद्यावरील आणि पडद्याबाहेरच्या आयुष्यातील तुलनेनं कमी माहीत असलेल्या दोन अंगांचा वेध घेण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यातला एक भाग म्हणजे देव आनंद आणि हॉलीवूड स्टार ग्रेगरी पेक (१९१६-२००३) यांची तुलना- जी तो हयात असताना नेहमी होत असे. आणि दुसरा भाग म्हणजे त्याचं सुरैयाबरोबरचं पहिलंवहिलं प्रेम प्रकरण! सुरैया (१९२९-२००४) तिच्या जमान्यातली एक आघाडीची गायिका, हिरॉइन आणि मोठी स्टार होती. बऱ्याच भारतीय सिनेप्रेमींनी देव-सुरैया आणि हॉलीवूडची दिल की धडकन् ग्रेगरी पेक अशा प्रेमाच्या त्रिकोणाची रोमँटिक कल्पना केली होती. परंतु प्रत्यक्षात असं काहीही नव्हतं.

देव आनंद आणि ग्रेगरी पेक दोघेही देखणे होते. हिटलरचा जनरल रोमेल याच्याकडे जसं ‘मिलिटरी सेक्स अपील’ होतं असं म्हणतात तसंच या दोघांकडेही ‘सिनेमा सेक्स अपील’ होतं असं म्हणता येईल. दोघेही सभ्य आणि मर्यादाशील म्हणून ओळखले जायचे. दोघांच्याही चाहत्यांची संख्या स्त्री व पुरुष दोन्ही अफाट होती/ आहे. दोघेही पदवीधर असून त्यांनी इंग्रजी विषयात पदवी घेतली होती. देव आनंदने लाहोरच्या प्रतिष्ठित गव्हर्नमेंट कॉलेजमधून, तर आपल्या या अमेरिकन हिरोने तुलनेने कितीतरी जास्त प्रतिष्ठित अशा युनिव्हर्सटिी ऑफ कॅलिफोर्निया (बर्कले) इथून. देव आनंदचे अनेक चाहते त्याला विचारवंत समजायचे, हे जरा अविवेकीच होतं. देव आनंद ‘फॉयल्स’ या  लंडनमधल्या जगप्रसिद्ध अशा पुस्तकाच्या दुकानाला अनेक वेळा भेट द्यायचा, पुस्तकं चाळायचा आणि बऱ्याच वेळा विकतही घ्यायचा- हे त्याचं कारण होतं. (तसं तर लिबियाचा दिवंगत हुकूमशहा कर्नल गद्दाफीदेखील या दुकानाला भेट देत असे.) दोघांचीही ठाम अशी राजकीय विचारसरणी होती आणि आपली मतं ते निर्भयपणे व्यक्त करत असत. ग्रेगरी पेक उदारमतवादी कार्यकर्ता होता आणि अमेरिकेतल्या House Un-American Activities Committee वर त्याने तीव्र नापसंती व्यक्त केली होती. (अमेरिकन नागरिकांचे काही कम्युनिस्ट लागेबांधे आहेत का, आणि ते काही राष्ट्रविरोधी कारवाया करताहेत का, याची चौकशी करण्यासाठी ही समिती गठित केली गेली होती.) व्हिएतनाम युद्धालाही त्याने तीव्र विरोध केला होता. तर देव आनंद उजव्या विचारसरणीचा होता. १९७५ ते ७७ या काळात इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जाहीर केली होती, तिला त्याने कडवा विरोध केला होता.

साधारण एकाच वयाचे असताना त्या दोघांचंही निधन झालं. ‘रोमन हॉलिडे’च्या नायकाचं ८७ व्या वर्षी, तर ‘गाईड’च्या हिरोचं ८८ व्या वर्षी. दोघेही काही फार मोठय़ा कुवतीचे अभिनेते नव्हते. समीक्षकांनीही कधी त्यांना महान अभिनेता वगैरे म्हटलेलं नाही.

पहिला फरक त्यांच्या देहयष्टीत होता. ग्रेगरी पेक अंगापिंडाने दणकट होता. त्याची उंची ६ फूट ३ इंच होती. पडद्यावर तरी देव आनंदला तुम्ही सरळ, ताठ उभा राहिलेला क्वचितच पाहिला असेल. त्याची मान सदैव एका बाजूला कललेली असे आणि तो गतिमान झाला की कुठल्याशा अदृश्य झाडाच्या फांद्या हुकवत जात आहे असे वाटे. त्यामुळे आपल्या भारतीय हिरोची खरी पूर्ण उंची किती होती, हे सांगणे कठीण. (तसं तो ५ फूट ८-९ इंच होता असं म्हणतात). आपल्या सिनेमातील हाणामारीची दृश्ये ग्रेगरी पेक स्वत:च करायचा, तर पडद्यावर दुष्ट खलनायकांना देव आनंद स्वत: बुकलायचा का, हे गुलदस्त्यात आहे. फ्रेड अ‍ॅस्टअर किंवा जीन केली यांच्यासारखा ग्रेगरी पेक हा निष्णात नर्तक नक्कीच नव्हता, हे जरी खरं असलं तरी कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्याने नृत्याचे धडे गिरवले होते. साधी, सोपी नाचाची दृश्यं विश्वासार्ह वाटतील अशा सक्षमपणे तो करू शकायचा. देव आनंदला नाच करणं कधीच जमलं नाही. त्याचं नृत्यकौशल्य लज्जित करण्याइतकं खराब होतं आणि त्याचं पदलालित्य पी. जी. वुडहाऊस या विनोदी लेखकाच्या ‘द मॅन विथ टू लेफ्ट फीट’ या एका लघुकथेच्या नायकासारखं होतं. (दोन डावे पाय असणाऱ्या मनुष्यप्राण्याची कल्पना करा, म्हणजे मला काय म्हणायचं आहे ते कळेल.) आणि  शेवटचा फरक म्हणजे ग्रेग या हॉलीवूडच्या स्टारची वेशभूषा त्याच्या शांत व्यक्तिमत्त्वाला साजेशी अशी पारंपरिक असायची. तर आपला भारतीय हिरो वेगवेगळ्या प्रकारच्या हॅट, स्कार्फ, मफलर, कमरेचे पट्टे अशा चित्रविचित्र साधनांनी नटून एक गमतीदार फॅशन स्टेटमेंट करायचा.

ते दोघंही काही फार मोठय़ा कुवतीचे अभिनेते नव्हते. मोतीलाल, बलराज साहनी, संजीवकुमार किंवा नसीरुद्दीन शहा यांच्या पंक्तीत काही देव आनंद बसू शकला नसता. तसंच ग्रेगरी पेकदेखील काही पॉल मुनी, पॉल न्यूमन किंवा मार्लन ब्रॅन्डो नव्हता. दोघांनाही चांगल्या दिग्दर्शकाची गरज भासे. दोघेही महान अभिनेते नसले तरी ग्रेगरी पेक त्यातल्या त्यात जरा जास्त उजवा होता. तीन वर्षांच्या अंतराने प्रकाशित झालेल्या या दोघांच्या पारितोषिकप्राप्त दोन सिनेमांची उदाहरणं घेऊ : ‘गाईड’ (१९६५) या सिनेमातील भूमिकेसाठी देव आनंदला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेयर पुरस्कार मिळाला होता. आणि ग्रेगरी पेक याला ‘To Kill A Mocking Bird’ या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. हे दोन्ही चित्रपट बघितले तर ग्रेगरी पेक याची ‘अ‍ॅट्टीकस फिंच’ ही भूमिका, देव आनंद याच्या ‘राजू’ या ‘गाईड’मधील भूमिकेपेक्षा कलात्मकदृष्टय़ा जास्त सरस आहे हे कळून येतं. आणि ग्रेगरी पेकचा ‘रोमन हॉलिडे’ या सिनेमातला जो ब्रॅडली आठवा- त्याच्याशी तुलना होऊ शकेल अशी देव आनंदची एक तरी भूमिका तुम्हाला आठवते का? मला तरी नाही.

१९५० च्या दशकातली देव आनंद आणि सुरैया यांची विफल प्रेमकहाणी देवच्या कडव्या चाहत्यांना सगळ्या तपशिलासकट माहीत असणार. ‘दिल्लगी’ सिनेमाच्या हिरॉईनची (म्हणजेच सुरैयाची) आजी त्या दोघांच्या पडद्यावरच्या आणि पडद्याबाहेरच्या रोमान्सवर कशी ससाण्यासारखी नजर ठेवून असायची, ती या प्रेमकहाणीत खलनायिका कशी झाली, ३००० रु. किमतीची साखरपुडय़ाची अंगठी तिने कशी अरबी समुद्रात फेकून दिली (की ती मुंबईतली मिठी नदी होती?), इत्यादी सारे तपशील त्यांना माहिती असतात. ते आपण  सोडून देऊ आणि देव आनंदच्या असंख्य चाहत्यांना पडलेल्या प्रश्नाकडे येऊ. तो प्रश्न म्हणजे- ‘ग्रेगरी पेकची अक्षरश: पूजा करणारी सुरैया देव आनंदच्या प्रेमात पडलीच कशी?’ त्याचं एक उत्तर सुचतं ते म्हणजे- ‘देव आनंदमध्ये तिने ग्रेगरी पेकची प्रतिमा बघितली आणि समंजस सुरैयाने ती स्वीकारली. कारण देव आनंद इथे मुंबईत होता आणि तिच्या स्वप्नातला राजकुमार तिच्यासाठी जणू एक अप्राप्य काल्पनिक अस्तित्व होता. देव आनंदचं तत्त्वज्ञान त्याच्या नंतरच्या काळातल्या एका गाण्यासारखं होतं. तेच- ‘हम दोनो’मधलं प्रसिद्ध गाणं..

‘बर्बादियों का सोग मनाना फिजूल था

हर फिक्र को धुएँ में उडाता चला गया’

हे काही सुरैयाला मानवणारं नव्हतं. १९४९ साली तिचा एक चित्रपट आला होता-‘बडी बहन’! त्यात तिने गायलेलं एक अतिशय लोकप्रिय गीत होतं. या गीतातून जणू तिच्या जगण्याचं तत्त्वज्ञानच ती सांगत होती..

‘वो पास रहें या दूर रहें,

नजरों में समाये रहते हैं’

या गाण्यानंच ती जणू आपलं सांत्वन करून घेत राहिली.

‘रोमन हॉलिडे’च्या हिरोने हे गाणं ऐकलं होतं की नाही हे आपल्याला कधीच कळणार नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की : १९५४ सालच्या एका दमट संध्याकाळी मुंबईच्या मरिन ड्राइव्ह येथील ‘कृष्णमहाल’ या इमारतीतल्या सुरैयाच्या घरी ग्रेगरी पेक तिला भेटला होता आणि आपल्या या सर्वात प्रसिद्ध भारतीय स्त्री-चाहतीबरोबर त्याने दोन तास व्यतीत केले होते.

देव-सुरैयाची ही अधुरी प्रेमकहाणी काहीशा फिल्मी आणि काहीशा वास्तव जगाच्या रीतीने अखेर संपुष्टात आली. आपला पंजाबी देवदास या धक्क्यातून लवकरच सावरला आणि त्याने कल्पना कार्तिकशी लग्न केले. ती त्याची ‘टॅक्सी ड्रायव्हर’ या सिनेमातली नायिका! सुरैयानं मात्र एकटंच राहण्याचा निर्णय घेतला आणि आयुष्याच्या अखेपर्यंत (२००४) लग्न न करता ती एकटीच राहिली. प्रसिद्ध रशियन लेखक अँटोन चेखोव्ह एकदा म्हणाला होता, ‘‘एकटेपणाची भीती जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही लग्न करू नका.’’ पण अखेपर्यंत एकटं राहण्याचा निर्णय तिने गालिबच्या एका शेरवरून घेतला असावा. ‘मिर्झा गालिब’ (१९५४) या सिनेमात सुरैयाने गालिबच्या तवायफ असलेल्या प्रेयसीची भूमिका केली होती. त्यात तिने स्वत: गायलेली गालिबची एक गझल आहे. त्यातल्या एका शेराने तिला हा निर्णय घेण्यास प्रवृत्त केलं असावं असं वाटतं. तो शेर असा :

‘ये न थी हमारी किस्मत के विसाल-ए-यार होता

अगर और जीते रहते यही इंतजार होता’

(‘आमचं मीलन व्हावं अशी नियतीच नव्हती. जगलो असतो तरी इथं वाट बघणंच नशिबी आलं असतं.’)

शब्दांकन : आनंद थत्ते