प्रा. मं. गो. राजाध्यक्ष rajapost@gmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मं. गो. राजाध्यक्ष.. ज. जी. उपयोजित कलामहाविद्यालयाचे माजी अधिष्ठाता. अनेक कलासंस्थांचे सल्लागार म्हणून कार्यरत. विविध कलांचे जाणकार विश्लेषक. त्यांचे कलाक्षेत्राची मुशाफिरी करणारे पाक्षिक सदर..
साधारणपणे १९५८ ते १९६८ चा काळ. भारतीय जाहिरात क्षेत्रात आपल्या मनमोहक कलाविष्काराने, अवर्णनीय रेखाटनाने एका तरुणाने आमूलाग्र क्रांती केली. तो काळ आजचा संगणकाचा नव्हता, फोटोशॉप – इलस्ट्रेटर अशा सॉफ्टवेअरचा नव्हता. कलाकार म्हटले की त्याच्या हातून होणारी कलानिर्मिती हीच एकमेव खास बाब ठरत असे. जाहिरातींमधील बोधचित्रे, कॅलेंडर्स, पोस्टर्स, कॅटलॉग, शुभेच्छा कार्डस् या सर्वच गोष्टी त्या तरुणाच्या हातून नखशिखांत देखणी होऊन बाहेर पडत आणि तो कलाकार म्हणजे आजचे जागतिक कीर्तीचे कलावंत रवी परांजपे.
रवी परांजपे यांचे नाव घेतले की माझे मन सुमारे साठ वर्षे मागे जाते अन् झर्रकन् तो संपूर्ण कालखंड माझ्या डोळय़ासमोर उभा राहतो. तेव्हा मी बेळगावच्या सेंट पॉल्स हायस्कूलमध्ये शिकत होतो. तेथे आमचे ड्रॉइंग शिक्षक होते बेळगावचे सुप्रसिद्ध कलामहर्षी के. बी. कुलकर्णी. त्यांची शिकविण्याची हातोटी काही वेगळीच होती. एक दिवस ते आपल्यासोबत एका तरुणाला घेऊन आले व त्याच्याशी आमची ओळख करून दिली, हे रवी परांजपे. हे आता तुम्हाला ड्रॉइंग शिकवतील. आमची ती परांजपे सरांशी पहिली भेट. देखणे रूप, गोरा वर्ण, डोक्यावरील केसांचा एका बाजूला वळवून भांग पाडण्याची पद्धत अन् मिठास बोलणे यामुळे त्या लहान वयातही त्यांचे व्यक्तिमत्त्व खुलून दिसत असे. पहिल्याच दिवशी त्यांनी आम्हा चित्रकलेकडे ओढा असलेल्या विद्यार्थ्यांचे मन आकर्षित केले आणि सायंकाळी ते कुलकर्णी सरांच्या ‘चित्रमंदिर’ या संस्थेत शिकत, इतर विद्यार्थ्यांनाही शिकवीत असत. पुढे त्याच ‘चित्रमंदिर’मध्ये मीही शिकण्यास जाऊ लागलो अन् तेव्हापासून परांजपे सरांशी जे ऋणानुबंध जुळले ते आजतागायत तसेच आहेत.
परांजपे यांचे वडील कृ. रा. परांजपे हे थोर अभ्यासक, संशोधनकार व विविध कलांनी युक्त असे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या आईकडेही कलागुण होते. त्यांचाच वारसा परांजपे यांना लाभला होता. चित्रकलेइतकीच परांजपेंना संगीतातही रुची होती. अगदी लहान वयातही परांजपेंचे काम पाहणाऱ्याला थक्क करून सोडणारे होते. मात्र त्यांना लाभलेल्या या दैवी देणगीबरोबरच त्यांचे परिश्रम व तपश्चर्या तेवढीच महत्त्वपूर्ण होती. त्यांचा रोजचा सराव, अभ्यास सतत सुरू असे. स्केचिंग – अनॉटॉमी यांच्या सरावाच्या कागदाचे ढीग ते रचत असत आणि यातूनच त्यांची अद्भूत अशी कला बहरत गेली, तिला कोंदण मिळाले. अर्थात बेळगावसारख्या ठिकाणी त्यांच्या कलागुणांचे चीज होणे कठीणच होते. त्यामुळे १९५८ साली परांजपेंनी बेळगावला रामराम ठोकला आणि त्यांचे पाऊल मुंबईला पडले.
मुंबईत आल्यावर ‘रतन बात्रा’ या जाहिरात संस्थेत त्यांनी कामास सुरुवात केली. पुढे त्यांनी केलेल्या ग्लॅक्सो कंपनीच्या कॅलेंडरमुळे ‘टाइम्स ऑफ इंडिया’चे आर्ट डायरेक्टर रमेश संझगिरी यांनी स्वत: परांजपेंना ‘टाइम्स’मध्ये आमंत्रित केले व परांजपेंचे एक स्वप्न सत्यात उतरले. त्या दिवशी ‘टाइम्स’मध्ये शिरताना सर्वप्रथम त्यांनी ‘टाइम्स’च्या पायऱ्यांना स्पर्श करून वंदन केले व ते आत शिरले! ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या चौथ्या मजल्यावर एक प्रचंड असा कला विभाग होता. लॅंगहॅमरसारख्या युरोपीयन कलाकाराने तो वाढविला होता. टाइम्स वृत्त समूहाची अनेक प्रकाशने होती. प्रामुख्याने त्यांचीच कामे परांजपेंना मिळू लागली. ‘टाइम्स’मध्ये परांजपेंमधील कलाकाराला एक मोठेच आव्हान मिळाले. त्यांचे प्रत्येक काम हे त्यांच्या कलाकारकीर्दीवर यशाचा एकेक तुरा खोवू लागले. त्यांची रेखाटनाची पद्धत, चित्रांतील गोडवा, छायाप्रकाशाचा खेळ मांडून त्यातून दाखवलेली चित्रांतील खोली, अॅनाटॉमीचा जबरदस्त अभ्यास यांमुळे त्यांचे प्रत्येक चित्र हे स्मरणीय ठरले. प्रत्येक चित्रात ते नवीन प्रयोग करीत असत. कधी स्क्रीन वापरून, कधी छपाईची शाई वापरून आणि सर्वात त्यांची नेत्रदीपक अशी रंगसंगती. यामुळे त्यांची चित्रे उठावदार होत असत. ‘टाइम्स’मधील अजूनही त्यांची चित्रे आठवतात ती म्हणजे पिकासो, जगदीशचंद्र बोस, विनोबा भावे अशांची पोट्र्रेट्स, ‘वीकली’साठी केलेली अनेक बोधचित्रे, ‘अॅन्युअल’साठी केलेली कव्हर्स, ‘धर्मयुग’च्या डबल स्प्रेडमध्ये केलेले गांधीजी, सरहद गांधी आणि पंडित नेहरूंच्या बैठकीचे इलस्ट्रेशन तर इतके प्रभावी होते, की त्यातील प्रत्येक व्यक्तिरेखा जिवंत वाटत होती. विक्रेते त्यांच्या चित्रांची पाने उघडून ठेवीत असत आणि परांजपेंच्या अशा चित्रांसाठी अनेक अंक संग्रा होत असत. ‘टाइम्स’मधील चित्रांमुळे परांजपेंचे नाव देशभर झाले. त्यांच्या नावाचा दबदबा निर्माण झाला व ते प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले. त्यांच्या कलाशैलीचे अनुकरण अनेक जण करू लागले.
पुढे ‘टाइम्स’ सोडून परांजपे आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या ‘बेन्सन’ या जाहिरात एजन्सीत आले आणि तेथे त्यांचे जाहिरातीच्या जगातील खरे काम सुरू झाले. येथे त्यांच्या कला कारकीर्दीने एक वेगळेच वळण घेतले. जाहिरातींसाठी चित्रे काढणे म्हणजे ती केवळ चित्रे नसून त्यामध्ये विचारप्रसारण हे महत्त्वाचे असते. ही चित्रे तुमच्याशी संवाद साधत असतात. तुमची चित्रे वाचकांशी वा ग्राहकांशी उत्पादनाबद्दल हितगुज करीत असतात. ‘बेन्सन’मध्ये केलेले पहिलेच चित्र क्लायंटला इतके आवडले की, बोधचित्रे आणि परांजपे हे एक समीकरणच ठरले. ‘बेन्सन’च्या काळातील परांजपे सरांची बोधचित्रे ही जाहिरात कला क्षेत्रातील एक मानदंड ठरला होता. त्या वेळी बहुतेक सर्वच जाहिरातींना बोधचित्रे वापरत असत. येथेही सरांची कामे ही नैपुण्यदायक असतच, शिवाय त्यांच्या ब्रशवरील हुकमी पकड दाखवणारी असत. त्यांनी ‘केप्लर मार्ट’साठी केलेले ड्राय ब्रशचे चित्र, वालचंदनगर साखरेसाठी केलेली ग्रामीण चित्रे, युद्धाच्या वेळी केलेली तंबूमधील मिलिटरी हॉस्पिटलची चित्रे, वॉटरबरीजसाठी केलेली हॉकी – फुटबॉल अशा खेळाडूंची चित्रे, ज्वेलर्ससाठी केलेली अशी असंख्य चित्रे होती. शिवाय कॅलेंडर, कॅटलॉग, शुभेच्छा पत्रे, पोस्टर्ससाठी केलेली खास परांजपे टचची चित्रे घरोघरी लोक सांभाळून ठेवीत असत. तशीच त्यांची कॅलेंडर्स लोक वर्षभर भिंतीवर व नंतर सांभाळून ठेवीत असत.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चित्रे काढताना परांजपेंना कधीच संदर्भ लागत नसे. कधी जर तांत्रिक मशीनरी अथवा तत्सम काम असेल तरच संदर्भ. नाही तर तुम्ही प्रसंग सांगत जा व सर त्याप्रमाणे रेखाटत जातात. इतकी त्यांची चित्र – स्मरणशक्ती तीव्र आहे. शिवाय जोडीला अॅनाटॉमी असल्याने आकृत्या कशाही असोत, त्या निर्दोष असतात. त्यांचे आलंकारिक सुलभ आकार अतिशय मोहमयी असतात. परांजपे सरांचे रंगही खास असे असायचे. केवळ बाटलीतून काढून वापरलेले नसत, तर त्यांच्या रंगांच्या शेड या खास स्वत:च्या असतात. त्यांचा लाल रंग त्यांनी तयार केलेला असतो. ग्रे रंगाच्या तर ते मालिकाच उभी करतात. एवढी रंगावर त्यांची हुकमत आहे. त्यांची केलेली रफ डिझाइन्ससुद्धा इतकी फिनिश असत, की कित्येकदा तीच छपाईसाठी वापरली जात. एवढी क्षमता त्यांच्या चित्रांत असे. याच दरम्यान त्यांचा विवाह स्मिता वहिनींशी झाला. त्यांच्या कला कारकीर्दीत त्यांचाही सहभाग तितकाच महत्त्वपूर्ण ठरला, प्रोत्साहन देणारा ठरला. जणू एकमेकांसाठीच निर्माण झालेले जोडपे होते ते! त्यांच्या कामात स्मिता वहिनी त्यांना नेहमीच प्रेरणादायी ठरल्या. याच वेळी बेन्सन इंटरनॅशनलचे सर्वात वरिष्ठ अधिकारी जगभरातील शाखांचा आढावा घेत होते. भारतात येण्यापूर्वी त्यांनी नैरोबीच्या बेन्सनच्या ऑफिसला भेट दिली होती. तेथे काम भरपूर होते, पण माणसे कमी होती आणि येथे भारतात त्याच्या नेमके उलट होते. माणसे होती, पण काम नव्हते आणि परांजपेंचे काम त्यांनी पाहिले व नैरोबीसाठी त्यांचे मन वळविले. तेथे गेल्यावर त्यांनी भरपूर काम केले. मुंबईला ते जेव्हा आले, त्या वेळी जे. जे. उपयोजित कला संस्थेत ती कामे विद्यार्थ्यांना दाखविण्यास आले. त्यांचा उद्देश होता, हे जाहिरातीचे क्षेत्र किती क्षणभंगुर आहे याची जाणीव देणे. त्यासाठी आपण कामात किती निष्णात हवे याची कल्पना देणे. त्यांच्या तेथील कामामध्ये आफ्रिकन लोकांचा रंग, तेथील निसर्ग, एक मनुष्य सायकलसोबत दाखविला होता, ती सायकलही फोटोग्राफीच्या पलीकडील बारकावे दाखवणारी होती. म्हणूनच त्यांच्या कामाला फोटो रियालिझम असेही म्हणत. फोटोग्राफीच्या पलीकडे त्यांचे काम असे. शिवाय जे. जे.मध्ये ते शिकवायलाही येत असत तेथे ड्रॉइंगचे महत्त्व समजावून सांगत. त्यासाठी लागणारे श्रम विशद करीत, प्रात्यक्षिके देत.
पुढे १९७३ साली परांजपे सरांनी बेन्सन सोडून स्वत:चा स्टुडिओ सुरू केला. तेथे त्यांच्याकडे बेन्सनमधून कामे येऊ लागलीच, शिवाय औषध कंपनी, टाइम्स ऑफ इंडियाची कामे येऊ लागली. शिवाय टाइम्समध्ये असताना त्यांचे नाव देशभर झाले होते. त्यामुळे दक्षिणेतील सर्व उत्पादक कॅलेंडरची कामे घेऊन त्यांच्याकडे येऊ लागले. मफतलालची जाहिरात मोहीम याच काळातील आणि याच वेळी त्यांच्या मनातील पेंटिंग करण्याची सुप्त भावना जागृत झाली. कामाबरोबरच त्यांचा कलेचा अभ्यास, जगभरातील कलाकारांची शैली अभ्यासणे, त्यावर संशोधन करणे ही कामे सुरूच होती. त्यात त्यांनी आधुनिक कलेचा अभ्यास केला. निरनिराळे इझम अभ्यासले. जे बघतो ते सुंदर करून मांडणे, ही त्यांची धारणा होती आणि १९८० साली त्यांचे पहिले चित्र प्रदर्शन मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये त्यांनी भरविले. छायाप्रकाशाचा अद्भूत खेळ मांडलेल्या त्या प्रदर्शनात एक मोराचे चित्र होते त्यातून प्रकाशाचा स्रोत बाहेर येत होता. अनेक लोक त्याच्या मागे एखादा लाइट लावला आहे का पाहण्यास जात. यानंतर पाठोपाठ त्यांची प्रदर्शने झाली. भारतात तशीच लंडन, न्यू जर्सी अशा ठिकाणीही त्यांच्या चित्रांना भरघोस प्रतिसाद मिळाला. प्रत्येक प्रदर्शनामध्ये त्यांनी आपल्या चित्रांत विविधता आणली होती. पेंटिंगमध्ये व्यस्त झाल्याने त्यांची जाहिरातीची कामे थोडी मागे पडली आणि दुसरा एक विषय त्यांची वाट पाहत उभा ठाकला होता. तो होता भव्य अशा इमारतींची पस्र्पेक्टिव्ह ड्रॉइंग्ज!
फिरोज कुडियनवाला हे इमारतींच्या वास्तुविशारदातील एक अग्रगण्य नाव. त्यांना इमारतींचा आराखडा झाल्यावर त्याच्या संभाव्य इमारतीचे चित्र पस्र्पेक्टिव्ह प्लॅन व एलिव्हेशनच्या आधारे करणारा आर्टिस्ट त्यांना हवा होता आणि शेवटी नाव आले ते रवी परांजपे. केवळ वास्तुविशारदाच्या आराखडय़ावरून पूर्ण इमारतीची रचना दाखवणारे ‘पस्र्पेक्टिव्ह रेंडिरग’ हे स्वतंत्र क्षेत्र परांजपेंनी विकसित केले. त्यातील लॅंडस्केपिंग, खालील लाद्यांवर पडलेले प्रतििबब, रंगसंगती अशानी युक्त असलेल्या संभाव्य इमारतीचे मनमोहक असे चित्र पाहिले, की एखाद्याला वाटलेच पाहिजे, की या इमारतीत राहायला हवे. अनेक वर्षे ही कामे सरांनी केली; पण त्यांच्यातील चित्रकार त्यांना अभिजात कलानिर्मिती करण्यास अस्वस्थ करून सोडत होता. शेवटी उपयोजित कलेची कामे बंद करून त्यांनी केवळ पेंटिंग करणे सुरू केले. आपल्या खास शैलीमधील त्यांनी केलेली पेंटिंग्जही त्यातील आधुनिकता, सुलभीकरण, आलंकारिक आकार, विशिष्ट अशी खास रंगसंगती व पोत या सर्वच दृष्टींनी सरस ठरतात. चित्रकलेसोबतच संगीतातही त्यांना तितकीच गती असल्याने त्यांची चित्रे, चित्र अन् संगीत यांचा सुंदर मिलाफ घडवून आणतात. त्यातूनही वेळ काढून चित्रकलेवर त्यांचे अभ्यासपूर्ण लेखन चालूच असते. त्यांची कला विषयावर विविध पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या ‘ब्रश माइलेज’ या आत्मचरित्राला पारितोषिक तर मिळालेच, शिवाय त्याच्या अनेक आवृत्त्या प्रकाशित झाल्या.
परांजप्यांना माध्यमाचे बंधन कधीच जाणवले नाही किंवा जाचक ठरले नाही. विविध माध्यमे त्यांनी अगदी सुलभतेने हाताळली. मग ते तैलरंग असो, जलरंग असो, पेन्सिल अथवा पेस्टल असो, सर्वच माध्यमं त्यांच्यासमोर लीन होत असत. तसेच विषयांचेही बंधन नाही. अगदी साध्यातला साधा विषयही त्यांना नव्या दृष्टीने पाहण्यास प्रवृत्त करतो. मग ती काही इंचांची वृत्तपत्रीय जाहिरात असो किंवा त्यांचा भव्य कॅनव्हास असो, त्यातील प्रत्येक रेषेत वा रंगाच्या फटकाऱ्यात परांजपे आपलं सर्वस्व ओततात. त्यामुळेच त्यांची प्रत्येक कलाकृती संस्मरणीय होते. १९९५ मध्ये त्यांना ‘कॅग’ या जाहिरात क्षेत्रीय संघटनेकडून ‘हॉल ऑफ फेम’ हा बहुमान मिळाला. भारतातील दयावती मोदी पुरस्काराचे अमिताभ बच्चन, मदर टेरेसानंतरचे ते तिसरे मानकरी ठरले. या पुरस्काराच्या रकमेचा ट्रस्ट करून त्यातून दरवर्षी त्यांनी सकारात्मक काम करणाऱ्या एका कलाकाराला रोख रक्कम व मानपत्र असा पुरस्कार आपले वडील कै. कृ. रा. परांजपे यांच्या नावाने सुरू केला होता. महाराष्ट्र शासनानेही त्यांचा सन्मान करून मानपत्र देऊन विशेष गौरव केला. याशिवाय अमेरिकेमधील ‘अमेरिकन आर्टिस्ट सोसायटी’तर्फे एका विशिष्ट देशातील कलाकाराचा सन्मान करण्याची प्रथा आहे. १९९८ हे वर्ष भारताचे होते. त्यामधूनही पुरस्कारासाठी रवी परांजपे यांचीच निवड झाली; पण आपल्या देशातील पद्म पुरस्कारांपासून मात्र ते वंचित राहिले. सतत कला साधनेमध्ये मग्न असलेला हा मनस्वी कलावंत आता पुण्यात स्थायिक झाला आहे. मुंबईने पैसा दिला, पण पुण्याने संस्कृती दिली व त्याच संस्कृतीशी त्यांनी आपले नाते जोडले आहे. पुण्यातील कलावंतांना, विशेषत: तरुण कलाकारांना सोबत घेऊन त्यांचे अनेक समाजोपयोगी उपक्रम सुरू असतात. आज दुर्मीळ होत चाललेल्या वास्तववादी कलेला मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी व वास्तववादी व सकारात्मक काम करणाऱ्या कलाकारांना प्रोत्साहन देऊन त्यांना सतत मार्गदर्शन करण्यासाठी तसेच नवोदित कलाकारांना, विचारवंतांना एक व्यासपीठ देण्यासाठी व भारतीय कलेचे सौंदर्य जपण्यासाठी ‘रवी परांजपे फाऊंडेशन’ व ‘रवी परांजपे आर्ट गॅलरी’ सुरू केली आहे. आज रवी परांजपे केवळ एक कलाकार नसून एक कलेचे विद्यापीठ बनले आहेत. त्यांची प्रचंड अशी कलासंपदा पुढच्या कित्येक पिढय़ांना मार्गदर्शनाचा एक तेवता दीपस्तंभ आहे!