मराठी रंगभूमीचा समग्र इतिहास कधी लिहिला जाईल की नाही माहीत नाही. परंतु त्यावर सादर होणाऱ्या नाटकांची सखोल चिकित्सा, विश्लेषण करणारी समीक्षाही अलीकडे दुर्मीळ होत चालली आहे. पूर्वी अनेक नाटय़विषयक किंवा इतरही नियतकालिकांतून नाटय़समीक्षा आवर्जून लिहिली आणि प्रसिद्ध केली जाई. परंतु कालौघात ही नियतकालिकं बंद पडली आणि वर्तमानपत्री समीक्षेवरच सगळा भार येऊन पडला. तीही तिच्या मर्यादित आवाक्यामुळे आणि जागेअभावी फारशी सखोल होत नव्हती आणि नाही. तरीही कमलाकर नाडकर्णी, ज्ञानेश्वर नाडकर्णी, प्रशांत दळवी, जयंत पवार, माधव वझे, शांता गोखले यांच्यासारख्यांमुळे वर्तमानपत्री समीक्षाही प्रतिष्ठा पावली. यांत आणखी एक घेण्यासारखं नाव म्हणजे नीलकंठ कदम यांचं. एक कवी, काव्यसमीक्षा करणारे म्हणून ते साहित्य क्षेत्रात मान्यता पावले आहेतच, परंतु ‘महानगर’मधून काही काळ आणि इतरत्र केलेल्या नाटय़समीक्षेमुळे ते नाटय़क्षेत्रातही परिचित झाले. अभ्यासू, ठाम मतमांडणी आणि तार्किक कारणमीमांसा करणारी त्यांची नाटय़समीक्षा नाटय़वर्तुळात दखलपात्र ठरली. १९८० ते आजपर्यंत म्हणजे गेल्या चाळीसेक वर्षांत त्यांनी नाना निमित्ताने नाटय़विषयक सखोल चिंतन करणारं लेखन केलं; जे आता ‘नाटक सांगोपांग’ या शीर्षकानं पुस्तकबद्ध झालेलं आहे.

शब्दालय प्रकाशनानं हे पुस्तक प्रसिद्ध केलं आहे. नीलकंठ कदम यांची आजवरची निवडक नाटय़समीक्षा, चिंतन, मनन यात शब्दबद्ध झालेलं आहे. काही चर्चासत्रांसाठी तसेच परिसंवादांसाठी लिहिलेले विशेष लेख, काही प्रसंगोपात उतरलेले नाटय़विषयक लेख आणि वर्तमानपत्री नाटय़समीक्षा अशी एकत्रित मांडणी या पुस्तकात झालेली आहे. नाटकं, त्यातील अनवट व्यक्तिरेखा, एखाद्या नाटककारावरील अभ्यासपूर्ण लेख तसंच रंगभूमीविषयक विवेचन करणारे लेख अशी सुरुवातीच्या लेखांची मांडणी आहे. ‘नाटकातील वैचारिकता आणि नाटय़ाभिरुची’ हा लेख रंगभूमीच्या विविध प्रवाहांची चिकित्सा करणारा आहे. त्यात पौराणिक, ऐतिहासिक, कौटुंबिक, वैचारिक, सामाजिक, प्रायोगिक, व्यावसायिक नाटकांचं खोलात जाऊन लेखकाने विश्लेषण केलं आहे. दलित नाटकं, तेंडुलकर, मतकरी आणि सई परांजपे यांची बालनाटय़ं, वसंत सबनीसांची तीन नाटकं, महेश एलकुंचवारांचे एकांकिका लेखन, प्रेमानंद गज्वींच्या एकांकिका अशा विविध विषयांवर त्यांनी प्रसंगपरत्वे लेख वा निबंध लिहिले आहेत. यातली त्यांची चिंतनीय मतं रंगभूमीच्या अभ्यासकांनी दखल घ्यावीत अशी आहेत.

article about social and political polarization facing by american media
वृत्तवाळवंट सुफलाम करण्यासाठी…
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Cash worth Rs 3 lakh stolen from school on Law College Road Pune news
पुणे: विधी महाविद्यालय रस्त्यावरील शाळेतून तीन लाखांची रोकड चोरी
Crime News
Crime News : थिएटरमधून अर्ध्यात सोडून गेल्याचा राग… बंगाली चित्रपटावरून एकाने पत्नीवर झाडल्या गोळ्या
CBSE instructed affiliated schools to publish staff and other information on their websites
संकेतस्थळावर माहिती, कागदपत्रे जाहीर न करणाऱ्या शाळांवर कारवाई; सीबीएसईचा इशारा
Action taken against bullet driver who makes loud noise
नागपूर : फटाके फोडणाऱ्या बुलेटमुळे त्रस्त! पोलिसांनी शेकडो सायलेन्सर…
nagpur crime news
उपराजधानीत तोतया पोलिसांचा सुळसुळाट, अजनी पोलीस ठाण्यासमोरच…
Vikas Dhakne was transferred after five months appointed Deputy Secretary
उल्हासनगरच्या आयुक्तांची उपमुख्यमंत्र्यांच्या उपसचिवपदी नियुक्ती, विकास ढाकणेंची अल्पावधीत बदली, नव्या आयुक्तपदी डॉ. रसाळांचे नाव चर्चेत

हेही वाचा : विचित्रपट तयार करताना..

नंतर बराच काळ त्यांनी ‘महानगर’मधून नाटय़समीक्षा लिहिली. त्यातल्या निवडक लेखांचा समावेशही या पुस्तकात आहे. ‘उद्ध्वस्त धर्मशाळा’, ‘पार्टी’, ‘वाडा चिरेबंदी’, ‘आत्मकथा’, ‘युगान्त’, ‘चारचौघी’, ‘यळकोट’, ‘अधांतर’, ‘राहिले दूर घर माझे’, ‘छोटय़ाशा सुट्टीत’, ‘गेली एकवीस वर्षे’, ‘रणांगण’, ‘शोभायात्रा’, ‘सेल्समन रामलाल’, ‘ढोलताशे’, ‘नातीगोती’, ‘डॉक्टर तुम्हीसुद्धा’, ‘ध्यानीमनी’, ‘अशी पाखरे येती’, ‘देहभान’ अशा अनेक नाटकांची वर्तमानपत्राच्या सीमित मर्यादेत केलेली त्यांची समीक्षा मर्मग्राही आहे. केवळ वरवरची शेरेबाजी न करता त्या नाटकाची संहिता, सादरीकरण, मांडणी, मूल्यविचार अशा अनेकानेक निकषांवर त्यांनी त्यांचं विवेचन केलेलं आढळतं. त्यांनी आपल्या परीक्षणांना दिलेली शीर्षकंही काहीएक विचार मांडणारी आढळतात; ज्यातून त्यांना नेमकं काय म्हणायचंय हे स्पष्ट होतं. केवळ नाटकाची गोष्ट सांगून ते तोंडदेखली शेरेबाजी करत नाहीत, तर आपल्याला मिळणाऱ्या मर्यादित जागेत ते वाचकाला नाटकाचं समग्र आकलन होईल आणि एक दृष्टिकोनही मिळेल हेही ते पाहतात. या अर्थानं वर्तमानपत्री असूनही त्यांची समीक्षा वेगळी ठरते. अर्थपूर्ण ठरते. दत्ता पाटील या उदयोन्मुख नाटककाराच्या नाटकांचा एकत्रित परामर्श घेणारा लेख हा नव्या रंगकर्मीचं स्वागत करणारा आहे. यापूर्वीची समीक्षक मंडळी साठ-सत्तरच्या दशकांतील नाटकं आणि नाटककारांपर्यंत येऊनच थबकायची. त्यानंतर जणू मराठी रंगभूमीवर काही झालंच नाही असं वाटावं असं त्यांचं मौन असे. या पुस्तकानं हे मौन तोडलं आहे आणि त्यानंतरच्या काळातही रंगभूमीवर बरंच काही घडलं आहे याची जाणीव त्यांनी या पुस्तकाद्वारे करून दिली आहे. मराठी रंगभूमीच्या इतिहासात याची उन्मेखून दखल घेतली जावी, हाही या पुस्तकाचा हेतू आहे.

हेही वाचा : प्रतीकांचा प्रभाव

नीलकंठ कदम आजही एकांकिका, नाटकं, नाटय़विषयक उपक्रम आवर्जून पाहतात, त्यांचा आस्वाद घेतात आणि त्यावर हिरीरीनं व्यक्तही होतात, याचा प्रत्यय पुस्तकातील तिसऱ्या विभागात येतो. ‘आय. एन. टी.’, ‘लोकसत्ता’ची ‘लोकांकिका स्पर्धा’ आणि राज्य मराठी विकास संस्थेची ‘रंगवैखरी’ ही स्पर्धा या सगळ्या स्पर्धाचा धांडोळा त्यांनी या विभागात घेतला आहे. त्यातून त्यांचा नवनव्या प्रयोगांकडे पाहण्याचा स्वागतशील दृष्टिकोन दिसतो. त्यांचा ‘दोन पिढय़ांचे शाहिरी आविष्कार’ हा लेखही लोककला परंपरेचा धांडोळा घेणारा आहे.
या सगळ्या लेखनात नीलकंठ कदम यांची आस्वादक वृत्ती, स्वागतशीलता आणि नव्या मंडळींचे प्रयोग उत्साहानं बघण्याची चिकित्सक वृत्ती प्रकर्षांनं जाणवते. त्यांचं आपल्या अभ्यासानं परिशीलन आणि विवेचन करणं त्यांना आवडतं.. भावतं. मराठी रंगभूमीच्या इतिहासात अशा प्रकारच्या म्हटलं तर तात्कालिक, परंतु काळाच्या ओघात आवश्यक ठरणाऱ्या चिकित्सक वृत्तीनं केलेल्या लेखनाची भर पडते आहे, हे विशेष.
‘नाटक सांगोपांग’- नीलकंठ कदम, शब्दालय प्रकाशन, पाने- ४५१, किंमत- ७६० रुपये.

Story img Loader