मराठी रंगभूमीचा समग्र इतिहास कधी लिहिला जाईल की नाही माहीत नाही. परंतु त्यावर सादर होणाऱ्या नाटकांची सखोल चिकित्सा, विश्लेषण करणारी समीक्षाही अलीकडे दुर्मीळ होत चालली आहे. पूर्वी अनेक नाटय़विषयक किंवा इतरही नियतकालिकांतून नाटय़समीक्षा आवर्जून लिहिली आणि प्रसिद्ध केली जाई. परंतु कालौघात ही नियतकालिकं बंद पडली आणि वर्तमानपत्री समीक्षेवरच सगळा भार येऊन पडला. तीही तिच्या मर्यादित आवाक्यामुळे आणि जागेअभावी फारशी सखोल होत नव्हती आणि नाही. तरीही कमलाकर नाडकर्णी, ज्ञानेश्वर नाडकर्णी, प्रशांत दळवी, जयंत पवार, माधव वझे, शांता गोखले यांच्यासारख्यांमुळे वर्तमानपत्री समीक्षाही प्रतिष्ठा पावली. यांत आणखी एक घेण्यासारखं नाव म्हणजे नीलकंठ कदम यांचं. एक कवी, काव्यसमीक्षा करणारे म्हणून ते साहित्य क्षेत्रात मान्यता पावले आहेतच, परंतु ‘महानगर’मधून काही काळ आणि इतरत्र केलेल्या नाटय़समीक्षेमुळे ते नाटय़क्षेत्रातही परिचित झाले. अभ्यासू, ठाम मतमांडणी आणि तार्किक कारणमीमांसा करणारी त्यांची नाटय़समीक्षा नाटय़वर्तुळात दखलपात्र ठरली. १९८० ते आजपर्यंत म्हणजे गेल्या चाळीसेक वर्षांत त्यांनी नाना निमित्ताने नाटय़विषयक सखोल चिंतन करणारं लेखन केलं; जे आता ‘नाटक सांगोपांग’ या शीर्षकानं पुस्तकबद्ध झालेलं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा