|| सुजाता राणे

कवी प्रमोदकुमार अणेराव यांच्या ‘काही सांगताच येत नाही’ या कवितासंग्रहाचे वर्णन ‘अभावग्रस्ततेच्या खाणाखुणांनी भरलेली, सर्वसामान्य माणसाच्या तुटक्याफुटक्या जगण्याची संवेदनशीलतेने केलेली अभिव्यक्ती’ असे थोडक्यात करता येईल. महानगरांमध्ये जागतिकीकरणाच्या रेट्यामुळे  हल्ली चकाचक मॉल आणि बाजारपेठेच्या चलतीसाठी सतत काही ना काही ‘साजरे’ करण्याची वृत्ती फोफावलेली दिसते.

22.91 lakh vehicles sold in January says FADA report
जानेवारीमध्ये २२.९१ लाख वाहनांची विक्री – फाडा
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
true friend in volatile market conditions Multi-asset funds
अस्थिर बाजार परिस्थितीतील खरा मित्र – मल्टी ॲसेट फंड
Godrej Consumer shares beneficiary
ससा-कासवाची गोष्ट : ‘गोदरेज कन्झ्युमर’चा शेअर अर्थसंकल्पाचा लाभार्थी ठरेल?
share market update bse nifty share bazar stock market
Marker roundup : ‘सेन्सेक्स’मध्ये सलग दुसऱ्या सत्रात मजबूत ६३१ अंशांची भर; दलाल स्ट्रीटवरील आजच्या तेजीमागील दडलंय काय?
Road encroachments removed in badlapur west railway station area
बदलापुरात रस्त्यावरील अतिक्रमणे हटवली; पूर्वेतील कारवाईनंतर पश्चिमेतही धडक कारवाई
deepseek vs chatgpt america
AI Technology: चीनी DeepSeek मुळे अमेरिकन शेअर मार्केटमध्ये कोलाहल; बाजार ३ टक्क्यांनी कोसळला, नेमकं घडतंय काय?
UCC
UCC in Uttarakhand : उत्तराखंडमध्ये आजपासून लागू झाला समान नागरी कायदा, आता नेमकं काय बदलणार?

‘सगळीकडे वाढून ठेवलीहे ढिगाढिगाने सुबत्ता

आणि पानांत वाढल्या जाताहेत आग्रहाने फक्त

भुका आणि भुका’        (‘लाळ’)

अशा ओळींमधून कवीने सहजतेने विषमता आणि वर्गसंघर्ष दाखवून दिला आहे. महानगरीय जीवनातील ओंगळवाणी, तुटक अनुभूती ‘उन्हबरसणीत’सारख्या कवितांमधून दाखवली आहे. साजरे करण्याच्या अतिरेकी नादात सपक, अभिरुचीहीन जगण्याचे उदात्तीकरण होऊ लागल्यामुळे…

‘हे कानफाड ढोलताशे!

बँडबाजे वाजताहेत दिगंतात

आणि आपली श्रुतीच गेलेली कायमची.

कोणी एक बरळलाच, अरे, हे बरे झाले

तसेही ऐकण्यासारखं काही राहिलं नाही बेट्या!’

                                                  (‘बस बोंबलत’)

या ओळी बधिरपणाने विवेकशून्य जगण्याकडे सुरू असलेला समाजाचा प्रवास सूचित करतात. कवितासंग्रहाचे शीर्षक ‘काही सांगताच येत नाही’ आणि ‘आता काही ऐकण्यासारखं राहिलं नाही’ यादरम्यानची ही संवेदनशील मनाची घुसमट या कविता अत्यंत ताकदीने व्यक्त करतात.

चंगळवादी, बाजारपेठीय व्यवस्थेत शेतीचा मातीशी संबंध न राहणे… तसेच अस्वाभाविक जगणे अवतीभवती पाहून कवी म्हणतो-

‘या वावटळीत मी कुठे आलो

पाहता पाहता या शतकात

माझ्यातून कविता

कवितेतून मी हद्दपार झालो’             (‘हद्दपार’)

आपल्या अनुभवाला टोकदार करण्यासाठी कवीने विविध परस्परविरोधी प्रतिमांची एकमेकांमध्ये केलेली गुंफण अफलातून आहे. उदाहरणार्थ…

‘पोहून जाण्यासाठी गुडघाभर पाणी नाही

चालून जाण्यासाठी पायाखाली नाही जमीन’(‘बिलामत’), ‘किती काळचा’सारखी कविता

‘किती काळचा सावता पावत्या फाडत राहिला पंढरीच्या

किती काळ नरहरी हरीहरी सोने पिटत राहिला…’ अशा चमत्कृतीपूर्ण शब्दयोजनांनी वाचकांचे लक्ष वेधून घेते.

‘सूर्य डिप्रेशनमध्ये जाणे’, ‘रात्रीच्या जखमा बांधताना सगुण देखणा चंद्र दिसणे’, ‘कधी अंतरात बेतून बेतून आकाशाचे हिंडणे’, ‘शरीरभर हताशेचं गोंदण’, ‘सर्वनाशाचा दस नंबरी शोषखड्डा’ यांसारखी भाषिक रूपे या कवितांचा वैशिष्ट्यपूर्ण आशय परिणामकारकपणे व नावीन्यपूर्ण रीतीने व्यक्त करतात. ‘पोकळ अनुभवांच्या परिणामस्वरूप पोकळ शब्द फुलवणारे काव्य’ असे स्वत:च्याच काव्यनिर्मितीबद्दल परखड भाष्य करण्यासाठी कलाकारापाशी आवश्यक असणारा परिपक्व तटस्थपणा कवी प्रमोदकुमार अणेराव यांच्यापाशी आहे.

‘काय फरक पडतो

कविता कळली काय, नाही कळली काय

कळले म्हणजे झाले जात, धर्म, वंश’

                                                  (‘काय फरक पडतो’)

 अशा सहज-साध्या भाषेतून समाजातील भेदभावाला खतपाणी घालणाऱ्या वृत्तीचा कवी उपरोधिक शैलीत समाचार घेतो. कवीने संवेदनशीलपणे भोवतालच्या अराजकसदृश परिस्थितीचा, जीवनात निरुद्देशपणाने लादलेल्या दडपणाचा, तसेच भीती, असुरक्षितता यांनी लदबदलेल्या टोकाच्या वैषम्याचा अनुभवही व्यक्त केला आहे. त्यासाठी कवीने विविध सांस्कृतिक चिन्हांचा, निसर्गातील प्रतिमांचा, चमत्कृतीपूर्ण शब्दकळेचा प्रभावी व योग्य वापर केला आहे.

‘चिरंजीव’सारख्या कवितेत ‘असे फोल पाखडीत बसलो आयुष्याचे अखंड दाणा एक सत्त्वाचा निका गवसेल का?’ अशी संतकाव्याशी जवळीक साधणारी शैलीही दिसून येते. संतांच्याच परखडपणे-

‘काळतोंड्या! तू मुक्त होऊ देत नाहीस पाताळयंत्री गारुडातून

राबते हात का अगतिक जुळतात पुन्हा पुन्हा’

असं म्हणत जणू विठ्ठलाबद्दल-

‘तू कावळा सहस्रक्ष

अखंड माझे मांसखंड लुचणारा’                                              

                   (‘हे खरं आहे की…’)

असे अत्यंत भेदक विचार मांडून जाते.

‘क्षितिजभर सांडली माझ्या वधाची लाली

क्रूस आणि खिळे माझ्या अवताली भवताली’

म्हणत ही कविता ‘कोणत्या भाषेत मावेल माझ्या वेदनेचा पट’ म्हणून येशू ख्रिस्ताने मानवतेसाठी केलेल्या त्यागाचीही आठवण करून देते. संस्कृती, जात, धर्म इत्यादी मानवनिर्मित व्यवस्थांमध्ये होणारे शोषण जणू सर्वसामान्य माणूस स्वत:हून निवडत असतो, म्हणूनच कवी ‘हा चाबूक किती देखणा पाठीने बेहद्द पसंत केलेला’ असे म्हणून या मानवनिर्मित विविध व्यवस्थांनी सर्वसामान्य माणसावर ढोंगीपणाने लादलेली गुलामगिरी दाखवून देतो. ‘सदेह’ ही संत तुकारामांचे संदर्भ आणि समाजभान यांचा छान मिलाफ साधणारी कविताही वाचनीय आहे. वासनेची अधीरता, मळलेले दृष्टिकोन, बुद्धी- विचारांवर येत चाललेली अनाकलनीय सूज या मनोकायिक आजारांवर केलेलं भाष्य ‘म्हन्जे बोललंच पाहिजे का?’सारख्या कवितेतून मुळातून वाचण्यासारखे आहे. 

‘पत्र’ या लेखनप्रकाराचा वापर करून पत्राच्या फॉर्ममधली कविता हा प्रयोग लक्षवेधी आहे . अगदी ‘मरणवाडी’ या पत्त्यापासून ते समारोपापर्यंत सर्वसामान्य माणसाच्या जीवनसंघर्षातील समस्यांकडे नेहमीच काणाडोळा करणाऱ्या व्यवस्थेचा यात गद्य भाषाशैलीत समाचार घेतला आहे .‘संवाद’ कवितेत ‘मी’ आणि ‘तो’ या दोन पात्रांमधला संवाद उंदीर, घूस, मुंग्या, डास, झुरळ यांच्या घरातील वावराशी संबंधित आहे. नाटकातील पात्रं व त्यांचे संवाद हे घटक कवितेत आणून रचनेच्या दृष्टीने केलेला प्रयोग व त्याने साधलेला नाट्यात्मक परिणाम अनुभवण्यासारखा आहे.

काहीही घडू शकते ही पाश्र्वभूमी असणाऱ्या ‘सांगताच येत नाही’ या कवितेचा-

‘पण दचकू नकोस, बिचकू नकोस

हृदयावर हात ठेवत म्हण

ओठ घुमा सिटी बजा, सिटी बजा के बोल

भैया आल इज वेल, अरे भैया आल इज वेल…’ असा लोकप्रिय हिंदी चित्रपटगीताच्या ओळींनी केलेला समारोप लक्षवेधी ठरतो.

‘पुन्हा पुन्हा’, ‘एका निवांत क्षणी’, ‘दुपार’, ‘आता तरी’, ‘सांप्रतात’, ‘प्रहर’ यांसारख्या कालदर्शक शीर्षकांतून कवीचे काळभानाच्या संदर्भातील अनुभव व्यक्त करणे समजून घेतले पाहिजे.

एकंदरीत नाराज करणारी आजूबाजूची परिस्थिती, अस्वस्थ वर्तमान, संभ्रमावस्था, गोंधळलेपण, संधिसाधू वृत्ती, स्वार्थी राजकीय-सामाजिक परिस्थिती यांमुळे झालेली विदीर्ण मन:स्थिती, हताशपणा असा सगळा आशय कवीने ‘काही सांगताच येत नाही’ या काव्यसंग्रहात प्रभावीपणे व्यक्त केला आहे.                                                                            ६

‘काही सांगताच येत नाही’- प्रमोदकुमार अणेराव, लोकवाङ्मय गृह, पाने- १०६, किंमत- १६० रुपये.

Story img Loader