अंकिता अविनाश कार्ले

एक मोठं जंगल होतं. त्यात खूप मोठी मोठी झाडं होती, प्राणी होते, पक्षी होते. सगळे जण छान हसूनखेळून राहत. त्यातच आपला छोटू हत्ती राहत होता बरं का! त्याच्या आई-बाबांसोबत. ते त्याचे खूप लाड करत. परंतु प्रसंगी त्याला ओरडतदेखील. तसा छोटू हत्ती शहाणा होता. पण कधी कधी तो वेडेपणादेखील करत असे. त्याला एक अतिशय वाईट सवय होती. ती म्हणजे आई-बाबांना न सांगताच तो घराबाहेर पडे. आपण शहाणी मुलं असं करतो का? नाही ना! पण हा छोटू हत्ती असाच होता. त्यासाठी तो नेहमी ओरडा खात असे. तरी त्याच्या या सवयीत त्याने कधीच बदल केला नाही.

tiger sighted again in barshi fear continues among villagers
बार्शीत वाघाचे पुन्हा दर्शन; गावकऱ्यांमध्ये दहशत कायम
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
tiger seen sitting on elephant shocking video viral
भयंकर घटना! वाघाला पकडून हत्तीवर बांधले अन् पुढे केलं असं काही की…, धक्कादायक VIDEO पाहून लोकांचा राग अनावर
Shegaon Gajanan Maharaj temple , Shegaon,
अवघी दुमदुमली संतनगरी! विदर्भ पंढरीत पाऊण लाख भाविकांची मंदियाळी…
forest fire cases
राज्यात तब्बल १६ हजारांहून अधिकवेळा जंगलाला आग
uran panje flamingos
Uran Flamingos : उरणच्या पाणजे पाणथळीवर परदेशी पाहुण्यांचे आगमन
Solapur tiger latest marathi news
Solapur Tiger News : ५० वर्षांनी सोलापुरात व्याघ्रदर्शन; शेतकऱ्यांमध्ये दहशत
Chandrapur forest area loksatta news
माजी वनमंत्र्यांच्या जिल्ह्यातील जंगल घटले

एके दिवशी काय झालं.. छोटू हत्ती अंगणात बसला होता. तेवढय़ात तिकडून त्याचा दोस्त आला. तो म्हणाला, ‘‘चल येतोस का फिरायला?’’ मग काय, आपला छोटू हत्ती लगेच निघाला. तेही घरी आई-बाबांना न सांगता. दोघं गप्पा मारत मारत खूप दूरवर गेले. तेवढय़ात त्या दोस्त हत्तीचे दुसरे मित्र त्याला भेटले आणि तो त्यांच्यासोबत निघून गेला.. तेही आपल्या छोटू हत्तीला एकटं टाकून. तसा आपला छोटू हत्ती धीट होता खरा; पण तो रस्ता त्याला थोडा अनोळखी होता. छोटू हत्तीने विचार केला- की दोस्त हत्ती तर निघून गेला, मग आपणही परत घरी जावं. ऊनही वाढलं होतं आणि त्याला भूकही लागली होती.

पण तेवढय़ात एक छोटीशी गडबड झाली. छोटू हत्ती चुकून आधीच्या गल्लीत वळला. परतीच्या वाटेवर त्याला ते कळलंच नाही. बिच्चारा! तो तसाच पुढे गेला.. पुढे गेला.. आणि बघतो तर काय! पुढे चक्क रस्ता होता सिमेंटचा. ते पाहून त्याला लगेचच लक्षात आलं, की आता आपलं जंगल संपलेलं आहे आणि माणसांचं जंगल सुरू झालं आहे. तो खूप गोंधळला. आपण वाट चुकलो आहोत हे त्याच्या लक्षात आलं. तेवढय़ात त्याला गाडय़ांचे आवाज ऐकू आले. तो इतका घाबरला, की त्याने त्याचे सुपासारखे कान पटकन् बंद केले. तेवढय़ात त्याला तिथे आणखीन काही हत्ती दिसले. त्यांना साखळदंडाने बांधलं होतं आणि काही माणसं त्यांना ओढत नेत होती. त्याला मग आई-बाबांची आठवण आली. खूप रडायला आलं. आणि कळून चुकलं, की ते त्याला का सांगत असतात- की न सांगता कुठे जाऊ नकोस! आपण हरवून जाऊ किंवा कोणीतरी आपल्याला पळवून घेऊन जाईल, या भीतीमुळे ते आपल्याला तसं सांगत असतात आणि आपण मात्र कसंही वागतो. आपली चूक छोटू हत्तीच्या लक्षात आली. त्याने मनातल्या मनात गणपती बाप्पाकडे प्रार्थना केली. आणि मग तो वाट शोधत शोधत काही वेळाने घरी परत आला. आल्या आल्या तो आईच्या कुशीत शिरला. तिला कळलंच नाही, की आपल्या या बाळाला नक्की काय झालंय! तिने त्याचे डोळे पुसले. मायेने त्याच्या अंगावरून सोंड फिरवली. ती अजिबात त्याला ओरडली नाही. त्याने आई-बाबांची क्षमा मागितली आणि घडलेली हकीगत सांगितली. आई-बाबांनी त्याला माफ केलं. ते खूश झाले.. कारण छोटू हत्ती आता असं परत कधीच वागणार नव्हता. तसं वचन छोटूने त्यांना दिलं होतं. तो आता शहाणा झाला होता. मग काय, आईने त्याला त्याच्या आवडीची केळी दिली. छोटू हत्ती ती आवडीने खात बसला.

तर आपणही आज ठरवूयात की, आई-बाबांना न सांगता आपणही कधीच कुठं जायचं नाही. नाहीतर आपल्याला छोटू हत्तीसारखा अनुभव यायचा.. हो की नाही?

karleankitaavi@gmail.com

Story img Loader