अंकिता अविनाश कार्ले

एका घनदाट जंगलात शेरू नावाचा बालसिंह राहत होता. बालसिंह म्हणजे छोटा सिंह. तो त्याच्या आई-बाबांबरोबर एका गुहेमध्ये राहत असे. शेरू न चुकता शाळेत जात असे. हो… त्यांच्या जंगलातसुद्धा शाळा होती. त्या शाळेत काय काय शिकवतात माहिती आहे का? त्या शाळेत शिकवतात की स्वसंरक्षण कसं करायचं, झाडांची काळजी कशी घ्यायची… कारण झाडं आहेत तर जंगल आहे! उगाच कोणी कोणाला त्रास द्यायचा नाही, एकमेकांना मदत करायची, छान छान गोष्टी सांगायच्या, असं सारं… शेरूला शाळा खूप आवडायची. तिथे त्याचे खूप मित्र होते. पण कोलू नावाचा कोल्हा त्याचा खास मित्र होता. ते दोघे खूप धम्माल करत, दंगा करत, खेळत, गप्पा मारत. एक दिवस कोलू शेरूला म्हणाला, ‘‘उद्या काही तरी हटके करायचं का?’’

saudi arabia snowfall
सौदी अरेबियाच्या रखरखीत वाळवंटात झाली चक्क बर्फवृष्टी; कारण काय?
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
story of young director who migrated from Goa to study at FTII
आम्ही डॉक्युमेंटरीवाले : घडविणारे आश्रयस्थान…
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Loksatta editorial Donald Trump won US presidential election
अग्रलेख: तो परत आलाय…
Narendra chapalgaonkar Sudhir rasal loksatta
लोभस आणि रसाळ!
loksatta editorial on aliens
अग्रलेख : ‘तारे’ तोडण्याचे तर्कट!

शेरू म्हणाला, ‘‘हटके म्हणजे काय रे?’’
कोलू म्हणाला, ‘‘अरे, हटके म्हणजे वेगळं काही तरी.’’ ते ऐकून शेरूच्या मनात कुतूहल निर्माण झालं. त्यानं विचारलं, ‘‘म्हणजे आपण काय करायचं रे कोलू?’’
कोलूला एक छान कल्पना सुचली होती. ‘‘शेरू, उद्या आपण त्या टेकडीवर जाऊ आणि मस्त मज्जा करू.’’ शेरूला कल्पना तर आवडली होती, पण शाळेचं काय करायचं या विचारात तो पडला. कारण घरी आई-बाबांना कळलं तर ते ओरडतील. त्यावर उपाय म्हणून कोलूला एक कल्पना सुचली, तो शेरूला म्हणाला, ‘‘आपण शाळेत जातो त्याच वेळेत घरातून बाहेर पडू, टेकडीवर जाऊ आणि शाळा सुटेल त्या वेळेत घरी परतू. म्हणजे कोणाला काही कळणार नाही.’’शेरूला ही कल्पना खूप आवडली आणि तो तयार झाला. त्या दोघांनाही हे फार साहसी वगैरे वाटत होतं, त्यामुळे ते दोघेही आनंदात होते.

आणखी वाचा-बालमैफल: जिंगल बेल… जिंगल बेल…

दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे ते शाळेला दांडी मारून टेकडीवर गेले, मजामस्ती केली आणि ठरल्या वेळेत घरी आले. पण खरी गंमत तर पुढे झाली. संध्याकाळी शेरूचे बाबा फेरफटका मारायला गेले असताना त्यांना शेरूचे शिक्षक भेटले. शेरू आज शाळेत का आला नाही याविषयी चौकशी करू लागले. त्याला बरं नाहीए का असं काळजीपोटी त्यांनी विचारलं. पण शेरूच्या बाबांना कळतच नव्हतं की शेरूचे शिक्षक असं का विचारतायत म्हणून. ते शिक्षकांना म्हणाले, ‘‘अहो सर, शेरू आज शाळेत गेला होता.’’

‘‘अहो शेरू आणि त्याचा मित्र कोलूही आज शाळेत आले नाहीत.’’ शिक्षक म्हणाले.
‘‘ठीक आहे, मी विचारतो शेरूला,’’ असं म्हणून ते घरी आले.
शेरू अंगणातच खेळत होता. बाबांनी त्याला विचारलं, ‘‘आज तू शाळेत गेला होतास ना?’’
शेरूनं घाबरून बाबांना थाप मारली, ‘‘हो गेलो होतो की!’’
त्यावर बाबा म्हणाले, ‘‘मग तुझे शिक्षक तर सांगत होते की तू आज गैरहजर होतास, कुठे गेला होतास?’’

आणखी वाचा-बालमैफल: चांदोबाचं दप्तर

‘‘एव्हाना शेरूच्या लक्षात आलं होतं की आता अजून थापा मारून काही उपयोग होणार नाही, त्यापेक्षा खरं काय ते सांगून टाकू. इतक्यात तिथे शेरूची आईदेखील आली. त्याने दोघांनाही घडलेली हकीगत सांगितली. ते सांगताना शेवटी शेवटी तर त्याला रडू कोसळलं. त्याला वाटलं, आता आई-बाबा आपल्याला ओरडणार. पण आई-बाबांनी खूप धीरानं घेतलं. ते शेरूला म्हणाले, ‘‘अरे शेरू, मजामस्ती करण्यात काहीच गैर नाही, दोस्तांबरोबर हुंदडण्यातही काही गैर नाही… पण शाळा बुडवून आणि आई-बाबांशी खोटं बोलून ते करणं हे मात्र चुकीचं आहे. आपण शाळेत का जातो? शिकायला ना! बरं शाळेतच रोज तुम्हाला काही वेळ खेळण्यासाठी असतोच की! त्यामुळे आणखी मजा करायची असेल तर सुट्टीच्या दिवशी जावं. आणि मला सांग शेरू, वर्गातल्या साऱ्या दोस्तांना एकत्र मजा करता यावी म्हणून तुमचे शिक्षक अधूनमधून जंगलसफारीही करवून आणतात की नाही? मग शाळेला अशी दांडी नाही मारायची.’’

शेरूनं डोळे पुसत पुसत त्यांची क्षमा मागितली आणि म्हणाला, ‘‘मी आता कधीही शाळा बुडवणार नाही आणि तुमच्याशी खोटं बोलणार नाही.’’
शेरूची अवस्था पाहून त्याच्या बाबांनी त्यांच्या लहानपणीची एक गंमत सांगितली. तेही एकदा लहानपणी अशीच शाळा बुडवून दोस्तांबरोबर मजा करायला गेले होते आणि त्यांच्या बाबांनीही त्यांना असंच समजावलं होतं. हे ऐकून शेरूला खुदकन् हसू आलं. त्यानं खेळण्यासाठी पुन्हा बाहेर धूम ठोकली.

karleankitaavi@gmail.com

Story img Loader