काही प्रश्नांची उत्तरे देणे कठीण असते हेच खरे! सोने खाली उतरणार का? शेअर बाजार आणखी वर जाणार का? असे अनेक प्रश्न वाचक ई-मेलवर विचारतात. अशा प्रश्नांच्या सरबत्तीत एक वेगळाच प्रश्न माझी पुरती कोंडी करून गेला. एका ज्येष्ठ नागरिकांनी मला एक ई-मेल लिहिला, त्याचा थोडक्यात सारांश असा-
सदर गृहस्थ सेवानिवृत्त आहेत. सध्या त्यांना त्यांच्या गुंतवणुकीवर एवढे व्याज मिळते की त्यांचा उदरनिर्वाह चांगला चालतो. आता त्यांच्या पुतण्याने काही उद्योग सुरू करण्याकरता त्यांच्याकडून पसे मागितले. त्यांनी आज त्यांच्या काही मुदत ठेवी मोडून हे पसे दिले तर त्यांना फार काही त्रास होणार नाही. पण येत्या दोन वर्षांत हे पसे परत मिळाले नाही, तर मात्र त्यांना त्यावेळी कदाचित जमा-खर्चाची तोंडमिळवणी करणे कठीण जाऊ शकते. त्यांचा प्रश्न असा होता की, असे पसे द्यावेत का?
काही मंडळींना हा अगदी खासगी प्रश्न वाटेल तर काहींना अगदी मामुली प्रश्न वाटेल. पण असे प्रश्न आपल्यापकी अनेकांना पडतात व काहींना आयुष्याच्या उत्तरार्धात किंवा आयुष्याच्या संध्याकाळी पडतात. ज्येष्ठ नागरिकांजवळ पसे नसणे ही एक समस्या आहे, तर पसे असणे हीदेखील एक समस्याच आहे, असे म्हणावे लागते. पसे नसले तर काय होते हे वेगळे सांगायला नको, पण पसे असणारे ज्येष्ठ नागरिकदेखील अनेकदा आíथक संकटात सापडताना दिसतात.
पसे असणारे ज्येष्ठ नागरिक पैसे मागणाऱ्याला बऱ्याचदा नाही म्हणू शकत नाहीत. विशेषत: एखाद्या तरुण नातेवाईकाने पसे मागितले तर एका बाजूला नाते व दुसऱ्या बाजूला आíथक अनिश्चित भवितव्य यांच्या कात्रीत सापडल्यासारखे व्हायला होते. उपरोल्लेखित प्रसंगात सदर ज्येष्ठ नागरिकांची आíथक परिस्थिती चांगली होती व मागितलेली रक्कम फार मोठी नसल्याने, केवळ पसे परत देण्याच्या लेखी बोलीवर त्यांनी त्यांच्या पुतण्याला पसे दिले. पुतण्या जबाबदारीने पसे परत करेल अशी त्यांना खात्री होती. महाराष्ट्रात काका-पुतण्यांचे संबंध चच्रेचा विषय ठरतात, पण या काका-पुतण्यांचे संबंध चांगल्या अर्थाने चíचले जावे ही अपेक्षा!
उतारवयात पशांच्या व्यवहाराबाबत थोडे जास्त सतर्क राहणे अपेक्षित आहे. नवे उत्पन्नाचे मार्ग फारसे नाहीत. आहे त्या पैशात उर्वरित आयुष्य काढायचे आहे, याची जाणीव मनाला कायम असणे आवश्यक आहे. बरेच पेचप्रसंग पशाच्या बाबतीत थोडेसे सल धोरण स्वीकारल्याने येतात. चारचौघात स्वत:च्या आíथकस्थितीची चर्चा, आपण केलेल्या ‘जबरदस्त फायदा देणाऱ्या’  मुदत ठेवींची चारचौघातील चर्चा येथूनच इतरांना ज्येष्ठांच्या आíथक स्थितीची कल्पना येते. ओळखीच्या व्यक्तींकडून बँकेचे पासबुक भरून घेणे ही आणखी एक घातक सवय. त्यामुळे आपल्या खात्यात किती पसे आहेत ते इतरांना सहज समजते.
सध्या बँका मोबाइल बॅंकिंग, ई-मेल बॅंकिंग या सोयी देतात. बँकेत स्वत:चा मोबाइल नंबर अद्ययावत ठेवल्यास बरेच कष्ट कमी होऊ शकतात. तसेच या मार्गाने इतर व्यक्तींवरचे आपले अवलंबित्व कमी करणे ज्येष्ठ नागरिकांना सहज शक्य आहे. तुमच्याजवळ किती पसे आहेत हे कळलेच नाही, तर पशासाठी कुणी तुमच्यावर हल्ला करणार नाही, तसेच कुणी तुमच्याकडे पसेही मागणार नाही.
तरीदेखील कुणी पसे मागितले व तुम्हाला पसे द्यावेसे वाटले तरी ते देत असताना ‘हे पसे परत मिळाले नाहीत तर काय?’ या प्रश्नाचे सकारात्मक उत्तर तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे. ‘स्टँपपेपरवर लिहून घेणे.’ ‘घरदार गहाण करून घेणे’ या मार्गानी नात्यातील किंवा ओळखीच्या प्रियजनांकडून वसुली करणे भल्याभल्यांना शक्य होत नाही. तसेच त्यासाठी लागणारी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याची चिकाटी फारजणांकडे नसते. वयपरत्वे स्वत:च्या आíथक क्षमता ओळखता आल्यावर अशा मागण्यांना कसे उत्तर द्यायचे ते नीट ठरवता येईल.
गाठीस चार पसे असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना भेडसावणारा आणखी एक प्रश्न म्हणजे अमुक एका योजनेत पसे गुंतवा व तमुक लाभ मिळवा, अशी मांडणी करणाऱ्या विक्रेत्यांच्या भेटी. अलीकडे बँकांमध्ये गुंतवणूक उत्पादन विक्रीतून कमिशन कमावणाऱ्या मंडळींची संख्या वाढली आहे. या कर्मचाऱ्यांना महिन्याला व वर्षांला काही विक्री उद्दिष्टे (टाग्रेट) दिलेली असतात व पसे असलेले ज्येष्ठ नागरिक त्यांच्यासाठी सॉफ्ट टाग्रेट असतात. ‘आम्ही असे फसलो’ या स्वरूपाच्या तक्रारी करणाऱ्या मंडळींमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या जास्त असते. ‘ही योजना फक्त आजच उपलब्ध आहे’, ‘तुम्ही लकी विनर असल्याने तुम्हाला इतके व्याज देत आहोत’ अशा प्रकारच्या दाव्यांपासून ज्येष्ठ नागरिकांनी सावध राहावे. घाई करून निर्णय घेणे टाळावे. विशेषत: गुंतवणुकीत आपण किती पसे किती कालावधीत भरणार आहोत व किती कालावधीनंतर किती रक्कम परत मिळणार आहे याची सखोल माहिती मिळवावी. योजनेची माहितीपत्रके (बँकेच्या किंवा कंपनीच्या लेटरहेडवर छापलेली) मागून घ्यावी. गुंतवणुकीचे फॉर्म भरण्याचे काम स्वत: करावे. स्वत:ला फॉर्म भरता येत नसेल तर सही करण्यापूर्वी अथपासून इतिपर्यंत जरूर वाचावा. एखादा कर्मचारी जी माहिती देत असेल ती त्याच्या वरिष्ठांकडून तपासून घ्यावी. विशेषत: एखाद्या गुंतवणुकीची माहिती इतर बँका, संबंधित कंपनीची वेबसाइट आदी मार्गाने तपासून घ्यावी.
पशाला अनाठायी पाय फुटणे टाळले तर अर्धीअधिक लढाई जिंकल्यासारखे आहे. बाकी नेहमीची काळजी घेतली तर उतारवयात आíथक जीवन सुखाचे होईल. यामध्ये पोलीस सांगतात तसे, दागदागिने घालून न मिरवणे हेदेखील आले. त्याचप्रमाणे स्वत:च्या आíथक व्यवहारात आयुष्याच्या जोडीदाराला द्वितीय खातेदार म्हणून जोडणे हेदेखील आलेच. इच्छापत्र या विषयावर पुन्हा केव्हातरी. दुसऱ्या बालपणात पसे म्हणजे केवळ त्रास आहे, असे न समजता आपले आर्थिक व्यवहार आपण जितके समजून घेऊन सावकाश पूर्ण करू तेवढे आपले आíथक जीवन समृद्ध होईल.                                                                                               

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा