‘ट्रिंग ट्रिंग’ माझ्या फोनची िरग वाजते.
‘‘हॅलो?’’ मी प्रश्नार्थक स्वागत करते.
‘‘तुमच्या आयुर्वेदात डोळ्यांसाठी हमखास उपाय असतात का हो?’’ आता ही चौकशी आहे की मुलाखत की उलट तपासणी की टाइमपास.. कसं कळणार? नाव, गाव काही न सांगता लोक थेट चालू होतात. त्यात
‘‘आपण कोण बोलताय?’’ मी शांतपणे विचारते.
‘‘मी एक पेशंट बोलतोय.’’ स्वत: फोन करून नाव गुप्त ठेवण्याची धडपड करणाऱ्या अशा लोकांची मला गंमत वाटते. ‘‘मला जरा डोळ्यांच्या उपचारांबद्दल माहिती हवी होती. तुम्ही काय औषध देता डोळ्यांवर?’’ माझा पदवीचा किमान दोन महिन्यांच्या आणि
२०० गुणांच्या अभ्यासाचा कस पुढच्या दोन मिनिटांत लागणार असतो.
‘‘आयुर्वेदात डोळ्यांच्या आजारासाठी औषध आहे. पण रुग्ण बघावा लागेल. कुठला आजार झालाय..’’
‘‘ते मी सांगतो की diabetic retinopathy आहे बघा.. काय औषध आहे त्याला?’’ हद्द झाली.
‘‘हो. पण आजार किती गंभीर आहे ते..’’
‘‘फारसा गंभीर नाही हो. ती सगळी कामं करते घरातली.’’
‘‘ती करते म्हणजे? मगाशी तर तुम्ही म्हणालात की पेशंट तुम्ही आहात!’’ माझ्याकडचं बर्फ आणि साखर दोन्ही वितळायला सुरुवात झालेली असते.
‘‘रुग्ण बघूनच काय ते नक्की सांगता येईल.’’ शेवटी सगळा कनवाळूपणा बाजूला ठेवून, स्पष्टपणे असं सांगावं लागतं. इतक्या चौकशा करूनही नियोजित वेळी रुग्ण येतीलच याची शाश्वती नसते.
पण आश्चर्य म्हणजे पावले कुटुंबातले सहा सदस्य दुसऱ्या दिवशी माझ्या पुण्यशालेत हजर झाले. दुर्दैवानं त्या सहाही जणांना डोळ्याची कुठली ना कुठली समस्या होती. आजींना diabetic retinopathy, आजोबांना वार्धक्यजन्य दृष्टिदोष, सुनेला वारंवार डोळे लाल होण्याचा आणि खाजण्याचा त्रास, मुलाला कम्प्युटर आय सिंड्रोम, नातवाला dry eye, तर नातीला चष्म्याचा वाढता नंबर.. कमी दिसण्याची समस्या तर थोडय़ाफार फरकाने प्रत्येकाला होती! बाब फारच गंभीर होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा