अरुंधती देवस्थळे
झूरिकमध्ये असताना तासभर अंतरावरल्या ‘बर्नच्या ‘पॉल क्लेई सेन्ट्रम’ला जा’ असं कोणी वेगळ्याने सांगायची गरज नव्हतीच. ‘तिथलं आईन्स्टाईनचं घरही बघायचं असेल तर रात्री मुक्काम करून दुसऱ्या दिवशी ते पाहून परत ये,’ हा सल्ला मात्र योग्यच होता. तर अशी रामप्रहरी बर्नला पोहोचले.. शहरापासून शांत अंतरावर असलेल्या पॉल क्लेईंच्या (१८७९-१९४०) दारी! प्रशस्त केंद्राच्या स्वागतकक्षातून आत जायला एक दरवाजा.. त्यावर पॉल क्लेईंचा मोठा फोटो. आणि समोर लिहिलेली त्यांची ओळख : Ich bin Malar (मी चित्रकार आहे). पण ते व्हायोलिनवादक, लेखक, संपादक आणि शिक्षकही होते. हे केंद्र क्लेईंच्या ५००० हून अधिक रेखाटनं, तसंच जलरंग, तैलरंग आणि रंगीत पेस्ट बनवून केलेल्या चित्रांचं संग्रहालय आहे. त्यांच्या स्टुडियोतलं सामान अजून तसंच मांडून ठेवलंय. ब्रशेस, रंग, पिगमेंट्स, हाताने केलेले मातीचे वाडगे आणि दोन-तीन कॅनव्हास. ही साधनं कशी वापरावीत याच्याही कार्यशाळा इथे घेण्यात येतात. एवढंच नव्हे, तर येणाऱ्यांमध्ये कोणाला जर क्लेईंची चित्रं पाहून काही पेंट करावंसं वाटलं तर आर्ट गॅलरीच्या केंद्रस्थानी एक वर्तुळाकृती कक्षात तीही मुभा आहे. ठिकठिकाणी चित्रांखाली Painting is an’ oil-reeking brush goddessl, line is a dot that went for a walk does not reproduce the visible, but makes visible’ यांसारखी क्लेईंची मार्मिक उद्धरणं लावलेली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आई आणि वडील दोघेही पाश्चिमात्य शास्त्रीय संगीतात पारंगत असल्याने सुरुवातीला क्लेईंच्या मनात आपण संगीत क्षेत्रात जावं की चित्रकलेत शिरावं याबद्दल संभ्रम होता. ते शिक्षणासाठी म्युनिकला आले. सुप्रसिद्ध फ्रान्झ वान ष्टोक अॅकॅडमीत प्रवेश मिळाला. शिक्षणाचा भाग म्हणून मास्टर्सचं काम बघायला ते इटलीत गेले. तिथली शिल्पं आणि पेंटिंग्ज पाहून ते इतके प्रभावित झाले की चित्र आणि रंगांच्या माध्यमातून स्वत:चा शोध घ्यायचा असं त्यांनी ठरवलं. सुरुवात कार्डबोर्डवर किंवा त्यावर लावलेल्या कॅनव्हासवर.. तैलरंगांनी. या काळात रंगयोजना उदास, मनाची अस्थिरता दाखवणारी. सुरुवातीच्या काळात त्यांचं लक्ष लाईन आणि किआरोस्कुरोमध्ये गुंतलेलं.
१९०५-१२ दरम्यान त्यांनी ६४ रिव्हर्स ग्लास पेन्टिंग्जची एक अप्रतिम मालिका केली होती. त्यातील प्रयोगशीलता बघता त्यांचं रंगांशी नातं समजू लागतं. हे तंत्र आत्मसात केल्यावर त्यांनी त्यातून अभिव्यक्तीच्या वाटा शोधल्या आणि दाखवूनही दिल्या. इथे असलेली ४२ रिव्हर्स ग्लास पेंटिंग्ज क्लेईंना हवी होती तशी फ्रेम केलेली आहेत. त्यांची निसर्गचित्रं ते चेहरे यांसारखे वेगवेगळे विषय बघता क्लेईंच्या प्रयोगशीलतेच्या धाडसाचा पल्ला डोळ्यांत भरतो. याच दरम्यान कधीतरी कांदिंस्कीची तैलचित्रं आणि त्यातील रंगांचा वापर त्यांच्या लक्षात आला आणि त्यांच्याच शब्दांत तो ‘Durchbruch zur farb (रंगांकडे नेणारा रस्ता) सापडला. १९१० च्या दशकात आधीचा जलरंगातील धुरकट रंगांचा सढळ वापर अचानक मावळून प्रकाश आणि उत्फुल्ल रंगांची सुरुवात होते. नव्याने गवसलेल्या पॅलेटमध्ये उठावदार, आनंदी रंग दाखल झाले. विरोधी रंगांचा खेळ जलरंगांतील चित्रांतून उमटू लागला. ‘‘जपानी इंडिया इंकचे पारदर्शक हात(थर) एकावर एक लावलेले. परस्परविरोधी रंगछटांतून चित्रांत अनेक ध्वनी निर्माण होतात. वेगवेगळी वाद्यं एकत्र यावीत तसं. आणि मग त्यांचा कल अमूर्ततेकडे झुकायला लागला- हे क्लेईंबाबतीत समजण्यासारखंच..’’ म्युझियममधली तेरेसा लक्षात आणून देते. ‘हा टय़ुनिशियाच्या वारीचा प्रभाव..’ असंही ती सांगते. आणि त्याबरोबरच सुरू झाला ॲब्स्ट्रॅक्ट कम्पोझिशन्स आणि भौमितिक आकारांचा खेळ. इमेजरीवर त्यांची असणारी अद्भुत हुकूमत.. दर्शकाने सावकाश पाहत अनुभवण्याजोगी. रंग आणि पिगमेंट्सची वेगवेगळी मिश्रणं आणि वेगवेगळ्या प्लास्टर ऑफ पॅरिसमधला जॅसो, खडूची पूड आणि वस्त्रगाळ वाळूसारखे घटक वापरून साधलेला परिणाम. एका कक्षात क्लेईंनी केलेली टेक्स्टाईल पेंटिंग्ज आहेत. सुती, रेशमी आणि जामदानी पृष्ठभागांवर केलेली चित्रं. वेगवेगळे प्रायमर लावून किंवा त्याशिवाय ते कापडाच्या पोताचा उपयोग पेन्टिंगसाठी आपल्याला अभिप्रेत पृष्ठभाग मिळवायला करीत. म्हणून त्यांच्या चित्रांचे पृष्ठभाग गुळगुळीत नसतात. त्यात भरडपणा असतो. त्याने एक वेगळाच फील येतो हा अनेकांचा अनुभव. ते रंग लावायला वापरत त्या पॅलेट नाइव्हज्, लाकडी उलथनं, हलक्या हातोडय़ा आणि कुंचले ही सगळी टीम पृष्ठभाग तयार करण्यात आपापली दर चित्रागणिक बदलणारी भूमिका निभावत असे. जसं की, जुन्या गालिच्याचा फील आणायचा असेल तर काही ठिकाणी रंग खरवडला जाई. थोडय़ाशा भागावर वाळू घासून तो विसविशीत झाल्यासारखं दाखवलं जाई.
आणखी एका कक्षात त्यांनी कात्रणांतून बनवलेली चित्रं आणि दोन्ही बाजूंनी रंगवलेली कॅनव्हासेस. पन्नाशीनंतरच्या कामात ते सगळ्या परंपरा आणि शैलीच्या मर्यादा झुगारून देऊन सर्वार्थाने मुक्त सर्जनात हरवून गेल्यासारखे दिसतात. काही कॉम्पोझिशन्समध्ये त्यांनी स्प्रेचा वापर केलाय, तर काहींत जलरंगात/ तैलरंगात/ पिगमेंट्समध्ये पेस्ट मिसळून अभिप्रेत असलेला इफेक्ट साधलाय. काही चित्रांत पिगमेंट्सपेक्षा प्लास्टरचं प्रमाण वाढवलं जाई; ज्यामुळे रंग जास्त वेळ ओला राहून त्यावर दुसरा रंग ब्रश, लाकडी सुऱ्या किंवा बोटाने लावणं शक्य होई. यामुळे त्यांच्या चित्रांना ब्रशने रंगवलेल्या चित्रांपेक्षा वेगळा फील येई. प्रत्येक चित्राला त्याचं स्वत्व (‘कॅरेक्टर’ या अर्थाने) मिळे. क्लेईंशी सूर जुळायला वेळ लागतो. पण ते झालं की त्यांच्या ॲब्स्ट्रॅक्टस्मधून संगीताचे सूर जाणवू लागतात. या अनुभूतीला नाव देता येत नाही.
घरातल्या संगीतप्रिय वातावरणामुळे पॉल क्लेईंना संगीताची गहिरी जाण होती. ते उत्कृष्ट व्हायोलिनवादकही होते. ॲब्स्ट्रॅक्ट चित्रकाराच्या नजरेतून ते बीथोवनसारख्या संगीतकारांना बघत : In Beethoven’s music, especially the late works, there are themes which do not allow the inner life to pour itself out freely, but to shape it into self-contained song. In performing it, we must take care to determine whether the psychic content expressed concerns others or is there for it’s own sake, I find the monologue form more and more attractive. For, in the end, we are alone on this earth, even in our love.(From the Diaries of Paul Klee)
क्लेईंचं वाचन दांडगं होतं Cooling in a Garden of the Torrid Zone यांसारख्या चित्रांच्या नावांवरूनही ते दिसतंच. क्लेई स्वत:च्या कामाकडे नि:स्पृह समीक्षकाच्या नजरेने बघत आणि तसं लिहीतही. कलेचे सिद्धान्त आणि सौंदर्यशास्त्रावर त्यांनी बरंच लिहिलं आहे. त्यांची ‘फॉर्म आणि डिझाईन’वरची व्याख्यानं प्रत्येक चित्रकाराने वाचण्या-ऐकण्यासारखीच. ‘रंग मला झपाटून टाकतात..’ म्हणणाऱ्या क्लेईंनी रंगांच्या थिअरीचा गहिरा अभ्यास केला होता. त्यामुळे एक्स्प्रेशनिझम, क्युबिझम आणि कधीमधी र्सीॲलिझमसारख्या वेगवेगळ्या शैलींत अभिव्यक्ती शोधत ते प्रयोगशील राहिले. सुरुवात तैलरंगांत झाली आणि नंतर ती मिश्र माध्यमांपर्यंत गेली. इथे त्यांच्या सृजनाची यात्रा रेखाटनांपासून ते शेवटच्या पूर्ण/ अपूर्ण चित्रांपर्यंत नेणारी. त्यांची ४००० च्या आसपास चित्रं तळघरातही नीट सांभाळून ठेवली आहेत. ती कायम अदलून बदलून प्रदर्शनाच्या कक्षांमध्ये मांडली जातात. त्यांच्या पन्नासाव्या वाढदिवसाला त्यांच्या चित्रांची प्रदर्शनं पॅरिस, ड्रेस्डेन, बर्लिन आणि न्यू यॉर्कमध्ये भरली होती. क्लेईंनी मध्यंतरी डय़ुसेलडॉर्फ ॲकॅडमीत अध्यापनही केलं. पण नॅशनल सोशॉलिस्ट मंडळींनी त्यांना फार काळ शिकवू दिलं नाही. म्हणून ते जर्मनी सोडून स्वित्र्झलडला बर्नच्या घरी कायमसाठी परतले.
१९३६ नंतर क्लेईंच्या कलेला शेवटचा बहर आला. आता शरीर पूर्वीसारखं साथ देत नव्हतं. कॅनव्हासजवळ उभं राहून चित्रं काढणं जमत नव्हतं. चित्रं बसून काढावी लागत. पण तरीही ते तंत्र, रंग आणि साहित्याच्या बाबतीत प्रयोगशील झाले होते. अमूर्त आणि लाक्षणिक यांचा मेळ असणारी चित्रं काढत ती लक्षवेधी रंगांत रंगवत होते. हे त्यांच्या अंतर्मुख होत चाललेल्या मनाला पडणाऱ्या ‘मी कोण आहे? माझ्या अस्तित्वाचं प्रयोजन काय?’ यांसारख्या प्रश्नांची उत्तरं शोधणं होतं, असं त्यांनी पत्नीला- लिलीला लिहिलं आहे.
दिवसाअखेरी एक सुखद आश्चर्य : माझं दिवसभर क्लेई बघणं पाहून संवेदनशील तेरेसाला काय वाटलं कुणास ठाऊक; तिने माझे तिकिटाचे पैसे परत केले. तिने ‘‘तू आर्टिस्ट दिसतेस..’’ म्हटल्यावर, ‘‘नाही. पण मी लिहीन कदाचित क्लेईंवर..’’ एवढंच मी म्हणाले. अत्यानंदाने म्युझियम शॉपमधून क्लेईंची जाडजूड डायरी (१८९८-१९१८) व सुसाना पार्श लिखित Paul Klee (1879-1940)’ हे छोटेसे, पण सटीक पुस्तक खरेदी करून टाकलं आणि ‘हे तुझ्यामुळे शक्य झालं..’ म्हणून तिला धन्यवादही दिले. डायरीला त्यांच्या मुलाची- फेलिक्सची प्रस्तावना आहे. क्लेई नियमितपणे दैनंदिनी लिहीत असत. इथे चार डायऱ्यांचा ऐवज संपादित करून दोन खंडांत प्रकाशित केला गेला आहे. केंद्रात माझ्या वाटय़ाला आलेला दिवस कसा संपला, ते कळलं नाही. जगाला दहा हजारवर चित्रं आणि निबंध, संगीत, साहित्य, सौंदर्यशास्त्र आणि कलेवर टिपणं असलेल्या डायऱ्या, पत्रव्यवहार आणि भाषणांच्या नोट्स देऊन जाणारे क्लेई सहज कोणाच्या आवाक्यात येणारे नाहीत. तरीही मी इतकंच म्हणेन की, हे केंद्र म्हणजे पॉल क्लेईंच्या दुनियेची ओळख करून घेण्याचा पासपोर्ट आहे. पाहणाऱ्याच्या आवाक्यानुसार इथे ज्या निखळतेने ते गवसतात, त्या समाधानाला तोड नाही!
arundhati.deosthale@gmail.com