नेहा लिमये
ताज्या वाचनाचा आणि नव्या पुस्तकांसाठीचा मुहूर्तकाळ ऐन दिवाळीतलाच. शेकडय़ाने दाखल होणारे दिवाळी अंक लेखक-कवी आणि विचारवंतांच्या कल्पनांची शब्दरूपे घेऊन येतात. याच दिवसांत पुस्तक जत्रा आणि महोत्सवांनाही उधाण येते. ‘लोकसत्ता’ अलीकडच्या काळातील लेखकांची पुस्तके वाचकांसमोर आणण्यासाठी नेहमी सक्रिय असते. राज्यातील साहित्यिक, प्रकाशक, संपादक, रंगकर्मी, चित्रपट दिग्दर्शक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर काय वाचतात, याचा शोध घेण्याचा हा प्रयत्न. आजच्या नव्या दमाच्या लेखकांचं कोणतं साहित्य वाचलं जात आहे, याचं सम्यक आकलन वाचकांना व्हावं आणि ग्रंथखरेदी अधिक सोपी व्हावी यासाठी राबविल्या जात असलेल्या उपक्रमाचे हे तिसरे वर्ष. यातील काही याद्यांमध्ये नव्याबरोबर जुन्याचा ओढाही कायम राहिलेला असला, तरी नव्या ग्रंथवाचनाकडे कल हळूहळू वाढत आहे. या याद्या त्याचीच साक्ष देतात..
हेही वाचा >>> ऱ्हासमय काळातील रसरशीत नऊ दशके
● वीणा गवाणकर (लेखिका)
* माणूस असा का वागतो? अंजली चिपलकट्टी
* भुरा – शरद बाविस्कर
* मराठी स्त्री आत्मकथनांची वाटचाल (१९१०-२०१०)
संपादन – डॉ. प्रतिभा कणेकर, छाया राजे
* ब्रॅंड फॅक्टरी- मनोहर सोनावणे
* चार चपटे मासे- विवेक वसंत कडू
● दिलीप माजगावकर (संपादक)
* कालकल्लोळ- अरुण खोपकर
* डॉ. मारिया मॉन्टेसरी- वीणा गवाणकर
* भुरा- प्रा. शरद बाविस्कर
* पंडित नेहरू- नरेंद्र चपळगावकर
* हाउ प्राइम मिनिस्टर्स डिसाइड- नीरजा चौधरी
● प्रवीण दशरथ बांदेकर (लेखक)
* अखईं तें जालें.. खंड १ व २- समीर चव्हाण
* काळ्यानिळ्या रेषा- राजू बाविस्कर
* आता वह्य सगळ्या बुडीत खाती- अनुराधा पाटील
* अधांतर : भूमी व अवकाश- संपादन. राजू देसले
* तथागत गोतम बुद्ध- वसंत गायकवाड
● चंद्रमोहन कुलकर्णी (चित्रकार)
* पाळण्यात न दिसलेले पाय- अजित गोगटे
* शब्द कल्पिताचे- संपादक- स्वानंद बेदरकर
* रुळानुबंध- गणेश मनोहर कुलकर्णी
* हिट्स ऑफ नाइन्टी टू- पंकज भोसले
* टिश्यु पेपर- रमेश रावळकर
* सांजड- सुचिता घोरपडे- सॅम पब्लिकेशन्स
● पुरुषोत्तम बेर्डे (दिग्दर्शक)
* इन्शाअल्लाह- अभिराम भडकमकर
* घातसूत्र- दीपक करंजीकर
* कोहजाद- अभिषेक कुंभार
* मराठवाडय़ाची नाटय़परंपरा- डॉ. सतीश साळुंके
* रावण- राजा राक्षसांचा- शरद तांदळे
● सचिन कुंडलकर (लेखक/ दिग्दर्शक)
* सत्यकथा निवडक कविता- खंड १ व २- संपादक- विजय तापस
* काम तमाम @ वाघा बॉर्डर- सतीश तांबे
* श्वासपाने- राही बर्वे
* बटरफ्लाय इफक्ट- गणेश मतकरी
* कुमारस्वर एक गंधर्व कथा- माधुरी पुरंदरे
● विजय केंकरे (नाटय़-दिग्दर्शक)
* चार चपटे मासे- विवेक वसंत कडू
* बटरफ्लाय इफक्ट- गणेश मतकरी
* विश्वामित्र सिंड्रोम- पंकज भोसले
* नदीष्ट- मनोज बोरगावकर
* दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी- बालाजी सुतार
● प्रेमानंद गज्वी (नाटककार)
* न हि वेरेन वेरानि- भगवान हिरे
* सिंधूतील साम्राज्ये- अॅलिस अल्बिनिया- अनुवाद- श्याम नारायण पाठक
* काश्मीरची ५००० वष्रे- बलराज पुरी- अनुवाद- संजय नहार
* तत्त्वज्ञान आणि नीती- संपादक-वसु भारद्वाज
● वसंत आबाजी डहाके (कवी)
* पाण्यारण्य- दीनकर मनवर
* दीर्घ – वामन कनाटे
* चार चपटे मासे- विवेक वसंत कडू
* मी सार्वकालिक सर्वत्र- पी. विठ्ठल
* खोल खोल दुष्काळ डोळे- प्रदीप कोकरे
● मिलिंद बोकील (लेखक)
* अवघी भूमी जगदिशाची- पराग चोळकर
* विश्वामित्र सिंड्रोम- पंकज भोसले
* बाळूच्या अवस्थांतराची डायरी- किरण गुरव
* हाकामारी- हृषीकेश गुप्ते
* गुरू विवेकी भला- अंजली जोशी
● भारत सासणे (लेखक)
* त्रिकाल : फ. मुं. शिंदे
* कला- समाज- संस्कृती -दीपक घारे
* काल -त्रिकाल – नागनाथ कोत्तापल्ले
* शब्द कल्पिताचे – संपादन – स्वानंद बेदरकर
* आपलं विश्व आणि त्याची नवलकथा – सुकल्प कारंजेकर
● उमेश कुलकर्णी (चित्रपट दिग्दर्शक)
* माझा प्रवास- गोडसे गुरुजी
* खोल खोल दुष्काळ डोळे- प्रदीप कोकरे
* साहित्य आणि अस्तित्वभान- दिलीप चित्रे
* श्वासपाने- राही अनिल बर्वे
* दृक्चिंतन- प्रभाकर कोलते
* मोनोक्रॉम- सचिन कुंडलकर
● जी. के. ऐनापुरे (लेखक)
* ग्रंथसर्जन : भाग २ – डॉ. शशिकांत लोखंडे
* उत्तरायण- संदीप सारंग
* थळ – रामराव अनिरुद्ध झुंजारे
* खोल खोल दुष्काळ डोळे- प्रदीप कोकरे
* भारतीय सौंदर्यशास्त्र- कॉ. शरद पाटील
● प्रभा गणोरकर (कवयित्री)
* साहित्य आणि अस्तित्वभान भाग २- दिलीप पुरुषोत्तम चित्रे
* लोभस- सुधीर रसाळ
* व्यासांचा वारसा- आनंद विनायक जातेगावकर
* कोलकाता कोलाज- नीलिमा भावे
● अतुल देऊळगावकर (लेखक)
* मोरी नींद नसानी होय- जयंत पवार
* गान गुणगान- सत्यशील देशपांडे
* खुलूस- समीर गायकवाड
* प्राक्- सिनेमा- अरुण खोपकर
* मी मराठीत बांग देतो- नारायण कुलकर्णी कवठेकर
● मनोज बोरगावकर (लेखक)
* आता वह्य सगळ्या बुडीत खाती- अनुराधा पाटील
* तसनस- आसाराम लोमटे
* फुकटचेच सल्ले- डॉ. रवींद्र तांबोळी
* वसुंधरेचे शोधयात्री- डॉ. अनुराग लव्हेकर
* आता मव्ह काय- देविदास तारू
● इंद्रजित भालेराव (कवी)
* काव्यालोचना- सुधीर रसाळ
* आता वह्य सगळ्या बुडीत खाती- अनुराधा पाटील
* सांजड- सुचिता घोरपडे
* मराठा वर्चस्वाचे बदलते आकृतीबंध- विवेक घोटाळे
* येथे बहुतांचे हित- मिलिंद बोकील
● हृषीकेश गुप्ते (लेखक, दिग्दर्शक)
* गॉगल लावलेला घोडा- निखिलेश चित्रे
* विश्वामित्र सिंड्रोम- पंकज भोसले
* बटरफ्लाय इफेक्ट- गणेश मतकरी
* मोनोक्रोम- सचिन कुंडलकर
* ५९६० आणि इतर चित्तचक्षुचमत्कारिक कथा- इमॅन्यूअल विन्सेंट सॅंडर्स
* दिमित्री रियाझ केळकरची गोष्ट- प्रणव सखदेव
● किरण गुरव (लेखक)
* फिन्द्री- सुनीता बोर्डे
* नाही मानियले बहुमता- नंदा खरे
* चार चपटे मासे – विवेक वसंत कुडू
* हिट्स ऑफ नाइन्टी टू- पंकज भोसले
* आठ फोडा आन बाहेर फेका- अमोल विनायकराव देशमुख (कविता संग्रह)
● लोकेश शेवडे (लेखक, उद्योजक)
* पान पाणी नि प्रवाह- अवधूत डोंगरे
* मुक्काम पोस्ट सांस्कृतिक फट- सतीश तांबे
* काम तमाम @वाघा बॉर्डर- सतीश तांबे
* शहीद भगतसिंह यांची जेल डायरी- अभिजित भालेराव
* स्वरभाषिते- रोहिणी गोविलकर
● गणेश मतकरी (लेखक)
* हलते डुलते झुमके- मनस्विनी लता रविंद्र
* दीर्घ- गणेश कनाटे
* स्टोरीटेलर- गजेंद्र अहिरे
* हिट्स ऑफ नाइन्टी टू- पंकज भोसले
* बारीक बारीक आवाज वाढत चाललेत- स्नेहा अवसरीकर
● प्रणव सखदेव (लेखक)
* गॉगल लावलेला घोडा- निखिलेश चित्रे
* महामाया निळावंती- सुमेध
* रज्जूत मज्जा- स्वप्निल चव्हाण
* लोकशाहीचे वास्तव- जोजी जोसेफ, अनुवाद- पूनम छत्रे
* कट्टा मॉडेल- मिलिंद वाटवे
● निपुण धर्माधिकारी (दिग्दर्शक)
* भुरा – शरद बाविस्कर
* महामाया निळावंती – सुमेध
* किटाळ – लक्ष्मण माने
* एक होता गोल्डी – अनिता पाध्ये
* गोठण्यातल्या गोष्टी – हृषीकेश गुप्ते
● डॉ. आशुतोष जावडेकर (लेखक)
* शहाणीव देणारी पुस्तकं- डॉ. वैभव ढमाळ
* ललद्यदस् ललबाय- मीनाक्षी पाटील
* श्रीमंत पेशवीण काशीबाई- अश्विनी कुलकर्णी
* अश्वत्थयुग्मांचे श्लोक – संतोष विठ्ठल घसिंग
* मध्ययुगीन मराठी वाङ्मय- डॉ. वर्षां तोडमल
● मीनाक्षी पाटील (कवयित्री)
* प्राक् सिनेमा-अरुण खोपकर
* रीलया -रवी लाखे
* दीर्घ- गणेश कनाटे
* अखईं तें जालें- समीर चव्हाण
* हरवलेल्या कथेच्या शोधात -सीताराम सावंत
● नितीन रिंढे (समीक्षक)
* प्राक् सिनेमा-अरुण खोपकर
* मायना- राजीव नाईक
* गॉगल लावलेला घोडा – निखिलेश चित्रे
* श्वासपाने- राही अनिल बर्वे
* नवल- प्रशांत बागड
● नीरजा (कवयित्री)
* हलते डुलते झुमके – मनस्विनी लता रवींद्र
* सिंधुकालीन लिपी आणि भारतीय भाषांचा इतिहास – रवींद्र इंगळे चावरेकर
* गॉगल लावलेला घोडा -निखिलेश चित्रे
* मी सार्वकालिक सर्वत्र – पी . विठ्ठल
* वेदनेचा क्रूस – लक्ष्मीकांत देशमुख
● मीना वैशंपायन (लेखिका)
* बुडता आवरी मज- सुरेंद्र दरेकर
* व्यक्ती आणि व्याप्ती- विनय हर्डीकर
* जिव्हाळा- रामदास भटकळ
* भारतीय भाषांमधील स्त्रीवादी साहित्य- संपादन- डॉ. अश्विनी धोंगडे
* दिडदा दिडदा- मूळ लेखिका- नमिता देवीदयाल, अनुवाद- अंबरीश मिश्र
● दीपक घारे (लेखक)
* बदलता भारत- पारतंत्र्यातून महासत्तेकडे दोन खंड, संपादक- दत्ता देसाई
* डॉ. मारिया माँटेसरी- वीणा गवाणकर
* शब्दप्रभू मोलस्वर्थ : प्रस्तावना आणि परामर्श- भाषांतर- संपादन- अरुण नेरूरकर
* अधांतर : भूमी व अवकाश- संपादक- राजू देसले
* केवळ काही वाक्यं- उदयन वाजपेयी, अनुवाद- प्रफुल्ल शिलेदार
● छाया महाजन (लेखिका)
* सायड-रवींद्र पांढरे
* महायोगिनी अक्कमहादेवी- श्रुती वडगबाळकर
* मराठी साहित्याच्या अभिवृद्धीसाठी- संपादक- विनय हर्डीकर
* दुष्काळात तिची होरपळ- डॉ. आरतीश्यामल जोशी
* काळोख्याच्या कविता- नामदेव कोळी
● मोनिका गजेंद्रगडकर (लेखिका)
* निर्मला पाटीलचे आत्मकथन- शांता गोखले
* विश्वामित्र सिंड्रोम- पंकज भोसले
* जवळिकीची सरोवरे- नीतिन वैद्य
* खुलूस- समीर गायकवाड
* अभिरामप्रहर- भारती बिर्जे डिग्गीकर
● किशोर दरक (शिक्षणशास्त्राचे अभ्यासक)
* झुम्कुळा- वसीमबरी मणेर
* भुरा- शरद बाविस्कर
* ब्राह्मणी मानसिकता आणि पु. ल. देशपांडे- संजय मेणसे
* शिकता शिकविता- नीलेश निमकर
* जीवनकोंडी- ऊसतोडणी कामगारांच्या समस्यांचा अभ्यास- संपादन- परेश जयश्री मनोहर व संतोष शेंडकर
● नवनाथ गोरे (लेखक)
* खोल खोल दुष्काळ डोळे- प्रदीप कोकरे
* गावमातीच्या गोष्टी- सुरेंद्र पाटील
* दस्तावेज- आनंद विंगकर
* जीव द्यावा की चहा प्यावा- दामोदर मावजो
* चार चपटे मासे- विवेक कडू
● प्रतिमा कुलकर्णी (दिग्दर्शिका)
* सात पाटील कुलवृत्तांत- रंगनाथ पठारे
* परीघ- सुधा मूर्ती
* भूमिका- यशवंतराव चव्हाण
* नेहरू : मिथक आणि सत्य- पीयूष बबेले, अनुवाद : अक्षय शिंपी
● धनवंती हर्डीकर (माजी विद्यासचिव, पाठय़पुस्तक मंडळ, बालभारती)
* गुरू विवेकी भला- डॉ. अंजली जोशी
* क्षितिजापारच्या संस्कृती- मिलिंद बोकील
* पर्वतपुत्र शेर्पा- उमेश झिरपे
* सूपशास्त्र- मूळ लेखक – रा. स. गुप्ते, रा. श्री. गोंधळेकर
* शतकाची विचारशैली- डॉ. रमेश धोंगडे
● अशोक नायगावकर (कवी)
* अभिरामप्रहर- भारती बिर्जे डिग्गीकर
* जवळिकीची सरोवरे- नीतिन वैद्य
* राधिका सांत्वनम्- डॉ. शंतनु अभ्यंकर
* शतकोत्तरी आराखडा- राजीव जोशी
* निर्वासित- डॉ. उषा रामवाणी
● कृष्णात खोत (लेखक)
* ते पन्नास दिवस- पवन भगत
* अजूनही गांधी जिवंत आहे- अजय कांडर
* भैया एक्स्प्रेस आणि इतर कथा- अनुवाद, जयप्रकाश सावंत
* गॉगल लावलेला घोडा- निखिलेश चित्रे
* थिजलेल्या काळाचे अवशेष- नीरजा
● डॉ. सिसिलिया काव्र्हालो (कवयित्री)
* चार चपटे मासे- विवेक वसंत कडू
* ललद्यदस् ललबाय- मीनाक्षी पाटील
* मराठी स्त्री आत्मकथनांची वाटचाल (१९१०-२०१०) संपादन – डॉ. प्रतिभा कणेकर, छाया राजे
* काम तमाम @ वाघा बॉर्डर- सतीश तांबे
● सुनील कर्णिक (लेखक/ समीक्षक)
* शब्दप्रभू मोल्सवर्थ- अरुण नेरुरकर
* बादल सरकार- अविनाश कदम
* सत्यकथा निवडक कविता- खंड १ व २- संपादक- विजय तापस
* रंगनिरंग – प्रेमानंद गज्वी
* माझा समुद्रप्रवास- अनंत देशमुख
● वरुण सुखराज (दिग्दक)
* लज्जागौरी- रा. चिं. ढेरे
* उभं-आडवं- राहुल कोसम्बी
* डॉ. मारिया मॉंटेसरी- वीणा गवाणकर
* ताम्रपट- रंगनाथ पठारे
* खुलूस- समीर गायकवाड
● हेमंत प्रकाशक राजोपाध्ये (अभ्यासक/ संशोधक)
* माणूस असा का वागतो?- अंजली चिपलकट्टी
* नाही मानियेले बहुमता- नंदा खरे- संपादन- मेघना भुस्कुटे, धनंजय मुळी, विद्यागौरी खरे, रविकांत पाटील
* बदलता भारत- खंड १ व २ संपादन- दत्ता देसाई
* खोल खोल दुष्काळ डोळे- प्रदीप कोकरे
* कल्पद्रुमाचिये तळी- डॉ. रा. चिं. ढेरे
● विवेक फणसळकर (पोलीस आयुक्त, मु्ंबई)
* दुपानी- दुर्गा भागवत
* तीळ आणि तांदूळ- ग. दि. माडगूळकर
* विजयाचे मानसशास्त्र- भीष्मराज बाम
● डॉ. रवींद्र शिसवे (पोलीस आयुक्त, लोहमार्ग मुंबई)
* मी संदर्भ पोखरतोय- पवन नालट
* ज्ञानेश्वरीचे भावविश्व- डॉ. मो. रा. गुण्ये
* आर्टिफिशियल इंटेलिजन्स- अच्युत गोडबोले
* काश्मीरनामा- इतिहास आणि वर्तमान – अशोककुमार पांडेय
* मागोवा- नरहर कुरुंदकर
* मातीची रूपे- डॉ. तारा भवाळकर
● किरण येले (लेखक)
* अण्णाभाऊंची दर्दभरी दास्तान- विश्वास पाटील
* शिवराज्याभिषेक- संपादन डॉ सदानंद मोरे
* सुमती लांडे समग्र कविता- संपादन कविता मुरुमकर
* हिट्स ऑफ नाइन्टी टू- पंकज भोसले
* तसनस – आसाराम लोमटे
* थिजलेल्या काळाचे अवशेष- नीरजा
● सतीश तांबे (लेखक)
* कामाठीपुरा- सुधीर जाधव
* तंबाखूची टपरी- चं. प्र. देशपांडे
* नवे जग, नवी कादंबरी- विश्राम गुप्ते
* दीर्घ- गणेश कनाटे
* हिट्स ऑफ नाइन्टी टू- पंकज भोसले
● वंदना बोकील-कुलकर्णी (लेखिका- संपादक)
* घामाची ओल धरून – आबासाहेब पाटील
* भारतीय विरागिनी- अरुणा ढेरे
* ढगाखाली- चांगदेव काळे
* गान गुण गान- सत्यशील देशपांडे
* कुमारस्वर एक गंधर्व कथा- माधुरी पुरंदरे
● विश्वास नांगरे-पाटील (अतिरिक्त पोलीस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग)
* गोष्ट पैशापाण्याची- प्रफुल्ल वानखेडे
* मनात- अच्युत गोडबोले
* माझी वाटचाल- राम प्रधान
* वीरप्पन विरुद्ध विजय कुमार- डॉ. सदानंद बोरसे
* सत्य शोधण्याचे शास्त्र, तंत्र आणि मंत्र – अरुण वाबळे
● अंकुश शिंदे (पोलीस आयुक्त, नाशिक)
* सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध – डॉ. आ. ह साळुंखे
* मनात- अच्युत गोडबोले
* ग्रामण्याचा साद्यंत इतिहास- प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे
* जिद्द- वामन कदम
* विसावे शतक आणि समता विचार- रावसाहबे कसबे
● निखिलेश चित्रे (लेखक)
* श्वासपाने- राही अनिल बर्वे
* चतुर- प्रणव सखदेव
* हिट्स ऑफ नाइन्टी टू- पंकज भोसले
* पिवळा पिवळा पाचोळा- अनिल साबळे
* फ्री फॉल- गणेश मतकरी
● आसाराम लोमटे (लेखक)
* मी मराठीत बांग देतो- नारायण कुलकर्णी कवठेकर
* ओस निळा एकांत- जी. के. ऐनापुरे
* येथे बहुतांचे हित- मिलिंद बोकील
* थिजलेल्या काळाचे अवशेष- नीरजा
* खोल खोल दुष्काळ डोळे- प्रदीप कोकरे
● जयराज साळगावकर (संपादक)
* व्यासपर्व- दुर्गा भागवत
* संहिता विंदा करंदीकरांची निवडक कविता- मंगेश पाडगावकर
* शतपत्रे- लोकहितवादी
* गावगाडा- त्रिंबक नारायण आत्रे
* पाडस- राम पटवर्धन
● अशोक कोठावळे (प्रकाशक)
* जीव द्यावा की चहा घ्यावा – दामोदर मावजो
* गुरू विवेकी भला – अंजली जोशी
* येथे बहुतांचे हित – मिलिंद बोकील
● गिरीश कुलकर्णी (अभिनेता)
* अमृत मंथन, अमृत गाथा – भाऊसाहेब थोरात
* प्रतिभा, कलानिर्मिती आणि कलाभ्यास- संपादक- अरुण जाखडे
* हल्लाबोल – सुधन्वा देशपांडे
● अन्वर हुसेन (चित्रकार )
* माणदेश: दुष्काळ दरसाल- आनंद विंगकर
* एकोणिसावी जात- महादेव मोरे
* दिमित्री रियाझ केळकरची गोष्ट- प्रणव सखदेव
* चित्र-वस्तुविचार- प्रभाकर बरवे
● अशोक राणे (चित्रपट समीक्षक, लेखक)
* नदीष्ट- मनोज बोरगावकर
* श्वासपाने- राही अनिल बर्वे
* चित्रपट- अभ्यास : डॉ. श्यामला वनारसे
* लपलेलं लंडन- अरविंद रे
● प्रदीप चंपानेरकर (लेखक- प्रकाशक )
* पंतप्रधान नेहरू- नरेंद्र चपळगावकर
* लढे आणि तिढे- पुष्पा भावे व मेधा कुलकर्णी
* वैचारिक घुसळण- आनंद करंदीकर
● सुबोध जावडेकर (विज्ञानकथा लेखक)
* नाही मानियले बहुमता- नंदा खरे
* व्यंगचित्रकारांचे जग- मधुकर धर्मापुरीकर
* शास्त्रकाटय़ाची कसोटी- संजीव कुलकर्णी
* (लो)कशाहीबद्दल- लोकेश शेवडे
● मुकुंद टाकसाळे (लेखक)
* गुरू विवेकी भला- अंजली जोशी
* आपलं विश्व आणि त्याची नवलकथा- सुकल्प कारंजेकर
* दीर्घ- गणेश कनाटे
* हिट्स ऑफ नाईन्टी टू- पंकज भोसले
● मधुकर धर्मापुरीकर (लेखक)
* यात्री- प्रफुल्ल कुलकर्णी.
* मार्क ट्वेनच्या निवडक कथा (अनुवाद ) – रोहिणी बागल
* कथा अकलेच्या कायद्याची- डॉ. मृदुला बेळे
* तीळ आणि तांदूळ- ग. दि. माडगूळकर
● हेमंत कर्णिक (लेखक- संपादक)
* (गांधीजन मालिकेतील) साने गुरुजी- सुचिता पडळकर
* निर्मला पाटील यांचे आत्मकथन- शांता गोखले
* माझी कंडक्टरी – संतोष अरविंदेकर
* हिट्स ऑफ नाईंटी टू- पंकज भोसले
● आनंद विंगकर (लेखक)
* सिंधू ते बुद्ध अज्ञात इतिहासाचा शोध- रवींद्र इंगळे चावरेकर
* गॉगल लावलेला घोडा- निखिलेश चित्रे
* ते कोण लोक आहेत- पांडुरंग सुतार
* ते पन्नास दिवस- पवन भगत
* राष्ट्रवाद म्हणजे आहे तरी काय- रोहित अझाद जानकी नायर
● गिरीश गांधी (ज्येष्ठ समाजसेवक)
* गांधीवादाचा केमिकल लोचा- लक्ष्मीकांत देशमुख
* वेदनेचा क्रुस- लक्ष्मीकांत देशमुख
* घरा मुंबईचा कोवीशी- सुरेश काकाणी
* सफरनामा- पल्लवी पंडित
● डॉ. यशवंत मनोहर (लेखक)
* धर्म ते धम्म- डॉ. प्रदीप गोखले
* संविधान आणि लोकलढा- प्रा. देवीदास घोडेस्वार, विलास भोंगाडे
* शरण जीवन दर्शन- राजू जुबरे
* प्रतिभा, कलानिर्मिती आणि कलाभ्यास- संपादक- अरुण जाखडे
● डॉ. रवींद्र शोभणे (लेखक)
* काल त्रिकाल- डॉ. नागनाथ कोत्तापल्ले
* रक्तातल्या समुद्राचं उधाण- भारत सासणे
* अफसाना लिख रही हूँ- डॉ. मृदुला दाढे-
* वेदनेचा क्रूस- लक्ष्मीकांत देशमुख
* खुलूस- समीर गायकवाड
● डॉ. प्रमोद मुनघाटे (समीक्षक)
* महाभारत- गणेश देवी
* भुरा- शरद बाविस्कर
* फ्रॅक्चर्ड फ्रीडम- कोबाड गांधी
* भिंतीवरचा चष्मा- अवधूत डोंगरे
* बाऊल- सौमित्र
● डॉ. रश्मी करंदीकर (पोलीस अधीक्षक, राज्य नागरी संरक्षण दल)
* मृत्युंजय- शिवाजी सावंत
* स्वामी- रणजित देसाई
* मला उद्ध्वस्त व्हायचंय- मल्लिका अमरशेख
● तेजस्वी सातपुते (मुंबई पोलीस उपायुक्त -मुख्यालय २)
* कास्ट मॅटर्स- सूरज एंगडे
* गोफ, एकेक पान गळावया- गौरी देशपांडे
* इस्रायलची मोसाद- पंकज कालुवाला
* गांधीजी आणि त्यांचे टीकाकार- सुरेश द्वादशीवार
● सोनाली कुलकर्णी (अभिनेत्री)
* प्रेमातून प्रेमाकडे- अरुणा ढेरे
* नाइन्टीन नाइन्टी -सचिन कुंडलकर
* लिहू या बिनचूक मराठी – श्रीपाद ब्रह्मे,