मराठी साहित्य क्षेत्रात मैलाचा दगड ठरलेल्या ‘कोसला’ या भालचंद्र नेमाडे यांच्या पहिल्या कादंबरीच्या निर्मितीप्रक्रियेसंदर्भातील रोचक माहिती.. त्यासंबंधीची मतभिन्नता.. तसंच कादंबरीच्या प्रसिद्धीपश्चात नेमाडेंच्या आई-वडिलांची उमटलेली तीव्र प्रतिक्रिया..  
‘कोसला’च्या निर्मितीप्रक्रियेसंबंधात प्रकाशक रा. ज. देशमुख यांच्या पत्नी सुलोचनाबाई देशमुख यांनी  दिलेली माहिती..
‘बासष्टच्या आसपास अशोक शहाणे आमच्याकडे राहत होता. आमच्या घरी तो दोनेक वर्षे तरी असावा. त्याने बी.ए.च्या परीक्षेला बसावे म्हणून मी धडपडत होते. शिवाय आमच्या कंपनीच्या चौकटीत तो बसला तर पुष्कळच चांगले होईल असे मला वाटत होते.
नेमाडे आमच्याकडे अशोकबरोबर येऊ लागला, राहू लागला. क्वचित वृंदावन दंडवते, भाऊ पाध्ये येऊन जात. यांच्या गप्पांत देशमुखही सामील होत. एक दिवस देशमुख मला म्हणाले, ‘अशोकचे काही खरे नाही. पण नेमाडेकडून तू कादंबरी लिहून घेतलीस तर ती चांगली होईल असे मला वाटते. या मुलात ते गुण मला दिसतात.’
मी म्हटले, ‘ही मुले वळली तर सूत, नाही तर भूत. पण तुम्हाला नेमाडय़ांबद्दल एवढा विश्वास वाटत असेल तर बघते प्रयत्न करून.’
आणि मग हळूहळू माझ्या पद्धतीने नेमाडे कशा प्रकारे लिहू शकेल याचा मी मनाशी विचार केला व त्यानुसार त्याला लिहिता करण्याच्या प्रयत्नास लागले. नेमाडे सरळ आहे असा माझा विश्वास होता, आजही आहे. या आधारावर तो कसा लिहायला लागेल यासाठी माझी धडपड सुरू झाली. माझ्या धडपडीला यश आले. नेमाडे लिहू लागला. लिहून झालेला भाग मला वाचून दाखवू लागला. आमच्या दोघांचे एकमत झाले तरच बदल केला जात असे. कादंबरीचे ‘कोसला’ हे नाव मी आणि नेमाडे यांनी विचार करून, शब्दकोशातील अर्थ पाहून ठरवले होते. ‘कोसला’चा अंतिम खर्डा त्याने आमच्या घरी राहूनच पुरा केला. रात्रीचे लिहिताना त्याला लाडू आणि सिगारेटी एवढे पुरत असे. ‘कोसला’ला देशमुखांनी प्रस्तावना लिहिली तीही नेमाडय़ांच्या संमतीनेच.’
‘The India Magazine’ च्या मार्च ९३ च्या अंकात मकरंद परांजपे यांचा ‘भालचंद्र नेमाडे’ हा लेख प्रसिद्ध झाला आहे. हा लेख परांजप्यांनी अर्थातच नेमाडय़ांशी बातचीत करूनच लिहिला असणार. या लेखात परांजपे लिहितात :
Deshmukh approached this angry young man who was always saying outrageous things about establishment.
”What do you think of Khandekar?” Deshmukh asked Nemade.
”I don’t think much of him.”
”And P. L. Deshpande?”
”He is a clown.”
Finally Deshmukh said, ”Instead of abusing and being abused all the time, why don’t you write something yourself?”
”If I wanted to write a novel like Khandekar’s I would do so in eight days,” young Nemade replied.
”It’s no use just talking,” Deshmukh replied, ”Do something.”
So that’s how ‘Kosla’ was written. Deshmukh had literally coaxed, cajoled and teased a novel out of Nemade.
वरील दोन स्पष्टीकरणांपैकी ग्राहय़ कुठले? कुठले अग्राहय़?
वस्तुस्थिती काय असेल ती असो! देशमुख- नेमाडय़ांनी एकमेकांना विचारलेले प्रश्न शेवटपर्यंत अनुत्तरितच राहिले, एवढे बरीक खरे. ७० साली ही कोंडी फुटली. ‘कोसला’च्या शिल्लक प्रती ३३ टक्के कमिशनने नेमाडय़ांनी विकत घेतल्या. शिवाय देशमुखांकडून नेमाडय़ांनी घेतलेले पैसे रॉयल्टीमधून वळते करून घेण्यात आले. हा व्यवहार लेखी झाला. आठशे सत्तर रुपयांत मिटला. आणि देशमुख पती-पत्नींना आपल्या घरी अवश्य येण्याचे नेमाडय़ांनी आमंत्रण दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑक्टोबरअखेर ‘देशमुख आणि कंपनी’ने ‘कोसला’ कादंबरी प्रसिद्ध केली. या कादंबरीचे लेखक होते भालचंद्र नेमाडे. ‘कोसला’आधीचे त्यांचे वाङ्मयीन उद्योग म्हणजे उदाहरणार्थ, ‘छंद’, ‘साधना’ यांत छापून आलेल्या कविता, ‘रहस्यरंजन’, ‘आलोचना’साठी लिहिलेले लेख, समीक्षा, वगैरे वगैरे. यांच्याबरोबरीने लिट्ल मॅगेझिन्सची चळवळ.
नेमाडय़ांसारख्या नवख्या लेखकाची कादंबरी देशमुखांनी स्वीकारली. छापली. छापल्यानंतर वाचली. वाचल्यानंतर तीन परिच्छेदांचे छोटेसे प्रास्ताविक लिहिले. त्यातील शेवटच्या दोन परिच्छेदांतील मजकूर असा-
‘मराठीमध्ये या पद्धतीने आणि या विषयावरील अशा पद्धतीने लिहिलेली ही पहिलीच कादंबरी आहे, असा माझा समज आहे. पहिली असो अगर नसो, पण लेखकाने जे काही लिहिले आहे ते वाचवते. लेखकाने कुठलीही गोष्ट व्याख्यानाच्या रूपाने सांगितलेली नाही. जे अनुभवले, पाहिले, ते लिहिण्याची प्रामाणिक धडपड त्याने केली आहे.
हा पांडुरंग सांगवीकर हा स्वत:बाबत व समाजाबाबत याच पद्धतीने का लिहितो आहे, याच पद्धतीने विचार मांडण्याची त्याला का इच्छा झाली, तो समाजाकडे याच पद्धतीने का पाहतो आहे, एवढा विचार जरी कादंबरी वाचून पालक- शिक्षक- समाज यांपैकी कुणाच्याही मनात आला, आणि क्षणभर जरी त्यामुळे अस्वस्थता वाटली, तरी खूपच झाले.’

नोव्हेंबर ४, नेमाडय़ांचे देशमुखांना पत्र :
‘प्रती छान. गावात बऱ्यापैकी sensation झाले. वडील = प्रचंड वैतागले. Full furious father किंवा Far full furious father. ते आपल्या मित्रमंडळींना म्हणाले, ‘कादंबरी म्हणजे खरीच माहिती असते असे नाही. सगळं काल्पनिक असतं हो..’ वगैरे.
‘आई = वडील नव्‍‌र्हस म्हणून आईही. म्हणाली, ‘सगळय़ा गावातल्या आई-बापांच्या गोष्टी आमच्या नावावर छापल्यात! आता आम्हीही ‘आमचा मुलगा नालायक निघाला’ असं पुस्तक लिहिलं तर देशमुख छापतील काय?’ मी म्हणालो, ‘नाही.’ पण आई सुलो(चना) मावशींना केव्हातरी पत्र टाकणार आहे. कारण तुमच्या कंपनीच्या पाकिटाचा पत्त्याचा कोपरा कुणीतरी फाडून ठेवलाय!
‘इकडे शाळा वगैरेंतून खपण्याचा संभव. परंतु तुम्ही लिहिल्याप्रमाणे आता या कादंबरीतून लक्ष काढून घेतो. सतरा-अठरा तारखेला मुंबई. नोव्हेंबरअखेपर्यंत तिकडे येतो. डिसेंबरात चार पेपर, जानेवारी-फेब्रुवारीत दोन पेपर आणि मराठीचे दोन अधूनमधून. मार्चमधे भंकस आणि एप्रिलमधे फ्याट्!’ आता हे शेवटचेच.’
(‘प्रकाशक रा. ज. देशमुख’ या पुस्तकातून साभार)