मिलिंद बोकील यांच्या ‘गवत्या’ या कादंबरीने दोन बाबी प्रामुख्याने अधोरेखित केल्या आहेत. एक- मिलिंद बोकील हे कादंबरीकार नसून त्यांचा िपड कथाकाराचाच आहे. दोन- लेखक म्हणून आता बोकीलांच्या मर्यादा स्पष्ट झाल्या असून, त्या ते ओलांडतील ही शक्यता दिसत नाही. ‘उदकाचिये आर्ती’ आणि ‘झेन गार्डन’ या दोन कथासंग्रहांच्या पलीकडे त्यांचे कुठलेच पुस्तक आतापर्यंत गेलेले नाही. ‘शाळा’सारख्या कादंबरीतून वेगळा विषय मांडायचा प्रयत्न त्यांनी केला असला तरी त्यांचा मूळ िपड लपत नाही.
आणीबाणीनंतर बऱ्याच राजकीय कार्यकर्त्यांनी स्वयंसेवी संस्था सुरू केल्या. या एनजीओज्ना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर बऱ्यापकी पसा मिळू लागला. १९७८ ते २००८.. असा २५ वष्रे हा खेळ बऱ्यापकी चालला. अमेरिकेतील आíथक घोटाळे व मंदी तसेच युरोपातील आíथक आणीबाणीनंतर त्यावर बऱ्याच मर्यादा आल्या. आणि आता तर या स्वयंसेवी संस्थांचा खेळ आटोपत आला आहे. बोकीलांच्या जवळपास सगळ्याच पुस्तकांवर या स्वयंसेवी संस्थांची छाया आहे. कधी स्पष्ट, तर कधी अस्पष्ट.
‘गवत्या’चा नायक सर्वोदयी सेवक संघाचे सचिव घारपुरे यांच्या सोंडूर गावातील केंद्रावर नोकरीसाठी जातो. शहरात अनेक छोटय़ा-मोठय़ा नोकऱ्या करून कंटाळलेला हा नायक पंडितराव या सीए असलेल्या दूरच्या नातेवाईकामुळे सोंडूर गावी जातो. तो ज्या संस्थेत काम करतो, तिचे नेमके स्वरूप काय, हे शेवटपर्यंत बोकील स्पष्ट करत नाहीत आणि त्यांना करावेसेही वाटत नाही. कादंबरीत दीर्घ वर्णनं येत राहतात. कादंबरी म्हणून येणारी विविध पात्रं, अनेक प्रसंग, त्यांतील भव्य नाटय़, ताणतणाव असं काहीही यात घडत नाही. त्यामुळे ही कादंबरी नसून एक दीर्घकथाच आहे, हे परत परत जाणवत राहतं.
या लेखनावर सगळ्यात मोठा आक्षेप हा आहे की, यातला नायक हा सारं काही नाकारणारा, भौतिक पातळीवरच्या सगळ्या गोष्टींना नकार देणारा रंगवलेला असताना कादंबरीच्या शेवटाला मात्र अशा नायकाला अमेरिकेतून बोलावणं येतं. कुणी धनाढय़ माणसानं (डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांचं हे नेमकं काय दुखणं आहे, कळत नाही. यांना समाजसेवा तर करायचीय; पण ती शासनाच्या पशानं किंवा कुणा धनाढय़ माणसाने दिलेल्या देणगीतून! परत त्यानं कसल्याही अटी घातल्या नाही पाहिजेत. ज्याला तत्त्वत: विरोध करायचा- त्याच्याच पशावर यांच्या गमज्या!!) मोठी देणगी दिलेल्या एका संस्थेत काम करायला नायकाला हे आमंत्रण येतं.
चेतन भगतला तद्दन व्यावसायिक लेखक म्हणून समीक्षक हिणवतात. मग आता प्रश्न असा पडतो की, बोकीलांसारखा लेखकही चेतन भगतसारखाच व्यूह आपल्या लिखाणात रचत असेल तर त्याला काय म्हणावे? चेतन भगतच्या कादंबरीवर आधारीत ‘थ्री इडियट’ या चित्रपटात आमीर खान सकृत्दर्शनी व्यवस्थेत बसण्यासाठी कसा अयोग्य आहे, हे दाखवत दाखवत त्यालाच पहिला नंबर मिळतो असं दाखवलं जातं. आणि जो कायम धडपडत असतो, त्याला दुसरा नंबर! शिवाय त्याच्यावर शेवटी आमीर खानपाशी येऊन लाचारी करण्याची वेळ कशी आली, हे रंगवलं जातं. ‘गवत्या’च्या नायकाला अमेरिकेचं आमंत्रण आल्यावर घरचं वातावरण कसं बदलतं, सगळ्यांना त्याच्या बुद्धिमत्तेचा कसा साक्षात्कार होतो, वगरे वगरे चित्र रंगवलं जातं. हा मोह बोकीलांना कसा आणि का पडला?
यापेक्षा ‘माचीवरचा बुधा’मधील गो. नी. दांडेकरांनी रंगवलेला बुधा कितीतरी प्रामाणिक आणि खरा म्हणावा लागेल. तो म्हातारपणी माचीवर राहायला जातो. कुठलीही समाजसेवा करायला जात नाही. तिथल्या निसर्गात रममाण होतो. आणि शेवटी तिथेच खांबाला टेकून प्राण सोडतो.. त्याच्या देहाला मुंग्या लागतात. असा अप्रतिम शेवट करून दांडेकरांनी या कादंबरीत एक उंची गाठली आहे. पण बोकीलांच्या नायकाची प्रेरणा काय? आणि जर अमेरिकेतच जाण्यात इतकी इतिकर्तव्यता आहे, तर मग त्यासाठी धडपडणारे शहरातील इतर लोक दुय्यम कसे? त्या सगळ्यांविषयी नायक कायम तुच्छता, उदासीनता का दाखवत राहतो?
गुरुजी नावाचे एक पात्र नायकाला गुरुस्थानी, आदरस्थानी वगरे वगरे असल्याचे रंगविले आहे. मुलगा, सून शेतकरी असलेली ही एक व्यक्तिरेखा. खरं तर बोकीलांनी ज्या पद्धतीनं त्यांच्याबद्दलची आत्मीयता रंगवली आहे, ते पाहता तेच खरे या कादंबरीचे नायक शोभतात. नायकाच्या दृष्टिकोनातून या कथेत जे गुरुजी आले आहेत, त्यातून लेखकाची दृष्टी कळते. परंतु पुन्हा एकदा बोकीलांवर त्यांच्यातील युवा संघर्ष वाहिनीचा कार्यकर्ता आरूढ होतो. वसंतराव देशपांडे यांच्यासारखं जमत आलेलं आपलंच गाणं विस्कटून टाकण्याची बुद्धी लेखकाला होते. म्हणूनच बहुधा त्यांच्या बहुतांश लिखाणातून ज्या खेडय़ांबद्दल त्यांना कमालीची आत्मीयता आहे, केवळ तिथेच राहणारा, त्याच वातावरणातून प्रेरणा घेणारा आणि तिथेच राहून काम करण्यात इतिकर्तव्यता मानणारा नायक त्यांना रंगवता येत नाही.. इच्छा असूनही! इतकंच नाही, तर बोकीलांची दुसरीही एक अडचण होते. विहित कार्यात स्वत:ला पूर्णपणे झोकून देणाऱ्या, नि:स्वार्थीपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांबद्दल त्यांना आत्मीयता आहे. (‘उदकाचिये आर्ती’ या कथेतील नायिका- जी मेधा पाटकरांवरून रंगवली आहे. तसेच ‘बाकी इतिहास’ कथेतील नायक!) परंतु त्याचबरोबर तथाकथित ‘करिअर’चे आणि शहराचे त्यांचे आकर्षणही संपत नाही. जसं ग्रामीण कादंबऱ्यांमधून नायकाला कायम महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरी मिळण्याची आस असते. (‘बारोमास’सारखी अकादमी पुरस्कारविजेती कादंबरी कुठल्याही पानावर ‘..आणि त्याला महाविद्यालयाचा शिक्का असलेला खाकी लिफाफा आला. ज्यात त्याच्या नोकरीच्या कायमस्वरूपी आदेशाचे पत्र होते..’ हे वाक्य टाकले की संपून जाते.) या द्वंद्वातला त्यांचा नायक मग नेहमीच छोटं गाव, खेडं सोडून तरी जातो, किंवा त्याचा त्याच्या कामातला रस हळूहळू संपून तरी जातो.
बोकीलांच्या लिखाणात नेहमी शहरातून खेडय़ात काम करायला येणारा स्वयंसेवी संस्थेतील कर्मचारी/ कार्यकर्ता दाखवला जातो. किंवा मग या सगळ्या कामाबद्दल आस्था असणारा नायक तरी रंगवला जातो. तो खेडय़ात जातो. त्याला तिथल्या जनजीवनाबद्दल आस्था असते. मग तो खेडय़ातील मुख्य व्यवसाय असलेल्या शेतीबद्दलच नेमका अनभिज्ञ कसा काय असतो? त्याला आदिवासींबद्दल आकर्षण आहे. तो त्यांच्या वस्त्यांवर जातो, सण-समारंभांत सामील होतो. त्यांच्याबरोबर दारू पितो. सगळं काही करतो. पण हेच शेतकऱ्यांसाठी का नाही करत? प्रत्यक्ष शेतावर जाऊन तिथली समस्या समजून घेण्याच्या बाबतीत त्याला अनास्था का आढळते? डाव्या चळवळीतला असल्यामुळे एखादी मुस्लीम व्यक्तिरेखाही हवीच. मग हा नायक त्यांच्या घरात कसा जातो आणि त्या मित्राच्या आईच्या हातची बिर्याणी कशी खातो आणि ती कशी चविष्ट असते, त्या मित्राची चुलत बहीण कशी याला आवडते, तिच्याशी भेटायला हा दग्र्यावर कसा जातो, वगरे वगरे साचेबद्ध चित्रण बोकीलांसारखा लेखक करत जातो, तेव्हा कळत नाही, की हे सारे कशासाठी आहे? किंवा उलट, कळत जाते की, हे सगळं डाव्यांची तथाकथित उदारमतवादी वृत्ती दाखविण्यासाठीच आहे.
जो काळ बोकील रंगवतात तो १९७५ नंतरचा काळ आहे. म्हणजे साधारणत: आणीबाणी आणि त्यानंतरचा काळ. नेमकं याच काळात शेतकरी आंदोलन सुरू झालेलं होतं. म्हणजे तिकडे शेतकरी आपल्या शेतमालाच्या भावासाठी लढत होते, त्यांच्या प्रश्नांची शास्त्रशुद्ध मांडणी केली जात होती.. आणि त्याच काळात बोकील त्यांच्या कादंबरीतील आदिवासींना विहिरीवर मोटर बसवून पाणी कसं उपसता येईल आणि शेती कशी करता येईल, या खटाटोपात दिसतात. आता जर शेती हे कलमच मुळात तोटय़ाचं असेल तर ते अडचणीत असलेल्या आदिवासींसाठी कसं काय फायद्याचं ठरू शकेल? आणि फक्त पोटापुरता विचार केला तर १९७२ च्या दुष्काळानंतर आजतागायत संपूर्ण भारतात अन्नधान्याची टंचाई उरलेली नाही. शासनाची गोदामं भरून अन्न सडून गेल्याची उदाहरणं आहेत. पण अन्नाचा दुष्काळ पडल्याचं एकही उदाहरण नाही. हे वास्तव बोकीलांना समजून घ्यायचं आहे की नाही? बोकीलांचे सृजनात्मक लिखाण सोडा; त्यांच्या इतर लिखाणातही शेतकरी मध्यवर्ती येत नाही. (‘कातकरी व्यवस्थापन आणि विस्थापन’, ‘मेंढा गावची गोष्ट’ वगरे पुस्तकं!)
स्वयंसेवी संस्थांमधील डाव्या विचारांचा शहरी कार्यकर्ता हा बोकीलांच्या लिखाणाचा मध्यवर्ती नायक आहे. हे व्यक्तिमत्त्व मुळातच दुभंगलेलं आहे. नेहरूप्रणीत समाजवादी व्यवस्थेचे सगळे फायदे शहरांनी आणि त्यात राहणाऱ्या मध्यमवर्गीयांनी उचलले. त्यासाठी त्यांनी ग्रामीण भागाचे आणि शेतीचे प्रचंड शोषण केले. हे समजणारा असा एक वर्ग समाजात तयार झाला, की त्याच्या मनात यातून एक अपराधगंड निर्माण झाला. त्यातून त्यांनी खेडय़ात काम करण्याचा ध्यास घेतला. खेडय़ात जाताना तिथली कॅन्सरची गाठ असलेला शेतीचा प्रश्न यांच्या गरसोयीचा होता, म्हणून मग यांनी नेमका तो सोडून बाकी सगळ्यावर आपली शक्ती खर्च करायला सुरुवात केली. सुरुवातीला या कामात असलेला प्रामाणिकपणा संपून मग परदेशातून मिळणाऱ्या प्रचंड आíथक देणग्यांमुळे त्यात व्यावसायिकता आली. या सगळ्याला दिलेला साहित्यिक कलात्मक मुलामा म्हणजे बोकीलांचे लिखाण होय.
‘उदकाचिये आर्ती’ आणि ‘झेन गार्डन’ या दोन कथासंग्रहांतून हा अनुभवाचा ऐवज वापरून नितांतसुंदर लिखाण करणारा हा लेखक स्वत:तच नंतर अडकत गेला. त्यांची नुकतीच प्रकाशित झालेली ‘महेश्वर’ नावाची दीर्घकथा वाचून पाहावी. म्हणजे मग आपण ‘गवत्या’ ही कादंबरी वाचतो आहोत की ‘महेश्वर’ ही दीर्घकथा वाचतो आहोत हे कळणारच नाही, इतका गोंधळ लेखकाने करून ठेवला आहे. लग्न-संसार व्हायच्या आधीचा ‘गवत्या’चा नायक आणि सगळं संपून, भोगून निवृत्त झालेला ‘महेश्वर’चा नायक एकाच जागी आलेले आहेत. (‘शोधयात्रा’ या पुस्तकात अरुण साधूंनी हाच व्यूह वापरला आहे.) ही या नायकांची मर्यादा नसून लेखकाचाच आवाका संपल्याची खूण आहे. थोडक्यात, इवलासा मजकूर चारशे पानांपर्यंत रंगवून ठुमरीला ख्यालासारखं रंगवण्याचा प्रयत्न बोकीलांनी ‘गवत्या’मध्ये केलेला आहे.
‘गवत्या’ – मिलिंद बोकील, मौज प्रकाशन गृह, मुंबई,
पृष्ठे  – ४१०, मूल्य – ३२५ रुपये.

Loksatta natyarang play don vajun bavis minitani written by Neeraj Shirwaikar and directed by Vijay Kenkare
नाट्यरंग: दोन वाजून बावीस मिनिटांनी…; भासआभासांचं कृतक भयनाट्य
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Loksatta Lokrang Shades of greedy people on stage play
रंगभूमीवरील लोभस माणसांच्या छटा
Loksatta book mark Patriot Alexei Navalny Russian security forces
बुकमार्क: अकाली मावळलेला झुंजार तारा
zee marathi new serial promo tula japanar ahe promo announces
तारीख अन् मुहूर्त ठरला! ‘झी मराठी’ची थ्रिलर मालिका ‘या’ दिवशी सुरू होणार; संपूर्ण स्टारकास्ट आली समोर, पाहा जबरदस्त प्रोमो
Gandhi assassination Hindu Mahasabha Mangutiwar Narayan Apte Gwalior
‘गांधीहत्या’ म्हणताच काय आठवते?
kshitee jog
“एक झिम्मा चालला म्हणजे…”, क्षिती जोग ‘त्या’ चित्रपटाच्या अपयशावर काय म्हणाली?
basti novel loksatta
तळटीपा : ये कैसी सरहदें…
Story img Loader