‘कर्णबधिरांच्या विश्वात’ या पुस्तकाच्या लेखिका समाजसेविका उषा धर्माधिकारी यांनी अनेक वर्षे लोकमान्य टिळक रुग्णालयातील बहिऱ्या मुलांची शाळा, डेफ युथ फाऊंडेशन, डेफ अॅक्शन ग्रुप आणि संजीवन दीप अशा विविध संस्थांच्या माध्यमातून कर्णबधिरतेच्या क्षेत्रात काम केले आहे. या कामाचा गाठीशी असलेला प्रदीर्घ अनुभव म्हणजे हे पुस्तक होय. ‘कर्णबधिरांच्या घरात’ या विभागात त्यांनी ज्या घरांत कर्णबधिर मुलं आहेत त्यांच्या पालकांचे अनुभव, त्यांचे संघर्ष, काहींनी या अनुभवांतून जपलेला समाजकार्याचा वसा अशा अनेक गोष्टींचा वेध घेतला आहे. त्या वाचकाला खूप काही शिकवून जातात. त्यातून कर्णबधिरांकडे बघण्याचा वाचकाचा दृष्टिकोण बदलतो. त्याचप्रमाणे कर्णबधिरांचे विवाह, त्यांचे विवाहपूर्व मेळावे, विवाहात येणाऱ्या समस्या यांविषयीही यात वाचायला मिळते. कर्णबधिरांसाठी काम करणाऱ्या संस्था आणि समाजसेवकांची माहिती या विभागात आहे. कर्णबधिरांना घेऊन नाटकं, नृत्य करण्याचा विलक्षण अनुभव वाचकाला चकित करून जातो. कर्णबधिरांसाठी असलेल्या शासकीय योजनांची माहितीही या पुस्तकात दिलेली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा