प्रसाद मोकाशी

मेनका प्रकाशनने गेल्या शतकातील  काही विस्मरणात गेलेल्या गुन्हेमालिकांवर लेखिका कल्पिता राजोपाध्ये यांना लिहिते करून विविध कथांवर चार पुस्तकांची मालिका वाचकांसाठी सादर केली आहे. या प्रत्येक पुस्तकातील गुन्ह्यांची कहाणी वाचकांना खिळवून ठेवतेच, पण त्यावेळची वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झालेली गुन्ह्यांची वर्णने आठवून अंगावर काटाही उभा राहतो. अत्यंत थंड डोक्याने गुन्हेगारांनी केलेल्या या हत्या आहेत. या पुस्तकांमध्ये केवळ गुन्ह्याच्या कहाण्याच नाहीत तर इतक्या वर्षांनतर त्यातील संबंधित व्यक्तींचे आयुष्य कसे सुरू आहे, याचीही माहिती यात सापडते. 

Manmohan Singh launched the Technology Mission on Citrus for orange growers in Vidarbha
डॉ.मनमोहन सिंग, नागपूरची संत्री आणि ‘मिशन सिट्रस’
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Cyber ​​criminals cheated the people of Nagpur of Rs 141 crore
सायबर गुन्हेगारांनी नागपूरकरांना घातला १४१ कोटींचा गंडा, १३ हजारांवर तक्रारी
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Ritika Malu Hit and Run Case CID officers help accused
नागपूर : सीआयडी अधिकाऱ्यांची आरोपींना मदत; रितिका मालू ‘हिट अँड रन प्रकरण’
navi mumbai cyber crime
यंदा नवी मुंबईत १ अब्ज ३७ कोटींहून अधिक रुपयांची सायबर लूट
Sahar Police registered case against passenger who smoked on plane during Abu Dhabi Mumbai journey
पोलीस अधिकाऱ्याला लाच देणारा एसीबीच्या जाळ्यात
A young man was brutally beaten to death due to an immoral relationship in Nagpur
विवाहित प्रेयसीची अंधारातील भेट प्रियकराच्या जीवावर बेतली

पार्टनर्स इन क्राइम आणि इतर कथा

१९८० च्या दशकामध्ये मुंबई शहरामध्ये विजय पलांडे या कुख्यात गुन्हेगाराने एका महिलेच्या सहाय्याने केलेल्या गुन्ह्यांची कहाणी या पुस्तकात आहे. खोटारडय़ा आणि लहरी गुन्हेगारांनी मुंबईच्या मोहमयी दुनियेत केलेल्या हत्याकांडाची ही कहाणी आहे. स्वत:च्या छानछौकीसाठी लागणारा पैसा उभा करताना निरपराध व्यक्तींच्या असहाय्यतेचा आणि त्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी करून त्यांना उद्ध्वस्त करणाऱ्या विजय पलांडे आणि त्याची मैत्रीण सिमरन सूद या जोडीने केलेली खून मालिका वाचताना थक्क व्हायला होते. सत्ता, अधिकार, सुविधांचा वापर स्वत:च्या फायद्यासाठी करणारे अनेकजण असतात. त्यांचा जगाला दाखविण्याचा चेहरा आणि त्या मुखवटय़ामागे दडलेला चेहरा यात बराच फरक असतो. केरळमध्ये घडलेल्या अशाच एका मुखवटय़ामागील चेहऱ्याने घडविलेल्या हत्याकांडामुळे एका मुलाला आपली आई गमवावी लागली. यामध्ये केरळमधील एका धर्मप्रसारकालाही आपले स्वत्व सिद्ध करण्यासाठी मोठय़ा दिव्यातून जावे लागले. त्याकाळामध्ये ही घटना केरळमध्ये प्रचंड गाजली होती. त्याची कहाणी ‘अभागिनी’ या कथेत वाचायला मिळते.

तामिळनाडूमध्ये १९९० च्या दशकामध्ये अज्ञात दरोडेखोरांनी केवळ लूटमार केली नाही तर जेथे जेथे दरोडे घातले तेथे तेथे हत्याकांडही घडविले. दरोडय़ांनंतर सर्व दरोडेखोर गायब होत होते. हे दरोडेखोर एका विशिष्ट जमातीचे होते. त्यांच्या दरोडय़ाच्या पद्धतीचा अभ्यास करून त्यांना शोधून काढणे पोलिसांसाठी आव्हान होते. या दरोडेखोरांना शोधण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. ऑपरेशन बावडिया ही मोहीम हाताळणाऱ्या आणि त्या दरोडेखोरांशी झुंज देणाऱ्या तत्कालीन इन्स्पेक्टर जनरल संगाराम जंगीड यांच्या कामगिरीवर आधारित कथा या पुस्तकामध्ये आहे.

रक्तपिपासू डॉक्टर

अमेरिकेमध्ये गेल्या शतकामध्ये गाजलेल्या सिरीयल किलरची कहाणी म्हणजे रक्तपिपासू डॉक्टर. सर्वाधिक हत्या करून नामानिराळा राहणारा डॉ. एच. एच. होम्स या नराधमाने आपल्या विकृत खेळापायी अनेक महिलांच्या हत्या केल्याच, पण त्यासाठी त्याने उभारलेल्या हॉटेल द कॅसलचे वर्णनही अंगावर काटा आणते. आपल्या देखणेपणाने सर्वावर एक प्रकारची भूल पाडत, लोकांच्या गर्दीतून हवी ती व्यक्ती शोधून काढून, तिला लुबाडून नंतर तिचे हाल हाल करून मारणाऱ्या होम्सच्या क्रौर्याचा कळस वाचतानाही रक्त उसळून उठते. या रक्तपिपासू डॉक्टर होम्सची ही प्रदीर्घ सत्यकथा.

दुपट्टा किलर आणि इतर कथा

गोव्यासारख्या  शांत राज्यामध्ये घडलेल्या या दुपट्टा किलरने काही वर्षांपूर्वी तेथील जनजीवन ढवळून काढले होते. महानंद नाईक या मारेकऱ्याने जेव्हा पोलिसांपुढे अत्यंत शांतपणे आपल्या गुन्ह्याची कबुली देण्यास सुरुवात केली तेव्हा पोलिसांनाही क्षणभर कानावर विश्वास ठेवता येत नव्हता. त्याने केलेल्या गुन्ह्यांची तपशीलवार माहिती तो शांतपणे देत होताच, पण अनेक गुन्ह्याची आपल्याला आठवणही नसल्याचे तो सांगत असल्याचे पाहून पोलिसांनाही चक्रावल्यासारखे होत होते. या गुन्ह्यांमध्ये त्याची पत्नीही सहभागी होती. त्याची पत्नी ही तुरुंगात जाऊन आल्यावरही सरकारी कर्मचारी म्हणून राजरोस वावरत होतीच, पण ती त्या सेवेतून निवृत्त झाली, हे या प्रशासकीय व्यवस्थेचे कौतुक म्हणावे की त्यावर कीव करावी असे प्रश्न वाचकांना पडल्याशिवाय राहणार नाहीत. पन्नासच्या दशकामध्ये आपल्या देशात दोन प्रेमत्रिकोण गाजले. त्यातील एक नानावटी-आहुजा हे मुंबईतील प्रकरण तर दुसरे दक्षिण भारतातील चेन्नई म्हणजेच तत्कालीन मद्रास प्रांतातील. एक व्यावसायिक गूढरीत्या गायब झाल्याची बातमी वृत्तपत्रांमध्ये पहिल्या पानावर येते आणि सारे जनजीवन ढवळून निघते. त्या अपहरणामागे असलेल्या घटनेतून खरे सत्य बाहेर येते आणि प्रेमत्रिकोणाचा अंत एका भयानक हत्येमध्ये झाल्याचे जगापुढे येते. ही सत्यकथा ‘दुर्गंध’ या कथेत वाचायला मिळते. जगाच्या पाठीवर एकतर्फी प्रेमप्रकरणं अनेक घडली. अनेकदा त्यातील नकार पचवता न आल्याने निराशा पदरी येते आणि त्या निराशेला सूड भावनेची साथ मिळाली की अनर्थ घडतो. अशीच घटना तामिळनाडूतील चेन्नईमध्ये गेल्या दशकामध्ये घडली. रेल्वे स्थानकावर सर्वासमक्ष आपल्या प्रेमाची हत्या करणाऱ्या प्रेमवीराची आणि त्याच्या प्रेमाची ही असफल कहाणी म्हणजे ‘एक होती स्वाती.’

दैत्यराज ऑटो शंकर आणि इतर कथा

तामिळनाडूच्या चेन्नई लगतच्या खेडय़ातून अचानक काही तरुणी गायब होऊ लागल्या. त्या सर्व तरुणींच्या अशा आकस्मिक गायब होण्यामागचे कारण होते गौरीशंकर ऊर्फ ऑटो शंकर. या ऑटो शंकरने आपल्या साथीदारांच्या मदतीने अनेक तरुणींचे अपहरण करून नंतर त्यांची हत्या केली. त्याने केलेल्या गुन्ह्यांच्या हकिकती इतक्या भीषण आणि क्रूर होत्या की त्याचा कबुलीजबाब नोंदवितानाही पोलिसांच्या अंगावर काटा उभा राहिला.

१९९५ मध्ये देवासजवळ एका बसमधून एका ख्रिस्ती धर्मप्रसारक महिलेची दिवसाढवळय़ा झालेली हत्या वणव्यासारखी देशात पसरली आणि त्यातून सर्वत्र असंतोष निर्माण झाला. स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. सरकारवर टीका सुरू झाली. सिस्टर रानी मारियाच्या गुन्हेगाराला कालांतराने पकडण्यात आले. त्याला शिक्षाही ठोठावण्यात आली. पण तिच्या कुटुंबाने त्याला माफ केले. त्याला चांगलं जीवन जगण्यासाठी प्रेम आणि प्रेरणा दिलीच, पण त्याला केलेल्या मार्गदर्शनामुळे तो खुनीही चांगल्या जीवनमार्गावर चालू लागला. रानीच्या कुटुंबाने केलेल्या या कृत्याची दखल ख्रिस्ती धर्मगुरूंनी घेतली आणि त्यांच्या या कार्याबद्दल रानीला संतपदासाठी निर्शित केले. मोठय़ा मनाच्या कुटुंबाची ही अस्वस्थ करणारी कहाणी म्हणजे ‘हृदय परिवर्तन.’

लहानपणी आपल्याला मिळालेल्या वागणुकीवर अनेकांचे मोठेपणी वर्तन अवलंबून असते. आपल्या आजूबाजूचं वातावरण आणि पालकांनी केलेले संस्कार या सगळय़ाचाच आपल्या भावविश्वावर सखोल परिणाम होत असतो. अमेरिकेमध्ये घडलेल्या रेमंड रीड खून खटल्याची पार्श्वभूमी ही होती. व्यक्तिमत्त्वावर घाला घालणारं कष्टप्रद वातावरण अनुभवल्यावर मानसिकता नकारात्मकतेकडे झुकली नाही तरच नवल. हेच या घटनेतून सिद्ध झाले आहे. याचीच कहाणी म्हणजे ‘विषकन्या.’

 एखादा गुन्हा आपल्या हातून घडल्यावर होणारा पश्चात्ताप माणसाच्या आयुष्याला कलाटणी देऊन जातो. मादक द्रव्यांच्या व्यसनपूर्तीसाठी अगदी थोडय़ा पैशांसाठी आपल्यावर पुत्रवत माया करणाऱ्या ज्येष्ठांची हत्या घडविणाऱ्या मद्रासी बाबूची कहाणी ‘पीस मेकर’ या कथेत वाचायला मिळते. निपुत्रिक असलेल्या कुटुंबाची हत्या केल्यावर मात्र त्याला पश्चात्ताप झाला आणि व्यसनमुक्तीसाठी तो काम करू लागला. ट्रबल मेकर ते पीस मेकर अशी कहाणी आपल्याला या कथेत वाचायला मिळते.

काही वर्षांपूर्वी मुंबईत घडलेल्या एका अनोख्या प्रेमत्रिकोणाची कहाणी म्हणजे ‘विकारवशतेचे तीन बळी!’ नीरज ग्रोव्हर, मारिया सुसायराज आणि एमिल जिरोमी मॅथ्यू यांच्या प्रेमत्रिकोणातील नीरज ग्रोव्हरची हत्या नेमकी कशी झाली, त्याचे न्यायालयापुढे आलेल्या कथानकावर आधारित ही कथा आहे. वास्तवात नेमके कसे घडले असेल याचा कल्पनाविलास या कथेत नसून साक्षीपुराव्यांवर आधारित आणि आरोपींनी दिलेल्या कबुलीजबाबावर ही कथा आहे. केवळ भावनांच्या आहारी गेल्याने, आपल्या मनावरचा ताबा सुटल्याने तीन उदयोन्मुख आयुष्यांची राखरांगोळी कशी झाली हे या कथेतून समोर येते.

कायद्याचा अभ्यास करणाऱ्यांना नेहमी एक खटला अभ्यासावा लागतो आणि तो म्हणजे गाजलेला नानावटी-आहुजा खटला. प्रेमाचा त्रिकोण आणि त्यातल्या एकाचा खून हे नेहमीचे कथानक आहे. १९६० च्या दशकामध्ये गाजलेल्या या खटल्यावर अनेक चित्रपट निघाले. या खटल्यामध्ये खून करणाऱ्याला त्याच्या समाजातून मिळालेला पाठिंबा, त्याच्या समाजातील एका व्यक्तीच्या मालकीच्या वृत्तपत्राने त्याच्या भावनेचा विचार करून चालविलेली बचाव मोहीम, मिळवलेला राजकीय आणि जनतेचा पाठिंबा, प्रेमात पडलेली आणि नंतर नवऱ्याला वाचविण्यासाठी प्रामाणिकपणाने सत्याचा सामना करणारी प्रेयसी, या सर्वातून वाचलेला खुनी नवरा आणि या प्रकरणातून ढवळून निघालेले समाजजीवन यावर आधारित कथा म्हणजे प्रेमत्रिकोणाची गाजलेली कहाणी.

या चारही पुस्तकांमधल्या कथांवर त्या त्या काळामध्ये निघालेले अनेक चित्रपट गाजले आहेत. विविध भाषांमध्ये निघालेले हे चित्रपट जसे वाचकांना खिळवून ठेवतात, त्या प्रमाणेच या कथाही वाचकांना पुढे काय अशा खिळवून ठेवतात, हे कल्पिता राजोपाध्ये यांच्या लिखाणाचे वैशिष्टय़ आहे.

‘ट्रू क्राइम सीरिज’, ‘पार्टनर्स इन क्राइम आणि इतर कथा’, ‘रक्तपिपासू डॉक्टर’, ‘दुपट्टा किलर आणि इतर कथा’, ‘दैत्यराज ऑटो शंकर आणि इतर कथा’

– कल्पिता राजोपाध्ये, मेनका प्रकाशन, पुणे,

अनुक्रमे पाने : १५८, १६५, १५७, १७२, प्रत्येकी किंमत : २९९ रुपये.

Story img Loader