मनोज बोरगावकर
विनोद म्हणजे आयुष्याच्या सीरियसली काढलेल्या नोट्स असतात. आणि हे ज्याला उमजतं त्याचा विनोद अभिजाततेच्या मार्गाने मार्गस्थ होतो. गेली तीस वर्षे सातत्याने आणि निष्ठेने विनोदी लेखन करणारे डॉ. रवींद्र तांबोळी याच पठडीतले लेखक. बोलता, वागताना विनोद करणे तसे सोपे असते, पण विनोद कागदावर उतरवून वाचकाची आवड रुदांवणे तसेही फार अवघड असते. कारण बोलताना हावभाव, बोलण्याचे टोन, अंगविक्षेप यांचा आधार घेऊन विनोदाला खुमारी देता येते आणि सामोरासमोर प्रतिसाद मिळत असल्याकारणाने विनोद किती स्ट्रेच करावा याचे संकेत मिळतात. कागदावर विनोद उतरवताना या कशाचाही आधार नसतो… त्यामुळे ती फार नफिस अशीच करामत असते… आणि ही करामत ‘फुकटचेच सल्ले’ या पुस्तकातून डॉ. रवींद्र तांबोळी यांना सहजी जमली आहे असेच वाटत राहते. रवींद्र तांबोळी यांच्या विनोदाचे आणखी एक वैशिष्ट्य अधोरेखित करावे ते म्हणजे रवींद्र यांचा विनोद तुम्हाला कोणतीही इजा न करता नि:शस्त्र करणारा असाच आहे. आमची अविरत प्रेमकरणे… या पहिल्याच घडामोडीत आपण इतके आकंठ बुडतो की बास रे बास आणि याचा शेवट ज्या ओळीने होतो ती ओळ इतकी कलात्मक आहे की फार मोठा अवकाश ती फार लीलया पेलून जाते. ‘तात्पर्य काय तर हिरव्या पानाचा देठ हा पोपटीच असतो.’ हे वाक्य वाचल्यानंतर वाटतं की या माणसाला विनोदातला विनोदच नाही तर विनोदातले काव्यदेखील सापडले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा