सुरेश भटांच्या गजलांमुळे १९७० सालानंतर जे कवी गज़्ालही लिहिण्यास प्रवृत्त झाले, त्यातील एक महत्त्वपूर्ण नाव रमण रणदिवे हे होय. चाळीस वर्षांच्या काव्यसृजन कालावधीत त्यांनी मोजकेच लिखाण केले. ‘काहूर’ हा त्यांचा चौथा काव्यसंग्रह आहे. त्यांच्या या संग्रहात गज़्ाला, गीतं व कविता असून तो आशयगर्भता, गेयता व शब्दसौष्ठव या तीन गुणांमुळे लक्षणीय ठरतो.
मौन सोडावेच वाटे आशयाला
हेच माझ्या अक्षरांचे कसब आहे
कवी आंतरिक भाव, कल्पना, विचारांना अभिव्यक्ती देण्यासाठी विशिष्ट काव्य-विधा निवडतो असं नाही. ते भाव, त्या कल्पना ते विचारच आपल्या अभिव्यक्तीचं माध्यम घेऊन साकारतात. गेय रूपात अवतरत असतील तर आपला छंद/ वृत्त तेच ठरवतात. कधी कविता तर कधी गीत वा गज़्ाल आकृतिबंधात पद्यरचना व्यक्त होते. रमण रणदिवेंची काव्य अभिव्यक्ती सहजपणे या तिन्ही काव्यविधेत होते. त्यांच्या उत्स्फूर्त शेरांचे काही नमुने बघा-
माझ्याविषयी जर काही वाटलेच नसते
जाता जाता वळून तू पाहिलेच नसते
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा