प्रा. माधुरी शानभाग यांचा ‘सावरीची पिसे’ हा दुसरा ललितलेख संग्रह. यात एकंदर २७ लेख आहेत. अध्यापनातले अनुभव, मोबाईलचे फायदे-तोटे, संगणक शिकण्याचा अनुभव, पोहण्याचा अनुभव, सहजीवन, लग्न या विषयावरील हे लेख आहेत. लेखिकेने अनुभवलेले प्रसंग आणि भेटलेली माणसं यावरून या लेखांची मांडणी केली आहे. सर्वच लेख चार-पाच पानांचेच आहेत. त्यामुळे त्यांची प्रासंगिकता त्यातून जाणवते. त्यांनी म्हटलं आहे, ‘आपल्याला जे सांगायचे होते ते शब्दात नीटसे पकडता आले नाही..तरीसुद्धा ओंजळीत घेऊन पाहत राहिले तर ही पिसे मन भरून आनंद देतात..’ ते आनंदाचे कवडसे त्यांनी या पुस्तकातून मांडले आहेत. कवडसेच ते, त्यामुळे त्यांच्या परिघ तसा छोटा.
सावरीची पिसे – माधुरी शानभाग, नवचैतन्य प्रकाशन, मुंबई, पृष्ठे – १८४, मूल्य – १८० रुपये.

मुंबईच्या समस्यांचं गाइड दर्शन
‘मुंबई रीडर’ हे मुंबईच्या शहरीकरणापासून ते सार्वजनिक सुविधांच्या दुरवस्थेपर्यंतच्या अनेक समस्यांचा आढावा घेणारं पुस्तक आहे. खरं तर मार्गदर्शन या अर्थाने गाइड म्हणायलाही हरकत नाही. वास्तूरचनाकार, पत्रकार, समाजशास्त्रज्ञ, प्राध्यापक, कायदेपंडित, मानववंशशास्त्रज्ञ अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांनी आपापल्या विषयांच्या अनुषंगाने लेखन केलं आहे. ‘एफएसआय’चा प्रश्न, धारावी पुनर्विकास, रेल्वे प्रवास, दहशतवादी हल्ले, वैद्यकीय उपचार, नागरी नियोजन, पर्यावरण, बारबाला, फेरीवाले, पादचारीपथ अशा विविध विषयांचा यात समावेश आहे. थोडक्यात, मुंबईचा एक शहर म्हणून विचार करताना त्याच्या महत्त्वाच्या नागरी समस्यांचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे.
‘मुंबई रीडर १२’ – संपादित, अर्बन डिझाईन रिसर्च इन्सिटटय़ूट, मुंबई, पृष्ठे – २७४, मूल्य – दिलेले नाही.

Women of mulank bring luck and success to their husbands
‘या’ मुलांकच्या मुली पतीसाठी असतात खूप लकी, जाणून घ्या, अंकशास्त्र काय सांगते?
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
interest and curiosity while making a documentary
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : आस्था आणि कुतूहलासाठी…
chaturang nature disorder harmful to society Personality American Psychological Association
स्वभाव-विभाव: समाजासाठी विघातक विकार
College student sexually assaulted and threatened to go viral and demanded extortion
मुंबईः लैंगिक अत्याचाराचे चित्रीकरण करून खंडणीची मागणी
Apte Vachan Mandir passion for innovation Kolhapur news
आपटे वाचन मंदिराला नावीन्यपूर्ण उपक्रमांचा ध्यास
Bhiwandi cosmetics marathi news
कालबाह्य सौंदर्य प्रसाधनांची भिवंडीत विक्री
documentary making, Abhijit Kolhatkar, Shilpa Godbole, producer director duo, documentary, Urdu ghazal, Shashikala Shirgopikar, Reverb Production, passion project, artistic journey
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : अद्यायावतीकरणाचा उद्योग…