लहान मुलांमध्ये मूल्यविचार रुजवण्यासाठी वेगवेगळय़ा कथांचा उपयोग केला जातो. आजही अनेक पालक मुलांना इसापनीतीच्या कथा आवर्जून सांगतात, वाचायला देतात. प्राण्यांच्या जीवनावर आधारित असणारी इसापनीती माणसाला जीवन कसं जगावं याचं उत्तम मार्गदर्शन करते. असाच मूल्यानंद देणारा डॉ. सिसिलिया काव्र्हालो यांचा बालकथांचा संग्रह म्हणजे ‘सवंगडी’. एकूण चार कथांचा हा कथासंग्रह असून लोककथांचा आधार घेऊन या कथा लिहिल्या गेल्या आहेत. पहिली कथा आहे ‘कोकरू’. ही कथा कोकरू आणि येशू यांच्या संवादातून अलवारपणे उलगडत जाते. येशूची दोन चित्रं पाहून शेफाली नावाच्या मुलीच्या मनात उमटलेले भावतरंग या कथेत आपल्याला वाचायला मिळतात. येशूच्या जन्माच्या इतिहासाबरोबरच तत्कालीन सामाजिक परिस्थितीही बालकांना समजेल अशी या कथेची मांडणी केलेली आपल्याला दिसते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा