डॉ. रवींद्र अनंत साठे यांनी लिहिलेल्या ‘शोध आणि बोध : प्राचीन शेती तंत्रविज्ञानाचा’ हे पुस्तक प्राचीन काळातील शेती आणि शेतीसंबंधित अभ्यास, प्रात्यक्षिके, संशोधन आणि उपाययोजनांवर सविस्तर प्रकाश टाकणारे आहे. मुळात प्राचीन काळात आपली शेती कशी होती, पिकांची वाढ होण्यासाठी खते, औषधे तयार करण्याची, ती पिकांना देण्याची पद्धत कशी होती, देशाच्या कोणत्या भागात कोणती पिके होत होती, त्यांचे स्थानिक महत्त्व काय होते, आहारातील त्यांचे स्थान काय होते, याबाबत सविस्तर आणि अभ्यासपूर्ण माहिती संदर्भासह या पुस्तकात दिलेली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

केवळ शेतीच नाही, तर पशुधन कोणते असावे, कसे असावे, गुराढोरांचे पालनपोषण करताना काय काळजी घ्यावी, त्यांना काय खायला घालावे यासह त्यांना एखादा आजार झाल्यास त्यावर काय उपाययोजना करावी, संबंधित औषध कसे तयार करावे याचीही विस्तृत माहिती या पुस्तकात दिली आहे. याबरोबरच सूक्ष्मजीव, पर्यावरण, बीजप्रक्रिया, पशुआयुर्वेद, सेंद्रिय शेती, वृक्षआयुर्वेद, शेतीची अवजारे इत्यादींविषयीही संदर्भासहित सखोल माहिती यात आहे. विशेषकरून विहीर तसेच कूपनलिकांसाठी जमिनीतील पाण्याचे झरे कसे शोधायचे, कोणत्या झाडाखाली, वेलीखाली किंवा वारुळाच्या कोणत्या दिशेला किती फुटांवर पाणी लागेल, ते गोडे असेल का याबाबतचे ठोकताळे अत्यंत विस्ताराने पुस्तकात दिले आहेत. हे पुस्तक सर्वसामान्य शेतकरी, शेती अभ्यासक, तसेच विद्यार्थ्यांना अत्यंत उपयोगी व दिशादर्शक ठरणारे आहे.

‘शोध आणि बोध : प्राचीन शेती तंत्रविज्ञानाचा’- रवींद्र अनंत साठे,

राजहंस प्रकाशन, पाने- २३१, किंमत- ३५० रुपये.