सभोवतालच्या निर्गुण, निराकार, अव्यक्त पोकळीला अर्थपूर्ण करते ती वास्तुकला! प्रत्येक वास्तू ही एक सांस्कृतिक विधान असते. कुठल्याही कलेचा उपयोग पोट भरण्यासाठी की आत्मसमाधानासाठी, ही निवड
जांभेकर १९६४ साली मुंबईच्या जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्समधून वास्तुविशारद झाले. काही काळ मुंबईत नोकरी, नंतर स्वत:चा व्यवसाय करून १९६९ साली ते न्यूयॉर्कमध्ये प्रारूपकार (ड्राफ्टस्मन) या हुद्दय़ावर नोकरी करू लागले. विशारद असून प्रारूप करण्याचे काम हा त्यांना अपमान वाटला खरा, परंतु काही दिवसांतच त्यांची दृष्टी बदलून गेली. पडेल ते काम शिस्तीत करण्याचा शिरस्ता त्यांच्या अंगवळणी पडला. सुरुवातीला त्यांना अमेरिकन इंग्रजीचे उच्चार समजत नसत. पण लक्षपूर्वक ऐकत श्रवणक्षमतेचा पूर्ण वापर करून जांभेकर त्या वातावरणाशी सरावून गेले. ज्येष्ठ वास्तुविशारदांसोबतच्या अनुभवातून शिकत गेले. त्या वेळी अमेरिकेत प्रचंड वैचारिक घुसळण होत होती. व्हिएतमानमधील अमेरिकी हल्ल्याच्या विरोधात देशभर निदर्शने चालली होती. वर्णद्वेषाविरोधी लढय़ाचे अिहसक नेते मार्टनि ल्युथर किंग यांच्या हत्येने वातावरणात क्षोभ होता. तर याच काळात मानवाने चंद्रावर पाऊल ठेवल्यामुळे विज्ञान जगत भारावून गेले होते. राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक विश्व बदलविण्यासाठी जगभरातील तरुण अनेक प्रयत्न करीत होते. साहित्य, चित्रपट, संगीत, वास्तुकला या क्षेत्रात नवीन कल्पनांना बहर येत होता. लेखकांनी हे सारे बाह्य बदल मन:पूर्वक समजून त्यानुरूप स्वत:मध्ये बदल घडवून आणले. ‘सत्याग्रह म्हणजे काय?’ या प्रश्नावर ते निरुत्तर झाले. भारतीय इतिहासाकडे झालेले दुर्लक्ष लक्षात आल्यावरच त्यांची मान खाली गेली
दुबईमधील मरीना टॉवर या ४० हेक्टरवरील मध्यमवर्गीयांच्या निवासी रचनेसाठी पाण्यात झेपावणाऱ्या हाताच्या बोटांसारख्या इमारतींची पर्यावरण स्नेही रचना जांभेकरांनी केली. पाण्याला अडथळा न करता कालव्यासारखा वापर केला. नसíगक वायूवीजनाची सोय केली. अरबस्तानातील वाळवंटी रियाद (मूळ अर्थ उद्यान)मध्ये मशीद करताना दिवसाचा असह्य उष्मा सहन करण्यासाठी जाळीदार िभत केली. सभोवताली झाडी देऊन पाणी खेळवले. यामुळे संपूर्ण वास्तू पाण्यावर तरंगत असल्याचा भास होतो. या वास्तूला अनेक पुरस्कार लाभले.
बांधकाम करताना कमीत कमी सामग्रीचा जास्तीत जास्त उपयोग व्हावा, निसर्गाला त्रास देऊ नये, बांधकामाचा वापर सुरू झाल्यावर वीज, पाणी या नियमित खर्चात कपात व्हावी, अशा पर्यावरण स्नेहाच्या
भारतीय व पाश्चात्त्य संगीत, चित्र, काव्य यामध्ये कलासक्त जांभेकर रममाण होतात. जयदेव यांच्या गीतगोिवदवरील कांगडा शैलीतील चित्रे, रामुकमार, सूझा, जामिनी रॉय यांची चित्रे, तांबे व पाडगावकर यांच्या कविता, कुमार गंधर्व व भीमसेन जोशी यांच्या गायनाविषयी त्यांनी भरभरून लिहिले आहे. सर्व कलांच्या निर्मितििवषयीचे त्यांचे कुतूहल या पुस्तकात वारंवार जाणवत राहते. स्थिर स्वरूपाच्या वास्तुकलेमध्ये संगीतातील प्रवाहीपणा आणण्याचा त्यांचा ध्यास अपूर्व आहे.
दुबईच्या खाडीकडे वरून पाहिल्यावर अरबी लिपीसारखा लफ्फेदार वळणांचा ओघवता नयनमनोहर पूल म्हणजे पाण्यावरील प्रवाही अक्षरेच वाटतात. रात्रीच्या प्रकाशात ही वलयांकित रचना पाण्यावर चंद्रकोरीचा (तर कधी पूर्णचंद्राच्या) भास निर्माण करते. पूल ही केवळ स्थापत्यरचना नसून सांस्कृतिक अभिव्यक्ती आहे, याची प्रचीती हा पूल देतो. पाच खाडय़ांना पार करणारा बारा पदरी पूल मेट्रो स्टेशनपर्यंत येतो. या पुलाच्या सान्निध्यात पक्ष्यांसाठी संरक्षित क्षेत्र ठेवले आहे. नवी व जुनी दुबई, सांस्कृतिक व भावनिकता यांना सांधणाऱ्या या पुलाची जगभर चर्चा झाली. प्रत्यक्ष काम कधीही चालू होऊ शकण्याच्या टप्प्यात आलं आहे. दोहा येथील विमानतळापासून सहा किलोमीटर लांबीचा पूल बांधताना जांभेकरांनी पाण्याखालून बोगदा आणि बाहेर दोन पूल दिले. समुद्रलाटांमध्ये शुभ्र िशपले तरंगत असल्याचा भास निर्माण करणारी ही रचना आहे.
जांभेकर ‘‘शहरीकरण, पर्यावरणरक्षण आणि सामाजिक बांधिलकी या तीन घटकांविषयीच्या चिंतनातून वास्तुरचनेची (डिझाइन) निर्मिती व्यक्त झाली पाहिजे,’’ असे म्हणतात. झोपडपट्टी हटवून नवीन वस्ती केल्यास शहराचा तो भाग निकामी अवयवासारखा होईल. गरीब वस्तीत घुसमटणाऱ्या माणसांना नव्या उमेदीने मूळ प्रवाहात आणता येईल. मुंबईतील सर्व आíकटेक्चरल स्कूल्सना एकत्र आणून धारावीच्या पुनरूत्थानाची रचना करावी, अशी त्यांची इच्छा आहे.
मात्र वास्तुकलेमधून होणारी अभिव्यक्ती आणि वास्तुरचनेच्या निर्मिती प्रक्रियेविषयीचे पुस्तकात ठिकठिकाणी विखुरलेले लेखकांचे चिंतन एकसंध असते तर अधिक परिणामकारक झाले असते. अमेरिकेतून अवघ्या जगाला भिडल्यामुळे जांभेकर यांची वास्तुकलेविषयक दृष्टी प्रगल्भ होत गेली याचा प्रत्यय वारंवार येतो. सध्याच्या काळात वास्तुकलेसमोरील आव्हाने, मागणी व बाजारपेठ यांचा परिणाम कसा होतो? तंत्रज्ञानातील प्रगती, आíथक सुबत्ता यामुळे वास्तुकला अधिक सुसंस्कृत झाली काय? जगातील विविध देशांतील समाजमन वास्तूमधून कसं व्यक्त होत आहे? यासंबंधी जांभेकराचे विस्तृत भाष्य आवश्यक होते. लेखकाला वैयक्तिक व कौटुंबिक कथनाचा विस्तार, प्रसंगांची पुनरुक्ती व काही छायाचित्रे टाळता आली असती.
वास्तुकलेसंबंधीची जाण वाढविणारी पुस्तके मराठी वाचकांच्या वाटय़ाला क्वचितच येतात. विश्वाचे अंगण हे आंदण मानून वास्तुकलेची महती उलगडून दाखविणारे हे पुस्तक वाचकांनी आवर्जून वाचले पाहिजे.
‘हे विश्वाचे अंगण – वास्तुरचनाकाराची कहाणी’ – सुधीर जांभेकर, राजहंस प्रकाशन, पुणे, पृष्ठे- १८२, मूल्य – ३५० रुपये.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा