सुधीर पाठक

आरक्षण घेणाऱ्यांची संख्या जशी वाढत आहे, तशीच संख्या आरक्षण सोडणाऱ्यांचीही वाढली पाहिजे. म्हणजे अधिक गरजूंना आरक्षणाचा फायदा मिळेल. त्यासाठी जनमानस उभे राहिले तरच विषमता संपुष्टात येऊ शकेल. भारत विश्वगुरूपदाकडे जात असताना आपसातील जातिप्रथा समाप्त करीत एकदिलाने, समरसतेने, परस्परांच्या सन्मानाच्या वाटेवरून पुढे जावे लागणार आहे. जातिप्रथा समाप्तीचा सोपान गाठताना आपल्याला आरक्षणाचा आधार घेत एकेक मजला पार करावा लागणार आहे. हे साध्य झाले तरच आपले ईप्सित गाठता येणार आहे. आपण भारतीय आहोत, हिंदूराष्ट्र हे आपले राष्ट्रीयत्व आहे, त्यातील विविधता ही अतिशय मनोहारी आहे. या विविधतेतून आपण जगाला एकतेचा संदेश देत असतो. आमचे एक राष्ट्रीयत्व असले तरी पूजापद्धती भिन्न आहेत. या भिन्न पूजापद्धतीने आमच्या राष्ट्रीयत्वाबाबत काही वेळेला संदेह उत्पन्न होतो; पण वस्तुस्थिती तशी नाही. सर्व तेहेतीस कोटी देवतांना पूजणारेही हिंदूराष्ट्राचे पाईक आहेत, तर यांपैकी एकालाही न पूजणाराही आम्ही आमचाच मानतो. अगदी दर रविवारी चर्चमध्ये जाऊन येशूची प्रार्थना करणारे आणि शुक्रवारी मशिदीत जाऊन नमाज पढणारे या सगळय़ांचे मूळ एक आहे ही आमची जीवन-श्रद्धा आहे. या जीवन-श्रद्धेची पताका हीच आमच्या जगण्याची शैली आहे.

four days week in japan
विश्लेषण : जन्मदर वाढविण्यासाठी जपानमध्ये चार दिवसांचा आठवडा..! काय आहेत कारणे? योजना कशी राबवणार?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
ipo allotment loksatta news
‘आयपीओ’ मिळण्याची शक्यता कशी वाढवावी? कटऑफ किंमत, एकापेक्षा अधिक डिमॅट खाती, कोटा याबाबत निर्णय कसा करावा?
Religion shouldnt justify reservation
इथे मुद्दा मुस्लिमांच्या लांगूलचालनाचा नसून, आरक्षणाच्या निकषांचा आहे…
Manoj Jarange On Santosh Deshmukh Case
Santosh Deshmukh Case : “आरोपींना मोकाट फिरू देणार असाल तर…”, मनोज जरांगेंची सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया
Onion prices fall due to increased production
नाशिक : आवक वाढल्याने कांद्याची घसरण
celebrations at durgadi fort in kalyan
कल्याणमधील दुर्गाडी किल्ला येथे जल्लोष
hitendra thakur slams bjp for marathon
मॅरेथॉन घेण्याची ताकद आहे का? राजकारण करणार्‍या भाजपला हितेंद्र ठाकूरांचा सवाल

या पद्धतीने जीवन जगताना प्राचीन काळी काही दोष समोर आलेत, त्यांचा आम्ही स्वीकार केला आणि त्यातून योग्य मार्ग शोधण्याचा प्रयासही केला. पूर्वी समाजात स्पृश्यास्पृश्यता होती. आम्ही आमच्याच समाजबांधवांना गावकुसाबाहेर जगण्याला लावीत होतो. त्यांची सावली जरी पडली तरी विटाळ होत असे. तो समाजही दिवाभीताचे जीवन जगत होता. माणूस म्हणून जगण्याचा आपला अधिकार नाकारला जातो हेदेखील सुरुवातीला लक्षात येत नसे. पण जसजसा काळ जाऊ लागला तसतसा या चुकांचे प्रायश्चित्त घ्यायचे, हा भाव समाजात वृद्धिंगत होऊ लागला. पण त्या समाजात अस्मिता जागृत व्हायला त्यांना धर्मातर करावे लागले. साधं पांडुरंगाचे दर्शन सर्वांना घेता यावे यासाठी साने गुरुजींना विठ्ठल मंदिरासमोर सत्याग्रह करावा लागला. १० मे १९४७ ला त्यांनी दहा दिवस उपोषण केले आणि पांडुरंगाला जातिपातीतून मुक्त केले. महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामान्य माणसात मानव म्हणून जगण्याची अस्मिता प्रज्वलित केली, तर एक मोठा वर्ग होता, ज्यात महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, श्री. म. भावे वगैरे होते. त्यांनी निप्रबुद्ध समाजमनाला अंतर्मुख व्हायला लावून स्वत:च्या चुकांचे परिमार्जन केले पाहिजे, ही भावना जागृत केली.

हेही वाचा : मायक्रोवेव्ह उपग्रहांची किमया…

साधारणत: जातीचा बोध हा आडनावावरून होतो. त्यामुळे आडनाव लावू नये अशी एक चळवळ मधल्या काळात उभी झाली होती. समाजवादी विचारांनी भारलेली एक पिढी या चळवळीत आघाडीवर होती. जयप्रकाश नारायण, प्रभावती, श्रीमन नारायण, मदालसा बेन ही त्यातलीच काही उदाहरणे. मात्र या चळवळीने महाराष्ट्रात फार जोर धरला नाही. हिंदी भाषक भागांत मात्र ही चळवळ बरीच फोफावली. आजही अनेक जण स्वत:चे आडनाव वापरत नाहीत. नितीशकुमार हे आज या मतप्रवाहाचे प्रतिनिधित्व करतात. मात्र या चळवळीने जातिप्रथा समाप्तीचा हेतू पूर्णपणे सफल झाला नाही. उलट महाराष्ट्रात बघायला गेले तर महाराष्ट्र विधानसभेत अनेक आमदार स्वत:च्या आडनावामागे ‘पाटील’ हे जातिदर्शक उपनाम लावण्यात धन्यता मानतात, असे दिसते.

१९२५ साली रा. स्व. संघाची स्थापना नागपूरला डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी केली. संघाचा हेतू, उद्दिष्टे याबाबत वेगवेगळे मतप्रवाह असू शकतात; पण एका बाबतीत मात्र सर्वांचे एकमत होते ते म्हणजे संघात जातपात बघितली जात नाही. शेजारी असलेला स्वयंसेवक कोणत्या जातीचा आहे याची कधीही विचारणा केली जात नाही. संघाचा मुख्य शिक्षक कोणत्याही वयाचा, जातीचा असो, त्याची आज्ञा संघस्थानावर सरसंघचालकांपासून सर्व जण पाळतात.

संघाचे एक ज्येष्ठ नेते अप्पाजी जोशी यांच्यामुळे महात्मा गांधी एकदा वर्धेला संघ शिबिरात आले होते. त्यांनी विचारणा केली की, यात किती जण ‘हरिजन’ आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, माहीत नाही. आम्ही कधीच जात विचारत नाही. संघात जात विचारली जात नाही, ही बाब बापूंना खूप भावली होती. संघ शिबिरात सर्वांचा एकच स्वयंपाक होतो आणि सरसंघचालकांपासून सर्व जण तेच जेवतात. एकदा शिबिरार्थी म्हणून आलेल्या पं. बच्छराज व्यास यांनी सोवळय़ात ‘माझा स्वयंपाक मी करीन’ असा आग्रह धरला होता. त्याला विरोध झाला नाही, पण ते वातावरण बघून पं. व्यास यांनी निर्णय घेतला की, सोवळय़ातला स्वयंपाक झाला आहे, पण तो मी वापरणार नाही. सर्वांसाठी शिजलेले अन्नच त्यांनी ग्रहण केले. हट्टाग्रह न धरता स्वयंसेवकाच्या मनोवृत्तीत कसा बदल घडविता येतो हे यातून स्पष्ट होते.

हेही वाचा : लाल सिंहातल्या दिवाळी शिखर परिषदेचा वृत्तांत

जातपात संघात मानली जात नाही. सर्वांना हृदयातून स्वीकारणे हीच सामाजिक समरसता आहे. सर्वांना आपल्यासारखे मानावे, जातिगत भेदभाव, उच्च-नीचता, अस्पृश्यता दूर करून लोकांत परस्पर प्रेम, आदर व सौहार्द वाढविणे आणि समाजातील सर्व वर्गात, जातींत एकता प्रस्थापित करणे ही सामाजिक समरसता आहे.

रा. स्व. संघाचे तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस वसंत व्याख्यानमालेत म्हणाले होते- अस्पृश्यता ही चूक आहे. It must go lock, stock and barrel. If untouchability is not wrong, nothing in the world is wrong. आपल्याकडे जातिपातीत रोटीबेटी व्यवहार होत असे. आता रोटी व्यवहार सर्रास सुरू झाला आहे. बेटी व्यवहारदेखील सुरू झाला आहे. त्यामुळे जातिभेदाची तीव्रता पुष्कळ प्रमाणात कमी झाली आहे. जातिभेदावरील उतारा म्हणून आरक्षणाकडे बघितले पाहिजे. जातिभेदाची तीव्रता कमी व्हावी आणि सामाजिक उतरंडीत जे मागे पडले आहेत, त्यांना बरोबर आणायला आरक्षण ही उपाययोजना निघाली. एक सुधारणा म्हणून आरक्षणाकडे बघितले पाहिजे.

हेही वाचा : आदले । आत्ताचे : मुसाफिर, जायेगा कहाँ?

भारतातील भेदभावपूर्ण जातिव्यवस्थेवर मात करण्यासाठी महात्मा जोतिबा फुले आणि ब्रिटिश अधिकारी हंटर यांनी वाचा फोडली. मागास समाजाला, समाजघटकांना समाजाच्या पुढारलेल्या घटकांपावेतो आणायचे असेल तर मागासर्गीयांना विशेष सवलती देणे म्हणजे आरक्षण. कोल्हापूर संस्थानचे छत्रपती शाहू महाराज यांनी या कल्पनेचा पाठपुरावा केला. केवळ सरकारीच नव्हे तर खासगी क्षेत्रालाही आरक्षण लागू केले.
स्वतंत्र भारतात प्रारंभी अनुसूचित जाती-जमातींना आरक्षण होते ते भटक्या विमुक्तांना देण्यात आले. मंडल आयोगामुळे १९९१ मध्ये ओबीसींना आरक्षण देण्यात आले. आपल्या विषमग्रस्त समाजाला समतेच्या प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण आवश्यक आहे हे समाजाने मान्य केले, पण ते किती काळ सुरू राहावे या प्रश्नावर मतभेद आहेत. रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी नुकतेच स्पष्ट केले आहे की, समाजातील विषमता संपेपावेतो आरक्षण आवश्यक आहे. त्यातून स्वाभाविक प्रश्न निर्माण होतो, ही विषमता केव्हा संपेल? याचे उत्तर सोपे नाही. त्यासाठी आरक्षण स्वीकारणाऱ्यांनी स्वयंनिर्णय घेतला पाहिजे. अमरावतीचे नेते गणेश आकाजी उपाख्य नानासाहेब गवई यांनी स्वत: कधीही आरक्षण घेतले नाही; पण त्यांची मुले पद्माकर गवई व एम. जी. गवई दोघेही ज्येष्ठ सनदी अधिकारी झालेत. आपण स्वत: मुख्य प्रवाहात आलो असे मानून त्यांच्या पुढील पिढय़ांनी आरक्षण नाकारले. हा एक उत्तम आदर्श, पण याउलटही अनुभव आहेत.

हेही वाचा : प्रेरणादायी जीवन कहाणी

वर्धा जिल्ह्यात एका महाविद्यालयात निबंध स्पर्धा होती. त्याचे बक्षीस मागास जातीतील मुला-मुलींना द्यायचे होते. कलेक्टरसाहेब आरक्षण घेणारे होते. त्यांच्या मुलीला बक्षीस द्यावे की अन्य मागासवर्गीय मुलीला. त्या वेळी कलेक्टरसाहेबांनी ठणकावून सांगितले, माझी मुलगी पहिली आहे, तिलाच पुरस्कार द्यायला हवा.

आरक्षण घेणाऱ्यांची संख्या जशी वाढत आहे तशीच संख्या आरक्षण सोडणाऱ्यांचीही वाढली पाहिजे, म्हणजे अधिक गरजूंना आरक्षणाचा फायदा मिळेल. त्यासाठी जनमानस उभे झाले पाहिजे आणि ते त्या वर्गातून आले पाहिजे; म्हणजे अधिकाधिक गरजूंपावेतो आरक्षण जाईल. हे आरक्षण जसे झिरपत जाईल तशी विषमता संपुष्टात येईल. विषमता संपुष्टात आलेली आपल्याला याचि देही याचि डोळा बघायला मिळावी, अशी आशा करू या; पण तोवर आरक्षणाला पर्याय नाही ही काळय़ा दगडावरील रेघ आहे.
2sudhirpathak@gmail.com

Story img Loader