त्याची गफलत झाल्याचं उमजल्याक्षणी मी बाटली साभार परत करून विचारलं, ‘‘साबण कुठे आहे?’’
त्यानं तीच बाटली माझ्या हातात कोंबत उत्तर दिलं, ‘‘साबणच तर आहे.’’
मला कसं पटणार? अंगाचा साबण म्हणजे घट्ट चौकोनी वजनदार वडी हे समीकरण हमाम, रेक्सोना, लाइफबॉय वगरे मंडळींनी बालपणापासून मनावर कोरून ठेवलेलं होतं.
‘‘बाटलीत शाम्पू असतो.’’ बाटली हलवून मी त्याला त्याची चूक दाखवून दिली.
मान गदागदा हालवून तो िखकाळला, ‘‘नो. नो. शाम्पू नाही. साबणच आहे. उघडून वास तर घेऊन बघा.’’
मी बाटलीचं बूच उघडणार, तोच तो पुढे म्हणाला, ‘‘डिट्टो पुरुषांच्या घामाचा घमघमाट आहे.’’
मी चपळाईनं बूच घट्ट दाबून टाकलं. पण अनवधानानं तळहात नाकापाशी गेलाच.
‘‘इट विल सेल लाइक हॉट केक.’’
तडाखेबंद खपाची अपेक्षा ऐकून मी सटपटलो आणि विचारलं, ‘‘असं कोण म्हणतं?’’
‘‘मार्केट सव्र्हेचे निष्कर्ष उत्साहवर्धक आहेत. खासकरून महिलांना हा सुगंध पसंत पडतो.’’
‘‘काय?’’ मी किंचाळलो. त्याचं विधान कोणत्याही शहाण्या माणसाला पटणं शक्यच नव्हतं.
‘‘रिपोर्ट दाखवू का? इंटरनॅशनल सव्र्हे आहे.’’
‘‘भारतात केलंय का हे सर्वेक्षण?’’
‘‘त्याची काय गरज? इंग्लंड, फ्रान्स, इटली, जर्मनी, हॉलंड आणि अमेरिकेत घेतलाय हा सव्र्हे. हल्ली तिथं जे चालतं तेच आपल्याकडेही खपतं. आमच्या या उत्पादनाच्या भारतातल्या खपाबद्दलचा अंदाज संख्याशास्त्राच्या आधारे बांधण्याची जबाबदारी तुमच्यावर सोपवली आहे.’’
‘‘पण मुळात हा नवीन साबण नेहमीप्रमाणे घन स्वरूपात का नाही?’’
‘‘इंटरनॅशनल फॅशन! जगभर अंगाचा साबण हल्ली सेमीलिक्विड फॉर्ममध्येच बनवला जातो. साबणाची वडीबिडी विसरा आता. ती फक्त लोअर मिडल क्लास आणि त्याखालच्या चालू मार्केटसाठीच बनवणार. अपमार्केटमध्ये शॉवर जेल, शॉवर क्रीम, बबल बाथ, फेस वॉश, बॉडी वॉश हेच बाथरूम प्रॉडक्ट्स असणार आहेत. आम्ही हा नवीन सुगंध या सर्व उत्पादनांमध्ये वापरणार आहोत.’’
‘‘म्हणजे अंघोळ करून आल्यावरदेखील अंगाला घामाचाच वास येणार. आळशी बाप्ये तर अंघोळ न करताच बाथरूममधून बाहेर येतील.’’
‘‘अशक्य. कारण हा सुगंध फक्त महिलांच्या उत्पादनांमध्येच असणार आहे.’’
‘‘धन्यवाद! आणि पुरुषांसाठी काय वापरणार?’’
‘‘अर्थातच सेम प्रिन्सिपल!’’
‘‘तद्दन मूर्खपणा आहे. घामाला कुबटच वास येतो. त्याचा साबण काढलात तर खप शून्य. कंपनी बुडेल.’’
‘‘चूक. मुळात ताज्या घामाला दरुगध नसतोच. हवं तर साहेबांना विचारा. आमचं रिसर्च डिपार्टमेंट तेच सांभाळतात.’’
मी संशोधक-कम-संचालक साहेबांकडे गेलो. त्यांनी तपशीलवार स्पष्टीकरण केलं, ‘‘त्वचेवरचे जीवाणू घामाच्या संसर्गात आले की फोफावतात. दरुगध निर्माण होतो तो त्यामुळे. ताज्या घामात तरल पण दमदार असे फेरोमोन्स असतात. ऑर्थोक्रेसॉल आणि पॅराक्रेसॉल असे दोन प्रकारचे मिथाइल फेनॉल असतात. त्यांचा एक विशिष्ट गंध असतो. पौराणिक साहित्यात अनेकदा यौवनगंध या शब्दाचा उल्लेख येतो. या सुगंधामुळे चित्तवृत्ती प्रसन्न होतात. मन नकळत उत्तेजित होतं. फ्रान्समधल्या आमच्या मूळ कंपनीतल्या संशोधकांनी घामातले क्रियाशील घटक डिस्टिलेशन करून वेगळे केले आहेत. ते आम्ही या प्रॉडक्ट लाइनमध्ये वापरले आहेत.’’ मी कळवळून विचारलं, ‘‘पण गुलाब, मोगरा, केवडा, झालंच तर खस, केशर, चंदन असे मनमोहक सुगंध उपलब्ध असताना ही कसली अवदसा आठवलीय तुम्हाला?’’
‘‘वर्षांनुवर्ष वापरून ते शिळे झाले. आता काहीतरी नवीन खळबळजनक फ्रॅग्रन्स आणला तरच मार्केटमध्ये टिकून राहता येईल. नाहीतर कंपनी बुडेल.’’
मी माझ्या पायांवर तसाच ठाम उभा राहिलेला पाहून साहेब समजावणीच्या सुरात म्हणाले, ‘‘मार्केटमध्ये कोणते प्रवाह चालतात, त्याची तुम्हाला कल्पना नाही. एक जुनं उदाहरण देतो. तुम्हाला पॉयसॉन नावाचा जगप्रसिद्ध परफ्यूम माहीत असेलच.’’
‘‘हो. बरेच लोक त्याला पॉयझन म्हणायचे.’’
‘‘बघा. म्हणजे विक्षिप्तपणा नावापासूनच सुरू झाला. पण डळमळत्या डिओर कंपनीला तारून नेलं त्या एका परफ्यूमनं. तब्बल २५ वर्षे तडाखेबंद विक्री झाली. पण १९८५ साली तो बाजारात येण्यापूर्वी पाश्चात्य ढुढ्ढाचार्यानी एकमुखानं त्याला लाल बावटा दाखवला होता. इतक्या उग्र वासाच्या आणि अभद्र नावाच्या परफ्यूमला अभिरुचीसंपन्न स्त्रिया बोटही लावणार नाहीत, असा होरा होता त्यांचा. पण वास्तवात काय घडलं? मार्केट असंच असतं. मार्केटला भूक असते, ती नावीन्याची आणि उत्कृष्ट प्रॉडक्टची.’’
‘‘पण तिथंच तर तुमचं हे नवीन घोडं पेंड खाणार ना?’’
साहेब माझ्याकडे रोखून पाहात फणकारले, ‘‘आमच्या या नवीन प्रॉडक्ट लाइनमधली ही खास पुरुषांसाठीच्या शॉवर जेलची सँपल बाटली घ्या. वापरून पाहा. मग पुढे बोलू या.’’
रविवारी मित्रानं सल्ला दिला, ‘‘फेकून दे ती घाणेरडी बाटली. असले अतिशहाणे अशाच दळभद्री आयडिया काढून कंपनीची वाट लावतात. तुझ्याकडे या कंपनीचे शेअरबिअर असतील तर ते लगेच विकून टाक.’’
शेअर विकून टाकले. पण अख्खी भरलेली बाटली फेकून देववेना. मी ती उघडण्याचं धाडस मात्र केलं नाही.
एकदा कधीतरी डोक्यावर शॉवर सोडल्यानंतर सोपबॉक्समधली साबणाची वडी सूक्ष्मावस्थेत गेल्याचं दिसलं. नवीन साबण दे अशी साद घातली, पण बायकोनं दाद दिली नाही. कुडकुडत वर पाहिलं तर फळीवर ही बाटली दिसली. दुसरा पर्यायच नसल्यामुळे ते शॉवर जेल वापरून स्नान उरकलं. छान वाटलं, हे कळण्यापूर्वीच मी रिपीट परफॉर्मन्स केला होता. ‘ठंडे ठंडे पानीसे नहाना चाहिये’ असं गुणगुणत टॉवेल गुंडाळला. बाथरूमबाहेर पडल्यानंतर शिटीवर ‘जिंदगीभर नहीं भुलेगी वो बरसात की रात’ मला नकळत सुरू झालं होतं. ते मात्र बायकोच्या कानात बरोब्बर पडलं.
ती घाईघाईत माझे कपडे घेऊन आली आणि फिसकारली, ‘‘यानंतर तुम्ही ‘जबसे तेरे नना’ गात रणबीर कपूरच्या स्टाईलमध्ये नाच कराल या धास्तीनं हातातलं काम टाकून आले. आज वेगळाच मूड लागलेला दिसतोय. घरात इतर माणसं वावरताहेत याचं भान असू दे. कपडे चढवा लगेच.’’
मी संचालकसाहेबांना फोन लावला, ‘‘अभिनंदन! तुमची ही नवीन प्रॉडक्ट लाइन धुमाकूळ माजवणार.’’
साहेब खळखळून हसत म्हणाले, ‘‘थँक्स. यानंतर आम्ही बिर्याणीच्या सुगंधाचा डायिनग रूम फ्रेशनर काढणार आहोत. जठराग्नी खवळून उठलाच पाहिजे. कशी आहे आयडिया?’’ ल्ल
घमघमाट
एका बहुराष्ट्रीय कंपनीचा प्रॉडक्ट मॅनेजर माझ्या हातात एक प्लास्टिकची बाटली सरकवत म्हणाला, ‘‘हे आमचं नवीन उत्पादन. बाथ सोप.’’
First published on: 18-08-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व बोलगप्पा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chit chat