नोकरीनिमित्त आपला गाव सोडून शहरात येऊन स्थिरस्थावर झाले तरी चाकरमान्यांच्या मनातून आपलं गाव जाता जात नाही. तिथली माती, घर, शेती, माणसं यांच्याशी जिव्हाळ्याचं नातं तोडता येत नाही, ते कायम त्याच्या मनात वास करून असतं. आणि त्यातही ते मन एका कवीचं असेल तर ते कवितेतून व्यक्त झाल्याशिवाय राहत नाही. याचा यथार्थ प्रत्यय येतो तो कवी प्रशांत वसंत डिंगणकर यांच्या ‘काय समजलीव्?’ या काव्यसंग्रहातून. या कवितांचा विशेष म्हणजे त्या संगमेश्वरी बोलीत लिहिल्या आहेत. या बोलीभाषेतला हा पहिलाच काव्यसंग्रह आहे. त्यामुळे या कवितांचा बाज काहीसा वेगळाच आहे.

आपल्या गावगाडय़ाच्या लोकरहाटीशी एकरूप झालेलं कविमन या कवितांमधून व्यक्त झालं आहे. संगमेश्वरी भाषेचा गोडवा या कवितांमध्ये अचूक पकडला गेला आहे. तिची गोडी ठायी ठायी जाणवत राहते. कुणबाऊ चालीरीती, लोकपरंपरा, भावकी, श्रद्धा-अंधश्रद्धा या कवितांमधून डोकावतात. इथल्या माणसांचं जगणं, इथले सण-उत्सव अशा अनेक गोष्टींचे दर्शन या कवितांमधून घडते. त्यामुळे या कविता केवळ कविता न राहता गावगाडय़ातील सामाजिक जीवनपट उलगडणारा वानवळा झाला आहे. ‘आम्ही वरून साधे दिसलो तरी आमच्यातही हुंकार दडलाय’ हे कवी आवर्जून सांगतो. ‘काय समजलीव्?’ या कवितेतून त्याचा प्रत्यय येतो.

Satavahana settlement remains were found at Tekabhatti four kilometers from Chivandagaon Gondpipari taluka
चंद्रपूर जिल्ह्यात सातवाहनकालीन वस्तीचे अवशेष; कधी होते मोठे शहर, आज आहे गर्द वनराई…
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Kandalwan damage new jetty, Virar Marambalpada,
नवीन जेट्टीच्या रस्त्यासाठी तिवरांची कत्तल? विरारच्या मारंबळपाडा परिसरातील प्रकार; पर्यावरणप्रेमींकडून संताप
Two speeding bikes collide head-on two killed
अमरावती : भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; दोन ठार
Adinath Kothare Manjiri Oak
“डोळ्यातून पाणी आलं…”, आदिनाथ कोठारेचे ‘पाणी’ चित्रपटासाठी कौतुक करत मंजिरी ओक म्हणाल्या, “ही तुझी पहिली फिल्म …”
Mann Ka Geet, Mann Ki Baat, Narendra Modi,
‘मन की बात’नंतर आता ‘मन का गीत’; गीत, संगीत, नृत्य, अभिवाचन आणि दृकश्राव्य माध्यमातून नरेंद्र मोदी यांच्या कवितांचा कार्यक्रम
pune pustak Mahotsav marathi news
‘पुणे पुस्तक महोत्सव’ का गाजला?
Amravati leopard died marathi news
रस्ते फक्त माणसांसाठीच असतात का..? एका बिबट्याचा सवाल

‘आमी आधी काय बोलत नाय

म्हणून आमानला मूकं समजू नका

काय समजलीव्?’

‘मलनी’ या कवितेत खळ्यात धान्याच्या राशी पाहून सुखावलेला शेतकरी आनंदून जातो..

‘खला सारवला ग बाई..

खला सारवला गं बाई

शेनामातीनं खला सारवला गं बाई

मलनीचा नारल वाडवला गं बाई

खला सारवला गं बाई’

गावगाडय़ातील लोकांचं खडतर जगणं कवी प्रकर्षांने या कवितांमधून मांडतो..

‘बावी आटायला लागल्या

चाला आता नदी खोदूया

डवूरं खोदू आनि पानी सोदू’

गावातील लोकांचं जगणं, त्यांच्या हालअपेष्टा, कष्ट आणि सण-उत्सवांमधून स्वत:चं मन रमवण्याची त्यांची वृत्ती अशा अनेक गोष्टींची गोळाबेरीज या कवितांमधून जाणवते. विशेष म्हणजे कवीचं गावगाडय़ात रमणारं मन त्यातून प्रकर्षांने जाणवतं.

काय समजलीव्?’- प्रशांत वसंत डिंगणकर, अनघा प्रकाशन, पाने- ८०, किंमत- १२० रुपये

संवेदनशील स्त्रीमनाचं टिपण

‘मनभावन’ हा ज्योती कपिले यांचा ललितलेखांचा संग्रह. या लेखांमधून जाणवतं ते एक हळवं स्त्रीमन. एक सकारात्मक ऊर्जा घेऊन वाटचाल करणारी स्त्री या लेखांमधून दिसते. हे अनुभव व्यक्तिगत असले तरी ते वाचकाच्या मनाशी तादात्म्य पावतात. या लेखांमधून व्यक्त होणारं स्त्रीमन बहुतांशी रमतं ते निसर्गाच्या सान्निध्यात. फुलांच्या झाडांशी लेखिकेची विशेष जवळीक आहे. लेखिकेला अनेक साहित्यिकांचा सहवास लाभला. त्याबद्दलची कृतज्ञता ती लेखांतून व्यक्त करते. ‘मैत्र’ हा जिवलग मैत्रिणीवरचा लेख मैत्रीतल्या हळुवारपणाची जाणीव करून देणारा. ‘कृष्ण माझा सखा’ यात लेखिकेचे कृष्णप्रेम दिसून येते. ‘जादू साहित्याची’ या लेखात साहित्याने आपलं जीवन कसं बदललं याविषयीचे लेखिकेचे कथन वाचण्यासारखे आहे. ‘विठाई’ हा लेख पंढरीच्या वारीचं कवतुक सांगणारा आहे. लेखिकेला जे जे भावलं ते तिनं सहजपणानं टिपलं आहे. तिच्या आयुष्यातील ही सुंदर टिपणं संवेदनशील वाचकालाही भावतील.

मनभावन’- ज्योती कपिले, जेके मीडिया प्रकाशन, पाने- ९६, किंमत- १५० रुपये.

रात्रीची मुंबई.. सांगोपांग 

मुंबई हे कधीही न झोपणारं शहर म्हणून ओळखलं जातं. मुंबईतील रात्रीचं जगही वेगळं आहे. अगदी रिक्षा-टॅक्सीवाल्यांपासून ते पान टपरीवाल्यांपर्यंत.. चहावाल्यांपासून ते वेश्यांपर्यंत.. कॉल सेंटरवाल्यांपासून ते वृत्तपत्र व्यावसायिकांपर्यंत.. प्रत्येक जण या रात्रीचा दिवस करून ही मुंबई जागवत असतो. प्रवीण धोपट यांच्या ‘लेट नाईट मुंबई’ या पुस्तकात ही रात्रीची मुंबई छान शब्दबद्ध केलेली आहे. दादर, गेटवे ऑफ इंडिया, गिरगाव चौपाटी, बेहरामपाडा, मरीन ड्राइव्ह, व्हीटी ते सीएसटी.. अशा अनेक ठिकाणांच्या रात्रीच्या मुंबईचं वर्णन वाचणं हा एक विलक्षण अनुभव आहे. ही वर्णनं वाचताना आपल्या चौकटबद्ध नजरेला तडे जातात. अनेकदा भयानक धक्के बसतात. काही अनुभव तर मन विषण्ण करतात. पोटाची खळगी भरण्यासाठी माणसं काय काय करत असतात, हे वाचून अचंबित व्हायला होते. ही अशीही मुंबईआपल्या मुंबईत आहे या जाणिवेने मन कातर होतं. पण हे सारं कशासाठी? तर.. पोटासाठी! हेच त्याचं एकमेव उत्तर मिळतं.

ज्यांना मुंबई खरोखरच समजून घ्यायची आहे त्यांनी हे पुस्तक आवर्जून वाचावं. लेखकाने शब्दबद्ध केलेली रात्रीची मुंबई आवर्जून पाहावी असं हे पुस्तक वाचल्यावर प्रकर्षांनं जाणवतं. या पुस्तकातली छायाचित्रं वाचकाला खूप काही सांगून जातात. ही छायाचित्रं रंगीत असती तर अधिक बहार आली असती.  ‘लेट नाइट मुंबई’- प्रवणी धोपट, रोहन प्रकाशन, पाने- १६६, किंमत- २५० रुपये.

Story img Loader