सॅबी परेरा
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
प्रिय मित्र दादू यांस,
सदू धांदरफळेचा नमस्कार आणि नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा!
दसऱ्याच्या दहा दिवस आधीपासून रोज कामा-धंद्याला जाताना ठरावीक रंगाचे कपडे परिधान करणं आणि रात्री उशिरापर्यंत डीजेच्या तालावर नाचणं, ही आपली उज्ज्वल परंपरा आहे. (परंपरा म्हटली कीती शे-दोनशे वर्षांची असून भागत नाही, ती हजारो वर्षांचीच असावी लागते.) तर हजारो वर्षांपूर्वी असे दिवसागणिक वेगवेगळे रंग ठरवून त्या त्या दिवशी ठरावीक रंगाची वल्कले नेसली जात असल्याचे पुरावे अलीकडेच बोरीबंदर येथे टाईम्स बिल्डिंगजवळ मेट्रोसाठी केलेल्या उत्खननात आढळून आले आहेत. तसेच गोरेगाव स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथील रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी केलेल्या रस्त्याकडेच्या उत्खननात साधारणत: बाराशे वर्षांपूर्वीच्या टिपऱ्या सापडल्या आहेत. मी व्हॉट्स-अॅप युनिव्हर्सटिीचा ताजा पदवीधर असल्याने, ठोस पुराव्याशिवाय काहीही बोलत नाही हे तुझ्या ध्यानात आलं असेलच.
तर आजपासून दसऱ्यापर्यंत हा दहा दिवसांचा नवरात्रोत्सव सुरू असणार आहे. आपण म्हणतो, ‘दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा.’ कधी कधी मला वाटतं, लोकांना असा एखाद्या दिवशी ठरवून आनंद कसा होत असेल? (आम्हाला कुठल्या दिवशी, किती प्रमाणात आनंद व्हायला हवा हेदेखील आम्ही स्वत: ठरवत नाही. ते काम आम्ही साळगावकरांच्या कालनिर्णयला आउटसोर्स केलंय.) अरे दादू, तसं पाहिलं तर सगळे दिवस सारखेच. ते येतात आणि जातात. आपण (म्हणजे साळगावकर) ठरवतो तोच दिवस सणाचा! रोजचा सूर्य तर उगवतच असतो. रोज नव्या वाटणाऱ्या, त्याच त्या जुन्या अडचणी घेऊन आणि उगवलेला सूर्य मावळतच असतो, सरल्या दिवसाच्या कडू-गोड आठवणी पोटात घेऊन! आपणच आपल्याला बरं वाटावं म्हणून येणाऱ्या दिवसाला कुठल्या तरी सणाचं नाव देतो आणि मग उसनं अवसान आणून आनंद व्यक्त करतो. याचा अर्थ आनंद साजरा करू नये असा नव्हे, तो तर साजरा करायलाच हवा. अरे, माणसाने कष्टायचं, लढायचं, रडायचं हे रोजचंच आहे. त्या रोजच्या रडक्या रहाटगाडग्यापायी सणाच्या दिवशीही आनंदाने जगायचं नाकारणं यासारखा दुसरा कपाळकरंटेपणा नाही!
दादू, मुंबईचा नवरात्रोत्सव खरोखर प्रेक्षणीय असतो. म्हणजे तसा नाचणीयदेखील असतो. पण मी राणेसाहेबांच्या खालोखाल स्वाभिमानी असल्याने घरच्या कोरिओग्राफरशिवाय इतर कुणाच्या तालावर नाचत नाही. लोक मला बायकोचा बल म्हणतात, पण ते मी फारसं मनावर घेऊ नये असं मला बायकोने बजावलंय. असो. खरं म्हणजे मला नाचगाण्याची खूप आवड आहे. मी जेव्हा दु:खी असतो, आयुष्यातील प्रश्नांनी मला भंडावून सोडलेलं असतं, निराशेच्या गत्रेत सापडलेला असतो; तेव्हा स्वत:लाच मोटिव्हेट करण्यासाठी मी गाणं गुणगुणतो. कुणी आजूबाजूला नाही हे पाहून घरातल्या घरात नाचतोदेखील; आणि माझ्या लक्षात येतं की, माझा आवाज आणि माझा नाच हा माझ्या प्रश्नांहून अधिक भयानक आहे. थोडक्यात सांगायचं तर, मला न येणारं गाणं आणि न झेपणारा नाच हेच माझ्या सदा उत्साही असण्याचं गमक आहे.
तुला सांगतो दादू, पूर्वी तत्त्वज्ञान ही एक स्वतंत्र ज्ञानशाखा होती. पण दीडशे रुपयांत अनलिमिटेड डेटा मिळायला लागल्यापासून सोशल मीडियावरील पंडितांनी कुठेही, कुठल्याही विषयात, कसलीही मोकळी जागा दिसली की तिथे तत्त्वज्ञानाचे पेवर ब्लॉक बसविण्याचा सपाटा सुरू केला आहे. परवा, अंगाला राईच्या तेलाचा वास येणारा एकजण ट्रेनमध्ये तत्त्वज्ञान सांगत होता, ‘‘जिस व्यक्ती को ये नहीं पता की जीवन में कब कदम आगे बढमना है, कब पीछे लेना है, वो व्यक्ती कभी भी गरबा नही खेल सकता!’’ अरे दादू, मी रात्रंदिवस सोशल मीडियावर पडीक असतो, पण मला असलं काही नावीन्यपूर्ण कधी सुचतच नाही. परवा मोबाइलवर एक अतिशय सुंदर सिनेमा पाहत होतो. त्यातला एक सीन मला खूप आवडला म्हणून रिवाइंड करून पुन्हा पाहायला गेलो. त्या गडबडीत सिनेमाचा आवाज बंद झाला. तसाच बिन-आवाजाचा तो सीन पाहिला. खूप कंटाळवाणा वाटला रे! त्याक्षणी, त्या मोबाइलनामक बोधिवृक्षाखाली मला एक तत्त्वज्ञान प्राप्त झालं. तू आपला माणूस म्हणून तुला फुकटात सांगतोय, ऐक.. आपल्या आयुष्याला बॅकग्राऊंड म्युझिक नसल्यामुळे आयुष्य बोअिरग झालेलं आहे!
खरं म्हणजे, आपल्याला जे जमत आणि झेपत नाही तिथे शहाण्या माणसाने जाऊ नये. पण शहाणपणाचं आणि माझं नातं खूप दूरचं असल्याने, तसंच मी सोसायटीच्या कार्यकारी मंडळावर असल्याने सोसायटीच्या गरब्याला मला जावंच लागतं. आपण बाजूला बसून गरबा पाहत असतो. इतक्यात नाचणाऱ्यांपैकी कुणाची तरी नजर आपल्यावर जाते आणि तो बाजूला येऊन आपल्याला नाचायला येण्याचा आग्रह करू लागतो. आपण विनवत असतो, मला नाचता येत नाही. इतक्यात आणखी एक-दोघं येतात आणि आपल्याला अक्षरश: ओढून गरबा खेळायला नेऊ लागतात. मी गयावया करून सांगत असतो की बाबा रे, मला नाचता येत नाही. मी या शहरात, या वातावरणात वाढलेलो नाहीये. मी मातीतला माणूस आहे (म्हणून प्रत्येक गोष्टीत माती खातो.) पण ते काही केल्या ऐकायच्या मूडमध्ये नसतात. दादू तुला सांगतो, अख्ख्या मुंबईत मी कदाचित एकमेव माणूस असेन, जो स्वत:हून कबूल करतोय की गरबा खेळायला गेल्यावर माझं पाऊल वाकडं पडतं म्हणून! तरीही ते लोक मला गरब्याच्या रिंगणात घेतात. एकदा का रिंगणात उतरलो की कसे कुणास ठाऊक, पण आपले पाय गाण्याच्या तालावर पडू लागतात. हाताची टाळीही बरोब्बर समेवर वाजू लागते. गिरकी घ्यायलाही जमू लागतं आणि आपली गरब्यातली ही गती पाहून एरवी आपल्याकडे ढुंकूनही न पाहणाऱ्या शेजारणींच्या नजरेत आपण अचानक राणू मंडल होऊन जातो.
एकंदरीत, गरब्याच्या दिवसात, (म्हणजे रात्रीत) ‘मनसोक्त पाहणं’ हे एकमेव काम मी भक्तिभावाने करत असतो. हॉलीवूडच्या सिनेमातल्याप्रमाणे आमच्या डोळ्यांत बसवलेल्या ‘साइज, फिगर आणि वय मापक यंत्रा’ने एकेक व्यक्तीचा डेटा आमच्या डेटाबेसमध्ये जमा करत असतो. आमच्या सोसायटीत आणि आजूबाजूला देखील गरबा असतो. पण आमच्याकडे बहुसंख्य मराठी लोक असल्यामुळे आमच्या इथल्या गरब्याचा ग्लॅमर-कोशंट तसा जेमतेमच असतो. पण घरच्या सीसीटीव्हीची नजर चुकवून जरा दूरवर जायची संधी मिळाली, तर आम्ही मित्र फिरत फिरत गुजराती एरियात जातो. तिथला गरबा पाहणं हा रोमहर्षक अनुभव असतो. अगदीच मोकाट रान मिळालं तर पंजाबी, सिंधी लोकांच्या गरब्यालाही आम्ही भेट देतो. तिथला गरबा पाहणं हा तर रोमहर्षकची पुढची पायरी म्हणजे इटलीहर्षक अनुभव असतो.
हल्ली प्रत्येक सोसायटी, गल्ली, वॉर्डावॉर्डाचे गरबा-किंग आणि गरबा-क्वीन असतात. आणि तेवढय़ा पुंजीवर ही मुलं बॉलीवूडमध्ये सुपरस्टार व्हायची स्वप्नं पाहतात. सिनेमाचा दिग्दर्शक असलेला माझा एक मित्र मध्यंतरी म्हणत होता, आपल्या सोसायटीच्या गरबा डान्सचा व्हिडीओ दाखवून त्या आधारावर सिनेमात काम मागणारी पोरं भेटतात. आयला, हे म्हणजे शाळेत उंच उडीचा चॅम्पियन होतो म्हणून सक्तवसुली संचालनालयामध्ये नोकरी द्या म्हणण्यासारखं आहे.
दादू, काल आमच्या सोसायटीच्या गरबा-क्वीनने मला गरब्याचं आमंत्रण दिलं तेव्हा मी गमतीत तिला म्हणालो, ‘तू माझ्या जोडीने नाचणार असशील तर मी नक्की येईन.’ यावर ती उत्तरली, ‘गरब्याच्या वेळी पुरुषाला एकदा का फ्री हँड दिला की पुरुषाचा तो फ्री हँड आपल्या अंगाखांद्यावरून फिरल्याशिवाय राहत नाही, हे आम्हा बायकांना पक्के ठाऊक आहे.’ दादू, सांगायची गोष्ट म्हणजे इतर सणांसारख्या नवरात्रीच्या या इतक्या चांगल्या सणातदेखील आज खूप अपप्रवृत्ती शिरल्या आहेत. पण या अपप्रवृत्तींसाठी मी शक्यतो कुणाच्या सणांवर, परंपरेवर, जातींवर, धर्मावर टीका करणार नाही. कारण मला माहिती आहे, हल्ली जाती-धर्मावर, सणांवर टीका करणे म्हणजे मधमाशीच्या पोळावर दगड मारण्यासारखे किंवा रिपब्लिक चॅनेलवरील चच्रेत स्वत:हून सामील होण्यासारखं आहे. असो.
आता महाराष्ट्रात निवडणूक नावाचा एक मोठा गरबा होऊ घातलाय. तिथे कोण कुणाच्या मांडवात गिरकी घेईल सांगता येत नाही. काही लोकांनी गरबा सुरू व्हायच्या आधीपासूनच आपले इतक्या वर्षांचे भिडू बदललेत, कुणी आपलं मंडळ बदललंय, कुणी अजून बदलत आहेत. अमुक पक्ष तमुकाची ‘ब’ टीम आहे आणि तमुक नेता अमुकाच्या तालावर नाचतोय असे आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दादू, अशा वेळी तुझ्या-माझ्यासारखा सामान्य माणूस भांबावून जातो रे. जणू काही गणपतीच्या विसर्जनस्थळी एकाच वेळी डझनभर मिरवणुका आल्या की सगळ्या बेंजो, डीजे, लेझीमवर वाजवल्या जाणाऱ्या गाण्याची, तालाची भेसळ होते तशी अवस्था होते. आपल्यासारखा नवखा डान्सर नाचायच्या स्टेप्स विसरून जातो. तरीही खूप हौशी लोक भान हरपून डिस्को डान्स ते नागीण डान्स या रेंजमध्ये नाचत असतात. रस्त्याच्या कडेला उभा असलेला एखादा ऐंशीच्या घरातला गृहस्थ हातवारे करून त्या नाचणाऱ्यांना प्रोत्साहन देत असतो. न राहवून मी त्या गृहस्थाला विचारतो की, ‘तुम्ही नक्की कुठल्या गाण्यावर हातवारे करताय आणि ही नाचणारी मंडळी नक्की कोणत्या तालावर नाचतायत?’ तोंडातली तंबाखू थुंकून तो इसम उत्तरतो, ‘असं भान हरपून नाचण्यासाठी कुठलंच गाणं लागत नाही, कुठलाच ताल लागत नाही. त्यासाठी लागते नशा! मग कधी ती मद्याची असते, कधी भक्तीची, कधी पशांची, तर कधी सत्तेची!’
तुझा मित्र,
सदू धांदरफळे
sabypereira@gmail.com