मनाली रानडे
प्राजक्ता, पूजा, प्रिया आणि पूर्वा या मुली आणि पियुष, पुनित, प्रकाश आणि पंकज ही मुले एका टेबलाभोवती विशिष्ट प्रकारे बसली आहेत.
अटी :
१) ही मित्रमंडळी एका वर्तुळाकार टेबलाभोवती टेबलाच्या मध्याकडे तोंड करून सारख्या अंतरावर बसलेली आहेत.
२) कुठल्याही दोन मुली किंवा दोन मुले एकमेकांच्या शेजारी बसलेले नाहीत.
३) पुनित आणि पियुष हे दोघे एकमेकांपासून (डाव्या आणि उजव्या) दोन्ही बाजूने सारख्याच अंतरावर बसले आहेत.
४) प्रिया पियुषच्या डावीकडे तिसऱ्या खुर्चीवर, तर पूजा पियुषच्या उजवीकडे तिसऱ्या खुर्चीवर बसलेली आहे.
५) प्रकाश हा प्रिया आणि प्राजक्ताच्या मधे बसलेला आहे.
प्रश्न : पूर्वाच्या उजव्या बाजूच्या शेजारच्या खुर्चीत कोण बसले आहे?
दुसरा प्रश्न : जर पहिली अट बदलून ही मित्रमंडळी टेबलाकडे पाठ करून बसली असतील, पण पुढील सर्व अटी तशाच राहिल्या तर आता या प्रश्नाचे उत्तर काय असेल?
उत्तरे :
(१) ‘पंकज’ (२) ‘पंकज’! दोन्ही प्रश्नांचे उत्तर एकच आहे हे तुमच्या लक्षात येईल.
manaliranade84@gmail.com