मनोहर पारनेरकर – samdhun12@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

It is an honour to philosophy that Dr. Radhakrishnan should be President of India and I, as a philosopher, take special pleasure in this. Plato aspired for philosophers to become kings and It is tribute to India that she should make a philosopher her President. – Bertrand Russell

हा लेख म्हणजे डॉ. राधाकृष्णन यांना जरा उशिराच वाहिलेली श्रद्धांजली आहे. ५ सप्टेंबर हा या थोर तत्त्ववेत्त्याचा जन्मदिवस भारतात ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला जातो. गेल्या शतकात भारतात ज्या महान व्यक्ती झाल्या त्यांत राधाकृष्णन यांचे स्थान अनन्यसाधारण आहे. माझ्या दृष्टीने याची मुख्यत्वेकरून तीन कारणे आहेत. ती अशी : १) ते महान तत्त्ववेत्ते तर होतेच; शिवाय ते उच्च दर्जाचे विद्वान, शिक्षक, शिक्षण प्रशासक, राजनीतिज्ञ, लेखक आणि संसदपटू होते. आधुनिक भारताच्या इतिहासात इतक्या विविध क्षेत्रांत महत्त्वाची कामगिरी इतक्या सहजसुंदरतेने, गौरवाने, अधिकाराने व शहाणिवेने करणारी त्यांच्याइतकी दुसरी व्यक्ती चटकन् आठवत नाही. २) स्वामी विवेकानंद आणि रवींद्रनाथ टागोर यांच्याप्रमाणे त्यांनी पूर्वेचा अध्यात्मवाद आणि पश्चिमेचा विवेकवाद यांतील दरी सांधणारे पूल बांधायचे काम केले. आणि ३) सी. राजगोपालाचारी, नोबेलविजेते डॉ. सी. व्ही. रमन आणि डॉ. राधाकृष्णन हे Three ‘R’s (‘र’ या अक्षराने सुरुवात होणाऱ्या या तीन व्यक्ती) म्हणजे स्वतंत्र भारतातील अनुक्रमे राजकारण, विज्ञान आणि तत्त्वज्ञान यांची उज्ज्वल प्रतीक होती. (एक योगायोग म्हणजे या तिघांनाही १९५४ साली ‘भारतरत्न’ या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविण्यात आले होते आणि हा सन्मान याच वर्षी सुरू झाला होता. यानंतरच्या काही ‘भारतरत्न’ मिळालेल्या व्यक्तींमुळे या पुरस्काराचे अवमूल्यन झाले असले तरी या तिन्ही व्यक्ती मात्र या पुरस्कारास सर्वयोग्य असून, त्या सर्वार्थानी ‘रत्न’ होत्या.)

राधाकृष्णन यांच्या गौरवशाली जीवनातील जे पैलू मला जास्त भावले त्याबद्दल मी या लेखात लिहिणार आहे. या पैलूंशी बरेच वाचक कदाचित तितकेसे परिचित नसण्याची शक्यता आहे. सुरुवातीला अत्यंत संक्षिप्त स्वरूपात त्यांचा परिचय अशा वाचकांसाठी- ज्यांना विकिपीडियाचे वावडे आहे किंवा तो बघण्याचादेखील आळस आहे.

त्यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी तिरुत्तानी या तामिळनाडूमधील एका लहानशा गावातील तेलुगू भाषिक कुटुंबात झाला. शाळा आणि सुरुवातीचे महाविद्यालयीन शिक्षण लुथेरन मिशन हायस्कूल आणि वेल्लोरच्या वुर्हिस कॉलेजात. प्रतिष्ठित मद्रास ख्रिश्चन कॉलेजातून बी. ए. आणि एम. ए. (तत्त्वज्ञान) या पदव्या. म्हैसूर युनिव्हर्सिटी, प्रेसिडेन्सी कॉलेज- मद्रास, प्रेसिडेन्सी कॉलेज- कोलकाता, बनारस युनिव्हर्सिटी आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी इथे तत्त्वज्ञान आणि ‘तौलनिक धर्माभ्यास’ या विषयांचे अध्यापन. अनेक ग्रंथांचे लेखक. त्यांच्या ग्रंथांतील ‘Two volumes on Indian Philosophy’, ‘The Hindu View of Life’ आणि ‘An idealist View of Life’ हे तीन अत्यंत महत्त्वाचे आहेत. भारतात आणि भारताबाहेर त्यांनी भूषविलेली काही महत्त्वाची पदे : League of Nationsl committee on intellectual co-operation चे सभासद, आंध्र युनिव्हर्सिटी आणि नंतर बनारस हिंदू युनिव्हर्सिटीचे कु लगुरू, सोव्हिएत रशियामध्ये भारताचे राजदूत, १९५२-१९६२ या कालावधीत भारताचे उपराष्ट्रपती, १९६२-१९६७ या कालावधीत भारताचे राष्ट्रपती. काही महत्त्वाचे सन्मान : ब्रिटिश नाइटहूड आणि भारतरत्न. अगदी कमी वयात लग्न. पाच मुली आणि एक मुलगा असा परिवार. मृत्यू- १७ एप्रिल १९७५.

राधाकृ ष्णन जेव्हा ब्रिटनमध्ये गेले तेव्हा तेथील ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमधील मॅंचेस्टर कॉलेजमध्ये त्यांची कीर्ती अगोदरच पोहोचली होती. म्हणूनच त्यांना अतिशय प्रतिष्ठेची ‘Spalding Chair of Comparative Religion’ बहाल के ली गेली. लवकरच ते युनिव्हर्सिटीत पूर्ण प्रतिष्ठेचे प्राध्यापक झाले. शिवाय Fellow of All Souls आणि युनिव्हर्सिटीमधील अत्युच्च पद Doctor of Civil Law हेही त्यांनी भूषवले.

बटरड्र रसेल यांच्या मनात राधाकृ ष्णन यांच्याबद्दल किती आदर होता हे तुम्हाला या लेखाच्या सुरुवातीला जे अवतरण दिले आहे त्यावरून समजले असेलच. १९३२ मध्ये लंडनमध्ये राधाकृ ष्णन यांनी अत्यंत प्रतिष्ठेची अशी जी ‘हिब्बर्ट’ व्याख्याने दिली तेव्हा श्रोत्यांमध्ये दस्तुरखुद्द रसेल उपस्थित होते. व्याख्यानानंतर रसेल यांनी एक तत्त्वज्ञ दुसऱ्या तत्त्वज्ञाला सांगेल अशा भाषेत राधाकृ ष्णन यांना सांगितले की, तत्त्वज्ञानाचे इतके  सुंदर विवेचन त्यांनी याआधी कधीच ऐकले नव्हते. रसेल यांच्यासारख्या जगातल्या एका ख्यातनाम तत्त्ववेत्त्याकडून अशी पोच मिळणे हे फारच लक्षणीय होते. (माझ्या माहितीप्रमाणे, या व्याख्यानांनंतर राधाकृ ष्णन यांनी रसेल यांना भारतात (म्हैसूरला) आमंत्रित करण्याचा प्रयत्न के ला तेव्हा रसेल म्हणाले होते की, ‘He did not relish the idea of witnessing the Middle Ages in the twentieth century.’ अशा प्रकारचे भारतविरोधी विधान लॉर्ड कर्झन वा विन्स्टन चर्चिल यांच्यासारख्या भारतद्वेष्टय़ा व्यक्तीने के ले असते तर ते समजण्यासारखे होते. पण Etu Bertie!! (Bertie हे रसेल यांचे लाडके नाव.)

राधाकृ ष्णन देशभक्त होते का? आणि ते समाजवादी होते का? या प्रश्नाच्या पहिल्या भागाचे उत्तर ‘होय’ आणि दुसऱ्या भागाचे ‘नाही’ असे आहे. त्यांना जरी ‘ब्रिटिश नाइटहूड’ मिळाला होता तरीही ते अंतर्बाह्य़ देशभक्त होते. १९३० च्या दशकात त्यांचे वास्तव्य ग्रेट ब्रिटनमध्ये होते. आणि स्वातंत्र्यसंग्रामात त्यांनी जरी सक्रि य भाग घेतला नव्हता तरी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीला आपला पाठिंबा जाहीर करण्यास ते कधीच कचरले नव्हते. ते खरेखुरे उदारमतवादी होते. आणि समाजवादी नसले तरी ‘समाजवाद’ या विचारधारेबद्दल ‘He had tremendous intellectual curiosity.’ एकदा त्यांच्या एका मार्क्‍सवादी मित्राला ते म्हणाले होते, ‘‘Cut out your class war stuff and I am with you.ll And that, I think, was the closest he would have ever come to Marxism. १९४९-१९५२ या काळात राधाकृष्णन हे सोव्हिएत रशियात भारताचे राजदूत होते. तो काळ भारत-सोव्हिएत रशिया संबंधांचा सवरेत्कृष्ट काळ मानला जातो. (काश्मीर प्रश्नाच्या बाबतीत सोव्हिएत रशियाने भारताला पाठिंबा देणं हा त्याचा एक मूर्त परिणाम होता.) मॉस्कोमध्ये आपल्या पदावर रुजू झाल्यानंतर लवकरच घडलेल्या पहिल्याच भेटीत स्टालिनने राधाकृष्णन यांचं आदरपूर्वक स्वागत केलं होतं. स्टालिनबरोबर ते इतक्या सहजपणे आणि बरोबरीच्या नात्याने वागले की ज्याची सोव्हिएत हुकूमशहाने कल्पनादेखील कधी केली नसेल. जाता जाता त्यांनी स्टॅलिनला शुभेच्छा दिल्या आणि आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे त्याच्या खांद्यावर हलकेच थोपटले, ज्यामुळे तो खूपच चकित झाला. पण ही राधाकृष्णन यांची कृती जितकी स्वाभाविक होती तितकीच ती प्रामाणिकही होती. अनंत कालानंतर स्टालिनसारख्या भीतिदायक व्यक्तीला दुसऱ्या एका मानवाने माणसासारखे वागवले होते. राधाकृष्णन यांनी कुठंतरी लिहिलंय : He nearly cried. मला इथं नमूद करावंसं वाटतं की, त्यांच्याआधीच्या भारतीय राजदूत विजयालक्ष्मी पंडित यांची स्टॅलिनने उपेक्षा केली होती. त्या या सोव्हिएत नेत्याला कधीच भेटू शकल्या नव्हत्या.

एखाद्या कडक स्वभावाच्या आणि जुन्या पिढीतल्या हेडमास्तरांसारखं रूप असलेल्या (त्यांच्या विचित्र पागोटे-पगडीसारख्या headgear मुळे त्यात भर पडत असे.) या तत्त्वज्ञाची विनोदबुद्धी बरीच तिरकस- जवळजवळ ब्रिटिश- म्हणता येईल अशी होती. त्याची काही उदाहरणं : (१) १९६२ साली जेव्हा ते नुकतेच राष्ट्रपती झाले होते तेव्हा ग्रीसचे राजे भारताच्या भेटीवर आले होते. त्यांचं स्वागत करताना राधाकृष्णन म्हणाले, ‘‘आमचे निमंत्रित पाहुणे म्हणून भारतात येणारे तुम्ही पहिलेच ग्रीसचे राजे आहात. अलेक्झांडरला आम्ही आमंत्रण दिलं नव्हतं.’’ (२) त्यांनी आपल्या एका डोळ्याचं ऑपरेशन भारतातील एका प्रख्यात हॉस्पिटलमध्ये करून घेतलं होतं. पण ते काही पूर्णपणे यशस्वी झालं नव्हतं. म्हणून त्यांनी आपल्या दुसऱ्या डोळ्याचं ऑपरेशन लंडनमधील एका प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये करून घ्यायचं ठरवलं. एका मित्राने त्यांना ‘असं का करत आहात?’ म्हणून विचारलं. तेव्हा ते म्हणाले, ‘‘इकडे मला त्यांनी शुक्राचार्य बनवलं आहे. दुसऱ्या डोळ्याचं ऑपरेशन जर इथेच केलं तर मला भीती वाटते की ते माझा धृतराष्ट्र बनवतील.’’ (३) १९६२ साली जेव्हा चीनविरुद्ध आपलं युद्ध झालं तेव्हा राधाकृष्णन राष्ट्रपती होते आणि हार्वर्डचे अर्थशास्त्रज्ञ जे. के. गॅलब्रेथ हे दिल्लीत अमेरिकेचे राजदूत होते. अशा त्या संकटकाळात अतिशय अकार्यक्षम जनरल बी. के. कौल यांची नेहरूंचे निकटवर्ती म्हणून झालेली नेमणूक, त्यांचं आजारीपणाचं ढोंग आणि त्या आजारपणात आपल्या पलंगावरून त्यांनी हलवलेली युद्धाची सूत्रं या सगळ्या गोष्टींनी त्यावेळी देशात एक संतापाची लाट उठली होती. गॅलब्रेथ राष्ट्रपती भवनात राधाकृष्णन यांची भेट घ्यायला गेले असता त्यांनी विचारलं की, ‘‘जनरल कौल यांचं निधन झालं अशा तऱ्हेच्या बातम्या ऐकू येताहेत. या बातम्या कितपत खऱ्या आहेत?’’ तेव्हा ते उत्तरले, ‘‘दुर्दैवाने त्या बातम्या खऱ्या नाहीयेत.’’ काहींना त्यांची ही प्रतिक्रिया कदाचित जरा क्रूर वाटेल, मला ती तेवढीशी क्रूर वाटत नाही.

जाता जाता तीन मुद्दे : (१) राधाकृष्णन यांनी केलेलं माझं एक आवडतं अवतरण : ‘‘This world of ours is not the natural home of perfection. No man is perfect, nor can be, nor wishes to be, for perfection is dull, like paradise, a full stop to things and therefore abysmally dismal.’’ (२) आपला मित्र सोपान यानं आपलं एक निरीक्षण नोंदवलं ते असं : तो म्हणाला, ‘राधाकृष्णन आणि मोहम्मद रफी यांचा हा एकत्र फोटो यापूर्वी फार लोकांनी बघितला असेल असं वाटत नाही.’ याआधी त्याने तो पाहिला नव्हता. (हा फोटो राष्ट्रपती भवनात १९६७ साली घेतलेला आहे. ४५ वर्षांच्या रफीसाहेबांनी त्यावेळचे भारताचे ७९ वर्षीय राष्ट्रपती राधाकृष्णन यांच्याकडून ‘पद्मश्री’ स्वीकारताना घेतलेला आहे.) पण या दोन थोर व्यक्ती जेव्हा एकमेकांना भेटल्या तेव्हा त्यांच्यात काय संवाद झाला असेल याबद्दल त्याला एक प्रकारचं कुतूहल वाटतं असं तो म्हणाला. कारण राधाकृष्णन यांचं हिंदुस्थानीचं ज्ञान आणि रफीसाहेबांचं इंग्रजीचं ज्ञान हे त्यांच्यात अर्थपूर्ण संवाद शक्य होईल असं निश्चितच नव्हतं. यामुळे मी सोपानसाठी या दोन ग्रेट व्यक्तींमध्ये घडलेला एक पूर्णपणे काल्पनिक प्रसंग रचला, तो असा : राष्ट्रपती रफीसाहेबांकडे एका गाण्याची फर्माईश करतात. ती पूर्ण करण्यासाठी रफीसाहेब ‘बैजू बावरा’ या सिनेमातलं अतिशय भावपूर्ण असं ‘मन तरपत हरीदर्शन को आज..’ हे गाणं आपल्या स्पिरिच्युअल आवाजात उत्स्फूर्तपणे सादर करतात. तेव्हा मंत्रमुग्ध झालेले राष्ट्रपती स्वत:शीच पुटपुटतात.. ‘‘Hear Nietzsche, how right you were when you said that without music life would be a mistake.’’ (३) गुरुदेव रामचंद्र दत्तात्रेय रानडे (१८८६-१९५७) हे महाराष्ट्रातील एक अतिशय महान तत्त्ववेत्ते, विद्वान आणि साधुवृत्तीचे पुरुष होते. ‘A Constructive Survey of Upanishadic Philosophy’ नावाचा जबरदस्त असा एक संदर्भग्रंथ त्यांनी अभ्यासकांसाठी लिहिलेला आहे. अलाहाबाद विद्यापीठाचे उपकुलगुरू म्हणून ते निवृत्त झाले आणि नंतर महाराष्ट्रातील निम्बाळ येथे स्थायिक झाले. १९५७ साली तिथेच त्यांचे देहावसान झाले. रानडे आणि राधाकृष्णन १९२६ मध्ये कोलकात्यात एका फिलॉसॉफी कॉन्फरन्समध्ये भेटले आणि आजन्म मित्र झाले. राधाकृष्णन यांच्या मनात गुरुदेव रानडय़ांबद्दल अतीव आदराचं स्थान होतं आणि दीर्घकाळ त्यांची मैत्री होती.

शब्दांकन : आनंद थत्ते