‘‘डॉक्टरकाका, आज मी तुमच्याकडे पेशंट म्हणून आली आहे.’’ – ज्योती.
‘‘ज्योती.. अगं, आली आहे नाही, तर आले आहे असं म्हण.’ – डॉक्टर.
‘‘डॉक्टरकाका.. अहो, आम्हा मुलींची ही बोलण्याची फॅशनच आहे आजकालची. पाणी पिले, घरी आली.
‘‘डब्बा? म्हणजे?’’
‘‘जुन्या चालीरीतीचा माणूस- म्हणजे पुरुष. माझा उदय डब्बा नाही.’’
‘‘तुझा उदय? म्हणजे तळपदे वकिलांचा मुलगा?’’
‘‘हो. पण डॉक्टरकाका, मी त्याच कामाकरता आली होती.’’
ज्योती म्हणजे उत्साहाचा खळाळणारा झराच. आमच्या फ्लॅटच्या वरच्याच फ्लॅटमध्ये ती राहते. बी. ए.च्या शेवटच्या वर्षांला आहे. आई-वडील दोघंही प्राध्यापक. एवढीशी असल्यापासून ती आमच्याकडेच जास्त असायची. दोन-अडीच वर्षांची असताना तिनं विचारलं होतं, ‘‘डॉक्तलकाका, हा सूल्य कुथे जातो?’’ ..तिला घेऊन आम्ही लॉंग ड्राइव्हला निघालो असताना मावळत्या सूर्याला पाहून तिनं विचारलं. मानसशास्त्रात सांगिल्याप्रमाणे मी सत्य सांगायचं म्हणून तिला पृथ्वीचं परिभ्रमण, सूर्य स्वत:बरोबरचे ग्रह, चंद्र, धूमकेतू, लघुग्रह वगैरे सगळ्या लटांबरासह फिरत असतो, असं सांगत होतो. तर ही मागच्या सीटवर बसलेल्या तिच्या काकूंकडे वळून पाहत, डोक्याला तर्जनी लावून ती गोल गोल फिरवत म्हणाली, ‘‘डॉक्तलकाकाला, काहीच माहीत नाही. अले, सूल्य आपल्याकलून अमेलिकेत जातो. नंतल अमेलिकेतून आपल्याकले येतो. मी बॉल तुज्याकले फेकते, मग तू माज्याकले फेकतो, तसं सूल्याचा चेंदू आपन अमेलिकेत फेकतो, मग अमेलिका आपल्याकले फेकतो. कसा काय ले तू डाक्तल झ्यालाश?’’
बालमानसशास्त्राची सगळी पुस्तकं पॅसिफिक महासागरात बुडवावी असं वाटलं होतं तेव्हा.
‘‘डॉक्टरकाका, तुमचं लक्ष कुठे आहे?’’ ज्योतीच्या त्या प्रश्नानं मी भानावर आलो.
‘‘डॉक्टरकाका, तुमचं संशोधन मला माहीत आहे. डिटेल्स मला माहीत नाहीत; पण तुम्ही काय करता, ते मला माहीत आहे.’’
‘‘अस्सं! सांग बरं मी काय करतो? ’’
‘‘अहो काका, त्या हेडसेटच्या वायरींची दोन टोकं कानाच्या जवळ लावता.’’
‘‘वायर्सच्या त्या टोकांना इलेक्ट्रोड्स म्हणतात.’’
‘‘आम्ही त्यांना वायरीच म्हणतो.’’
‘‘बाटली.’’
‘‘बाटली? म्हणजे?’’
‘‘अशा मुलींना आम्ही ‘बाटली’ म्हणतो.’’
‘‘अस्सं होय! बरं, मग ती टोकं भिंतीवर असलेल्या प्लगला जोडता.’’
‘‘बरं झालं तू असा प्रयोग कुणावर केला नाहीस. आणि कधी करूही नकोस. हेडसेटची ती टोकं अत्यंत कमी दाबाच्या बॅटरीला आणि नंतर ती लॅपटॉपलाही जोडतो.’’
‘‘लॅपटॉपला?’’
‘‘हो. ईईजीमध्ये इलेक्ट्रिक करंट तुमच्या मनातील पूर्ण विचारांशी जोडला जातो. मानवी मेंदूमध्ये अब्जावधी न्यूरॉन्स असतात. त्यांना जोडल्यास १ लाख ७० हजार कि. मी. लांबीपर्यंतची साखळी तयार होऊ शकते. विचार करताना मेंदूत त्यासंबंधी अत्यंत कमी क्षमतेचे इलेक्ट्रिक सिग्नल्स तयार होतात. हे इलेक्ट्रिकल इम्पल्स न्यूरॉन्सच्या केमिकल रिअॅक्शनने तयार होतात. ते मोजता येतात. म्हणून मेंदूत निर्माण झालेल्या इलेक्ट्रिक सिग्नल्सचा अर्थ लॅपटॉपवर लावला जातो. स्मृती विभागात लहान लहान, मध्यम आकाराची मोठी सर्किट्स असतात.’’
‘‘मेंदूत सर्किट्स?’’
‘‘हो. विजेच्या तारांची नाही, मज्जातंतूंची सर्किट्स असतात. परीक्षेकरिता केलेला अभ्यास लहान लहान सर्किट्समध्ये असतो. म्हणून परीक्षा होताच तुम्ही तो विसरता.’’
‘‘अय्या ! खरं र र र च?’’
‘‘काही महत्त्वाचे प्रसंग मोठय़ा सर्किट्समध्ये आपोआप जातात.’’
‘‘डॉक्टरकाका, मोठय़ा सर्किट्समधले प्रसंग तुम्ही घालवू शकता ना? मला उदयच्या स्मृती सगळ्या घालवायच्या आहेत.’’ डबडबलेले डोळे रुमालानं पुसत ज्योती म्हणाली.
‘‘का गं? काय झालं? डोळे का भरून आले तुझे? मी आजच तळपदे वकिलांकडे जातो अन् उदयला जाब विचारतो.’’
‘‘डॉक्टरकाका, काही उपयोग नाही. आमचा ब्रेकअप् झालाय.’’
‘‘पण कारण काय?’’
‘‘काका, अलीकडे आमची खूप भांडणं होताहेत. वेगवेगळ्या कारणांनी. शेवटी एकमेकांना बाय केलं. मला सारख्या सारख्या त्याच्या आठवणी छळतात.’’
‘‘म्हणजे तुझं त्याच्यावर अजून प्रेम आहे.’’
‘‘हुडुत्! ‘तुझं थोबाड परत मला दाखवू नकोस,’ असं मी त्याला म्हटलंय. तोही तसंच म्हणाला.’’
‘‘तू एक आठवडय़ानंतर माझ्याकडे ये. मग विचार करतो- तुला त्याच्या आठवणींच्या गुंत्यातून सोडवण्याचा.’’
डॉक्टरकाका
‘‘डॉक्टरकाका, आज मी तुमच्याकडे पेशंट म्हणून आली आहे.’’ - ज्योती. ‘‘ज्योती.. अगं, आली आहे नाही, तर आले आहे असं म्हण.’ - डॉक्टर.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 21-06-2015 at 12:20 IST
मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Doctor uncle