-वैभव आबनावे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
रूढार्थाने ‘फिक्शन’ आणि ‘डॉक्युमेण्ट्री’ असे हवाबंद कप्पे आपण करत असलो तरी समोर जे चाललंय ते निर्ममपणे टिपणारा कॅमेरा कुठे त्यात भेदाभेद करतो? समोर जे येईल ते टिपणारं, साठवणारं, कैद करणारं ते एक यंत्र आहे. मग ते कल्पित असो, घटित वा त्यांचा पाठशिवणीचा खेळ… डॉक्युमेण्ट्रीला पडद्यावरच्या तालमींसारखे पाहणाऱ्या चित्रकर्त्याची गोष्ट…
‘आणि लैला ही एकच अशी संख्या आहे की जी मजनू अशीही लिहिता येते.’ अरुण कोलटकरांच्या या विलक्षण, खोलवर ‘लागलेल्या’ ओळीची संरचना उसनी घेण्याचा प्रमाद करून असं म्हणावं वाटतं, ‘डॉक्युमेण्टरी ही एकच अशी संख्या आहे की जी फिक्शन अशीही लिहिता येते.’ असं म्हणावं हे जरी आज सुचत असलं तरी असं वाटण्याची सुरुवात झाली ती कुठलाही साज चढण्याआधी अनावृत नाट्यप्रयोग जिथे आकाराला येतो त्या तालमीच्या हॉलमध्ये. तालमींदरम्यान लिखित संहितेचं बोट सोडून उत्स्फूर्त प्रसंग सादर करणाऱ्यांची शरीरं, आवाज क्षणोक्षणी ‘नट असणं’ आणि ‘पात्र होणं’ या मधल्या अंधूक सीमारेषेवर हिंदकळताना पाहून वाटायचं की, आपण तालीम नावाचं ‘घटित’ आणि तिच्या अदृश्य फटीतून अवचित दृश्यमान होणारं नाटक नावाचं ‘कल्पित’ असं एकाच वेळी बघतोय. त्यांना ना एकमेकांपासून विलग होता येतंय ना एकमेकांत विलीन. पुढे प्रयोग सुरू झाल्यावर कल्पिताच्या भगभगीत प्रकाशात घटित बिचारं झाकोळून जायचं. ते थेट पडदा पडताना टाळ्यांच्या गजरातच डोकं वर काढायचं. तसा करारच होता. तिसऱ्या घंटेनंतर कल्पिताची एन्ट्री, घटिताची एक्झिट. प्रयोग सुरू असता कल्पिताची जागा मंचावर, घटिताची विंगेत. क्वचितच प्रयोगादरम्यान कल्पिताच्या फुग्याला ब्रेश्तियन ( Brechtian) वा आळेकरी टाचणी लागायची आणि त्याची घटिताशी अनपेक्षित गाठ पडायची. एरवी प्रयोगात खंड वा नटसंच बदलल्यानं पुन्हा तालमी कराव्या लागल्या तरच ही शक्यता, अन्यथा नव्या नाटकाच्या तालमी सुरू होतील तेव्हाच. त्यामुळे सतत नवीन नाटक करावं असं वाटायचं किंवा मग फक्त तालमी कराव्यात- ज्यांचा प्रयोगच होणार नाही… किंवा गोष्टीतल्या राक्षसासारखं तालमींच्या जादूई काळाला एखाद्या बाटलीत कैद करावं. कुठे मिळणार अशी बाटली?
आणखी वाचा-आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : आस्था आणि कुतूहलासाठी…
कॉलेजातली नाटकं सुरू व्हायच्या आधी ‘फिक्शन’ सिनेमाचं शूटिंग अनुभवलेलं. त्या नशेत मित्रांसोबत लुटुपुटुचं शूटिंगही करून पाहिलेलं. तिथेही रंगमंचासारखाच करार. ‘अॅक्शन’ म्हटल्यावर कॅमेऱ्यासमोरून झटक्यात घटिताची एक्झिट, कल्पिताची एन्ट्री. नाहीतर कट किंवा रिटेक. पुन्हा नाटकासारख्या दीर्घकाळ चालणाऱ्या तालमी इथं नाहीत. त्यातच एका मित्रानं पुण्यातल्या गणेशोत्सवावर ‘डॉक्युमेण्ट्री’ केली- ज्यात अगदी उलटा प्रकार. कॅमेऱ्यासमोर फक्त घटिताला जागा, कल्पिताला सक्तीची रजा. एकुणात ‘फिक्शन’ आणि ‘डॉक्युमेण्ट्री’ यांतल्या फाळणीमुळे आजूबाजूला सिनेमा म्हणून जे बनतंय त्यात घटित आणि कल्पिताची गाठ पडण्याची सुतराम शक्यता दिसत नव्हती. पण त्याच वेळी एक गोष्ट मात्र जाणवली की रूढार्थाने ‘फिक्शन’ आणि ‘डॉक्युमेण्ट्री’ असे हवाबंद कप्पे आपण करत असलो तरी समोर जे चाललंय ते निर्ममपणे टिपणारा कॅमेरा थोडीच त्यात भेदाभेद करतोय? त्याचा डोळा थोडीच आपल्या डोळ्यांसारखा हा मंच, ही विंग, हा प्रयोग, ही तालीम असं विभाजन करतोय? समोर जे येईल ते टिपणारं, साठवणारं, कैद करणारं ते एक यंत्र आहे. मग ते कल्पित असो, घटित वा त्यांचा पाठशिवणीचा खेळ. युरेका! तालमींच्या जादूई काळाला कैद करू शकणारी बाटली गवसली! पावलं आपसूक तालमीच्या हॉलकडे वळली, पण नाटकासाठी नसून फिल्मसाठी.
झालं असं की एचआयव्ही बाधा झाल्याची वाच्यता ( disclosure) करताना नेमकं कशाचं भान बाळगावं, काय टाळावं याविषयी संबंधितांचे अनुबोधन करण्यासाठी पुण्यातील ‘प्रयास’ संस्थेच्या आरोग्य विभागाला दृक्-श्राव्य सामग्रीची आवश्यकता होती. सभोवताली नानाविध शारीरिक-मानसिक व्याधींवर ‘फिक्शन’ चित्रपट बनवून त्याद्वारे लोकशिक्षण करण्याची चलती होती. या धोपटमार्गाला न लागता सिनेमाचा खेळ नाटकाच्या तालमीसारखा खेळावा अशी कल्पना सुचली. एचआयव्हीबाधितांच्या आयुष्यातील वाच्यतेच्या नाजूक प्रसंगांना, जे रोजच्या जगण्यात परत जगण्याची मुभा नसते अशा प्रसंगांना नटमंडळी तालमीच्या सुरक्षित अवकाशात परत जगून बघतील. चुकलं- माकलं, पुढची वाट सापडेनाशी झाली तर परत पहिल्यापासून सुरू करून विषयतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली नव्याने गुंता सोडवायचा प्रयत्न करतील. ठोस उत्तरं देण्याऐवजी समूहानं प्रश्न समजून घेण्याची, वाट शोधण्याची कॅमेऱ्यानं टिपलेली (कैद केलेली!) तालीम म्हणजेच आमची फिल्म असेल- ज्यात आपसूकच नट-पात्र, घटित-कल्पित, डॉक्युमेण्ट्री-फिक्शन यांतील सीमारेषा पुसट होतील, अशा आशयाची रूपरेषा लिहून काढली. आलेल्या प्रस्तावांमधून तिची निवड झाली. अनुभवी आणि ताज्या दमाच्या नटांचं मिश्रण असलेल्या संचासोबत कार्यशाळा सुरू झाली, ज्यातच संहितेचा आराखडा बनला. आता चित्रीकरण म्हणजे नेमकं काय घडणारे हे कळायच्या आतच छोटे-मोठे कॅमेरे नटांच्या अवतीभवती अलगदपणे वावरत त्यांच्या उत्स्फूर्त तालमी टिपू लागले. कॅमेऱ्याच्या नजरेत नट-पात्र, जगणं-नाटक यांचा चकवा देणारा गुंता कैद होऊ लागला. सहजतेने घटित आणि कल्पितातल्या सीमारेषा धूसर होत गेल्या. फिल्म बनवणाऱ्या चमूला आणि फिल्मलाही आपलं नाव गवसलं… ‘फॅक्ट अॅण्ड फिक्शन फिल्म्स’ निर्मित ‘धूसर’. एक मध्यम लांबीची डॉक्युमेण्ट्री- जिला ‘फिक्शन’ असंही म्हणता येईल किंवा कॅमेऱ्यानं कैद केलेली तालीम जिचा प्रयोग थेट पडद्यावर दिसतो.
आणखी वाचा-आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : आकाशपाळण्यातील धाडस..
‘धूसर’नंतर विख्यात नाटककार महेश एलकुंचवारांच्या लिखाणाचा, त्यामागील प्रेरणांचा, त्यावरील संस्कारांचा, त्यांच्या साहित्यविचाराचा, एकंदर जीवनदृष्टीचाच नटांसोबत, कॅमेऱ्याच्या साक्षीनं शोध घेण्याची कल्पना मनात मूळ धरत होती. साहजिकच ही सर्वसाधारणपणे लेखकांवर बनवतात तशी मुलाखतप्रधान ‘डॉक्युमेण्ट्री’ वा त्यांचा जीवनप्रवास आरेखणारा ‘फिक्शन’ चरित्रपट असं दोन्ही नसणार हे स्पष्टच होतं. पण तिचा नेमका रूपबंध दिसत नव्हता. ‘धूसर’ मधला उत्स्फूर्त तालमींचा रूपबंध या तरल, काव्यात्म, तत्त्वचिंतनात्मक आशयाला कवेत घ्यायला पुरा पडेल याची खात्री वाटत नव्हती. पण मनातून तालिमीतला घटित-कल्पिताचा पाठशिवणीचा खेळ जात नव्हता. मात्र या खेळासाठी नटांना लिखित संहितेची भक्कम भूमी लागणार असंही वाटत होतं. दीडेक वर्षं एलकुंचवारांचं समग्र साहित्य, त्याची समीक्षा, त्यावर संस्कार करणारं अभिजात विश्व-साहित्य असा मोठा वाङ्मय-परीघ पिंजून काढला. कलाकारांचं जीवन आणि त्यांची कला यांचे आंतरिक नाते धुंडाळणारे देशोदेशीचे चित्रपट पाहिले. तरीही रूपबंध हाती लागेना. कळेनासं झालेलं की हा केवळ रुपबंधासाठीचा अट्टहास आहे, की त्याचं आशयाशी निकडीचं नातं आहे? एलकुंचवारांच्या साहित्यातील आशयसूत्रांची मनात दिवसरात्र घुसळण सुरू होती. एके रात्री अर्ध-जागृत अवस्थेत एक कल्पना लख्ख चमकून गेली. एलकुंचवारांच्या नाट्यसृष्टीतील पात्रांची प्रभावळ, नातेसंबंधांची घट्ट वीण, प्रवाही संवाद या सगळ्याच्या गाभ्याशी एक अखंड, दुखरं स्वगत आहे- मौनाचं रूप धारण केलेलं. ‘तुका म्हणे होय मनासी संवाद। आपुलाची वाद आपणासी.’ एलकुंचवारांचं लिखाण ही जणू या ठसठसत्या स्व-संवादाची, आत्ममग्नतेचा डोह पार करत, स्व-च्या कक्षा विस्तारत निळ्या व्योमाकडे झेपाणवण्याची निरंतर चाललेली तालीमच आहे. शीतलतेच्या ओढीनं ‘स्व’ सोलवटण्याची तालीम. जिच्या धगीत जगणं-साहित्य, व्यक्तिगत-वैश्विक, लौकिक-अलौकिक यातील सीमारेषा वितळून जातात. लख्ख चमकून गेलेला सोलीव आशय स्वत:चा रूपबंध घेऊन आला. प्रतिसादाची वाट बघत एकेकट्या नटांनी केलेल्या तालमी. प्रतिसादाविना संवादांची स्वगतं होतात. जेमतेम साताठ वर्षं वय असलेल्या लहानग्याच्या मूक साक्षीने आळवलेल्या चार स्वगतांमधून एलकुंचवारांचा आंतरिक प्रवास उलगडतो.
स्वगतांच्या संहितेत अनुभवी नटांनी प्राण फुंकले. लहानग्याच्या असण्यानंच मौनाला दृश्यरूप आलं. रंगमंचीय नेपथ्यानं स्टुडिओच्या निर्वात पोकळीत विस्कटत जाणारं आतलं जग उभं राहिलं. पोकळीत थिजलेल्या अवकाशाला कॅमेऱ्यानं काळ, लय, घनता बहाल केली. संकलनादरम्यान संहितेतील एकरेषीय काळ-अवकाशाची पुनर्रचना होत स्वगतं संवादाच्या उंबरठ्यावर घुटमळू लागली. अनवट सुरावटींनी आणि आभासी ध्वनी-संरचनेने चित्रचौकटींपल्याडच्या अथांग अ-दृश्याला अस्तित्व दिलं. लिखित शब्दांचा संदर्भ जागवत पांढऱ्याशुभ्र पडद्यावर काळ्याभोर शाईच्या गर्तेत फिल्मचं नाव उमटलं- मौनराग. ‘मोनोलॉग’ हे मौनरागचं भाषांतर नव्हे, तर ज्या दोन बिंदूंमध्ये फिल्म हेलकावते त्या बिंदूंची ही नावं. मौनाच्या शोधात अव्याहत चालणारा मोनोलॉग. आणखीही दोन बिंदूंमध्ये फिल्मचा संचार होत राहतो… व्यक्तीच्या आयुष्यातील ठसठसणारं तथ्य (फॅक्ट) आणि लेखकाच्या तालमीत पुनर्घटित होणारं कलात्मक सत्य (ट्रूथ). तथ्याकडून सत्याकडच्या प्रवासात फिक्शनला पर्याय नाही. विख्यात सायकोअनॅलिस्ट जाक लाकां म्हणतो, ‘ट्रुथ हॅज द स्ट्रुर ऑफ फिक्शन.’ मात्र फिल्ममधे तथ्याकडून सत्याकडे असा एकरेषीय प्रवास नसून ती या दोघांत लंबकासारखी फिरत राहते. सत्याची आस धरताना तथ्याची कास सोडत नाही. इथं तथ्य सत्यापासून ना विलग होतं ना सत्यात विलीन होतं. दोन्हींतला ताण कथनाला तोलून धरतो. एखाद्या आवर्तनासारखं कथन तथ्याच्या समेवर येत राहतं. त्यामुळे रचनेचा बाज फिक्शनच्या अंगाने कलला तरी डॉक्युमेण्ट्रीपण सुटत नाही. उलट ‘धूसर’ डॉक्युमेण्ट्रीच्या अंगाने जात तरी फिक्शनला स्पर्श करत राहते.
आणखी वाचा-आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : अद्यायावतीकरणाचा उद्योग…
‘मौनराग’नंतर काही वर्षांनी पुन्हा डॉक्युमेण्ट्रीच्या अंगानं फिक्शनला स्पर्श करण्याचा योग आला. सुरुवात झाली ती विख्यात जर्मन लेखक फ्रान्झ काफ्काच्या ‘अकादमीसमोर अहवाल’ या निवेदनरूपी कथेवर आधारित एकपात्री प्रयोग तीन भाषांत (जर्मन, मराठी, इंग्रजी) सादर करणाऱ्या तीन नटांपासून… वाटलं, निवेदनाच्या तीन भाषा आणि निवेदकांची तीन शरीरं यांच्या ‘मधे’ विखुरलेल्या या अहवालाची गोधडी सिनेमाच शिवू शकेल. माकड (एप) अस्तित्वापासून आपण सुटका कशी करून घेतली, आपली ‘प्रगती’ कशी झाली याचा अहवाल सादर करणारा काफ्काचा निवेदक रेड पीटरही माकड असण्याच्या आणि माणूस होण्याच्या कुठेतरी ‘मधे’च आहे. माकड-माणूस, असणं-होणं, डॉक्युमेण्ट्री-फिक्शन यांच्या मधल्या फटीत फिल्म दिसू लागली. कॅमेरे अलगदपणे कधी तालमीच्या हॉलमध्ये तर कधी मंचावर रेड पीटरच्या मधलेपणाचे तीन भाषांत लावलेले तीन निराळे अर्थ न्याहाळू लागले. तीन भाषांची कधी एकमेकींत, कधी अमूर्त चित्रभाषेत तर कधी केवळ उच्चारित ध्वनींमध्ये भाषांतरं होऊ लागली. संकलनादरम्यान माकडा-माणसातल्या मधलेपणाची कसरत, तालीम आणि प्रयोग यामधल्या निसरड्या अवकाशात लीलया झुलू लागली. एरवी प्रयोगाच्या झगमगाटात झाकोळणारा घटित-कल्पिताचा लपंडाव दृश्यमान होऊ लागला. गोधडी विणताविणता नाटक-सिनेमा यांच्या पाठशिवणीच्या खेळाचं एक महत्त्वाचं सूत्र उमजलं… सिनेमा म्हणजे नाटकाच्या प्रत्यक्ष नसण्याचं पडद्यावरचं असणं. नाटकाच्या नसण्याचं असणं प्रत्यक्ष अनुभवायचं असेल तर सिनेमा नावाच्या गुहेत शिरून प्रकाश-सावल्यांच्या खेळात रमावं लागेल. या नसण्या-असण्याच्या मधलेपणाचा अहवाल म्हणजे ही फिल्म- ‘आय अॅम ओन्ली मेकिंग ए रिपोर्ट’. फिल्मचं शीर्षक म्हणजे काफ्काच्या निवेदनाच्या शेवटाचा प्रतिध्वनी. निरोप घेताना झुकून काफ्काचा निवेदक म्हणतो, ‘मी फक्त अहवाल सादर केला’. तर मीही फक्त अहवाल सादर केला, पडद्यावरच्या तालमींचा.
लेखक फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटयूट ऑफ इंडिया, पुणे येथे चित्रपट दिग्दर्शन आणि पटकथालेखन विभागात सहयोगी प्राध्यापक आहेत. ‘धूसर’ आणि ‘मौनराग’ या माहितीपटांचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये प्रदर्शन. ‘आय अॅम ओन्ली मेकिंग ए रिपोर्ट’ची केरळमध्ये ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या लघुपट महोत्सवातील स्पर्धा विभागात निवड.
vaibhavabnave@gmail.com