-विवेक वाघ

संवाद १ (स्थळ माहीत नाही. काळ आत्ताचा)
पहिला : काय चाललंय नवीन.
दुसरा : नवीन सिनेमाची तयारी.
पहिला : अरे वा! कधी प्रदर्शित?
दुसरा : नाही नाही शूटिंग सुरू होईल.
पहिला : मस्त मस्त. ‘ऑल द बेस्ट’. लक्ष असू द्या.
(दुसरा अभिमानाने कसानुसा होतो)
सवांद २ (स्थळ : एक चित्रपटगृह. काळ मध्यंतर.)
पहिला : काय चाललंय नवीन?
दुसरा : एक डॉक्युमेण्ट्री करतोय.
(भयाण नाही, पण शांतता)
मध्यंतर संपला.

Paaru
Video : अनुष्का आदित्यच्या घरातील व्यक्तीचा अपघात घडवून आणणार? पारूला सत्य समजणार का? पाहा प्रोमो
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Puneri pati shopkeeper display puneri pati on borrow photo viral on social media funny puneri pati
PHOTO: पुणेकरांचा विषयच हार्ड! उधारी रोखण्यासाठी जुगाड; दुकानात लावली अशी पाटी, लोकं स्वप्नातही मागणार नाही उधार 
Nitin Gadkari on Omraje Nimbalkar
Maharashtra News Highlights : “ताजमहल लवकर बांधून झाला पण..”, ठाकरेंच्या खासदाराचा संसदेत मराठीत प्रश्न, नितीन गडकरींनी दिले ‘असे’ उत्तर
Nikki Giovanni
व्यक्तिवेध : निक्की जियोव्हानी
artificial intelligence
कुतूहल : चुकांची जबाबदारी निश्चित करण्याचे आव्हान!
Loksatta Online organizes Fact Checking workshop Mumbai news
‘फेक न्यूज’ हा साऱ्या विश्वाचाच प्रश्न! लोकसत्ता ‘फॅक्ट चेक’ कार्यशाळेतील तज्ज्ञांचा सूर
Shocking video Bat Spotted Eating Chikoo In Pune Market; Video Raises Health Concerns
पुणेकरांनो तुम्हीही बाजारातून फळं घेताय का? थांबा! ‘हा’ प्रकार पाहून पायाखालची जमीन सरकेल; VIDEO एकदा पाहाच

माहितीपट, डॉक्युमेण्ट्रीची तयारी करताना बऱ्याच वेळेला अशा शांततेला सामोरं जावं लागतं. कदाचित डॉक्युमेण्ट्री या माध्यमातील व्यावसायिक जोखीम. त्यामुळे एखाद्या विषयाचा ध्यास घ्यायला न मिळणारं निमित्त, ऊर्जा आणि सर्वात महत्त्वाचे माहितीपट या माध्यमाला (आत्ता) नसणारे तथाकथित वलय कारणीभूत असावे. कदाचित त्यामुळेच माहितीपट निर्मिती हा प्रकार अभ्यास याच मुद्दयासाठी मर्यादित वाटू लागतो. पर्यायाने आशय, विषय, तंत्र, मांडणी, चित्रीकरणाच्या पद्धती या सर्व विभागांना आर्थिक ग्रहण गृहीत धरून माहितीपटाचे काम करावे लागते. अपवाद ‘असाईनमेंट’ म्हणून करता येणारे काम वेगळे. एका बाजूने चित्रपट विश्वाची स्वप्ने पाहताना डॉक्युमेण्ट्री हा हौशी किंवा प्रशिक्षणातील एक भाग वाटत असावा. आणि दुसरीकडे माहीत नसलेल्या विषयाची माहिती आवर्जून करून घ्यावी याबाबत प्रेक्षकांचा प्रतिसादही काही उत्साह वाढवणारा नसतोच. राहता राहता स्पर्धा हेच काय ते कौतुकाचे आणि प्रेक्षक मिळवण्याचे व्यासपीठ होऊन जाते.

आणखी वाचा-आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : निसर्ग टिपताना..

संवाद (स्थळ. चित्रपटगृहामधील पायऱ्या. वेळ चित्रपट संपल्यानंतरची.)
दुसरा : किती वेळेची आहे डॉक्युमेण्ट्री.
पहिला : ठरवलं नाही. बघू कशी माहिती मिळते ते.
दुसरा : (असमाधानाने) काय बजेट?
पहिला : अंदाज येईना. विषयाचा आवाका मोठा आहे ना?
(दुसरा त्याच्या मोबाइलमध्ये.. परिणाम- पुन्हा शांतता)

अमुक एक विषयाची डॉक्युमेण्ट्रीच करायची या विचाराने काम करणारे व्यावसायिक अभावानेच असतात. तसाच मीपण. चित्रपटाच्या प्रवासात वेबसीरिज या माध्यमाची तोंडओळख झाली. मोठी कथा ८ ते १० भागांत मांडता येते आणि त्यातील उत्सुकता, मनोरंजन याला कुठेही धक्का न लागता प्रेक्षक त्यामध्ये गुंतून जातात. अशीच वेबसीरिज पाहाताना ‘कभी कभी लगता अपुनही भगवान है’ ही एक दणकेबाज ओळ ऐकली – पाहिली आणि लक्षात आलं, ही ओळ अशीच जगणाऱ्या आणि पुणे शहराला हादरून सोडणाऱ्या पात्राची आहे. त्या उत्सुकेतून ‘जक्कल’ जोशी अभ्यंकर हत्याकांड या विषयाची ४५ वर्षांनी नव्याने माहिती करून घ्यायला सुरुवात केली. डॉक्युमेण्ट्री म्हणून नाही, तर वेबसीरिज प्रकार कळला त्यासाठी.

या विषयातील अपुरी माहिती, अफवा, समज-गैरसमज या सगळयांमधून योग्य काय याचा पाठपुरावा घ्यायला सुरुवात झाली. जुनी वृत्तपत्रे, वाचनालये आणि सगळयात महत्त्वाची म्हणजे त्या काळातील माणसे यांचा शोध आणि वाचन असा प्रवास सुरू झाला. मग एक वर्ष त्यातच कसे गेले ते कळले नाही. पण आपण योग्य माहिती मिळवतोय, आपल्याला त्यासाठी उत्तम सहकार्य करणारी माणसे भेटत आहेत.. या सगळयांमुळे त्या विषयातील स्वत:ची अभ्यासऊर्जा वाढत गेली. खूप महत्त्वाचे असे आपल्याला हे लोक सांगत आहेत, हे रेकॉर्ड करून ठेवले पाहिजे (साहजिकच वेबसीरिजच्या पटकथेकरिता) असे ठरले. मग मुलाखती आणि अर्थकारण यांत पुन्हा वर्ष गेले. या टप्प्यावर मात्र सगळयाचे नक्की काय करावे, कसे करावे हे प्रश्नचिन्ह मोठे होत गेले.

संवाद (स्थळ : एक मिसळची टपरी. वेळ दुपार.)
दुसरा : (पुन्हा एकदा) काय चाललंय?
पहिला : डॉक्युमेण्ट्री.
दुसरा : अजून चालू आहे? दोन-तीन वर्ष झाली ना?
पाहिला : (शांत)
दुसरा : बरं बरं. एवढे काय त्या विषयात? सगळयांना माहिती आहे.
पहिला : (शांत आणि अनुत्तरित)
दुसरा : बाकी कलाकार कोण आहेत?
पहिला : नाही कलाकार नाहीत. मुलाखती आहेत.
दुसरा : नुसत्या मुलाखती? (कल्पनाशक्तीला खूप ताण देऊनही यावर प्रश्न, शंका म्हणून तरी काय विचारावे कळेना. परिणाम- तो त्याचा मोबाइल आणि पुन्हा तशीच शांतता.)

आणखी वाचा-आठवणींचा सराफा : ‘अर्धसत्य’ गेम

‘वास्तववादी गोष्टींचे कलात्मक चित्रण’ हे डोक्यात ठेवून संकलन सुरू झाले. सात तासांच्या मुलाखती ऐकून प्रश्नचिन्ह अजून मोठे झाले. घटना सविस्तर आहे, पण एवढा पसारा एडिट कुठून कसा करायचा? कारण आपल्याकडे स्क्रिप्ट नाही, सुरुवात- मध्य- शेवट असे काही नाही. वास्तवाचे भान सुटणार नाही, रंजकतेच्या आहारी जाऊन मुलाखतीमधला सत्याचा भाव पण जाणार नाही. या महत्त्वाच्या गोष्टी मनात ठेवून डॉक्युमेण्ट्रीची संहिता संकलनात सुरू तयार करणे सुरू झाले. एका बाजूला संहिता आकार घेऊ लागली आणि त्याचा योग्य परिणाम येण्यासाठी नव्याने शूटिंग सुरू झाले.

या सगळया संकलन प्रवासात नव्याने ऊर्जा सगळयांमध्ये आली. कदाचित हा प्रवास एखाद्या चित्रपट निर्मितीसारखाच अनुभव देतो, हे जाणवले. ‘स्क्रिप्ट करा’, ‘शॉट्स असेच घ्या’, ‘पार्श्वसंगीत’, ‘ध्वनी आरेखन’ सगळे सुरू झाले आणि.. पाहिला एडिट कट १३० मिनिटांचा, पण शेवट येईना. दुसरा कट ९८ मिनिटांचा.. शेवट मिळाला.. पण पसरट डॉक्युमेण्ट्री. तिसरा कट ७२ मिनिटांचा. सर्व प्रश्नचिन्हे संपली. बघता बघता तीन वर्षे गेली.

प्रदर्शनपूर्व प्रयोगांना भरभरून प्रतिसाद मिळाला. ‘७२ मिनिटांमध्ये विषयाची पूर्ण माहिती परिणामांसकट पडद्यावर येते.’ ‘७२ मिनिटे अजिबात बोअर होत नाहीत. अजून १० मिनिटे चालली असती.’, ‘एकदा ही डॉक्युमेण्ट्री पाहिली की या विषयातील कसलीही शंका उरत नाही..’ भरभरून येणाऱ्या प्रतिसादाने समाधानही मिळाले. प्रसारमाध्यमांनी दखल घेतली. व्यावसायिक संस्थानी पर्याप्त दखल घेतली आणि डॉक्युमेण्ट्री माध्यमाची ताकद अनुभवायला मिळाली. गेलेली तीन वर्षे योग्य वाटू लागली. कदाचित जक्कल विषयाची आणि डॉक्युमेण्ट्री माध्यमाची ती गरजच होती.

संवाद (स्थळ : ऑफिस. वेळ सकाळी १०)
पहिला : नमस्कार. या या इकडे कुठे अचानक?
दुसरा : (आनंदाने) अरे अभिनंदन. डायरेक्ट ‘जक्कल’ला नॅशनल अवॉर्ड? एक नंबर.
पहिला : धन्यवाद.
दुसरा : मस्त मस्त तीन-चार वर्षे गेली ना?
पहिला : हो ना.
दुसरा : नाही नाही. अरे, चांगले काम करायचे म्हणजे डेडिकेशन लागतेच.
पहिला : (अचंबित )
दुसरा : नवीन काय? आता सिनेमा?
(शांतता)

चित्रपट माध्यमात वेगळे वेगळे दिग्दर्शक, लेखक, निर्माते यांच्याबरोबर काम करण्याची व्यावसायिक संधी मिळाली. त्यामुळे ते माध्यम जवळून अनुभवता आले. कार्यकारी निर्माता, निर्माता, दिग्दर्शक म्हणून काम करताना कथा, पटकथा निर्मिती, दिग्दर्शन संकलन सगळया प्रकारची कामे जवळून अनुभवली होती. त्यावेळेस माहितीपट हे माध्यम म्हणजे हौशी कलाकारांचे काम असणे, तसेच शक्यतो ३० मिनिटांवर नसावा, (मोठी असेल, तर कोणी पाहत नाही) तांत्रिक गोष्टी दुर्लक्षित झाल्या तरी चालतात. प्रेक्षक घेतात समजून, असे अनेक गैरसमज होते.

आणखी वाचा-आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: बौद्धिक कसरत..

सामाजिक विषय असो, कोणा व्यक्तीबद्दल असो किंवा सत्य घटनेवर असो, माहितीपट करताना त्याविषयांतील तज्ज्ञ लोकांकडून तो विषय समजून घेणे, त्याबद्दल अधिक वाचन करणे, त्या त्या जागांवर जाऊन निरीक्षण, पाहणी करणे हे तर प्राथमिक गरजेचेच आहे; पण त्याचबरोबर स्वत:ला प्रश्न पडणे आणि त्या विषयाची आपली उत्सुकता न संपणे हेही महत्त्वाचे आहे. मेकर्सना पडणारे प्रश्न महत्त्वाचे आणि प्रेक्षकांना पडणारे नाहीत, असे नसते बहुतेक वेळा. चित्रकर्त्यांना पडणारे प्रश्न आणि प्रेक्षकांना पडणारे प्रश्न यांत फार फरक असत नाही. हे पडणारे प्रश्न आणि असणारी उत्सुकता पुढे माहितीपट तयार करताना महत्त्वाचे ठरतात. वेळेचे बंधन हेसुद्धा आशय, विषयावरच अवलंबून ठेवावे लागते. वेळेचे, आर्थिक बाबींचे भान असायला हवे, पण अमुक वेळेचा माहितीपट अमुक पैशांत असे स्वत:साठीही सोपे करून घेऊ नये. चित्रपटाची कथा जशी त्याचा काळ, वेळ यांची जातकुळी घेऊनच येते. तसा डॉक्युमेण्ट्रीचा विषय, त्याची वेळ, त्याचे प्रश्न घेऊन येतो.

सवांद (स्थळ : डिनर टेबल. वेळ : रात्र.)
पहिला : केव्हापासून ठरवतोय तुझ्याशी गप्पा मारायला भेटायचं आणि पार्टीपण पेंडिग होती माझ्याकडून.
दुसरा : (मेनुकार्ड वाचन)
पहिला : (पुन्हा तेच)
दुसरा : डॉक्युमेण्ट्री.
(आता शांतता नाही. ऑर्डर देऊन ताबडतोब)
पहिला : अरे वा वा. कशावर करतोय?
दुसरा : कोकणातल्या कातळशिल्पावर.
पहिला : अरे हा हा. ऐकलेय कातळावर चित्रे काढली आहेत ना? फार जुनी आहेत म्हणे. थोडे थोडे ऐकलेय. मस्त मस्त. काही मदत लागली तर सांग. आपल्या कोकणात भरपूर ओळखी आहेत.
पहिला : नक्की नक्की
(पुढे ..)

खरे तर चित्रकला हा माझा प्रांत नाही. आणि भूगोल तर.. असो. अतिशय जुजबी माहिती आणि भरपूर उत्सुकता घेऊन कोकणात गेलो. आवडते का बघू, नाहीतर कोकण ट्रिप झाली म्हणायची, असा विचार करून कोकणात पोहोचलो. कातळशिल्पाबद्दल तशी ही जुजबी माहिती असल्याने प्रश्न आपोआपच पडत गेले. बरेच अज्ञानातून असतील, पण प्रश्न होते. भाई रिसबुड, ऋत्विज आपटे, धनंजय मराठे अशी मस्त माणसे संपर्कात आली- ज्यांनी कातळशिल्पे शोधली. त्यांचा ध्यास, कोकणाबद्दलची ओढ, त्यांच्याकडून मिळालेली माहिती, ज्ञान, गप्पा या सगळयातून एक वाटले ‘कलियुगातील माणसांनी अष्मयुगातील माणसाचा घेतलेला शोध’ आणि या विषयावर माहितीपटच करायचा, हे निश्चित करून कोकणातून पुण्याकडे प्रवास सुरू केला.

आणखी वाचा-शिकवताना शिकण्याचा प्रवास..

आधीच्या महितीपटाचा अनुभव आणि कातळशिल्प विषयांवर माहितीपट करण्याच्या विचाराने झालेले काम यांतूनच ‘स्टोन अँड एज’ हा माहितीपट पूर्ण झाला. पुन्हा एकदा त्याचा कालावधी १३० मिनिटांवरून ८० मिनिटांवर येऊन थांबला.

सवांद : फोनवरून
पहिला : नमस्कार.
दुसरा : बोला मान्यवर.
पहिला : अहो कसले मान्यवर. अरे एकदा फस्र्ट कट पाहायचा आहे ‘स्टोन एज’चा.
दुसरा : हो हो. नक्की पाहू या.
पहिला : एक-दीड वर्ष झाले ना?
दुसरा : हो हो.
पहिला : मी तुला सांगू यावेळी ‘विकेण्ड डॉक्युमेण्ट्री शो’ लाव. येतील लोक पाहायला.
दुसरा : (विचारात आणि आनंदात.)

‘काय नवीन?’ ‘चालू आहे डॉक्युमेण्ट्री’ या उत्तरानंतरच्या शांततेपासून ते ‘डॉक्युमेण्ट्रीचे ‘विकेण्ड शो’ लाव. हा अतिशय सकारात्मक बदल काही वर्षांत होत चाललाय. महत्त्वाच्या ज्ञात, अज्ञात गोष्टींचं दस्तावेजीकरण करू शकणाऱ्या या माध्यमाकडे बघण्याची नजर बदलत आहे. जशी ओटीटी (नेटफ्लिक्स, अॅ्मेझॉन आणि इतर) वर डॉक्युमेण्ट्रीसाठी वेगळी व्यावसायिक खिडकी उपलब्ध आहे, तसेच मराठी चित्रपटाच्या व्यावसायिक स्पर्धामधून ‘बेस्ट डॉक्युमेण्ट्री’ हा विभाग सुरू करण्याचा विचार व्हायला हवा हे निश्चित आहे. संशोधन ते नियंत्रण हा एखाद्या महितीपटाचा प्रवास नक्कीच फिल्ममेकर्सच्या आनंदाच्या पुढे घेऊन जाणारा आहे. जसे लोककलावाले, जसे नाटकवाले, तसे सिनेमावाले आणि आता डॉक्युमेण्ट्रीवाले.. म्हणजे डॉक्युमेण्ट्री बनवणारे आणि पाहणारे प्रेक्षक हाही गट दखल घ्यावी असा प्रस्थापित होऊ लागलाय.

संवाद 🙁 स्थळ, काळ, वेळ, महत्त्वाचं नाही)
पहिला : सध्या फ्री आहेस का ?
दुसरा : म्हटले तर हो. का बरे?
पहिला : दोन विषय आहेत. ऐकले ना तर वेडा होशील. आणि आपल्याकडे रिसोर्स आहे. तू चार दिवस काढ. आपण जाऊन येऊ. तू पण म्हणशील यावर डॉक्युमेण्ट्री केलीच पाहिजे. लोकांपर्यंत हे पोचले पाहिजे.. शांतता संपली आणि चर्चा, विचार, गप्पा, सुरूच राहिल्या. अजून एक डॉक्युमेण्ट्रीवाला भेटला. त्याचा उत्साह. बोलणं मी बघत राहिलो, ऐकत राहिलो.

गेल्या वीस वर्षांपासून चित्रपट क्षेत्रात कार्यरत. रंगभूमी, टीव्ही मालिका आणि सिनेमा या तिन्ही क्षेत्रांत निर्माते, दिग्दर्शक ही ओळख. ‘शाळा’, ‘सिद्धांत’ हे गाजलेले चित्रपट. ‘जक्कल’या डॉक्युमेण्ट्रीसाठी राष्ट्रीय पुरस्कार. सध्या चित्रपट आणि माहितीपटांच्या अनेक प्रकल्पांत व्यग्र.

vivekdwagh@gmail.com

Story img Loader