केवळ नागरिकत्वावरून किंवा वर्णावरून नाकारले गेल्याचे अनुभव आम्हाला शहाणीव देऊन गेले. आता आफ्रिकेतले आगगाडीबाहेर ढकललेले महात्मा गांधी किंवा म्हातारवयात लंडनला जाऊन खटला लढणारे लोकमान्य टिळक यांचा तो संघर्ष मला अधिक उमगणार आहे हे नक्की! तो संघर्ष तेव्हाही होता आणि आत्ताही आहे. ..स्विस मने वरून स्वस्थ आणि आतून अस्वस्थ आहेत याची साक्ष देणारे हे अनुभव!

स्वित्झर्लंड म्हटलं की यश चोप्रांचे सगळे चित्रपट आणि त्यातला सगळा रोमँटिक अर्क आठवतो. स्वित्झर्लंडमधलं अद्भुत निसर्गसौंदर्य हे रोमान्ससाठी फायदेशीर आहेच! पण मला स्वित्झर्लंडमध्ये प्रवास करताना त्या स्वस्थतेहून पुष्कळ बघायला, अनुभवायला मिळालं तिथल्या समाजाचा आतून वरती उसळत असलेला राग, एकंदर स्त्री-पुरुष भेद, विचारांचं जुनेपण हे दिसत होतंच. त्यात आम्हाला वर्णभेदाचा थेट अनुभव मिळाला आणि अन्य भारतीय पर्यटकांना तो मिळत असताना बघायलाही मिळाला. स्विस निसर्गसौंदर्याविषयी सगळेच बोलतात आणि ते वाखाणण्याजोगे आहेच. पण म्हटलं, कदाचित संकोचून भारतीय पर्यटक दिसलेल्या दुसऱ्या बाजू मांडत नाहीत का? तर आपण बोलूया, शेअर करूया. स्पिएझ नावाच्या गावात आम्ही अपार्टमेंट बुक केलेलं. पॅरिसहून आमची रेल्वे तिथे पोचली. आम्ही जड सामान घेऊन ढकलत स्टेशनबाहेर आलो. अपार्टमेंटचं अंतर स्टेशनपासून जवळ असलं तरी रस्ता चढाचा होता. सोबत सगळं सामान होतं. म्हटलं चालत न जाता टॅक्सी करू तर तिथे काही सोय दिसेना. संध्याकाळचे साडेसात वाजले असल्याने टुरिस्ट माहिती केंद्र बंद झालेलं. काय करावं कळेना. तितक्यात दोन स्विस आज्या आम्हाला दिसल्या. मी त्यांना सहज विचारलं. पॅरिसमध्ये आधी आठवडाभर आम्ही इतके स्थानिक अनुभव आनंदाने घेतलेले आणि इतक्या मस्त गप्पा भाषेचे अडसर असून झालेल्या की तोच अनुभव मागे होता. त्या आज्या भल्या होत्या. त्यांनी त्यांच्या फोनवरून स्थानिक अॅप वापरून आमच्यासाठी टॅक्सी बोलावली. स्थानिक स्विस लोकांशी सभ्यपणे आणि आनंदाने झालेला हा शेवटचा संवाद असेल असं तेव्हा मुळीच वाटलं नाही, पण दुर्दैवाने झालं खरं.

epileptic attack, youth epileptic attack, Pune,
पुणे : अपघातानंतर तरुणाला अपस्माराचा झटका, पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरेंच्या तत्परतेमुळे वैद्यकीय मदत
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
Shocking video delhi two girls fight in college video viral on social media
“अगं सोड जीव जाईल तिचा”, भर कॉलेजमध्ये तरुणींमध्ये कपडे फाटेपर्यंत हाणामारी; VIDEO पाहून धक्का बसेल
Woman vulgar dance at tribute meeting video viral on social media
असे लोक येतात तरी कुठून? आजी आजोबांच्या श्रद्धांजली सभेत तरुणीने केली हद्द पार, स्टेजवर गेली अन्…, VIDEO पाहून संताप होईल अनावर
Interesting story of father-son relationship Shri Ganesha movie Milind Kavade
बापलेकाच्या नात्याची रंजक गोष्ट
Inquiry into cases in Beed Parbhani through retired judges Nagpur news
बीड, परभणीतील प्रकरणांची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
Women World, Feminist Thought ,
स्त्री ‘वि’श्व : लोकल भी, ग्लोबल भी!
who is Phangnon Konyak
Rahul Gandhi : राहुल गांधींनी प्रतिष्ठेला धक्का पोहचवाल्याचा आरोप करणाऱ्या भाजपाच्या महिला खासदार आहेत कोण?

हेही वाचा…व्रणभरला ऋतू…

गाव गिंड्रेलवाल्ड. सुंदर निसर्ग आणि आसपास उंच पर्वत. गावात भटकून आम्ही एका हॉटेलपाशी येतो. एव्हाना स्वित्झर्लंडमधला महागडा पिझ्झा विनातक्रार खाण्याची आम्हाला सवय झालेली असते. बाहेरून हॉटेल बरं दिसतंय. आत लोक खातपित आहेत. बागेसारखा माहोल आहे. बाहेरची पाटी सांगते- प्लीज वेट. आम्ही थांबतो, थांबूनच राहतो. पाचेक मिनिटे झाली तरी कुणी दखल घेत नाही. आतले वेटर, मॅनेजर वगैरे बहुधा आमच्याकडे दुर्लक्ष करत आहेत. कदाचित मीच चुकत असेन असं मला वाटतं. आम्ही अजून थोडं थांबतो. अखेर मुलीला भूक लागली आहे म्हणून मी एक पाऊल आत टाकतो तर जणू त्या क्षणाची वाट बघत असल्यासारखा वेटर वसकन् अंगावर ओरडतो, ‘‘वेट आऊटसाइड.’’ शब्द साधे, पण सूर? अख्खं हॉटेल आमच्याकडे बघायला लागतं! मॅनेजर त्या वेटरकडे बघत पसंतीची मान हलवतो, पण आमच्याकडे तरीही येत नाही. सोबत माझी तेरा वर्षांची लेक आणि पत्नी. आम्हाला धक्का बसतो, आश्चर्य वाटतं आणि अर्थात रागही येतो. मनोमन हाड म्हणत आम्ही वाद न घालता दुसरीकडे निघून जातो. मुलीला त्याच्या आधीच्या दिवसाची एक आठवण येतेच. स्थळ वेन्गेंन. अतिशय नितांतसुंदर गावात आम्ही ट्रेनने उतरलो आहोत. समोरच एक मस्त टेबल टेनिसचं टेबल दिसतंय आणि शेजारी अधिकृत पर्यटक माहिती केंद्र. आम्ही रॅकेटची चौकशी करायला तिथे जातो. एक मध्यवयीन बाई आम्हाला सांगते की, रॅकेट मी देते आणि त्या फ्रीही आहेत. (हे म्हणताना तिच्या चेहऱ्यावरचं एक कुत्सित हसू मी टिपतोच.) पण पुढे एकदम अंगावर ओरडत ती म्हणते, ‘‘या रॅकेट चोरू नका, परत आणून द्या!’’ मी थक्क होतो. मी कुणाला शार्विलकवाटेन अशी उभ्या आयुष्यात कल्पना मी केलेली नसते. लेकीचा हिरमोड करायला नको म्हणून वाद न घालता आम्ही रॅकेट घेऊन बाहेर येतो. मागे उंच बर्फाच्छादित पर्वतरांगा, सुंदर ऊन आणि वारा आणि आमचा रंगलेला टि. टी.चा पार एक्कावन्न पॉइंटचा डाव! खेळ खेळून झाल्यावर आम्ही रॅकेट परत द्यायला जातो. तिथे खिडकीवर कुणीतरी उभं असतं म्हणून मागे थांबतो. युरोपात मागे रांगेत थांबणं हे गरजेचं आहे याची आम्हाला कल्पना असते. मॅडम आमच्याकडे बघतात आणि दुर्लक्ष करून समोरच्या एका मुलीशी गप्पा मारत राहतात. ती पर्यटक नसून स्थानिक आहे हे आमच्या लक्षात येतं. त्या दोघी आमच्याकडे बघत कुजबुजत हसतात. एकदम ती कर्मचारी ओरडून म्हणते, ‘‘द्या चला रॅकेट परत.’’ आता मात्र मी खिडकीपाशी जाऊन बोलायला सुरुवात करतो. बोलताना सौम्य समज मला द्यायची असते. पण आधी म्हटलं एक साधा प्रश्न विचारावा म्हणून मी तिथल्या गोंडोलाची माहिती विचारतो. ती बाई छद्मी हसून म्हणते, ‘‘त्या राइड महाग आहेत. आम्हाला श्रीमंत पर्यटक हवे आहेत. मध्यमवर्गीय भारतीय नकोत!’’ मी वाद घालत नाही. बाहेर जाताना उलटा वळून आयफोनच्या झूमचा कमालीचा वापर करून त्या अहंकारी बाईचा फोटो काढतो आणि नंतर गूगल रिव्ह्यू लिहितो. खुलासे देत, आपली बाजू सावरत का असेना तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मला दीर्घ उत्तर लिहावं लागतं. सांस्कृतिक भेदांमुळे विसंवाद घडतो याची आम्हाला कल्पना होती. तुम्ही जिथे आहात तिथल्या स्थानिक भाषेचा, संस्कृतीचा आदर केल्याखेरीज संवाद रंगत नाही हे मला माहीत होतंच. अति फिरलो नसलो तरी जगातील पाच-सहा महानगरे माझी अनुभवून झालेली आहेत. तिथले अनुभव मागे आहेत. अगदी ताजा पॅरिसचादेखील होताच. ‘बाँजूर’खेरीज मी संभाषण सुरू करत नसे आणि ‘मेस्सी’खेरीज संपवीत नसे. आणि पर्शियन मंडळीदेखील आम्हा तिघांशी उत्तम संवाद साधत, माहिती देत. पण स्विस खाक्या वेगळा होता. बरं, हे काही आमच्याबाबतच घडत होतं असं मुळीच नव्हतं. आमच्या आसपास असलेल्या अनेक भारतीय पर्यटकांना असे अनुभव येताना आम्ही बघत होतो.

एक दाक्षिणात्य चेन्नईचे डॉक्टर दाम्पत्य आम्हाला फिरताना दोन-तीन वेळा क्रॉस झालेलं. ते कधीही ट्रेनमध्ये असतील तर त्यांच्या शेजारी कुणी म्हणजे कुणीही स्थानिक बसायचे नाहीत. ट्रेनमध्ये समोरासमोर अशा चार खुर्च्या असत. आम्ही तिघे बसल्यावर एक मोकळी राहत असे. कुणीतरी स्थानिक बाई अखेर जर्मनीमध्ये उसासे, नाटकी दु:खी उद्गार काढत अंतिमत: आमच्या शेजारी बसे. पण निदान बसे! नंतर कधीतरी बोलेही. हे जोडपे दक्षिण भारतात सहसा आढळते त्या कृष्णवर्णीय वर्णाचे. एकदा बाकीच्या सीट भरल्या होत्या आणि या जोडप्यासमोरची रिकामी होती, पण बर्न येईपर्यंत दोन स्विस बायका डब्याच्या शेवटी तासभर उभ्या राहिल्या, पण मुळीच बसल्या नाहीत. ते गृहस्थ सहज संवाद साधत मला म्हणाले, ‘‘आम्हाला स्वित्झर्लंडमध्ये फर्स्ट क्लाससारखं या डब्यातदेखील पाय पसरून बसायला मिळत आहे! तुम्ही गोरे असल्याने निदान तुमच्या शेजारी हे बसतात, पण आम्हाला पूर्ण प्रवासात अशी फर्स्ट क्लास पाय ताणण्याची अपग्रेड मिळाली आहे.’’ त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून प्रसंगाला विनोदाने तोंड दिलेलं, पण आम्हाला ते ऐकून फार फार वाईट वाटलं. मराठी पर्यटक एकटे एकटे फिरत नाहीत. बहुधा ते टूरबरोबर जातात. त्यात काही वाईट आहे असंही नाही. प्रत्येक पर्यटकाच्या गरजा निराळया असतात. पण त्यांना बहुधा ते एकत्र असल्याने हे अनुभव येतच नसावेत. जे भारतीय पर्यटक एकटे आपले आपले फिरतात त्यांना ते येत होतेच. बहुधा ते स्विस रेल्वे पास काढल्याने आपल्याला भेटत राहतात आणि संवादही होतो. एकदा झरमॅट या सुंदर, सुबक गावाहून परत येताना रेल्वेत दोन बहिणी भेटल्या. त्या त्यांच्या पालकांना घेऊन ट्रीपवर आल्या होत्या. त्यातल्या एकीचा नवी दिल्लीतल्या ग्रेटर कैलाशमध्ये बंगला होता, म्हणजे आर्थिक स्तर काय उच्च असेल ते ओळखावं. पण त्यांनीही त्यांचे असे अनेक वर्णभेदाचे अनुभव आम्हाला शेअर केले. लिंड्झ या फॅक्टरीत त्या गेलेल्या असताना एक मराठी दाम्पत्य आणि त्यांची तीन वर्षांची मुलगी त्यांच्यापुढे होते. फॅक्टरीमध्ये सगळयांनी शेवटी एक किंवा दोन चॉकलेट घेऊन बाहेर पडावं अशी अपेक्षा होती, पण या मराठी दाम्पत्याच्या तीन वर्षांच्या मुलीने बहुधा चारेक चॉकलेटं घेतली. ते बघून जर्मनमध्ये जोरात ओरडत तिथली एक बाई आली आणि तिने या दाम्पत्याला चोरटे संबोधून त्यांचा सगळयांसमोर भयंकर पाणउतारा केला! ही हकिगत आम्हाला त्या दिल्लीतील स्त्रीने सांगताना तिच्या चेहऱ्यावरही अतिशय राग होता. अशा वेळी आपण कुठल्या राज्यातले हे गौण ठरतं आणि भारतीय हे मागे उरतं! पण म्हणून जसे दक्षिण कोरिया किंवा चीनचे पर्यटक एकत्र जोरात स्थानिकांशी गरज पडल्यास वाद घालतात, तसे भारतीय एकवटत नाहीत हेही तितकेच खरे.

हेही वाचा…लोकउत्सव

एकूणच युरोपमध्ये कोव्हिडोत्तर काळात भारतीय – त्यातही सुशिक्षित भारतीय आपल्या चांगल्या पगाराच्या नोकऱ्या चोरतात याचा राग आहेच. अल्जेरिया किंवा आफ्रिकेतून गटारे किंवा स्वच्छतागृहे साफ करायला आलेल्या कामगारांची त्यांना अडचण नाहीच. तसेही ती कामे स्विस थोडीच करणार आहेत. पण भारतीय शिक्षक ८००० सीएचएफचा मासिक पगार मिळवतो, गावात नव्याने आलेला भारतीय डॉक्टर बघता बघता हॉस्पिटलमध्ये सर्वात प्रसिद्ध होतो वगैरे काही त्यांना रुचणारे नाही. साधी साधी निरीक्षणे सांगत होती की स्वित्झर्लंड आतून अस्वस्थ आहे. ३५० किलोमीटरच्या गतीने टीव्हीजी लायरिया ट्रेनने अतिवेगात पॅरिसहून स्वित्झर्लँडमध्ये पोचलो. स्विस हद्दीत घाट ओलांडून प्रवेश केल्यापासून ते आम्ही स्पिएझ या गावी जाईपर्यंत रेल्वेच्या कडेला अखंड ग्राफिती दिसल्या. रेल्वेच्या सामानाच्या डब्यावरदेखील अश्लील खुणांनी भरलेल्या अनेक ग्राफिती होत्या. जीनिव्हापासून लौसेनला जाताना त्या कमी होत्या, पण लौसेन स्टेशनच्या अलीकडे पलीकडे तर ग्राफितीचा आकांत होता. ‘लोकसत्ता’च्या वाचकांना कदाचित आठवत असेल की मी ‘लयपश्चिमा’ सदरात हिप हॉप संगीत, भिंतीवरच्या ग्राफिती आणि एकंदर सामाजिक असंतोष यावर विस्ताराने लिहिलं होतं. मागे अद्भुत तलाव आणि पर्वतरांगा दिसत आहेत. आणि समोर विद्रूप केलेले रेल्वे डबे, भिंती, हॉटेलच्या मागच्या भिंती, कुंपणे! आमच्यासमोर एक स्विस मुलगी होती. छान स्वत:हून बोलत होती. तिला सहज याविषयी विचारलं तर ती एकदम गप्प झाली. पुढे नेटवर वाचलं तर ध्यानात आलं की हा प्रश्न एकंदर युरोपचा आहेच, पण युरोपने त्याची वेगळी दखल घेतली आहे. काही युरोपमधील गावांनी ठरवून या चिडलेल्या युवकांकडून भिंती चांगल्या पद्धतीने रंगवून घेतल्या आहेत. त्या असंतोषाला वाट दिली आहे. स्वित्झर्लंड याबाबत शांतच आहे. किती काळ ही शांतता टिकेल माहीत नाही. बिल ब्रायसनने त्याच्या पुस्तकात लिहिलेलं मला आठवलं. त्याला हा देश संथ, बिलंदर आणि अतिशय जुनाट विचारांचा वाटला. हे मी बायकोला सांगताना आमच्या सव्‍‌र्हिस अपार्टमेंटमधल्या स्वयंपाकघरात रेडी टू इट मिसळ करायला मदत करत होतो. माझ्या एकदम लक्षात आलं की समोर आम्हाला शेजारच्या बिल्डिंगच्या सहा किचन विंडो दिसत. आम्ही असेपर्यंत एकदाही, एकाही खिडकीत चुकूनही एकही पुरुष दिसला नव्हता! बायका दोन दोन तास संध्याकाळी रांधताना दिसत असत. इथे अमेरिकन सॅन्डविचचे खाणे नसावे. गप्पा मारत मागे पुरुष उभा आहे असंही दिसलं नाही. भारतात बायकांना मतदानाचा हक्क सुरुवातीपासून मिळाला, पण स्विस बायकांना संघर्ष करून १९७१ साली मिळाला आणि तरी तिथल्या एका राज्यात तो कायदा प्रत्यक्षात यायला बहुधा १९८९ उजाडलं होतं हे वाचल्याचं मला आठवलं.

एकंदर हे सगळे अनुभव बर्नीज ओबरलँड या भागात अधिक आले. झुरिकमध्ये तसं वातावरण वाटलं नाही. टिटलिस आणि इंटरलाकेनमध्ये भारतीय पर्यटक भरपूर असल्याने तिथेही फार कुणाला येत नसावेत. तरी इंटरलाकेनला जो यश चोप्रा यांचा पुतळा आहे तिथे आम्ही गेलो तर तो खुला नव्हताच. मराठी पर्यटक तिथे आलेले, पण त्यांनाही परत यायला लागलेलं. आम्ही आत जाऊन चौकशी केली तर कळलं की, आजकाल ती जागा भाडयाने दिली जाते आणि तिथे कन्व्हेन्शन भरतात आणि मग लोकांना प्रवेश नसतो. भारतीय दिग्दर्शकाचा एकदा बसवलेला पुतळा आता काढता तर येणार नाही. पण आता भारतीय पर्यटक नव्या काळात नकोत, श्रीमंत चिनी आणि कोरियन हवेत तर ती जागाच भाडयाने द्या आणि पर्यटकांना बंद करा! – खरा बिलंदर देश! टिटलिसमध्ये आमचा फोटो काढायला एका तिथल्या स्विस स्टाफला आम्ही -ती मुलगी तितक्या समोर आली म्हणून- विनंती केली, पण ती म्हणाली, ‘‘मला वीस युरो द्या आधी!’’ आणि तोऱ्यात निघून गेली. शेजारी उभ्या असलेल्या तरुण अमेरिकन पोराने मस्त फकारयुक्त शिवी तिला घातली आणि आमचे फर्मास फोटो काढले. अमेरिकेची आणि भारताची युती अशा तऱ्हेने दहा हजार फुटांच्या टिटलिस शिखरावर झाली! पुढे तिथे एका ग्रुपमधून आलेले मराठी पर्यटक आम्हाला भेटले आणि ‘जरासा झूम लू मैं’ या गाण्यावर तिथे एकत्र नाचून आम्ही स्विस शिस्तीचं ठरवून भजं केलं. आपली भारतीय बंडखोरी!

हेही वाचा…आम्ही डॉक्युमेंट्रीवाले : बदल घडण्यासाठी…

या अनेक प्रसंगांत तिथल्या तिथे न भांडण्याचं शहाणपण आम्ही अशासाठी दाखवलं की, अशा वेळी कायदे स्थानिकांच्या बाजूने असतात. पोलिसात प्रकरण गेलं तर अधिक चिघळत. अखेर आपण परक्या देशात असतो. पण परत भारतात आल्यावर मी सगळीकडे हे रिव्ह्यू लिहिले आणि आगामी पर्यटकांना सावध तरी केलं. मध्यंतरी ओप्राह विन्फ्रेने एका स्विस दुकानात चपला का बुटांची चौकशी केल्यावर तिथल्या सेल्समन मुलीने ओप्राहचा कृष्णवर्णीय चेहरा बघून ‘‘तुला हे परवडणार नाहीत,’’ असं सांगितलं होतं. प्रख्यात भारतीय उद्योगपती हर्ष गोयंका यांनीदेखील स्विस हॉटेल भारतीय पर्यटकांना दुय्यम वागणूक देतात अशा आशयाचं ट्वीट केलेलं. भारतीय पर्यटक गोंगाट करतात, बेशिस्त वागतात, स्वच्छतेचे नियम पाळत नाहीत हेही खरं; पण म्हणून सरसकट वर्णभेदी वागणूक हे त्यावर उत्तर असूच शकत नाही. आमच्या एका अर्थतज्ज्ञ मित्राने गप्पा मारताना तर आम्हाला सांगितलं की स्विस बँकेतले भारतीय अकाउंटदेखील दिवसेंदिवस कमी होत आहेत. त्यामागे असे काही अनुभव आहेत का न कळे!

हेही वाचा…निमित्त : एकनिष्ठ वाङ्मय अभ्यासक…

बाकी मी, माझी पत्नी आणि कन्या आम्ही झकास फिरलो. हे अनुभव गरजेपेक्षा अधिक काळ मनात रेंगाळू दिले नाहीत. निसर्ग सगळयांचा असतो. त्याला पासपोर्ट समजत नाही. कधी पावसात- उन्हात- बर्फात, कधी झऱ्याशी- डोंगरावर- तळयाशी असे तिघांनी अर्थपूर्ण आणि आत्मीय अनुभव घेतले आणि आनंदलो. परत विमानातून येताना हे अनुभव आठवून बोलत होतो तेव्हा लक्षात आलं की, हे काहीसे वाईट अनुभव आयुष्यात आले तेही चांगलं झालं. नकाराचे अनुभव सगळयांनाच आलेले असतात. पण केवळ नागरिकत्वावरून किंवा वर्णावरून नाकारले गेल्याचे हे अनुभव आम्हाला शहाणीव देऊन गेले. आता आफ्रिकेतले आगगाडीबाहेर ढकललेले महात्मा गांधी किंवा म्हातारवयात लंडनला जाऊन खटला लढणारे लोकमान्य टिळक यांचा तो संघर्ष मला अधिक उमगणार आहे हे नक्की! तो संघर्ष तेव्हाही होता आणि आत्ताही आहे. स्विस मने वरून स्वस्थ आणि आतून अस्वस्थ आहेत याची साक्ष देणारे हे अनुभव! आल्प्सच्या डोंगरउतारांवर मधुर घंटा गळयात बांधलेल्या म्हशी, गायी चरत आहेत, पलीकडे कुणीतरी त्वेषाने रेल्वे स्टेशनच्या आतल्या भिंतीवर पोलिसांची नजर चुकवत स्प्रे पेंटिंग करतो आहे आणि यश चोप्रा यांचे ते स्वप्न आणि पुतळा पार झाकून गेलं आहे!

ashudentist@gmail.com

Story img Loader