युरोप-अमेरिकेत हेरगिरी, रहस्यमयता, अद्भुतता या विषयांवरील कथा-कादंबऱ्यांचं मोठं आकर्षण आहे. त्यामुळे या विषयांवरील कथा-कादंबऱ्या मोठय़ा प्रमाणात लिहिल्या-वाचल्या जातात. जॉर्जिना हार्डिग या अशाच रहस्यमय कादंबऱ्या लिहिणाऱ्या ब्रिटिश लेखिका आहेत. त्यांची ‘द सॉलिटय़ूड ऑफ थॉमस केव्हज’ ही पहिली कादंबरी बरीच गाजली. त्यानंतर त्यांनी ‘द स्पाय गेम’ ही कादंबरी लिहिली. तिचा हा मराठी अनुवाद. अद्भुतता आणि नाटय़मता ही दोन या कादंबरीची वैशिष्टय़ं आहेत. १९६१ मधील हिवाळ्यातील एका गोठलेल्या सकाळी कॅरोलिन अचानक गायब होते. त्यानंतर आठ वर्षांची अॅना आणि तिचा दहा वर्षांचा भाऊ पीटर यांना त्यांच्या आईचा मृत्यू झाला आहे, एवढंच सांगितलं जातं. पण आपली आई हेर होती, याची तिच्या बोलण्यातून आलेली पुसटशी कल्पना आणि नंतर वर्तमानपत्रातील बातम्या यातून पिटर-अॅना वेगवेगळ्या कल्पना करतात. पुढे मोठेपणी अॅना आईचा शोध घ्यायला लागते, त्यातून तिला कल्पनातीत सत्य समजते. त्याची ही गोष्ट आहे. अतिशय हळूवार मांडणी आणि मन हेलावून टाकणारे प्रसंग यामुळे ही कादंबरी वाचनीय झाली आहे.
‘हेरगिरीचा पोरखेळ’ – जॉर्जिना हार्डिग, अनुवाद उज्ज्वला गोखले, मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे, पृष्ठे – २३०, मूल्य – २४० रुपये.
नाटय़मय कादंबरी
युरोप-अमेरिकेत हेरगिरी, रहस्यमयता, अद्भुतता या विषयांवरील कथा-कादंबऱ्यांचं मोठं आकर्षण आहे. त्यामुळे या विषयांवरील कथा-कादंबऱ्या मोठय़ा प्रमाणात लिहिल्या-वाचल्या जातात. जॉर्जिना हार्डिग या अशाच रहस्यमय कादंबऱ्या लिहिणाऱ्या ब्रिटिश लेखिका आहेत. त्यांची 'द सॉलिटय़ूड ऑफ थॉमस केव्हज' ही पहिली कादंबरी बरीच गाजली. त्यानंतर …
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 03-02-2013 at 12:01 IST
मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dramatical book