– मेधा पाटकर
‘श्रममेव जयते!’ या दोन शब्दांत साठवलेलं जग पाहायचं, तर कष्टकऱ्यांमध्ये दिवस-रात्र घालवल्यानेच ते शक्य होतं. माझ्यासारख्या ‘कष्टकरी’ म्हणून न गणल्या जाणाऱ्या घरातही तसे अपार श्रम घेणारे आई-वडील होतेच. आम्हा भावंडांसाठी त्यांनी दिलेला ठेवा हा अमूल्यच! तसेही घरातली स्त्री ही दुनियेतल्या श्रमात एकतृतीयांश भार उचलणाऱ्या स्त्रीवर्गातच मोडणारी. घरचे आणि दारचे- दोन्ही सांभाळणारी आई.. एखाद्या फेरीवाल्या वा अंगमेहनती कुटुंबात असते तशीच.. आमच्या मध्यमवर्गीय कुटुंबातही होतीच! सरकारी नोकरीतून कुटुंबासाठी कमावतानाच ती सर्व सामाजिक-राजकीय कामांमध्ये उघडपणे सहभागी व्हायची. ‘‘सरकारचे काम करतो म्हणजे मिंधे नसतो; उलट घटनेच्या चौकटीतच, पण सामाजिक जबाबदारी निभावणारे पाईक असतो,’’ असे तिचे मत होते. पुढे कधीतरी पंचवार्षिक योजनांच्या प्रस्तावनेतही याच प्रकारचे सरकारी भाष्य वाचून मी धन्य झाले. वडील तर कामगार संघटनेच्या कामात असत. ‘हिंद मजदूर सभे’च्या कामगारांसाठी ते दिवस-रात्र राबत. आमच्या लहानशा घरात त्यांच्या बैठका, त्यातील तावातावाने चाललेल्या कामगारांच्या हक्क व कर्तव्यांविषयीच्या चर्चा, मालकांशीही त्याच घरात उठलेले वादविवाद या साऱ्याची मी साक्षी आहे. श्रमजीवींशी जोडलेले हे बुद्धिजीवीही तळागाळातील लोकांच्या अधिकारांविषयीचे प्रश्न उठवत ‘श्रमिक’ बनून खपताना पाहत मी मोठी झाले. त्यामुळेच ‘श्रमप्रतिष्ठे’चे मूल्य मनात बिंबले गेले ते कायमचेच!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा