डॉ. आशुतोष जावडेकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सकाळी लवकर उठून अस्मितच्या वडिलांनी खास पाठवलेल्या मिहद्राच्या दणकट जीपमध्ये बसून जेव्हा आम्ही फायनली नगरच्या स्टँडपाशी पोचलो तेव्हा जेमतेम साडेआठ वाजत होते. मी अस्म्याला म्हटलं, ‘‘चक्! इथे का थांबलोय आपण? तुझ्या घरीच चल ना! मला ते तुझं शेत आधी पाहायचं आहे.’’ तो म्हणाला, ‘‘थांब, चहा पिऊ, धार सोडू मग जाऊ!’’ दीड वर्ष अस्मितच्या तोंडातून एवढय़ा स्टोऱ्या मी ऐकल्या होत्या या शेतीविषयी की, इराच्या भाषेत सांगायचं तर- एक्साइटमेंट वॉज किलिंग मी! आधी मला ते सगळं पाहायचं होतं. या त्याच्या धारेवरून आठवलं की, मी आणि अस्मित केवळ योगायोगाने रूम पार्टनर झालो. पहिल्याच रात्री गप्पा मारत आम्ही दोघे बसलेलो. मध्ये मी टॉयलेटला गेलो, बाहेर आलो आणि पहिलं त्याला विचारलेलं, ‘‘अस्मित, तू काय केलंयस नक्की आत मगाशी?’’ देन ही सेड, ‘‘धार सोडायला गेलेलो राव! काय झालं?’’ धार अँड ऑल! माझ्या पाल्र्याच्या मित्रांनी हे ऐकूनच त्याचा कचरा केला असता, पण मी शांतपणे डील करत म्हटलं, ‘‘ते कळलं. पण शेतात केल्यासारखी सोडू नको धार तुझी!’’ मी आयुष्यात पहिल्यांदा तो ‘धार’ हा शब्द वापरला होता. मला नंतर हसायलाच आलं आणि अस्मितलाही. तेव्हाच आम्हाला कळलं की, मी दादागिरी करेनच जरा, पण तरी मेन म्हणजे आमचं दोघांचं मस्त जमेल आणि जमलंच!

पुढे कॉलेजमध्ये आमचे ग्रुप्स अर्थात वेगळे होणार होते तसेच झाले. तो नगरजवळच्या बऱ्यापैकी पैसेवाल्या शेतकऱ्याच्या घरातला. मी पाल्र्याच्या हनुमान रोडचं हायर मिडल क्लास प्रॉडक्ट! मी हिशेबाला चोख आणि अस्मित? – गावाकडची अनेक मुलं त्याच्याकडे पैसे मागायला यायची आणि हाही खुशाल द्यायचा. परत यायचे नाहीत ते पैसे. एक-दोनदा आमच्या फ्लॅटमध्ये माझ्यासमोर असं झालं तेव्हा मी त्याला म्हणालो, ‘‘अस्म्या.. चक् मॅन! तुला फसवत आहेत हे.’’ तर तो म्हणाला, ‘‘जाऊ दे रे. मला कळत नाहीये का? पण बापाचे जादाचे पैसे दिले अडल्या-नडल्याला तर काय जातंय?’’  ‘‘बापाचे सोड, पुढे तुझे देशील का असे पैसे काढून?’’ मी लगेच विचारलेलं. तेव्हा तो हातातला पेन-ड्राइव्ह खाली ठेवत म्हणालेला, ‘‘शंभर टक्के! करायलाच पाहिजे राव मदत!’’ आणि त्याचा चेहरा एवढा प्रामाणिक होता त्याक्षणी की मी एक ढांग पुढे टाकत त्याला छान मिठी मारलेली. आमची खरी मत्री सुरू झाली ती तेव्हा त्या मोमेंटला.. त्याने मला त्याच्या शेतावर आणि मीही त्याला अर्थातच मग अनेक वेळा माझ्या पाल्र्याच्या घरी यायचा आग्रह केला आणि अत्यंत मनापासून केला. पण तो बुजत असावा नकळत. उशिरा कळलं ते मला. मग मी नाही म्हटलं पुन्हा. आणि मग इगो असतो ना यार आपला! मी मग ठरवलेलं की मीही नाही जाणार याच्या शेतात. मग मागच्या रविवारी सकाळी कॉफी पिताना अस्मित म्हणाला, ‘‘आऱ्या, चल की शेतात माझ्या आतातरी. कुठे नंतर येणार तू? तू परदेशात जाणार.’’ मी नुसता हात ‘नाही’ असं सांगत हलवला तर तो म्हणाला, ‘‘तुझं शेत नाही. तुला परदेशातच जायला लागणार! आणि मग विसरणार तू मला! आधीच त्या माही आणि तेजसच्या नादात तू जगाला विसरलाय. त्यात वर तुझी ती इरामॅडम! आमचा नंबर शेवटीच. पण शेवटचा तरी आहे ना मी.. निदान लिस्टमध्ये तुझ्या?’’ आणि मला एकदम जाणवलं की तो सगळं खरं बोलतो आहे! पण तो माझ्या ‘लिस्ट’मध्ये – अशी लिस्ट असेल तर – शेवटचा नाही आहे यार. मला तेव्हा वाटलं की, अस्मित माझ्यात इतका इन्व्हॉल्व्हड आहे हे मला कळलंच नाही आहे! मी म्हटलं ‘‘डन! पुढच्या वीकेण्डला तुझ्या शेतात. पक्कं!’’

आणि अखेर आम्ही त्याच्या घरात पोचलो. त्याचे बाबा-आई-बहीण सगळे स्वागताला आलेले. सगळ्यांशी आधीची तशी ओळख होती, कारण आमच्या फ्लॅटवर ते यायचेच मध्ये-मध्ये. काकू म्हणाल्या, ‘‘या शेतात फिरून आधी. मग चिकन केलंय मस्त.’’ मी खरं परवाच वेगन होण्याचा सीरियसली विचार करत होतो, पण काकूंच्या हातचं चिकन खाऊन मग होऊ असं लगेच मी ठरवलं. मग अस्मितच्या बाबांनी, आईने, बहिणीने (जी मला बघून जास्त हायपर झालेली!) सगळ्यांनी माझं कौतुक केलं की, मी कसं त्यांच्या अस्मितला शहरी वळण लावलं. कशा रीतीभाती शिकवल्या. कसं अभ्यासाला बसवलं. पण मला मात्र आठवलं की, मी काय त्याला फक्त एक इंग्रजी शिवी शिकवली आणि त्यांनं मला ‘घंटा’ इ. नव्या पंधरा अस्सल मराठी शिव्या सवयीच्या करवल्या दीड वर्षांत. कुणी कुणावर काय संस्कार केले ते पालकांना काय कळायचं म्हणा! मी आपलं शांतपणे कौतुक ऐकून घेतलं आणि मग आम्ही दोघे सटकलो बाहेर. बाहेर पडल्यापडल्या शिवी हासडत अस्म्या म्हणाला, ‘‘कौतुकाचं धिरडं नि खाऊ कसं कोरडं अशी गत आहे. सारखंच तुझं कौतुक करत असतात माझ्या घरचे.’’ मी शेतात चालता चालता म्हटलं, ‘‘मग? आहेच मी भारी!’’ आणि मग हसत अस्मितच्या पाठीवर हात ठेवत त्याला जवळ ओढत आधी एक सेल्फी काढला! मागे नेमकी तितक्यात म्हैस आली आणि परफेक्ट इंस्टाग्रामसाठीचा फोटो निघाला. हॅशटॅग दोन बल आणि एक म्हैस! मग आम्ही जरा भटकलो. उगाच इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या. शेतात अगदी शांत होतं. मला एकदम वाटलं की, खेडय़ातल्या मुलांना प्रायव्हसी हवी तेवढी आहे यार! पॉर्नमध्ये दाखवतात तसं एकदम आऊटडोअर! ऊन वाढलं तसं आम्ही घरी आलो. चिकनवर ताव मारला. भातही खाल्ला आणि आडवे झालो.

संध्याकाळ होत आली तसं अस्मितने मला ढोसून ढोसून उठवलं आणि मग पुन्हा बूट घालून आम्ही शेताच्या पुढच्या बांधापाशी चालत जायला निघालो. रात्री नऊला परत निघणार होतो मी एकटा. बांधापाशी गेलो. समोर सुंदर पाणी. खूप लांबवर पसरलेलं. संध्याकाळची मस्त हवा, प्रकाश आणि आम्ही दोघे. लवकर एकमेकांचा निरोप घेणार आहोत असे. पण मला आठवेल यार तो. ‘‘काय रे साल्या, मला पुढे तू आठवणार नाही असं कसं रे वाटलं तुला?’’ मी एकदम आवाज चढवत विचारलं. अस्मितने वळून माझ्याकडे बघितलं आणि उद्गारला, ‘‘आयला! हे काय नवीन! काय झटका बसला तुला राव एकदम?’’ पण त्याला कळलं मला काय म्हणायचं होत ते; आणि त्याला त्याने आनंदही झाला तेही मला कळलं. माही म्हणते तसं आम्ही पुरुष असेच असतो. काही बोलत नाही आम्ही, पण कळतं आम्हाला एकमेकांचं! मग पाण्यात पाय सोडून बसलो असताना अस्मित म्हणाला, ‘‘संपत आलं की रे आपलं शिक्षण. पाच महिने अजून फक्त.’’ मलाही जाणवलं की शाळा नाही, कॉलेज नाही, क्लास नाही, बंकिंग नाही, कँटीनमध्ये भंकस नाही.. असं पुढचं जग असणार आहे. पीजीही संपलंच आता. आता कामाला लागायचं. केवढी स्पर्धा आहे. मी ते झटकत म्हटलं, ‘‘चल गाऊ.’’ आणि सरळ गाणी म्हणायला सुरुवात केली. कोल्डप्लेचं ‘लॉस्ट’ गाणं मला फार आवडतं. मी ते गिटार वाजवल्याची हाताने अ‍ॅक्टिंग करत गायलं, मग अस्मितने ‘मेहबूबा मेहबूबा’ गायलं. त्याने एक पोवाडाही म्हटला. आमचे आवाज आमच्या दोघांच्या सवयीचे आहेत आणि बाकी कुणी तिथं नव्हतं म्हणूनच केवळ ही मफल रंगलेली होती. मग मी सुनिधी चौहानचं ‘ले डुबा’ गायलो.. एक लम्हें मैं कितनी यादें बन जाती हैं.. आणि आम्ही दोघे सेंटी झालो. दोन क्षण कुणी बोललं नाही. मग अस्मितचा हात घट्ट पकडला मी आणि मनोमन पुन्हा म्हटलं, ‘‘यार, तू शेवटचा नाही आहेस माझ्या लिस्टमध्ये.’’ अस्मित शांत राहिला. त्याला आठवले असले पाहिजेत अनेक क्षण, जेव्हा मी त्याला पार विसरून माही आणि तेजस आणि इव्हन गीतामावशी यांच्यामध्येच रमलो होतो. त्याला आठवलं असणार की, इरा फ्लॅटवर आली की तो बाहेर निघून जायचा. पण मी कधी त्याला थँक्स म्हटलं नाही. त्याला आठवलं असणार की त्याने अनेकदा मला भाकरी ताजी, गरम करून खायला दिली, पण मी कधी पटकन मायक्रोवेव्हमध्ये त्याच्यासाठी पॉपकॉर्नही केले नव्हते! चुकलं माझं. मला कळलंच नाही की त्याला मी मनापासून आवडतो! नुसता वरवर राहिलो या मत्रीत. मग मी म्हटलं- आणि मनापासून म्हटलं, ‘‘आय लव्ह यू फ्रेंड..’’ आणि मग हसत म्हटलं, ‘‘साल्या, जगात कुठेही आऊटडोअर धार सोडताना तू मला आठवणार!’’ हसताना एकीकडे त्याच्या डोळ्यात एकदम पाणी आलं की काय असं मला वाटलं, पण त्याने मान फिरवली आणि माझा हात न सोडता तो जुनं लोकगीत गाऊ लागला, ‘गवरीचा बाळ गे बसला बाजेवरी..’ मला आवडतो त्या गाण्याचा रिदम. मग एकदम तो गाताना मला गौरीचा गणपती आठवण्याऐवजी माझ्या पाल्र्याच्या घरात इराणी कार्पेटवर बसून खेळणारा मीच लहान मुलगा आठवलो. तसा फोटो आहे माझ्याकडे. आणि मग एकदम वाटलं की, आता लवकर पायाखालचं मऊ काप्रेट कुणी जणू काढून घेणार आहे- या बाहेरच्या मोठय़ा जगात एंटर करताना! मी सांगितलं मग ते अस्म्याला. तो हसला. मग अंधार पडत चालला तेव्हा तो म्हणाला, ‘‘चल, धार टाकू तिकडे वावरात आणि घरी परतू.’’ आम्ही मस्त पळत गेलो. अंतरावर उभे राहिलो.. तिथून मोकळं होऊन परतताना वाटलं की तेजसदा सांगतो तसं आता चिल करणं सोडून आम्हाला धारेला लागायचं आहे आणि पुढे जे जग आहे ते धारदारदेखील असणार आहे! तिथे नीट चालायचं तर काही सोबती पक्क्या हव्यातच. मी आणि अस्मितने एकदा एकमेकांकडे सहज हसत पाहिलं, एकमेकांचा हात हातात नीट रोवून धरला आणि हिरव्या शेतातून जवळजवळ अंधारातून घराकडे आम्ही चालायला लागलो.

ashudentist@gmail.com