हेमंत प्रकाश राजोपाध्ये – rajopadhyehemant@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सृष्टीनिर्मितीचे कारण किंवा कारणे शोधण्याची जिज्ञासा अन्य प्राचीन संस्कृतींप्रमाणेच इतिहासकालीन भारतीय समूहांमध्येही नेहमीच दिसून येते हे आपण जाणतो. विश्वनिर्मितीच्या अनेक सिद्धांतांना धार्मिक, श्रद्धापर किंवा तत्त्वज्ञानपर किंवा गूढवादी चौकटींची जोड दिली गेल्याने प्राचीन समाजांतील विश्वनिर्मितीच्या धारणा आजच्या आधुनिक मनांना रंजक किंवा गूढ वा अवैज्ञानिक वाटतात. खरे तर विश्वाची निर्मिती किंवा विश्वाची नेमकी संरचना आणि स्वरूप याविषयीच्या सर्वच प्राचीन समूहांतल्या धारणा अशाच प्रकृतीच्या असल्याचं दिसून येतं. मात्र, या सर्व धारणांमधून संबंधित समाजांच्या सांस्कृतिक, बौद्धिक घडणीचा उत्तम मागोवा घेता येऊ शकतो. नटराज शिवाचे नृत्य आणि त्यातून विश्वाचे सर्जन ही अशीच अनोखी कल्पना भारतीय समाजातील वेगवेगळ्या आयामांचे प्रतिनिधित्व करते. भारतीय कला क्षेत्रात कलेतून सृष्टीची अभिव्यक्ती होते, हा विचार बहुधा या धारणेतूनच विकसित झाला असावा. सृष्टीनिर्मितीच्या रहस्यांसोबत इतर अनेक सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय प्रक्रियांचा मागोवा नृत्यादी कलांच्या इतिहासात दडला आहे. त्यामुळेच भारतीय समाजांचा इतिहास तपासताना कला आणि त्याविषयक धारणांचा अभ्यास अनेक अंगांनी करावा लागतो. खरे तर भारतीय म्हणवल्या जाणाऱ्या सर्वच तत्त्वांना एका विशिष्ट भारतीय किंवा प्रादेशिक ओळखीभोवती केंद्रित करायचा प्रयत्न केला तरी त्यांचं वर्तमान स्वरूप एखाद्या अवाढव्य अशा एकमेकांत वर्षांनुवष्रे गुंतून विलग करण्यास कठीण झालेल्या अनेक पारंब्यांसारखं असल्याचं भासतं. या पारंब्यांना श्रद्धा, धर्म, प्रदेशभिन्नता अशा अनेक निकषांच्या आधारे वेगळं ओळखायचे अनेक प्रयत्न होत असले तरी त्यांच्यातील आंतरसंबंध अनेकदा दिसून येत असतात.

भारतीय कलांच्या संदर्भातही अन्य क्षेत्रांप्रमाणे धर्मश्रद्धा ही बाब डोकावत असल्याने त्यांची विभागणी िहदू, बौद्ध, जैन, मुस्लीम, पाश्चात्त्य वगरे चौकटींत करणेही अनेकदा विविध कारणांनी कठीण होऊन बसते. उदाहरण द्यायचं झालं तर गजलक्ष्मी या आज िहदू विश्वाचा भाग समजल्या जाणाऱ्या देवतेची घडण आपण बघू. आज िहदू देवता अशी मान्यता असलेल्या या देवीचे सर्वात प्राचीन असे उपलब्ध शिल्प भारहूत येथील दुसऱ्या शतकातील बौद्ध स्तूपरचनेवर आढळते. राजस्थानातल्या ओसियां येथील जैन मंदिरांतील शिल्प व उदयपूरजवळील जगत येथील िहदू मंदिरातील शिल्प यांच्यातील साधम्र्य अतिशय लक्षणीय आहे. अर्थात प्रतिमांमध्ये दाखवलेल्या शरीराकृतींमधील शिर, हात इत्यादींचे अनेकत्व हे बहुतांशी त्यांचं वैदिक किंवा िहदू असण्याचं निदर्शक असल्याचं डॉरीस श्रीनिवासन व अन्य अभ्यासकांनी अनेकदा नमूद केलं आहे. मानवी आकार असलेल्या प्रतिमांमधून वेगवेगळ्या मुद्रा, हालचाली, आविर्भाव व्यक्त होतातच. मात्र, काही विशिष्ट, ठरावीक रीतीच्या सांकेतिक रचनांतून- जसे शिविलग- विशिष्ट देवतांचं स्वरूप अभिव्यक्त होतं. शिविलगासारखं आणखी एक उदाहरण देता येईल. श्रीयंत्राचं किंवा शाळीग्राम स्वरूपात अभिव्यक्त होणाऱ्या विष्णूचं. काही विशिष्ट आकृती विशिष्ट अतिमानवीय शक्ती असलेल्या तत्त्वांचे किंवा आत्मा किंवा यक्ष, भूतादिक तत्त्वांचे निदर्शन करतात. अर्थात अन्य इतर क्षेत्रांप्रमाणे कलेच्या बाबतीतदेखील विशिष्ट व्यक्ती किंवा देवतागण यांच्या अंकनातून संबंधित विशिष्ट देवतेच्या रूपासोबतच काहीतरी वैश्विक किंवा बा विस्तृत जगताविषयीच्या धारणांची अभिव्यक्तीदेखील होत असते. या प्रतिमांसोबतच वेगवेगळ्या चिन्हसंकेतांतूनही व्यक्त होणारी कल्पित कॉस्मिक- अर्थात वैश्विक धारणांना कवेत घेणारी आध्यात्मिकता हीदेखील त्यातून अभिव्यक्त व्हावी याकडे शिल्पकारांचा असलेला कल ठळक दिसून येतो. रंगावली किंवा रांगोळीच्या कलेमधील तांत्रिक आणि अन्य कलाकृतीतूनदेखील हे दिसून येतं.

समाजातील पवित्रताव्यूहांची आणि त्याविषयीच्या धारणांची सामाजिकता या रचनांच्या निर्मितीप्रक्रियेतून दिसून येते. या कलाकृती, शिल्पकृतींमागे असलेल्या विश्वात्मकतेच्या वर नमूद केलेल्या धारणा समाजमनात घट्ट रुजल्याने या कलाकृतींचे रचयिते किंवा निर्मातेदेखील संबंधित विश्वात्मकतेला नवनवीन काळात नवनव्या रीतीने अभिव्यक्त करत असल्याची सांकेतिक धारणा बाळगून असतात असं दिसून येतं. ‘शिल्पशास्त्र’ या ग्रंथात सांगितल्यानुसार, शिल्परचनाकाराने संबंधित निर्मिती करण्याआधी दीक्षासदृश विशिष्ट शुद्धीकरण विधीचे आचरण करावे. याअंतर्गत लाकूड किंवा दगड वा तत्सम वस्तू- ज्यावर शिल्प अंकित केले जाणार आहे त्याविषयी अर्चना, आदर व्यक्त करून करणे आवश्यक असते. वेदांमधील यज्ञदीक्षेत ज्या रीतीने दीक्षा घेणाऱ्या माणसामध्ये देवत्व संचारते अशी धारणा आहे, त्या रीतीने या रचनाकारामध्येही अशा रीतीने देवत्व किंवा विशिष्ट अतिमानवीय पवित्रता मूल्य संचारल्याची धारणा यातून व्यक्त होते. वैश्विक चिन्हांची अभिव्यक्ती करण्याचे सामथ्र्य हे विधाता, शिव, विश्वकर्मा किंवा माया यांसारख्या ईश्वरी व्यूहातील शक्तींमध्ये असल्याने संबंधित समाजांची आराध्यदेवतादेखील शिव, नटराज, विश्वकर्मा या असतात. त्यामुळे संबंधित कारागिरी करण्यासाठी शक्ती या देवतांच्याच ठायी असल्याने संबंधित विधींतून जणू त्या देवतांचे संचारण कलाकाराच्या हातून होणार असल्याची धारणा या विधींद्वारे अभिव्यक्त होते. थोडक्यात, संबंधित कलाकाराचे कार्य केवळ शिल्प किंवा संबंधित कलाकृतीची निर्मिती हे नसून, त्या निर्मितीद्वारे देह किंवा विशिष्ट सगुण आकृती आणि वैश्विक शक्तींच्या सहसंबंधांचे ज्ञान समाजाला करून देणे ही मोठी जबाबदारी या वर्गावर असल्याची धारणा यातून प्रतीत होते.

नाटय़ आणि साहित्यशास्त्रात प्रतिपादित केलेल्या रससिद्धांताचेदेखील या शिल्प, चित्रादी कलांशी असलेले संबंध महत्त्वाचे ठरतात. विष्णुधर्मोत्तर पुराणात नमूद केल्यानुसार, देवतास्वरूप आणि अन्य चिन्हांच्या अंकनासाठीचे काही नियम सांगितलेले दिसतात. त्यात विशिष्ट सौंदर्यविषयक संकल्पनांना अशी शिल्परचना घडवण्याविषयी काही संकेत दिसतात. विशिष्ट संदर्भात अंकित केलेल्या विशिष्ट देवतांच्या चेहऱ्यावरील भाव, डोळ्यांच्या रचना, मूड्स, संबंधित संदर्भानुसार अवयवांचे अंकन इत्यादी बाबींचा यात विचार दिसतो. मूर्ती हे ध्यान किंवा देवतेच्या रूपप्रकृतीविषयीच्या चिंतनासाठी महत्त्वाची मानली गेल्याने त्याविषयीच्या नियमांवर आणि रसनिष्पत्तीवर शास्त्रकारांनी भर दिल्याचं दिसून येतं. अर्थात यातून जैन, िहदू, बौद्ध अन् स्थानिक लोकधर्माशी संबंधित विशिष्ट रीती आणि धारणांचे वेगळेपण कटाक्षाने जपले गेल्याचे दिसून येत असते.

यातून लज्जागौरीसारख्या प्रतिमांद्वारे सर्जनविषयक धारणा दिसून येतात. सुफलनाच्या प्रतिमा व कल्पना अंकित झालेल्या दिसतात. यक्ष, अप्सरा, नाग, नागिणी इत्यादी आकृतींतून वैदिक आणि अवैदिक वर्गाची मिसळण दिसून येते. मथुरा वगरे भागात मणिभद्र यक्षासारख्या व्यापारी आणि प्रवासीवर्गाची देवता मानल्या जात असलेल्या यक्षाचे महत्त्व दिसून येते. थोडक्यात, सामाजिक इतिहासाच्या अंगाने पाहिल्यासदेखील वेगवेगळ्या प्रदेशांतील शिल्पप्रतिमांच्या तौलनिक अभ्यासातून तीर्थयात्रा, लोकांचे स्थलांतर, सहसंबंध, समाजाचे आíथक व्यवहार व परिस्थितीचा आणि त्यातून आकाराला आलेल्या धार्मिक भूगोलाचा मागोवादेखील घेता येतो, हे हिमांशूप्रभा रेंसारख्या अभ्यासकांनी दाखवून दिले आहे.

भारतीय कलांचा विचार करताना शिल्पकेंद्री विवेचन आता आपण केले असले तरी नृत्य, रंगावली, चित्रादी कलांचा विचार केला तरी त्यातून वर नमूद केलेली तत्त्वे केंद्रस्थानी मानली गेल्याचे दिसून येते. त्यामुळे भारतीय धर्मातील श्रद्धाविषयक धारणा, तत्त्वज्ञानव्यूह, त्यांच्या प्रतिपादनासाठी योजिले गेलेले कथात्म अभिजात व लोकसाहित्य इत्यादींकडे दुर्लक्ष करून अभिजात भारतीय कलांचा अभ्यास करणे केवळ अशक्य आहे. या श्रद्धाविषयक धारणांमध्ये वेगवेगळी कर्मकांडे, त्यांचे संदर्भ, लोकजीवनातील सर्जनविषयक कल्पनांसोबतच विशिष्ट संकेत, चिन्हे इत्यादींचा समावेश होतो. उदाहरणार्थ, गज, नाग, कमळ यांसारख्या चिन्हांच्या सर्जन, सौंदर्य, समृद्धी इत्यादी संकल्पनांशी नि:बद्ध असलेल्या धारणा आकळणे आवश्यक ठरते. अर्थात केवळ यांतून व्यक्त होणारी सांकेतिकता समजून घेणे पर्याप्त ठरत नसून, वेगवेगळ्या ऐतिहासिक राजकुलांनी किंवा राजांनी बौद्ध, िहदू, जैन देवताविश्व आणि तत्त्वज्ञान प्रणालींचे शास्ते किंवा उद्धारक म्हणून स्वत:विषयीच्या धारणा संबंधित पौराणिक कथापात्रांच्या किंवा देवतांच्या अंकित केलेल्या प्रतिमांतून कशा व्यक्त होतात हे लक्षात घ्यावे लागते. उदाहरणार्थ, चंद्रगुप्त दुसरा या सम्राटाने शकांचा बीमोड करून झाल्यावर वैदिक धर्माची पुनस्र्थापना करण्याचा पराक्रम आणि उदयगिरी येथील भूदेवीचे उद्धरण करणाऱ्या प्रसिद्ध वराह अवताराचे शिल्प या दोन बाबींतील सांकेतिक अर्थ, राजाने केलेले विष्णू अवतारासमान कार्य ध्वनित करतात.

कला ही गोष्ट मानवी व्यवहारांत केवळ मनोरंजन करणारी बाब असते अशी धारणा सर्वसामान्यत: व्यक्त होते. मात्र, कलेमध्ये किंवा कलाकृतींमध्ये अनुस्यूत असलेल्या विविध बाबींची मीमांसा भारतातील प्राचीन कलाशास्त्रांत विविध अंगांनी झालेली दिसते. त्यातून विश्वनिर्मितीसोबतच वेगवेगळ्या वैश्विक, सामाजिक, राजकीय घटना, सिद्धांत आणि तत्त्वांचे अंकन केलेले असते. आधुनिक काळात पाश्चात्त्य कलास्वादाच्या वेगवेगळ्या सिद्धांतांच्या अंगाने भारतीय कलाकृतींचे मानसिक, कलात्मक, राजकीय, सांस्कृतिक अंगाने परिशीलन आणि अन्वयन जगभरात सुरू झाले आहेत. ऐतिहासिक राजकारणाच्या वर्तमान अभ्यासचौकटी, परंपरांना अभिप्रेत असलेले अर्थ आणि आधुनिक मीमांसेच्या अंगाने होणारे कलासमीक्षण यांचा समन्वयाची प्रक्रिया या तिन्ही घटकांच्या सतत वाढत व गुंतागुंतीच्या होत जात असलेल्या व्याप्तीसोबत अधिक प्रगल्भ होत जात आहे, जाणार आहे. वास्तविक ग्रंथांतून किंवा मौखिक साहित्यातून व्यक्त होणाऱ्या कथा, कल्पना आणि धारणांना शिल्प, रंगावली, चित्र, नृत्यादी कलाविष्कारांतून अधिक प्रभावीरीत्या व्यक्त करता येते. त्यांचा प्रेक्षक, आस्वादक वर्ग हा अनेक भौगोलिक, काळाच्या, वर्गाच्या मर्यादाचौकटींत बांधला गेलेला नसतो. कारण या मूर्त अभिव्यक्ती त्या, त्या संबंधित वर्तमानातील सामाजिक धारणा आणि स्थानिक व बा प्रभावांचे, आíथक, राजकीय घडामोडीचे संदर्भ व वास्तवे अधिक ठळक व मूर्त रीतीने समोर आणतात. इतिहासाच्या अभ्यासकांना टेक्स्च्युअल, ग्रांथिक अभ्यासासोबतच कलाइतिहासाचे, कलांच्या ऐतिहासिक सामाजिकतेचे, राजकीयतेचे, आíथकतेचे भान असणेही गरजेचे असते, ते याच कारणांमुळे.

(लेखक धर्म, इतिहास आणि भाषा या विषयांचे अभ्यासक आहेत.)