आजच्या कॉलेजच्या पोरांचं गाणं ‘रॉक’ असेल, तर माझ्या वयाच्या आसपासच्या (आणि ते पस्तीस आहे!) पोरांचं कॉलेजमधलं गाणं हे ‘पॉप’ होतं. नव्यानेच भारतात आलेला तो एम. टी. व्ही.- व्ही. टी. व्ही., त्यावरची निरंतर पळणारी चित्रं, कमीत कमी जाहिरातींसह सदा चालू असलेले ते व्हिडीओ अल्बम्स, ते वेगळ्याच विश्वामधले गायक-गायिका आणि त्यांचं ते अद्भुत, निराळं जग. ते परकं जग माझ्या पिढीपर्यंत बहुधा या चॅनेल्समुळेच पहिलं पोहोचलं असावं. ना तेव्हा मोबाइल होते, ना इंटरनेट. आजच्या पाळण्यातल्या पोरानं ‘स्काईप’वरून अमेरिकेमधल्या काका- मामा- आत्या- मावशीचं घर दहादा बघितलेलं असतं! ‘बेवॉच’सारख्या मालिकांमुळे हवाईचा समुद्रकिनारा तरुणांनी दहादा टी.व्ही.वर बघितलेला असतो. पण आमच्या मित्र-मैत्रिणींच्या कंपूनं हवाईचा तो निळा-सावळा सागरतीर पाहिला तो एम. टी.व्ही.वर.. ग्लेन मेडेरीऑसच्या गाण्यात. ‘Nothingls gonna change my love for you…’ ग्लेन गाऊ लागला.. मैत्रिणीचा हात हातात घेऊन, त्या किनाऱ्यावर चालता चालता. इकडे आमच्याही स्वप्नील आशा पल्लवित झाल्या. मागे सॅक्सोफोन वाजतो आहे.. गाण्याची लय कशी निवांत आहे. ग्लेन सौम्यपणे आर्जव करीत म्हणतोय : ‘Hold me now, touch me now, I don’t want to live without you.’ उतरत जाणारा तो सूर्य आता समुद्राला टेकलाय. सारी हवा कशी प्रसन्नतेचा शिडकावा करीत चालली आहे. आमच्या डोळ्यांवर काही ‘थ्री-डी’ चष्मे नाहीएत; पण तरी आम्ही जणू स्वत:च हवाईच्या त्या किनाऱ्यावर असल्याचं कसं बरं भासतंय? मागे गोव्याच्या किनाऱ्यावरचे बाकीबाब तथा बा. भ. बोरकर जणू उभे राहून म्हणताहेत : ‘हवा पावसाळी, जरा रात्र काळी..’ सारा आसमंत जणू प्रेमाच्या वाटेनं निघालाय. तो देखणा ग्लेन त्याच्या उमद्या आवाजानिशी सुरतपाक युवतीकडे कटाक्ष टाकतो आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा