१५ ऑगस्ट १९७५ रोजी ‘शोले’ प्रदर्शित झाला. त्याला ४० वर्षे होत आहेत. तो प्रदर्शित झाला तेव्हा चित्रपट समीक्षकांनी ‘शोले’वर झोंबरी टीका केली होती. पहिले दोन आठवडे तर त्याचे बॉक्स ऑफिसवरही थंडेच स्वागत झाले होते. परंतु ज्यांनी तो पाहिला त्यांच्या प्रशंसेने नंतर या चित्रपटाने जी उचल खाल्ली, ती पुढे जाऊन त्याने चक्क इतिहासच रचला. ‘पाश्चात्य मसालापट’ अशी जरी त्याची संभावना झाली असली तरी पुढे हा चित्रपट ‘फिल्म ऑफ द मिलेनियम’ (बीबीसी इंडिया), ‘बेस्ट ऑफ बॉलीवूड’ (‘टाइम’ मॅगझिन) म्हणून गौरवला गेला. एकाच वेळी १०० चित्रपटगृहांत रौप्यमहोत्सव, ६० चित्रपटगृहांमध्ये सुवर्णमहोत्सव, तसेच मिनव्र्हा थिएटरमध्ये पाच वर्षांहून अधिक काळ चाललेला पहिला चित्रपट असे अनेक विक्रम त्याने केले. ‘शोले’वर ‘शोले- अ कल्चरल रीडिंग’ आणि ‘शोले- द मेकिंग ऑफ अ क्लासिक’ ही अभ्यासपूर्ण पुस्तकेही लिहिली गेली आहेत. २०१४ साली ‘शोले’ थ्रीडी रूपात पुन्हा प्रदर्शित करण्यात आला. ‘शोले’च्या चाळीशीनिमित्त वेगवेगळ्या पिढय़ांतील प्रेक्षकांना काय वाटते, हे सांगणारी मनोगते..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा