नेहमीची चौकट सोडून काही वेगळी गाणी हेमंतदांनी दिली. कुठल्याही एका शैलीला बांधून न घेतल्यामुळे शब्द वेगळ्या ‘मीटर’चे (छंदाचे) आले, तर त्यांना वेगळी ट्रीटमेंट हेमंतदा देऊ शकले. ‘कश्ती का खामोश सफर है’ (गर्लफ्रेंड), किंवा ‘ओ बेकरार दिल’ (कोहरा) अगदी सुरुवातीला दिलेले ‘जय जगदीश हरे’ (आनंदमठ) किंवा
‘छुप गया कोई रे ऽ’ (चंपाकली) किंवा ‘या दिल की सुनो दुनियावालो’ (अनुपमा) यासारखी व्यथित अंत:करणातून आलेली गाणी ऐकली की या संगीतकाराचं टेंपरामेंट काहीसं अंतर्मुख असल्याचं जाणवतं. उगीच भावबंबाळ, तालास्वराची आदळआपट करून स्वत:चं म्हणणं मांडण्याची गरज त्यांना वाटली नाही. ‘छुप गया’मध्ये ‘हाय यही तो मेरे दिन थे सिंगार के’ ही ओळ ‘यही’वर हलकासा जोर देऊन येते तेव्हा ते दु:ख अधिक गहिरं होतं. या गाण्यात लताबाईंचा आवाज आणि बासरी यांचाच संवाद आहे.
‘ओ रात के मुसाफिर चंदा जरा बता दे’ (राजेंद्र कृष्ण, लता-रफी, मिस मेरी) या गाण्याची गंमत काही निराळीच. मीनाकुमारीने लटक्या रागाचा विलोभनीय अभिनय पडद्यावर साकारलाय. त्या गोबऱ्या गालातला तो लटका रुसवा-फुगवा.. ती डोळ्यांची मजेशीर हालचाल फार गोड. संगीतकाराचं सृजन असं की तिन्ही अंतऱ्यांमध्ये छोटे छोटे बदल करून, तिथल्या तिथेच ओळी फिरवून वैविध्य आणलंय; आणि हे सगळं त्या गाण्याची प्रवाही लय कायम ठेवून. ‘दिल पे किसी को अपने काबू नहीं रहा है, ये राज मेरे दिल से आँखों ने ही कहा है’ हे शब्द किती साधे सोपे, अर्थवाही आणि ‘दिल से’ या शब्दात लताबाईंनी दिलेली ती ‘आस’ जरूर ऐका. ‘दिल से’ आणि ‘आँखों ने’ या दोन शब्दांतला तो सुंदर पूल आहे. ‘मिस मेरी’मधलंच ‘सखी री सुन बोले पपिहा उस पार’ (लता-आशा) हेसुद्धा खूप सुंदर गाणं. गाण्याची लय वाढत गेल्यावर दोघींच्या तानांची बरसात सुरू होते. शास्त्रीय संगीताच्या मफिलीचा सगळा अर्क तीन मिनिटांत काढण्याचा हा चमत्कार अचंबित करणारा. दोघींच्या आवाजातली अजून अशी खूप गाणी यायला हवी होती, ही चुटपूट लावणारं हे गाणं..
‘ओ बेकरार दिल, हो चुका है मुझको आसुओं से प्यार’ (कोहरा) हे खूप वेगळं गाणं. त्या वातावरणाला साजेसं. कारण या गाण्यात आपल्याला नेहमीची ‘सुरक्षितता’ आढळत नाही. म्हणजे ध्रुवपद, अंतऱ्याच्या मधले पीसेस आणि मग अंतरा, असा जो नेहमीचा ढाचा असतो, तो नाही इथे. कदाचित त्या गूढ वातावरणामुळे थोडा विस्कटलेपणा आहे या गाण्याला. यात दुसऱ्या अंतऱ्याची सुरुवात वेगळी. पण मध्येच येणारे ऋ्र’’ी१२ या गाण्याला खूप वेगळं बनवतात. ‘मिली चमन को बहार हसीं फूल को मिली’, ‘गीत कोयल को मिले और मैंने पायी खामोशी’ या ओळीतली तालाची गंमत अनुभवा. एकूणच अनपेक्षित शब्द, स्वर मांडणी, गूढता या गाण्यात अनुभवायला मिळते, खरं तर, ‘आयी घटा घिर के घटा’ हा दुसरा अंतरा ऐकताना वेगळंच गाणं सुरू झाल्यासारखं वाटतं. यानंतर ्रल्ल३१ स्र््रीूी मधलाच मोठा ऋ्र’’ी१ येतो. लयीचे इतके खेळ या गाण्यात आहेत की ूेस्र्’ी७्र३८ कडे झुकणारं, पण तरी ओढ लावणारं हे गाणं. गुंतागुंतीची रचना असल्यामुळे स्टेजवर क्वचितच भेटणारं. यूटय़ूबवर याचं मूळ बंगाली गाणं- ‘ओ नोदी रे’ हेमंतदांच्या आवाजात ऐकायला मिळतं. जरूर ऐका.
हेमंतदांच्या एकूणच शैलीशी रहस्यमयता कुठेतरी जोडली गेलीय असं वाटून जातं. कारण ‘बीस साल बाद’ असो, किंवा ‘कोहरा’, असे रहस्यमय संगीत देण्यात ते निष्णात होते, ज्याची झलक ‘कोई दूर से आवाज दे’पासूनच आपल्याला मिळाली. ‘झूम झूम ढलती रात’मधलं रहस्य थरारून टाकणारं. आज अशा काही गूढतेकडे झुकणाऱ्या गाण्यांचा आस्वाद घेऊ.
कहीं दीप जले कहीं दिल
(शकील बदायूनी, बीस साल बाद)
एक सतत ँं४ल्ल३ करणारी मेंडोलीनची टय़ून.. लताबाईंचा तो कापत जाणारा आवाज. तेरी ‘कौनसी है मंजिल’ म्हणताना ‘कौनसी’ शब्दाला दिलेला तो वेगळाच फैलाव. ‘दीप’वरची ती जागा. ‘परवानेऽऽऽ’ला ज्या तऱ्हेने हाक येते, ती शहारा आणतेच. आजही ँं४ल्ल३्रल्लॠ गाण्यांचं मुकुटमणी असलेलं हे गाणं आणि ती मेंडोलीनची टय़ून.. फक्त प, ध, ग या तीन स्वरांवर तोललेली..
कोई दूर से आवाज दे..
(शकील बदायूनी, ‘साहब, बीबी और गुलाम’)
एका खोल डोहातून, अनामिक हुरहुर घेऊन येणारा गूढ आवाज. गीता दत्तच्या आवाजातला नखरा, मस्ती आपण अनुभवली होती, पण ही गूढता? वर्षांनुवष्रे नव्हे, युगानुयुगे वाट पाहून थिजलेल्या डोळ्यांची ती छोटी बहू. तिची ‘चले आओ. चले आओ’ ही हाक इतकी काळीज कापणारी, ‘त्या’ मृत्यूपलीकडच्या जगातून आलेली. अत्यंत मोजकी वाद्यं आणि गीता दत्तचा जखमी हरिणीच्या काळजातून येणारा तो आवाज. हे शब्द आणि ही चाल..
दिया बुझा बुझा, नना थके थके
पिया धीरे धीरे चले आओ.. चले आओ
एका आत्म्याचं हे रूदन आहे. वरवरचं नाही. खूप आतून..
ये नयन डरे डरे
(कैफी आझमी, कोहरा)
डोळ्यांत कुठली तरी अनामिक भीती. डोळे कसले? प्रमाथी मद्याचे प्यालेच ते. आकंठ प्यावे आणि सगळं सगळं विसरून हे आयुष्य एका रात्रीत जगावं. तुलाच माहीत नाही तू काय आहेस. ‘जराऽऽ पीने दो’ म्हणताना स्वर वर जाऊन पुन्हा खाली ओघळतो. जणू नशा चढत जाऊन तनामनाला पूर्ण व्यापावी. त्यातच ते व्हायोलीन इतकं सुंदर बिलगलंय प्रत्येक ओळीला..
‘रात हसीं ये चाँद हसीं
तू सबसे हसीं मेरे दिलबर’
लाजत लाजत हे सगळं ती ऐकते आणि ‘और तुझसे हँसी?’ म्हटल्यावर तिथे ते प्रश्नार्थक पाहणं? आणि ‘तुझसे हँसी तेरा प्यार’ म्हटल्यावर पुन्हा लाजणं.. केवळ अप्रतिम!
कहाँ ले चले हो
(राजेंद्र कृष्ण, दुग्रेश नंदिनी)
एक अत्यंत ‘स्वप्निल’, ‘या’ दुनियेतून तिथे दूर, ताऱ्यांच्याही पलीकडे नेणारं गाणं. तुझा हात धरून या सफरीला निघाले तर खरी. कुठे नेतोयस मला? हे कुठलं वेगळंच जग. मला ढगांनी झाकलेली ती धरती दिसतेय. आपण खरंच इतक्या दूर आलो? स्वर्ग म्हणतात तो हाच का?
‘कहां रह गए काफिले बादलों के
जमीं छुप गयी है तले बादलों के
है मुझको यकीं के है जन्नत यहीं है
अजब सी फिजा है अजब ये समा है..’
‘कहाँ रह गए’ म्हणताना लताबाईंचा स्वर खरोखरच आसमंत भेदून विश्वाच्या त्या अनंत अवकाशात घेऊन जातो. तो दिव्य सुगंध. ती वेगळीच हवा. सगळं सगळं जाणवायला लागतं. मन कापसासारखं हलकं हलकं होतं.
‘नजर की दुआ का जवाब आ रहा है
मेरी आरजू पे शबाब आ रहा है
ये खामोशीयां भी है इक दास्तां
कोई कहता है मुझसे मुहब्बत जवां है’
दुसरा अंतरा खालच्या स्वरावर ठेवून अंतर्मुख व्हायला लावणारी जी धून हेमंतदांनी साकारलीय ती केवळ लाजवाब. काही गाणी आपल्याला करमणुकीच्या खूप पलीकडे, उंचावर घेऊन जातात, त्यापकी हे एक गाणं.
(क्रमश:)
कहीं दीप जले कहीं दिल..
नेहमीची चौकट सोडून काही वेगळी गाणी हेमंतदांनी दिली. कुठल्याही एका शैलीला बांधून न घेतल्यामुळे शब्द वेगळ्या ‘मीटर’चे (छंदाचे) आले, तर त्यांना वेगळी ट्रीटमेंट हेमंतदा देऊ शकले. ‘कश्ती का खामोश सफर है’ (गर्लफ्रेंड), किंवा ‘ओ बेकरार दिल’ (कोहरा) अगदी सुरुवातीला दिलेले ‘जय जगदीश हरे’ (आनंदमठ) किंवा ‘हमने देखी है इन आंखों की महकती खुशबू’ (खामोशी) ही उत्तम उदाहरणं.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 02-11-2014 at 05:34 IST
TOPICSहिंदी गाणी
मराठीतील सर्व रहे ना रहे हम बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hindi songs