आज वर्गात शाळेची डायरी वाटली होती. सगळेजण उत्सुकतेनं डायरी चाळत होते. रोहन आणि किशोर मधल्या सुट्टीत भेटले, त्यांनीही डबा खाता खाता डायरीबद्दल जोरदार चर्चा केली. वर्षभरात करायच्या अनेक गोष्टी डायरीमध्ये लिहिलेल्या होत्या. त्यात स्पर्धा होत्या, वेगवेगळे उपक्रम होते, निरनिराळ्या परीक्षा होत्या, वेगवेगळे सण, उत्सव, जयंत्या, पुण्यतिथ्याही होत्या. शालेय विषयांचा अभ्यासक्रम, निबंध, व्याकरण अनेक गोष्टी सामावलेल्या होत्या. आपला वर्ग बदलला, आपण मोठे झालो, पण एवढेही काही मोठे नाही की बाईंनी एवढं काम द्यावं वर्षभरात! किती किती काय काय करायचं?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केवढी यादी आहे डायरीमध्ये! डबा खाऊन झाला तरी चर्चा संपत नव्हती. खेळांच्या किती स्पर्धा, भाषेच्या किती स्पर्धा काय काय आणि काय काय! कसं जमणार?

हेही वाचा – आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : जतन-सुविधेचा सोपा काळ..

संध्याकाळी शाळा सुटल्यावर तिसऱ्या मजल्यावरील वर्गातून खाली उतरतानाही रोहन आणि किशोरमध्ये हीच चर्चा रंगली होती. जोरजोरात बोलत ते दुसऱ्या मजल्यावर आले आणि रोहनला एकदम आजीची आठवण झाली. रोहनने परत एकदा दप्तरातली डायरी काढली. ती किशोरला दाखवत तो म्हणाला, ‘‘अरे, हे तर माझी आजी म्हणते तसं जिना चढण्यासारखं आहे. रोज एक एक पायरीने पुढे गेलो तर कधीच शेवटचा मजला येईल समजणारही नाही. डायरीतल्या गोष्टीही आपल्याला एका दिवसात करायच्या नाहीयेत, वर्षभर रोज थोड्या थोड्या करायच्या आहेत.’’

हेही वाचा – सीमेवरचा नाटककार..

‘‘अरे हो रे, आपण उगाचच घाबरलो. रोज थोडं थोडं काम पूर्ण केलं तर वर्षभरात सगळं सहजच पूर्ण होईल. तुझी आजी खरंच ग्रेट आहे! चला तर उचला पाऊल नि लागा कामाला!’’
joshimeghana.23@gmail.com

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If you do a little work every day you can easily complete a years work ssb