समोरच्या बिल्डिंगमध्ये राहणारे जोशी कालच मला भेटले. डोळ्यांत एक वेगळीच चमक होती. ‘‘बघतेस काय? इन्कम टॅक्सचे झंझट उरकलेसुद्धा.’’ – इति जोशी. थोडी अधिक विचारपूस केली असता त्यांनी नवीन घेतलेल्या आयुर्वमिा पॉलिसीचा २५००० चा पहिला हप्ता भरल्याचे सांगितले. ‘फक्त पाच वष्रे प्रीमिअम भरायला हवा. मग काही पसे द्यायची गरज नाही. पसे लगेच परत काढून घेऊ- पाच वष्रे झाली की..’ जोशींनी अधिक माहिती पुरवली.
जोशींचे वय वष्रे ५८. त्यांच्या एकुलत्या एका मुलीचे लग्न होऊन ती अमेरिकेत. जोशीकाकू तीन वर्षांपूर्वीच स्वेच्छानिवृत्ती स्वीकारून घरी बसल्यात. आणि आता त्यांचा निवृत्तीवेतनचा ओघ चालू. दोन वर्षांनी खासगी कंपनीतून निवृत्त होणाऱ्या जोशींना पॉलिसीचे ‘सरेंडर चार्जेस’ किती, ते माहीत नाहीत आणि पाच वर्षांनी साधारण किती पसे परत मिळणार, हेही माहीत नाही. त्यांना सहज विचारले- ‘आयुर्वमिा काढलात, पण वैद्यकीय विमा आहे का हो तुमच्याकडे?’ जोशींच्या चेहऱ्यावरील प्रश्नचिन्ह बरेच काही सांगून गेले.
नंतर भेटला सर्वानन. वय २३ वष्रे. पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यावर औद्योगिक वापराच्या बॅटऱ्या विकायच्या नोकरीत आणि त्यामुळेच सतत फिरतीवर. ‘‘पप्पाने बोला पोस्ट में एन.एस.सी. खरीदो,’’ इति- सर्वानन. नॅशनल सेिव्हग सर्टिफिकेटच्या छायाप्रती गेल्या मे महिन्यात कार्यालयात जमा करून आयकरविरोधी लढाई जिंकल्याचा अभिमान चेहऱ्यावर ओसंडून वाहणाऱ्या सर्वाननकडे कंपनीने दिलेल्या एक लाख रुपयांच्या विमा संरक्षणाशिवाय इतर विमा नाही.
या दोन टोकाच्या उदाहरणांत एक सामायिक सूत्र आहे. या दोघांचे उद्दिष्ट एकच- आयकर वाचविण्यासाठी पसे गुंतवायचे. खरे तर पसे गुंतवताना आयकर वाचायला हवा, अशी मानसिकता असायला हवी. पण आज बहुतांश मंडळी काय वाटेल ते करू, पण आयकर वाचवा- अशी मानसिकता घेऊन फिरताना दिसतात. अशा मंडळींना एकच गोष्ट अगदी ओरडून सांगावीशी वाटते- ‘माझ्या काय गरजा आहेत?’ या प्रश्नाचे उत्तर शोधा म्हणजे योग्य ती गुंतवणूक करता येईल आणि त्याचबरोबर आयकरही आपसूक वाचेल.
जोशींचे उदाहरण घेऊ. वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांच्यावर कोणीही आíथकदृष्टय़ा अवलंबून नाही. त्यामुळे त्यांना आयुर्वमिा घेण्याची गरज नाही. जर मी सिगारेट ओढत नसेन तर मला सिगारेट घ्यायची गरज नाही. मी दाढी करत नसेन तर मला दाढीचा साबण घ्यायची गरज नाही. त्याचप्रमाणे जर माझ्या नसण्याने कुणाचेही आíथक नुकसान होणार नसेल तर मला आयुर्वमिा घ्यायची गरज नाही- एवढा साधा-सरळ व्यावहारिक विचार करणे आवश्यक आहे. विमा आणि गुंतवणूक या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. त्यावर सविस्तर पुन्हा केव्हातरी. पण एक क्षणभर जोशींनी गुंतवणूक म्हणून विमा घेतला असे म्हणावे, तर जोशींना पॉलिसीमधून पाच वर्षांनी नि किती पसे मिळतील, हे सांगता येत नाही.
जोशींना खरे तर आज दोन गोष्टींची गरज आहे. १. आरोग्यविमा आणि
२. स्थिर उत्पन्न देणाऱ्या साध्या-सरळ गुंतवणुका. आरोग्यविमा त्यांना मन:शांती मिळवून देईल. वाढत्या वयात आरोग्याच्या तक्रारी वाढतात. अशावेळी आरोग्यविमा असलेला बरा. आजारपणात मोठे खर्च होऊन आíथक विपन्नावस्था येण्यापेक्षा विम्याचे संरक्षण केव्हाही चांगले. आरोग्यविम्याचा प्रीमिअम कलम ८० ऊ खाली आयकर वाचवायला उपयुक्त ठरतो. स्थिर उत्पन्न देणाऱ्या गुंतवणुकांमध्ये बँकेच्या पाच वर्षांचे करबचत करणारी मुदत ठेव करायला हरकत नाही. ८.७५% ते ९% व्याज मिळते आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मुदत ठेवीत गुंतवणूकदाराला समजण्यास क्लिष्ट असे काहीच नाही. कलम ८० उ अंतर्गत करवजावट आहे, ती वेगळी.
सर्वानन तरुण आहे. जोखीम घेण्यासाठी योग्य वय आहे. त्याने शेअर बाजारात पसे गुंतवणाऱ्या इक्विटी-लिंक्ड सेिव्हग स्कीममध्ये पसे गुंतवले तर त्याला कलम ८० उ मध्ये करवजावट मिळेलच; पण दीर्घ मुदतीत चांगला भांडवली फायदादेखील होण्याची शक्यता आहे. सर्व तरुण मंडळींनी सगळे पसे जोखीम घेऊन शेअर बाजारात गुंतवावेत असे नाही. पण नोकरदार मंडळींचा काही पसा प्रॉव्हिडंट फंड या सुरक्षित आणि व्याज कमावणाऱ्या गुंतवणुकीत असतोच. वर रिकिरग आणि मुदत ठेवीत आपण पसे गुंतवीत असतोच. त्यामुळे थोडी वाट वाकडी करून इक्विटी-िलक्ड सेिव्हग स्कीमचा विचार करायला हरकत नाही. दुसरे महत्त्वाचे म्हणजे तरुण वयात आयुर्वमिा आणि अपघात विमा दोन्ही असणे आवश्यक आहेत. तरुणांवर त्यांचे आई-वडील, घरातील इतर व्यक्ती आíथकदृष्टय़ा अवलंबून असतात. तरुण वयात साधा टर्म लाइफ इन्शुरन्स जरूर विकत घ्यावा. अत्यंत कमी हप्त्यात मोठे संरक्षण मिळते व कलम ८० उ मध्ये कर- वजावट मिळते. फिरतीच्या नोकरीत अपघात विमा आवश्यक आहेच. अपघातात एखादा अवयव गमावल्यास जीवन जगणे कठीण होते. अशावेळी हा विमा उपयोगी येतो. येथेही प्रीमिअम फार कमी आहे. यावर करवजावट मिळत नाही. तरीही प्रत्येकाने हा विमा विकत घ्यावा.
प्रत्येक चांगली खरेदी तुम्हाला करात वजावट घेऊन येईल असे नाही. गरज असेल तर विमा घ्या किंवा गुंतवणूक करा. आयकर वजावट असली तरी आणि नसली तरीही. आपण जेवताना, श्वास घेताना आयकरात सवलत मिळते का, असा विचार करतो का?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा