निहाल सरिनकडे पाहिलं, तर चिमुकल्या वयापासून त्याने स्वत:ला तळपत ठेवलेले दिसेल. निहालनं नऊ वर्षांखालील आणि ११ वर्षांखालील राज्य अजिंक्यपदे आपल्याकडे राखली. १० व्या वर्षी, राज्य १५ वर्षांखालील मुलांचा उपविजेता बनला. जेमतेम टेबलच्या वर डोके पोचणाऱ्या १० वर्षांच्या निहालला त्याच्याहून वयानं मोठय़ा ११२ जणांशी एकाच वेळी खेळायची संधी देखील मिळाली. त्याने सर्वांना पराभूत करून चकितच केले.

सगळय़ांचे लक्ष चीनमधील आशियाई खेळांकडे लागले असताना, तिकडे अल्बानिया नावाच्या छोटय़ा युरोपियन देशात ‘युरोपियन क्लब कप’ या स्पर्धेत ग्रँडमास्टर निहाल सरीन यानं २७०० इलो रेटिंगचा टप्पा पार केला. हल्ली या आकडय़ाला स्पर्श करणाऱ्यास सुपर ग्रँडमास्टर म्हणतात. निहालनं जरी आत्ता हा मान मिळवला असला तरी अनेकांना तो आत्तापर्यंत २७०० नव्हता याचंच आश्चर्य वाटलं. या जादूई अंकाला स्पर्श करणारा नववा भारतीय खेळाडू आहे.

Shocking video of Kidnapping where a man saved girls life video viral on social media
काळ आला होता पण वेळ आली नव्हती! त्याने तिला जबरदस्तीने व्हॅनमध्ये बसवलं अन्…, अपहरणाचा धक्कादायक VIDEO व्हायरल
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Terrifying video of man crossing railway track fell down from barricade accident video viral
“एक मिनिट वाचवण्याच्या नादात सर्व संपून जाईल…” रेल्वे रुळ ओलांडताना बॅरिकेडवर चढला अन् पुढे जे झालं ते पाहून बसेल धक्का, थरारक VIDEO
Athavale claim chairman of trust running Siddharth college
‘पीपल्स’च्या अध्यक्षपदावर रामदास आठवले यांचा दावा; जुन्या इमारतीच्या नूतनीकरणासाठी ५०० कोटींच्या निधीची मागणी
actor arun singh rana divorce
“मी खचलो होतो”, प्रसिद्ध अभिनेत्याने केली घटस्फोटाची घोषणा; अतुल सुभाषशी स्वतःची तुलना करत म्हणाला, “माझ्या आयुष्यातील…”
Pramod kumar Success Story
Success Story : ‘स्वप्न एका रात्रीत पूर्ण होत नाही!’ केवळ २,५०० केली व्यवसायाची सुरुवात; मेहनतीच्या जोरावर उभारली ५० कोटींची कंपनी
cm Devendra fadnavis loksatta
महाकालीचे दर्शन शुभसंकेत, ठरवल्यापेक्षा मोठे काम होणार – फडणवीस
Bigg Boss Marathi Season 5 Dhananjay Powar answer to troller
“फर्निचरचं दुकान चालवण्यासाठी सर्वसामान्यांची फसवणूक…” म्हणणाऱ्यावर धनंजय पोवार भडकला, म्हणाला, “किती घाणेरडी वृत्ती…”

गेले काही महिने अंगकाठीनं छोटा असणारा निहाल सरीन आपला फॉर्म गमावून बसला होता; आणि त्यामुळे त्याचा आशियाई खेळासाठीच्या भारतीय संघात समावेश झाला नाही. गेल्या चेन्नई ऑलिम्पियाडमध्ये वैयक्तिक सुवर्ण पदक मिळवून आपल्या भारत ‘ब’ संघाला कांस्य पदक मिळवून देणारा निहाल चीनला गेला नाही. यामध्ये त्याचाच नव्हे तर भारतीय संघाचाही तोटा झाला, हे वैयक्तिक स्पर्धेतील आपल्या देशाच्या अपयशावरून लक्षात येतं. पण त्यानं जिद्दीनं युरोपियन क्लब कप खेळायचं ठरवलं आणि तिथं आपल्या संघासाठी चांगली वैयक्तिक कामगिरी केली.

लहानपणीच निहालनं आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेची चुणूक दाखवायला सुरुवात केली होती. केरळमधील थ्रिसूर या गावी त्वचारोगतज्ज्ञ असलेले वडील अब्दुलसलाम आणि मानसरोगतज्ज्ञ आई शिजिन अशा सुशिक्षित कुटुंबात निहालचा जन्म झाला. वयाच्या तिसऱ्या वर्षीच निहालला जगातल्या १९० देशांच्या राजधान्यांची नावं पाठ होती आणि त्यांचे राष्ट्रध्वजही ओळखता येत होतं. त्याच वेळी त्याला अनेक कीटकांची शास्त्रीय नावंही लक्षात राहत होती. निहाल पाच वर्षांचा असताना त्याला सराईतपणे इंग्रजी बोलता येत होतं आणि पहिल्या इयत्तेत गेल्या गेल्या त्यानं १ ते १६ पाढे पाठ करून दाखवले होते. अशा कुशाग्र बुद्धीच्या निहालला सुटीच्या दिवसांत कंटाळा येत असे आणि त्यामुळे त्याच्या आजोबांनी निहालला बुद्धिबळाचा पट आणि सोंगटय़ा आणून दिल्या. बुद्धिबळातील अमर्याद कल्पनांमुळे निहाल त्या विश्वात रमून गेला. राष्ट्रीय खेळाडू मॅथ्यू जोसेफ याने त्याला आठवडय़ातून दोन वेळा येऊन शिकवण्यास सुरुवात केली.

हेही वाचा… ‘बीबी’चा मकबरा!

अवघ्या वर्षभरात निहाल हा केरळ राज्याचा सात वर्षांच्या मुलांचा विजेता झाला आणि एका झगमगत्या कारकीर्दीला सुरुवात झाली. केरळ हे शेजारच्या तमिळनाडू एवढे बुद्धिबळात प्रगत नसले, तरी हरियाणाएवढे मागासलेले राज्यही नव्हे. निहालनं त्यानंतर काही वर्षे नऊ वर्षांखालील आणि ११ वर्षांखालील राज्य अजिंक्यपदे आपल्याकडे राखली. पण त्यानं खरी कमाल केली ती वयाच्या १० व्या वर्षी- राज्य १५ वर्षांखालील मुलांचा उपविजेता बनून. आणि या धक्क्यातून केरळमधील बुद्धिबळप्रेमी सावरतात, तोच त्याने पुरुषांच्या राज्य स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावून खळबळ उडवून दिली. राज्य अजिंक्यपद स्पर्धेतील पहिले चार खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरत असल्यामुळे निहाल त्या वर्षीच्या राष्ट्रीय पुरुषांच्या स्पर्धेतील सर्वात लहान वयाचा खेळाडू बनला. हे तर काहीच नव्हे, त्यानं वयाच्या आठव्या आणि १० व्या वर्षी राज्य जुनिअर (१९ वर्षांखालील) अजिंक्यपद स्पर्धामध्येही उपविजेतेपद मिळवलं होतं.

ही झाली निहालची राज्य पातळीवरील कामगिरी! त्यानं राष्ट्रीय नऊ वर्षांखालील मुलांचं अजिंक्यपद मिळवलं होतं, ते चेन्नईमध्ये- भारतीय बुद्धिबळाचा विम्बल्डन समजल्या जाणाऱ्या गावात आणि तेही प्रज्ञानंदला मागे टाकून. सध्या भारतीय संघामध्ये २७०० रेटिंग मिळवून देदीप्यमान कामगिरी करणारे अर्जुन इरिगेसी, प्रज्ञानंद आणि निहाल गेली १० वर्षे एकमेकांचे कडवे प्रतिस्पर्धी आहेत. निहालची कामगिरी कायम वरच्या दर्जाची राहिली होती. आता हेच बघा- २०१४ साली राष्ट्रीय ११ वर्षांखालील मुलांमध्ये निहाल कांस्य पदक विजेता होता, तर अर्जुन आणि प्रज्ञानंद अनुक्रमे चौथ्या आणि ९व्या क्रमांकावर होते. पुढच्याच वर्षी प्रज्ञानंद ११ वर्षे वयाचा राष्ट्रीय विजेता झाला, पण निहाल दुसऱ्या क्रमांकावर होता. त्या दोघांचा चेन्नई ऑलिम्पियाडमधील कांस्य पदक विजेत्या संघातील सहकारी रौनक साधवानी चौथा आला, तर मुंबईचा ग्रँडमास्टर आदित्य मित्तल आठवा होता. थोडक्यात, पुढे ग्रँडमास्टर झालेले अनेक खेळाडू त्या वेळेपासून एकमेकांशी झुंजत होते.

निहाल सरीन आपल्या प्रखर बुद्धिमत्तेमुळे परिस्थितीचे पटकन आकलन करत असे आणि आपल्या खुर्चीवर बसण्यापेक्षा हिंडण्यात वेळ घालवत असे. कित्येक वेळा तर प्रतिस्पर्ध्याने खूप विचार करून खेळी केली की निहाल उभ्या उभ्या त्याला उत्तर देई. नंतर तो खुर्चीवर बसून आपली खेळी लिहीत असे. या बाबतीत निहाल आणि विश्वनाथन आनंद यांच्यात खूप साम्य आढळतं. दोघेही खेळाडू सुरुवातीला आपल्या जलद खेळामुळे प्रसिद्ध झाले होते. एकदा निहालसाठी मोठं आव्हान देण्यात आलं. जेमतेम टेबलच्या वर डोकं पोचणाऱ्या १० वर्षांच्या निहालला त्याच्याहून वयानं मोठय़ा ११२ जणांशी एकाच वेळी खेळण्याची संधी मिळाली आणि थोडुपुझा या गावी निहालनं हे आव्हान स्वीकारलं. या छोटय़ानं सर्वच्या सर्व डाव जिंकून सगळय़ांना चकित केलं होतं.

वयाच्या ९ व्या वर्षीच त्याची ओळख झाली अरब एमिरातीमध्ये शिकवणाऱ्या ग्रँडमास्टर कॅमरॉवशी आणि तेथून पुढची काही वर्षे कॅमरॉवच्या मार्गदर्शनाखाली निहालच्या खेळाला बहर आला. छोटय़ा निहालला पहिलं आंतरराष्ट्रीय यश मिळालं ते दक्षिण आफ्रिकेत दरबान या गावी झालेल्या जागतिक १० वर्षांखालील मुलांच्या स्पर्धेत. त्या आधी निहालनं २०१३ साली अल एन या अमिरातीमध्ये झालेल्या स्पर्धेत १० वर्षांखालील विद्युतगती सुवर्ण जिंकलं होतं. पुढच्याच वर्षी त्यानं विद्युतगतीपाठोपाठ जलदगती स्पर्धाची अशी दोन सुवर्णपदकं खिशात टाकली होती. पण मानाचं क्लासिकल प्रकारातील सुवर्ण त्याला हुलकावणी देत होतं. ते त्याला दरबानला मिळालं आणि जागतिक संघटनेकडून ‘कॅन्डिडेट मास्टर’ हा किताबही. निहालच्या यशाचा वारू आता चौफेर दौडू लागला.

२०१५ साली ग्रीसमध्ये जागतिक १२ वर्षांखालील मुलांचं रौप्य पदक जिंकून निहालनं आपल्या सातत्याची प्रचीती दिली. त्या वेळी अखेरच्या दोन फेऱ्यांत त्यानं अवंडर लियॉन्ग आणि अब्दुसत्तारोव यांना पराभूत करून सगळय़ांना चकित केलं. यापैकी अब्दुसत्तारोव तर आज जागतिक २७ व्या क्रमांकावर आहे आणि अवंडर हा अमेरिकेचा ग्रँडमास्टर आहे. २०१६ सालच्या स्टोकहोम येथील स्पर्धेत निहाल सरीननं लिथुवेनियाच्या ग्रँडमास्टर रोझेन्थालीस याला ज्या प्रकारे पराभूत केलं, त्या डावाला आयोजकांनी त्या दिवशीचा सर्वोत्कृष्ट डाव म्हणून घोषित केलं.

राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते बालदिनाच्या निमित्तानं निहालचा सत्कार लहान वयात अपूर्व कामगिरी केल्याची पावती म्हणून करण्यात आला. २०१६ या वर्षीच निहाल आंतरराष्ट्रीय मास्टर किताबाचा धनी झाला. आता त्याचं लक्ष होतं ग्रँडमास्टर किताबावर. त्याच्या पहिल्या ग्रँडमास्टर नॉर्मची कहाणी मोठी रंजक आहे. १२ वर्षांचा निहाल नॉर्वेमधील फागेरनेस इंटरनॅशनल स्पर्धेत खेळण्यासाठी आला तो सर्वात लहान खेळाडू म्हणून! बर्फात जवळपास बुडलेल्या निसर्गरम्य हॉटेल स्कँडिक वाल्ड्रेसमध्ये निहालनं अपराजित राहून नुसता आपला पहिला ग्रँडमास्टर नॉर्मच कमावला नाही, तर अनेक ग्रॅण्डमास्टर्स त्याचे चाहते झाले. एक दिवस सकाळी तेथे जलदगती स्पर्धा घेण्यात आली. त्या वेळी तर निहालनं सगळय़ा प्रतिस्पर्ध्याना पाणी पाजून पहिला क्रमांक पटकावला.

हेही वाचा… आदले । आत्ताचे : नखललेलं काळीज..

यथावकाश निहाल सरीन ग्रँडमास्टर झाला आणि ते वर्ष होतं २०१८. त्याला ज्यावेळी टाटा स्टील स्पर्धेसाठी कोलकाता येथे बोलावण्यात आलं तेव्हा निहाल काय करणार याची सर्वांना उत्सुकता होती. त्यानं साक्षात विश्वनाथन आनंदशी बरोबरी साधली त्या वेळी आनंदनं निहालच्या खेळावर स्तुतिसुमनं उधळली. आनंद म्हणाला, ‘‘या मुलाला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे, पण जगज्जेता होण्याची प्रतिभा त्याच्याकडे नक्कीच आहे.’’ त्याच वर्षी जागतिक विद्युतगती स्पर्धेत निहालनं ११वा क्रमांक पटकावला. त्या वेळी पहिल्या ५० बक्षीस विजेत्यांमध्ये तो सर्वात कमी रेटिंगचा खेळाडू होता. जगज्जेत्या मॅग्नस कार्लसननं त्याचं भरभरून कौतुक केलं.

२०२० पर्यंत निहालनं आपली घोडदौड सुरूच ठेवली होती आणि त्याला अक्षयकल्प या कंपनीनं पुरस्कृत करून त्याच्या परदेश दौऱ्यांचा भार उचलला. करोनाकाळात झालेल्या ऑनलाइन ऑलिम्पियाडमध्ये सुवर्ण पदक विजेत्या भारतीय संघाचा निहाल सरीन एक सभासद होता. त्यानंतर chess.com नं घेतलेल्या ऑनलाइन जुनिअर स्पीड चेस चॅलेंज या स्पर्धेचं विजेतेपद त्यानं लीलया जिंकलं. या स्पर्धेत जगातील जवळजवळ सर्व प्रमुख तरुण खेळाडू खेळत होते.

निहालच्या आयुष्यात कलाटणी देणारी एक घटना २०२१ साली घडली. जगातील सर्वोत्कृष्ट १९ जुनिअर खेळाडूंना ज्युडिथ पोल्गर आणि व्लादिमीर क्रॅमनिक यांनी प्रशिक्षणासाठी निवडले आणि अर्थातच त्या प्रतिभावंतांमध्ये निहाल होता. या प्रशिक्षणादरम्यान निवडलेल्या १९ जणांशी एक एक करून मॅग्नस कार्लसन खेळला. निहाल विरुद्ध अवघ्या तीन मिनिटे प्रत्येकी खेळल्या गेलेल्या विद्युतगती डावात जगज्जेता पराभूत झाला. मॅग्नस म्हणाला, ‘‘हा मुलगा म्हणजे एक बंदूक आहे आणि जगातील उत्कृष्ट विद्युतगती खेळाडूंपैकी एक आहे.’’

निहाल २०२१ साली करोनामुळे झालेल्या आंतरराष्ट्रीय बंदी उठल्या उठल्या सर्बियामध्ये गेला. कारण भारतीयांना तेथे व्हिसा लागत नसे. त्यानं सिल्वर लेक ओपन आणि सर्बिया ओपन या दोन स्पर्धामध्ये पहिलं बक्षीस मिळवून पुनरागमन साजरं केलं. भारतात चेन्नई येथे ऑलिम्पियाड होणार म्हटल्यावर तर निहालची वर्णी भारत ‘ब’ संघात लागणार हे उघड होतं. तेथेही दुसऱ्या पटावर सुवर्णपदक जिंकून त्यानं आपल्या संघाच्या कांस्य पदक विजयाला हातभार लावला. लगेच डिसेंबरमध्ये झालेल्या टाटा स्टील इंडिया स्पर्धेत विद्युतगती खेळाचा अनभिषिक्त सम्राट हिकारू नाकामुरा खेळत असताना निहालनं पहिलं बक्षीस मिळवून आपल्या शिरपेचात नवा तुरा खोचला. आता तर त्यानं २७००चा पल्ला पार करून अर्जुन इरिगेसी, प्रज्ञानंद, गुकेश या सवंगडय़ांबरोबर भारताच्या युवा बुद्धिशक्तीत भर घातली आहे.

विश्वनाथन आनंदच्या वेस्टब्रिज आनंद बुद्धिबळ प्रशिक्षण केंद्रात आपलं कौशल्य अधिक धारदार करताना, निहाल सरीन लवकरच आपली छाप आंतरराष्ट्रीय नकाशावर उमटवेल अशी आशा आहे.

gokhale.chess@gmail.com

Story img Loader