महेंद्र पंढरपुरे

निसर्ग, समुद्रकिनारा, संस्कृती, आरामदायी पाहुणचार, वन्यजीवन, साहस, बर्फाळ प्रदेश, अनुकूल हवामान आदींच्या आवडीने पर्यटनासाठी घराबाहेर पडणाऱ्यांसाठी नेहमीची वाट सोडून काही नव्या पाऊलवाटेने जाण्याच्या ऊर्मी आता वाढल्या आहेत. अशांसाठी अनेक पर्यायही पुढे येत आहेत. त्यापैकी दक्षिण आफ्रिका हा देश आपल्या पर्यटनयादीत असायला हवा. या देशातील बहुआयामी पर्यटनाचा अनुभव एकदा तरी घेऊन पाहावा असाच आहे. येथे विपुल वन्यजीवन आहे, विशाल समुद्रकिनारे आहेत, येथल्या लोकसंस्कृतीतील बहुविधता मोठी लोभसवाणी आहे आणि या देशाचा इतिहास व त्याच्या जागोजागी जतन करून ठेवलेल्या खाणाखुणा हादेखील आपले अनुभवविश्व समृद्ध करणारा ठेवा आहे.

proposals for adarsh nagar and bandra reclamation redevelopment project stuck
पुनर्विकासाचा प्रस्ताव लालफितीत; वांद्रे रेक्लेमेशन, आदर्श नगरच्या विकासाला मंजुरीची प्रतीक्षा
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
bus station in Kurla, commuters problem Kurla,
कुर्ल्यातील बस स्थानक बंद केल्याने प्रवाशांना पायपीट
Navi Mumbai city is called the Flamingo City This year arrival of flamingo bired delayed
फ्लेमिंगोंच्या आगमनाची प्रतीक्षाच
Mumbai subway metro, subway metro passengers Mumbai , Mumbai metro,
भुयारी मेट्रोकडे मुंबईकरांची पाठ, दुसऱ्या महिन्यात प्रवासी संख्येत ६८ हजारांहून अधिकने घट
K North Division office, K North Division office inauguration, mumbai, K North Division office mumbai,
मुंबई : के उत्तर विभाग कार्यालय अद्याप सुरू नाही, निवडणुकीच्या तोंडावर घाईघाईत उद्घाटन
Bridge contract signed before land acquisition work of Goregaon Creek project delayed after contractor appointment
भूसंपादनाआधीच पुलाचे कंत्राट, गोरेगाव खाडीवरील प्रकल्पाच्या कामाला कंत्राटदार नेमणुकीनंतरही दिरंगाई
Rabi sowing in the country is on 428 lakh hectares
देशातील रब्बी पेरण्या ४२८ लाख हेक्टरवर; जाणून घ्या, देशभरातील पीकनिहाय पेरणी क्षेत्र

दक्षिण आफ्रिका म्हटले की, साहजिकच तेथील वर्णद्वेष, त्याविरोधात दिले गेलेले लढे.. नेल्सन मंडेला यांचे झंझावाती नेतृत्व आणि वर्णद्वेषाला मूठमाती देऊन त्यांनी रुजवलेली लोकशाही.. महात्मा गांधींना ज्या भूमीत स्वातंत्र्य, अहिंसा आणि सविनय कायदेभंगाची बीजे गवसली तो इतिहास, त्यासाठीचा त्यांचा दृढाग्रह व त्यामुळे चालत्या रेल्वेतून त्यांना ढकलून दिले गेले तो प्रसंग.. तेथील आदिम काळापासून चालत आलेली बहुरंगी लोकसंस्कृती.. हत्ती, झेब्रा, जिराफ, रानगवा, गेंडा, चित्ता यांचा अधिवास असलेली वनसंपदा.. हे असे किती काही आठवते! त्याबरोबरीनेच उपासमार, गरिबी, बेरोजगारीचा कलंक या देशाच्या ललाटावरून पुसला गेलेला नाही, या वास्तवाची जाणीव करून देणारी तेथील बकाल वस्त्यांची कृष्णचित्रे डोळ्यासमोर झळकू लागतात. गुन्हेगारीचा टक्का या देशात अंमळ जास्त आहे याची आठवण करून दिली जाते. अशा काही कारणांनी आपल्या पर्यटनाच्या यादीत दक्षिण आफ्रिकेला वरचे स्थान तसे नव्हतेच. सिंगापूर, बँकॉक, दुबई, मलेशिया, श्रीलंका आदींच्या पलीकडे जायचे म्हटले, की युरोप, अमेरिका खुणावू लागते. निसर्ग, समुद्रकिनारा, संस्कृती, आरामदायी पाहुणचार, वन्यजीवन, साहस, बर्फाळ प्रदेश, अनुकूल हवामान, प्रवासाच्या चांगल्या सुविधा, स्वच्छ व आरोग्यदायी राहणीमान अशांची पूर्तता होत असल्याने प्राधान्यक्रमावर ही ठिकाणे अग्रभागी राहतात. आणि नेमकी हीच संधी पाहून दक्षिण आफ्रिकेचे पर्यटन विकसित करता येईल याचे भान तेथील प्रशासनाला आले आणि त्या अनुषंगाने पर्यटनाचा विस्तार केला गेला.

वर्णद्वेषामुळे दक्षिण आफ्रिकेपासून इतर जग काहीसे अंतर राखून होते. विसाव्या शतकाच्या अखेरीस वर्णद्वेषास मूठमाती दिल्यानंतर आलेल्या सरकारांनी तेथील पर्यटनास चालना देण्याचे धोरण ठेवले आणि हळूहळू हा देश जागतिक पर्यटनाच्या नकाशावर ठळकपणे नोंदला गेला. सुमारे बारा लाख चौरस किलोमीटरचे भूक्षेत्र, त्यापैकी ३५ टक्के विपुल वनसंपदा व खनिजांची रेलचेल, तब्बल अडीच हजार किलोमीटरहून अधिक सुमुद्रकिनारा आणि अवघी सव्वापाच कोटी लोकसंख्या एवढेसारे असताना पर्यटनाला अधिक वाव मिळणे साहजिकच होते. त्यासाठीची आवश्यक ती पायाभूत यंत्रणा सरकारने लगोलग उभी केली. मुख्यत: देशातील प्रमुख शहरे हवाईमार्गे जगाशी जोडली. जोहान्सबर्ग, केपटाऊन, डरबन येथील विमानतळांवर परदेशी पर्यटकांचा राबता आता वाढला आहे. देशांतर्गत वाहतुकीसाठी पोर्ट एलिझाबेथ, जॉर्ज, ईस्ट लंडन आदी शहरांतील विमानतळे विकसित केली गेली आहेत.

ईस्टर्न केप, फ्री स्टेट, ग्वाटेंग, क्वाझुलू नाताल, लिम्पोपो, उम्पुमालांगा, नॉर्दर्न केप, नॉर्थ वेस्ट, वेस्टर्न केप अशा नऊ परगण्यांत विभागलेल्या दक्षिण आफ्रिकेचे पर्यटन प्रामुख्याने ग्वाटेंग, क्वाझुलू नाताल, ईस्टर्न व वेस्टर्न केप या विभागांतच मोठय़ा प्रमाणावर विकसित झाले आहे. जोहान्सबर्ग, प्रिटोरिया, डरबन, केपटाऊन, पोर्ट एलिझाबेथ ही पर्यटनसमृद्ध शहरे या परगण्यांत वसली आहेत. दक्षिण आफ्रिकेतील वास्तव्यात जोहान्सबर्ग (ग्वाटेंग), पोर्ट एलिझाबेथ (ईस्टर्न केप) व पर्यटकांचे आकर्षण ठरलेले केपटाऊन (वेस्टर्न केप) या ठिकाणांना पर्यटक म्हणून भेट देण्याची संधी मिळाली. जोहान्सबर्ग ते पोर्ट एलिझाबेथ हा विमानप्रवास सोडला, तर या विस्तीर्ण भूभागांतून गाडीने प्रवास केला. शेकडो एकरांत पसरलेली शेती, पर्वतरांगा, दऱ्या-घाट व अनेकदा एका बाजूने समुद्राची साथ घेत चाललेले रस्ते आणि वाटेत ठिकठिकाणी स्वागतशील टुमदारे गावे यांमुळे हा प्रवास दक्षिण आफ्रिकेची मोहक स्मृती मनात साठवणारा ठरला.

जोहान्सबर्ग ही या देशाची आर्थिक राजधानी. आपल्या मुंबईसारखी. भारतीयांना द. आफ्रिकेची ओळख ज्या दोन-चार शहरांपुरती मर्यादित होती, त्यापैकी हे एक. केप ऑफ गूड होप, डरबन, प्रिटोरिया ही नावे कधीमधी ऐकलेली. आपला पहिला मुक्काम जर जोहान्सबर्ग शहरात असेल तर द. आफ्रिकेच्या ज्ञात इतिहासाची उजळणी सुरू होते, हे लक्षात घ्यावे. पर्यटनासाठी तसे केपटाऊन हे बहुआयामी व अनेकांसाठी गंतव्यस्थान असले, तरी जोहान्सबर्गची भेट आपल्या अनुभवाला अधिक समृद्ध करून जाते. दिल्ली राजधानी असली तरी मुंबई टाळून भारताचा फेरफटका पूर्ण होऊ शकत नाही, तसे जोहान्सबर्गला वळसा घालून केलेले द. आफ्रिकेचे पर्यटन पूर्णत्वास जात नाही. या शहराला द. आफ्रिकेच्या स्थित्यंतरात अनन्यसधारण महत्त्व आहे, हे तेथे जतन केलेल्या अनेक स्मृतिस्थळांनी अधोरेखित होते. अर्थात, त्याला काळी किनार आहे ती वर्णद्वेषाच्या त्या कृष्ण इतिहासाची आणि गुलामगिरीच्या भयस्वप्नाची. कृष्णवर्णीयांना या शहरातील अनेक भागांत प्रवेश नव्हता. ‘परमिट राज’ होते. त्या विपरीत कृत्य करणाऱ्यांसाठी अनन्वित अत्याचाराची योजना असलेले तुरुंग आजही राष्ट्रीय स्मारके म्हणून जतन केलेले आहेत. कृष्णवर्णीय महिलांसाठीची कारागृहे आज दाखवण्याची बाब बनली असली, तरी तेथे उमटून गेलेल्या वेदनांचे आर्त नि:शब्द करतात. येथे फिरताना गाइडने एक कोपरा दाखवला. तेथे पाच-सात चौथरे होते. गुलामांची तेथे विक्री चाले असे तो सहजपणे सांगून गेला. अंगावर शहारेच उमटले. गाडी थांबवून त्यातील एका चौथऱ्यावर उभे राहून पाहिले. आज एका कोपऱ्यात पडलेले ते चौथरे काल-परवापर्यंतच्या इतिहासात कातडीच्या रंगांचा बाजार मांडत होते याची पुसटशीही वेदना शहराच्या बदलाच्या आवर्तात कोठेतरी लोप पावताना आढळली. समोरची राजधानीय वर्दळ आपल्याच धुंदीत होती. त्याच धुंदीत शहराच्या एका टोकाला आलो. येथे पूर्वी सोने-हिऱ्यांच्या खाणी होत्या. त्या काळी वापरली जाणारी अजस्र यंत्रे, रेल्वे मार्ग, त्याची प्राथमिक अवस्थेतील कोळशावर चालणारी इंजिने, मालडबे असे खूप काही प्रदर्शनांत मांडावे तसे चौका-चौकांत हारीने मांडले आहे. चकाचक दिसणारा तो भाग आता भल्याथोरल्या व्यावसायिक इमारतींनी व्यापला आहे. पण तरीही कानात ऐकू येते ते तेच नि:शब्द आर्त.. गुलामगिरीत पिचताना न उमटू शकलेले!

जोहान्सबर्गच्या या आखीवरेखीव पर्यटनस्थळांना भेट देत आपण फिरत असतो. वाटेत स्थानिक बाजारपेठ लागते. रस्त्यावरील या बाजारात खरेदी करताना मोठा मजा येतो. हस्तकलांपासून ते कपडे, चामडय़ाच्या वस्तू, बूट, पादत्राणे, नकली दागिने यांनी बाजार भरलेला असतो. तुमच्या सौदेबाजीच्या कसबावर किमती ठरतात. या खरेदीला थोडे आटोपते घेऊन शहरातील नेल्सन मंडेला यांच्या घराला आवर्जून भेट द्यावी. विलाकाझी स्ट्रीटवर हे ‘८११५’ या घर क्रमांकाने ही वास्तू पूर्वीसारखीच राखली आहे. तेथला व्यावसायिक माहोल आणि स्थानिकांचे अतिरेकी दिखाऊ अप्रूप बाजूला ठेवून त्या छोटेखानी घरात वावरावं. ‘मदिबा’च्या (मंडेलांना प्रेमाने ‘मदिबा’ असे संबोधतात) वापरातील अनेक वस्तू तेथे आहेत. त्यांच्या कालखंडाचे चित्ररूप प्रदर्शन मांडलेले आहे. मंडेलांना मिळालेले विविध पुरस्कार कपाटांत ठेवलेले आहेत. मंडेलांच्या वास्तव्याचा भाग असलेली ती वास्तू अल्पावधीतच भारावून टाकते. या घराच्या प्रथम दर्शनाने पुण्यातील महात्मा जोतीराव फुले यांचे राष्ट्रीय स्मारक झालेले घर आठवले. तसेच छोटेखानी आणि स्फूर्तिदायी!

जोहान्सबर्गमधील ‘गांधी स्क्वेअर’ या भागाला भारतीयांनी भेट द्यावीच. महात्मा गांधी यांच्या नावाने ओळखला जाणारा हा चौक आज एक व्यावसायिक आस्थापनांचे आगार आहे. महात्मा गांधी वकिली करीत असताना त्यांचे कार्यालय याच भागात होते, म्हणून देशाच्या नव्या राजवटीने या चौकात महात्मा गांधी यांचा पुतळा उभा करून या भागाचे ‘गांधी स्क्वेअर’ असे नामकरण केले. गांधीजींचा पुतळा म्हटले की, आपल्यासमोर नेहमी येणारी त्यांची उघडी कृश देहयष्टी, डोळ्यांवर गोल चष्मा, डोळ्यांत करुणाभाव व हातात काठी अशी प्रतिमा उभी राहते. इथला पूर्णाकृती पुतळा मात्र वेगळाच आहे. तो तरुणपणीच्या गांधींचा आहे आणि वकिलाच्या पेहरावातील आहे. शहरातील मुख्य बसस्थानक, बाजारपेठा व बाजूलाच पन्नास मजली ‘कार्लटन सेंटर’ ही इमारत या पार्श्वभूमीवरचा हा पुतळा तरीही लक्ष वेधून घेतो.

जोहान्सबर्गमध्ये इतिहासाची अनुभूती घेतल्यानंतर जावे ते शेजारील प्रिटोरियात. ही देशाची प्रशासकीय राजधानी. राष्ट्राध्यक्षांचे कार्यालय व निवासस्थान येथे आहे. देशातील प्रमुख विद्यापीठ व शैक्षणिक संस्थाही येथील विस्तीर्ण जागेत आहेत. प्रशासकीय मुख्यालय असलेली ‘युनियन बिल्डंग’ ही दगडी वास्तू  तिच्या भव्यतेने व रचनेमुळे डोळ्यांत भरून राहते. या वास्तूसमोरील बागेत नेल्सन मंडेला यांचा सुमारे नऊ मीटर उंचीचा ब्राँझमध्ये घडवलेला पूर्णाकृती पुतळा आहे. दोन्ही हात फैलावत सगळ्यांना आपलेसे करणारी त्यांची ही प्रतीमा समर्पक ठरते. आपल्याकडे लग्नानंतर नवे जोडपे जसे देवदर्शनाला देवळात जाते, तसे येथील कृष्णवर्णीय नवदाम्पत्ये आशीर्वादासाठी वऱ्हाडासह या पुतळ्याच्या पायाशी येताना दिसतात.

जोहान्सबर्ग, प्रिटोरिया या शहरांच्या भेटींनंतर द. आफ्रिकेतील आपला प्रवास सुरू होतो तो येथल्या जंगलांकडे, समुद्राकडे आणि संस्कृतीत रममाण असलेल्या लोकजीवनाकडे! जोहान्सबर्गहून एकीकडे तुम्ही डरबनला जाऊन पुढे महात्मा गांधी यांना जेथे रेल्वेगाडीतून ढकलून दिले गेले त्या पीटरमारित्झबर्ग स्थानकाला भेट देऊन नंतर क्रूगर नॅशनल पार्क या अभयारण्याकडे जाऊ शकता. आम्ही मात्र विमानाने पोर्ट एलिझाबेथ या शहरात दाखल झालो.

पोर्ट एलिझाबेथ हे बंदराचे शहर. पोर्तुगिजांची एकेकाळची वसाहत. त्यामुळे त्यांचा समुद्री व्यापारावर नेहमीच वरचष्मा राहिलेला. पुढे ब्रिटिशांनी या शहरावर ताबा मिळवला. पहिला गव्हर्नर रुफेन शॉ डाँकिनने आपल्या दिवंगत पत्नीचे नाव या शहराला दिले. ही एलिझाबेथ मरण पावली तेव्हा भारतात होती. ती कधीच येथे येऊ शकली नाही, मात्र तिचे नाव या सुंदर शहराला लाभले आहे! येथल्या रेल्वे स्थानकाच्या दारांत उभा असलेल्या ‘कॅम्पलाइन टॉवर’वरून शहरावर नजर फिरवावी. वेगवान वाऱ्यामुळे ‘विंडी सिटी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या या शहराच्या समुद्रकिनाऱ्याला नेल्सन मंडेला यांचे नाव देण्यात आले आहे. समुद्राच्या लाटांवरील सर्फिग आणि किनाऱ्यावरील वाळूच्या छोटेखानी टेकडय़ांवरून करता येणाऱ्या सँड बोर्डिगची गंमत या शहराकडे तरुणाईला आकर्षित करते.

इथले समुद्रपर्यटन आपली थेट महाकाय व्हेल माशाशीच गाठ घालून देते. यांत्रिक बोटीतून किनारा सोडला, की आधी भेटतात डॉल्फिन माशांचे कळप. आपल्या आजूबाजूने अनेक कला करीत ते आपली सोबत करत असतात. जसजसे आपण खोल समुद्राकडे जाऊ लागतो, तसे हे डॉल्फिन मागे राहतात आणि आपण व्हेल माशाच्या दर्शनाची आस धरतो. बोटीवरील खलाशी व्हेलच्या ‘फूटप्रिंट्स’चा माग काढत बोट हाकत असतात. त्याच्या या दर्शनासाठी आपल्या संयम आणि प्रतीक्षेची कसोटी लागलेली असते. खोल समुद्रात अत्यंत वेगाने इकडून तिकडे जाणारे ते महाकाय धूड अचानक कधीतरी पाण्यातून वर प्रगटते. व्हेल माशाच्या जोडीचा पाण्यात चाललेला पाठशिवणीचा खेळ मग कितीतरी काळ चालू होता.

सागरी सफरीचा हा अनुभव घेतल्यानंतर थेट जावे ते जंगलात! जगाच्या अरण्य-दर्शन नकाशावर द. आफ्रिका अग्रस्थानी आहे. किंबहुना द. आफ्रिका म्हटले की, आपल्याला जंगल आणि तिथले उघडे-नग्न आदिवासीच डोळ्यासमोर येत. या देशातील खबरबात फारशी बाहेर येत नव्हती, तेव्हा ऐंशीच्या दशकात आलेल्या ‘द गॉड्स मस्ट बी क्रेझी’ या चित्रपटाने ही धारणा अधिकच पक्की केली होती. कलाहारीच्या वाळवंटातील ती चित्रकथा त्यातील प्रहसनाने आजही पाहावीशी वाटत राहते. पण आता हा देश खूप बदलत आहे. वनदर्शनात तर तो खूपच पुढे गेला आहे. येथील  ‘क्रूगर नॅशनल पार्क’ हे जंगलसफारीचे प्रमुख आकर्षण आहे आणि अन्य काही ठिकाणेही सरकारने विकसित केली आहेत. असे असले तरी येथील खासगी मालकीची अभयारण्ये तितकीच मोठी व सुसज्ज आहेत. अशी किमान १५ खासगी अभयारण्ये देशात असल्याचे सांगितले गेले. ईस्टर्न केपमधील ईस्ट लंडन शहरानजीकच्या ‘इन्केक्वेझी’ अभयारण्यातील दोन दिवसांचा मुक्काम जंगलाचा पुरेपूर अनुभव देऊन गेला. इथल्या घनदाट जंगलात उभ्या केलेल्या सुसज्ज राहुटय़ांत राहणे जसे विस्मयकारक होते, तसेच जंगलात उघडय़ा गाडीतून मारलेला फेरफटका उत्कंठावर्धक होता. या प्रवासात पांढऱ्या सिंहाचे अगदी सहकुटुंब जवळून दर्शन झाले. १०० चौरस कि.मी. परिसरात विस्तारलेल्या या अभयारण्यात ‘बिग फाइव्ह’ आहेत. यापैकी चित्ता दिसला नाही, मात्र पांढरा सिंह, झेब्रा, जिराफ, काळा गेंडा, रानम्हशी अन् आफ्रिकन हत्ती हे प्राणी मुक्त वातावरणात जवळून पाहता आले. पक्षांच्या तर कितीतरी प्रजाती येथे पाहायला मिळतात. रात्री जंगलात शेकोटी पेटवून केलेले सहभोजन लक्षात राहते.

जंगल मनसोक्त अनुभवल्यानंतर येथून गाडीने थेट जावे ते केपटाऊनला! वाटेत जंगल, पर्वत, नद्या आणि समुद्र यांची साथ असते.  वाटेत थांबून वायनरीला अवश्य भेट द्यावी. येथे पर्यटकांसाठी वायनरीमध्ये अनेक सुविधा उपलब्ध आहेत. वाइन कशी बनवली जाते, हे तर दाखवले जातेच; पण द्राक्षांच्या मळ्यातून क्वाड्रा बाइकवरून फेरफटका मारण्यातील गंमतही अनुभवायला मिळते.

असे वेगवेगळे अनुभव गाठीशी बांधत केपटाऊनला पोहचावे. ही या देशातील पर्यटनाची पंढरीच. समुद्राकाठची आलिशान घरे व हॉटेल्स, मोठमोठे मॉल, तेथे अविरत चालू असलेली मौजमजा यांत गुंतून पडायचे, की बाहेर पडून टेबल माउंटनवर जाऊन पॅराग्लायडिंग करायचे, हे ज्याचे त्याने ठरवावे. खराब हवामानामुळे पॅराग्लायडिंग करता आले नाही, पण त्याच्या बदल्यात हेलिकॉप्टरमधून केपटाऊन शहरावरून मारलेली चक्कर कायम स्मरणात राहील! अशी चक्कर मारण्यासाठी येथे हेलिकॉप्टर्स सदैव तयार असतात. आकाशातून शहराचा नजारा और दिसतो! विशेषत: क्रिकेटचे ते गोलाकार स्टेडियम लक्ष वेधून घेते. याच सफरीत बंदराशेजारील ‘रॉबिन आयलंड’ दिसले. नेल्सन मंडेला यांना येथेच बंदिवासात ठेवले गेले होते. मंडेला बंदिवासातून सुटल्यानंतर त्यांचे पहिले आगमन याच शहरात झाले. तेव्हा तेथील रहिवाशांनी रस्त्याच्या दुतर्फाची घरे विविध रंगांत रंगवून काढली. आजही ती त्याच दिमाखात आणि रंगांत उभी आहेत. लाडक्या नेत्याच्या स्वागताच्या त्या स्मृती त्यामुळे ताज्या राहिल्या आहेत.

नेहमीची वहिवाट सोडून नवी वाट चोखाळण्यातील खुमारी दक्षिण आफ्रिकेच्या पर्यटनात ओतप्रोत भरलेली आहे. ती एकदा तरी अनुभवावी. आठवणींचा खजिना असाच भरायचा असतो.

अविस्मरणीय बंजी जम्प

साहसाची तयारी आणि ते करण्यासाठीचे धाडस असलेल्यांसाठी जगभरात अनेक बाबी खुणावत असतात. द. आफ्रिकेतील ‘बंजी जम्प’ ही त्यातलीच एक! जगभरातील अनेकांच्या ‘बकेट लिस्ट’मध्ये स्थान मिळवलेली आहे. केपटाऊनकडे जाताना वाटेत ‘तित्सित्कामा’ हा विलक्षण सुंदर प्रदेश लागतो. पाण्याची लयलूट असलेला हा भाग निसर्गाने मढलेला आहे. येथील दरीतून ‘ब्लाऊक्रान्स’ नदी वाहते. दोन बेलाग डोंगरांच्या दरीतून वाहणाऱ्या या नदीवर एक मोठा पूल बांधण्यात आला आहे. ईस्टर्न आणि वेस्टर्न केपला जोडणाऱ्या पुलावरून खाली दरीत २१६ मीटपर्यंत दोराच्या साह्य़ाने झेप घेणे एकवेळ जमून जाते; पण तिथवर जाईपर्यंतच अनेकांचे अवसान गळते. तरीही खंबीर मनाने हा पाच-सात मिनिटांचा थरार अनुभवावाच. पूल आणि दरीच्या मधोमध आपण उलटे लटकत असतो तेव्हा जाणवणारी शांतता पराकोटीची असते. मनातील धाकधूक ते मन:शांती ते मन:पूत आनंद हे सारे मनोविभ्रम या पाच-सात मिनिटांत उल्हसित करून जातात.

मराठी मोहर

द. आफ्रिकेत जाऊन अनेक भारतीयांनी व्यापारउदिमांत बस्तान बसवले आहे. केपटाऊनमधील वास्तव्यात एका मराठी माणसाच्या हॉटेलची माहिती मिळाली आणि थेट तेथे जाऊन आलो. केपटाऊनच्या मुख्य रस्त्यावरील ‘व्हिंटेज इंडिया’ हे उपाहारगृह सुधीर विचारे या कोकणातील हरहुन्नरी माणसाने सुरू केले आहे. मुंबईच्या चाळीत राहणारे सुधीर त्याकाळी पडेल तसे व्यवसाय करीत. जरा पुंजी जमली की, ते थेट दोन-चार बॅगा भरून सौंदर्य प्रसाधने व इतर गोष्टी घेऊन डरबनमध्ये येत. तेथील फूटपाथवर मालाची ते विक्री करीत. अशाच फेऱ्यांतून पुढे त्यांनी डरबनमध्ये पहिले भारतीय उपाहारगृह सुरू केले. नंतर जोहान्सबर्ग, केपटाऊन अशा चार शहरांत त्यांनी मोठी हॉटेल्स उभारली. सुधीर विचारे यांचे अलीकडेच निधन झाले. त्यांनी सुरू केलेल्या व्यवसायाची धुरा त्यांचे पुत्र पार्थ व कन्या जोनाकी वाहत आहेत.

mahendra.pandharpure@expressindia.com

Story img Loader