विद्युत भागवत

‘गांधी, विनोबा आणि जयप्रकाश’ हे मिलिंद बोकील यांनी लिहिलेले पुस्तक यंदा जूनमध्ये प्रकाशित झाले.गांधी, विनोबा आणि जयप्रकाश या तीनही विचारवंतांना आजवर कोणीही ‘लडिवाळ महापुरुष’ असे संबोधन वापरले नसेल. परंतु लेखकाने त्यांच्या कडेवर बसून भावी जग पाहण्याचा विचार केला आहे.

mrunal thakur marathi film sangeet manapman review
सुबोध भावेच्या ‘संगीत मानापमान’ सिनेमासाठी अभिनेत्री मृणाल ठाकूरची पोस्ट, म्हणाली…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
स्वामी विवेकानंद यांनी पाश्चिमात्य देशांना हिंदू धर्माची ओळख कशी करून दिली? (फोटो सौजन्य इंडियन एक्स्प्रेस)
स्वामी विवेकानंद यांनी पाश्चिमात्य देशांना हिंदू तत्वज्ञानाची ओळख कशी करून दिली?
shikaayla gelo ek marathi drama review
नाट्यरंग : शिकायला गेलो एक! व्यंकूची ‘आज’ची शिकवणी
Sudhir Mungantiwar Devendra Fadnavis (1)
निमंत्रण पत्रिकेत शेवटी नाव, मुनगंटीवार नाराज? फडणवीस खुलासा करत म्हणाले, “आम्ही वाघ व वारांचा…”
Mahatma Gandhi Laxman Shastri Joshi British Railways
तर्कतीर्थ विचार: महात्मा गांधींच्या सहवासात…
तर्कतीर्थ विचार: तर्कतीर्थांचे वेदाध्ययन
kangana ranaut makeup indira gandhi prosthetic make up
कंगना रणौत ते माजी पंतप्रधान इंदिरा गांधी; असं झालं ट्रान्सफॉर्मेशन, प्रोस्थेटिक मेकअपची कमाल; व्हायरल झाला व्हिडीओ

जयप्रकाश नारायण आणि विनोबा भावे यांच्या विचारांचा अभ्यास करताना लेखकाला महात्मा गांधी नावाचा भव्य वटवृक्ष त्यामागे उभा आहे याची जाणीव आहे. म्हणूनच त्यांनी या तीन विचारवंतांना एकत्र आणताना आपल्याला जाणवलेली त्यातली सूत्रे निर्भयपणे मांडली आहेत. लेखकाच्या शब्दांत सांगायचे तर – ‘गांधी, विनोबा आणि जयप्रकाश मिळून विसाव्या शतकातील भारतीय विचारदर्शनाचा आणि सामूहिक कृतीचा एक भव्य आलेख समोर येतो.’ या भव्यतेने स्तिमित होऊन लेखकाने हे पुस्तक लिहिले आहे. या विचारवंतांचे उद्देश पूर्णत्वाला गेले नाहीत याचा दोष पुढच्या पिढीला लागू होतो, अशी मांडणी बोकील करतात. त्यांनी मनोगतामध्येच- ‘कोणत्याही एका ठरावीक चौकटीतून साचेबंद विचार करण्याऐवजी अभिनव आणि विशाल बुद्धीने विचार व्हावा यासाठी हा खटाटोप’ केल्याचे म्हटले आहे.

पहिले प्रकरण ‘गांधी’ या शीर्षकाचे आहे. गांधी काय म्हणतात, हे समजून घेण्यासाठी लेखकाने मुळातून गांधीविचार वाचला आहे. परंतु गांधींची आत्मकथा त्यांच्या मनाचे दर्शन कशी घडवते, हे त्यांनी विनोबा भावे यांच्या लिखाणातून समजून घेतले आहे. गांधींवरचे हे प्रकरण सत्य, अहिंसा आणि त्या चौकटीतील सत्याग्रह (तोही अहिंसक) या विषयी भाष्य करते. तसेच गांधी नेमके भगवद् गीतेला काय मानत होते, या विषयीचे विवेचन करते. गांधींना भारतातील अगदी दुबळ्या माणसांनासुद्धा बलदंड माणसांशी प्रतिकार करण्यासाठी आत्मिक बळ द्यायचे होते. त्यासाठी त्यांनी स्वदेशी व असहकार ही शस्त्रे वापरली. लेखकाच्या मते, अहिंसक सत्याग्रहाद्वारे नवीन परंपरेचे बीज निर्माण करून गांधींनी आध्यात्मिक दृष्टीने स्वातंत्र्य चळवळ चालवली. गांधींची ‘सर्वोदय’ ही संकल्पना, यंत्र-उद्योग तसेच स्वदेशी आणि स्वराज्य यांविषयीच्या त्यांच्या मतांबद्दल सोप्या शब्दांत लेखकाने मांडणी केली आहे. गांधींच्या धर्मामागे असलेला नीतिमत्तेचा अर्थही लेखकाने सोप्या भाषेत उलगडून दाखवला आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे म. गांधींनी विलक्षण धर्याने सत्याचे प्रयोग केले आणि त्यातून लैंगिकता हा विषय वैयक्तिक गोष्ट न मानता सामाजिक चच्रेचा विषय बनवला, याकडेही लक्ष वेधले आहे.

दुसऱ्या प्रकरणात विनोबा भावे यांच्या विचारांचा वेध घेतला आहे. विनोबांना ‘दुसरा ज्ञानेश्वर’ मानून एका वेगळ्या दृष्टीने त्यांच्याकडे पाहिले आहे. गांधींच्या शिकवणुकीचा विस्तार करणारे, भूदान आंदोलनाचे जनक आणि ‘गीताई’कार – गीतेचे भाष्यकार विनोबा या प्रकरणात वाचकांना भेटतात. या प्रकरणाचे वैशिष्टय़ असे, की विनोबांनी ‘विज्ञान’ या शब्दाचा लावलेला विशाल अर्थ लेखकाने उलगडून दाखवला आहे. युरोपात धर्म आणि विज्ञान यांच्यात जसा संघर्ष झाला व वैज्ञानिकांचा छळ झाला तसा भारतात झाला नाही, यावर भर देत विज्ञान आणि अध्यात्म याबद्दल पुस्तकात चर्चा येते. ‘हिंदू धर्म मुळातच मानव धर्म आहे. त्यात एकच एक ग्रंथ-पंथ-संस्थापक नाही; इतकेच नव्हे, तर हा धर्म एका विशिष्ट भूमीशीही जोडलेला नाही म्हणून सार्वभौम आहे’ असे विनोबा मांडतात. लेखकाला विनोबांचा हा विचार आताच्या काळात महत्त्वाचा वाटतो. लेखकाने सर्वोदयाच्या सिद्धांताला नव्या पातळीवर अर्थ देण्याचा प्रयत्न केला आहे. भूदान कल्पनेमागे जी क्रांतिकारकता आहे ती निसर्गनिर्मित साधनसंपत्ती कोण्या एका व्यक्तीच्या मालकीची असू नये अशी आहे, असे बोकील मांडतात.

या पुस्तकातील शेवटचे प्रकरण जयप्रकाश नारायण यांच्या विचार आणि चळवळीसंदर्भात येते. लेखकाला जयप्रकाश नारायण महत्त्वाचे आणि वैचारिकदृष्टय़ा प्रेमाचे का वाटतात, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. लेखक म्हणतात, ‘तरुण पिढीला तुमच्या समोरचे प्रश्न हे बेकारीचे, शिक्षणाचे, महागाईचे आणि अधिकारशाहीचे आहेत हे सर्वच जण सांगतात. पण तरुणांच्या पुढचे प्रश्न आध्यात्मिक असतात हे सांगणारे जे.पी. हेच एकमेव नेते होते.’ या आध्यात्मिकतेचा आधार चित्तशुद्धी आहे आणि मनशुद्धीपेक्षाही चित्तशुद्धी ही लेखकाला महत्त्वाची वाटते.

राजकीय पटलावर काम करणाऱ्या विचारवंतांचा हा असा वेध घेणे लेखकाच्या दृष्टीने जरी आवश्यक असला तरी एकूण यातून काय साधते, असा प्रश्न वाचक म्हणून मनात रेंगाळतो. मनात येते की, बोकिलांना एकूणच सर्व विचारवंत भारतीय चौकटीत पुरुषच का असतात, हा प्रश्न का पडत नाही? स्त्री चळवळीच्या तीन लाटा बोकिलांच्या पिढीनेही पाहिल्या, त्यातून ते काहीच शिकले नाहीत का? मन, चित्त, शुद्धी, सत्य, अिहसा हे शब्द अशा तऱ्हेने अनतिहासिक आणि तोच तो अर्थ असणारे ते कसे मानू शकतात? महात्मा गांधींच्या चळवळीतून विचार करून उभ्या राहणाऱ्या  प्रेमा कंटक या स्त्रीचा विचार करावासा वाटत नाही का? छात्र युवा संघर्ष वाहिनीच्या कार्यकर्त्यांना ज्या मानसिक समस्या आल्या, त्याबद्दल भाष्य करावेसे का वाटत नाही? इतकेच नाही, तर अध्यात्म आणि विज्ञान यांच्यातील एकत्वाला महत्त्व देताना आपल्याकडे विज्ञान आणि धर्म यांच्यात संघर्ष न होण्यातून झालेले नुकसान त्यांना पाहावेसे का वाटत नाही? म्हणजे, विज्ञानाच्या वाटचालीत आडव्या येणाऱ्या स्त्रियांना चेटकिणी म्हणून जाळले जाणे हे वास्तव होते; म्हणूनच तेथे स्त्रीवादी विचार धारदारपणे आला, हे लक्षात घ्यायला नको का? आपल्याकडे सुईणींना वसाहतवादाच्या छायेखाली अडाणी व मागास ठरविले गेले आणि विज्ञानाचे आक्रमण सुशिक्षित स्त्रियांनी, तेही ब्राह्मण स्त्रियांनी पचवावे अशी धाटणी पडली. तेव्हा आजीबाईचा बटवा आणि आदिवासींचा वनौषधींचा साठा कसा अपहृत झाला, याबद्दल विचार करावासा वाटत नाही का? शेवटी फुले-आंबेडकर ही नावे केवळ काळाच्या रेटय़ाखाली घेण्याऐवजी फुले – आंबेडकर – शाहू – कॉ. शरद् पाटील इत्यादी अब्राह्मणी विचारवंतांच्या वाटय़ाला आपण का गेलो नाही, याचाही विचार आपण करायला नको का?

‘गांधी, विनोबा आणि जयप्रकाश’

– मिलिंद बोकील, मॅजेस्टिक पब्लिशिंग  हाऊस, पृष्ठे – १२६, मूल्य – १७० रुपये.

Story img Loader