मानव आणि वन्यजीव संघर्षांचा मुद्दा अलीकडच्या काळात तीव्र झाला आहे. यामागचे उघड कारण म्हणजे मानवाचे जंगलावरील अतिक्रमण. शहरीकरणाच्या रेटय़ात जंगल व त्यातल्या जीवसृष्टीशी असलेले आपले आदिम नाते संपते की काय, असे वाटण्याजोगी परिस्थिती आहे. पर्यावरण की विकास, अशा पेचात सबंध जगच अडकले आहे. आणि प्रत्येक समाज, देश आपापल्या परीने त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. तरीही जंगलांचे आक्रसणे हे वास्तव उरतेच आणि कुठल्याही संवेदनशील मनास ते नक्कीच अस्वस्थ करणार. रमेश सावंत यांची ‘जंगलगाथा’ ही दीर्घकविता त्या अस्वस्थतेला शब्दांकित करते. या दीर्घकवितेची पाठराखण करताना कवी अजय कांडर यांनी म्हटले आहे की, ‘कवितेच्या निमित्ताने माणूस आणि निसर्ग यांचे बदलत गेलेले नाते चिंतनाच्या पातळीवर प्रथमच मराठी कवितेत दीर्घ स्वरूपात व्यक्त होत आहे, हे या कवितेचे अनोखेपण आहे.’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा