आज (१२ जानेवारी) रोजी स्वामी विवेकानंद यांची शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती वर्षांची सांगता होत आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या सर्वव्यापी धर्मतत्त्व विचारांचा मागोवा..

सध्या ‘धर्म’ ही संकल्पना तिच्या मूळ आशयापासून दूर चालल्याचे विषण्ण करणारे चित्र पाहायला मिळते. परिणामी माणसांचे जीवन भरकटलेल्या जहाजाप्रमाणे दिशाहीन झाले आहे. आपल्याला नेमके काय पाहिजे आहे? ते मिळाल्याने तरी आयुष्य परिपूर्ण होईल का? असे प्रश्न स्वत:ला न विचारता जो- तो मृगजळामागे धावत सुटला आहे. आज समाजातील अराजकसदृश्य परिस्थिती हेच सांगते. व्यक्तिगत आयुष्यात उदात्त मूल्यांना स्थानच न उरल्याने नितळ चारित्र्याची उत्तुंग व्यक्तिमत्त्वे आज समाजात दुर्मीळ होत चालली आहेत. म्हणूनच आज कधी नव्हे इतके स्वामी विवेकानंदांचे स्मरण अत्यावश्यक ठरते. ‘नास्तिक नरेंद्र ते स्वामी विवेकानंद’ हा त्यांचा सामान्यत्वाकडून दिव्यत्वाकडे झालेला प्रवास अत्यंत प्रेरणादायी असाच आहे. प्रत्येक माणसाने स्वत:शी प्रामाणिक असणे गरजेचे आहे, हा महत्त्वपूर्ण संदेश विवेकानंदांच्या चरित्रातून मिळतो. जी व्यक्ती स्वत:शी अप्रामाणिक असते ती इतरांशी, राष्ट्राशी, समाजाशी प्रामाणिक असूच शकत नाही. प्रामाणिकपणा हा दिव्यत्वाकडे जाण्याचा पाया होय.

Malavya rajyog in meen
शुक्र देणार गडगंज श्रीमंती! मालव्य राजयोगाच्या प्रभावाने ‘या’ तीन राशींवर होणार देवी लक्ष्मीची कृपा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
decision making process in religious and social welfare
तर्कतीर्थ विचार : धर्मनिर्णय पद्धती व समाजहित
Kark Rashi mata lakshmi
कर्क राशीमध्ये निर्माण होईल डबल लक्ष्मी राजयोग! ‘या’ ३ राशीचे भाग्य उजळणार, माता लक्ष्मीच्या कृपेने प्रत्येक काम मिळणार अपार यश
Maha Kumbh Mela World largest gathering begins in India
दीड कोटी भाविकांचे पवित्र स्नान; भक्तिमय वातावरणात महाकुंभाला सुरुवात
tulja bhavani shakambhari navratrotsav loksatta news
शाकंभरी नवरात्र महोत्सव : सहाव्या माळेला महिषासूरमर्दिनी अलंकार महापूजा
1st anniversary celebrations of Ram Lalla idol consecration
अयोध्येत रामभक्तांची गर्दी ; रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा पहिला वर्धापन दिन सोहळा
Special article on occasion of Swami Vivekanandas birth anniversary
धर्म, अस्मिता आणि हिंदू!

आणखी वाचा – धर्म नाही, कुटिल राजकारणच जबाबदार!

स्वामीजींनी कोणतेही तत्त्वप्रमाण म्हणून स्वीकारताना ते बौद्धिक कसोटीवर घासून, पडताळून घेतले.विवेकवादाची ही खरी साधना होय. ते अंधानुकरणाच्या प्रखर विरोधात होते. खरे तर भारतीय समाजात हा मोठा दोष आहे. विवेकानंदांनी ‘सत्य’ तत्त्व शोधण्यासाठी अथक प्रयत्न केले. खऱ्या अर्थाने तितिक्षा अनुभवली. त्यासाठीची तळमळ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. संपूर्ण समर्पण भावनेने ते त्याकरता झटत होते. अनेक व्यक्ती आपल्या प्रयत्नांत समíपत नसतात. किंवा मधला मार्ग (जो कमी कष्टाचा असेल) शोधण्याचा प्रयत्न करतात आणि तरीही यशाची अपेक्षा धरतात. अशांच्या पदरी वैफल्यग्रस्तता येणे स्वाभाविक आहे.

एखादे तत्त्व वा विचार नाकारायचा असेल तर त्याचा किमान अभ्यास असला पाहिजे. परंतु सध्या अनेकजण ‘विचारवंत’ही उपाधी आपल्या नावाआधी लावताना बिनदिक्कतपणे हे तत्त्व पायदळी तुडवतात.या तत्त्वाचा प्रामाणिक शोध ही मंडळी घेत नाहीत.आणि काही वेळेस याची जाणीव असूनदेखील केवळ आपली ‘प्रतिमा’जपण्यासाठी वास्तव न स्वीकारता बौद्धिक अनाचार माजवतात.विवेकानंदांचे स्मरण याकरताही गरजेचे आहे. त्यांच्यासारखी एक नास्तिक व्यक्ती पुढे जाऊन कालीमातेची परमभक्त बनते आणि वेदांतील तत्त्वज्ञान अवघ्या विश्वाला शिकवू लागते..‘नास्तिक ते विरागी योगी’ असा विवेकानंदांचा झालेला हा प्रवास विलक्षणच आहे.

आणखी वाचा – चतु:सूत्र (गांधीवाद) : दोन महामानवांचे जीवनदर्शन

सामान्यांची दैन्यावस्था पाहून त्यांचे अंत:करण व्याकूळ होत असे.म्हणूनच त्यांनी त्यांच्या दु:खनिवारणासाठी,त्यांना जमेल ते साहाय्य करण्यासाठी स्वत:ला झोकून दिले.लोकांची दु:खे समजून घेण्याकरिता स्वामी विवेकानंद अखंड भारत फिरले. स्वामी विवेकानंदांचे वेगळेपण हे, की त्यांनी ‘शिवभावे जीवसेवा’हे आपल्या आयुष्याचे ध्येय निश्चित केले. स्वामीजी केवळ पोथीनिष्ठ पंडित नव्हते, तर ते क्रियाशील होते. त्यांना दृढ विश्वास होता, की लोकांचे भले करण्याची तुमची खरोखर इच्छा असेल तर सर्व विश्व जरी तुमच्या विरुद्ध उभे ठाकले तरी ते तुम्हाला अपाय करू शकणार नाही.तुम्ही निष्ठावान आणि खरोखरच नि:स्वार्थी असाल तर तुमच्यातील परमेश्वरी शक्तीपुढे या विरोधाचा धुव्वा उडेल.

विवेकानंदांनी आत्मविश्वास हरवलेल्या सामान्यजनांना आत्मसन्मानान जगण्याची स्फूर्ती दिली.भारताच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण करून दिले.स्वामीजींच्या प्रेरणेने कित्येकांनी आपले आयुष्य भारतमातेच्या सेवेसाठी अर्पण केले.त्यातून अनेक युवा संन्याशांचा संघ भारतमातेच्या सेवेत अवघा देश पादाक्रांत करत होता.स्वामीजींनी कसलेही व्यक्तिस्तोम माजवले नाही की कर्मकांडांचा बागुलबुवा मांडला नाही.त्यांनी जाणले होते की, धर्म हा भारताच्या सांस्कृतिक जीवनाचा पाया आहे.परंतु त्याची अवस्था जीर्ण झालेली आहे.म्हणूनच त्यांनी धार्मिक होणे म्हणजे नेमके काय,हे विशद करून सांगितले. ते म्हणतात,‘धर्माविषयी नुसत्या बाता मारून धर्माचे आचरण होत नसते. असे जीवन दाखवा, की ज्यात त्याग,आध्यात्मिकता, तितिक्षा आणि प्रेम समूर्त झाले आहे.हे सारे गुण असतील तरच तुम्ही धार्मिक व्यक्ती आहात.’भारतासारख्या अनेक धर्म एकत्र नांदणाऱ्या देशात धार्मिकतेची ही व्याख्या प्रत्येकाने आपल्या अंगी बाणवली तर एका सृजनशील समाजाची निर्मिती व्हायला वेळ लागणार नाही.
ज्या युवकांच्या क्षमतेवर विश्वास ठेवून आपण आज महासत्ता बनण्याची स्वप्ने पाहत आहोत, त्या युवकांकडून विवेकानंदांना खूप अपेक्षा होत्या. त्यांना वाटे, की ज्याचेोपल्या देशावर प्रेम आहेत्याने सामान्य जनतेला दुरापास्त असलेल्या शास्त्रांचे ज्ञान त्यांना द्यावे. कारण हेच खरे देशाचे वारसदार आहेत. स्वामीजींनी आयुष्यभर भरपूर प्रवास केला. या प्रवासात त्यांनी देशातील विविधता अनुभवली.अनेकांना ही विविधता विहित कार्यात अडथळा वाटते.पण विवेकानंद म्हणत,‘विचारपद्धतीतील ही विभिन्नता राहील तोवरच आपण अस्तित्वात राहू.मात्र, विभिन्नता आहे म्हणजे परस्परकलह,एकमेकांत भांडणे असलीच पाहिजेत असे मात्र मुळीच नाही.माझा मार्ग माझ्या पक्षी ठीक आहे, तुमच्यापक्षी नाही.याला ‘इष्ट’ असे म्हणतात. आणि प्रत्येकाचे इष्ट वेगवेगळे असू शकते.’आज विवेकानंदांचे स्मरण याकरताही गरजेचे आहे.भारतासारख्या पावलागणिक विविधता असलेल्या देशात हा प्रगल्भ विचार रुजला तरच आपण खऱ्या अर्थाने सामाजिक सद्भाव निर्माण करू शकू.

आणखी वाचा – जयंती विशेष: स्मरणशक्ती वाढवण्यासाठी करा ध्यानधारणा! विवेकानंदांचा संदेश

भारतमातेच्या उत्थानासाठी तरुणांना कार्यप्रवण करणारे विवेकानंद खरेखुरे विवेकवादी होते.ईश्वरप्राप्ती म्हणजे केवळ पोथीपंडितपणा नव्हे की कर्मकांडंही नव्हे; तर प्रत्येक जीवात्म्याचे दु:ख दूर करण्यासाठी त्याला जमेल ते साहाय्य करणे होय..अशी वास्तवदर्शी आध्यात्मिकता विवेकानंदानी प्रत्यक्ष आचरणात आणून एक आदर्श निर्माण केला.प्रसंगी आपल्या कुटुंबियांची ससेहोलपट सहन केली, पण भारतमातेच्या सेवेचे व्रत त्यांनी कधीही सोडले नाही.म्हणूनच भारतमातेच्या या महान पुत्राचे स्मरण आज अत्यावश्यक झाले आहे.

Story img Loader